सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स डेच्या निमित्ताने लिहीत आहे. तुम्हा सर्वांना सांगावे असं वाटले. मदर्स डेच काय मला तर आयुष्यभराची गिफ्ट मिळाली!!
शीर्षकात लिहील्याप्रमाणे हो! he 'said' I Love you! हा ही म्हणजे अर्थातच माझा मुलगा. माझा, ऑटीझम असलेला, अजुन एकही शब्द न उच्चारणारा कसा काय म्हणाला आय लव्ह यू?
झाले असे.. बरेच दिवसांपासून हेरून ठेवलेले aacorn AAC हे अॅप मी शेवटी विकत घेतलेच. हे होते तब्बल ८०$चे.. तशी मी फुकट रोजच काहीतरी डाउनलोड करत असते. बर्याच अॅप्सकडे मुलगा ढुंकूनही पाहात नाही. हेच त्याने ह्याही अॅपबरोबर केले असते तर फारच महागात पडले असते. खूप विचार करता शेवटी आपल्या मुलाला होईल उपयोग ह्याचा असा मनाने कौल दिला व घेतले.
थोडी माहिती : aacorn हे एकप्रकारचे AAC अॅप आहे. AAC augmentative assistive communication. ज्यांना बोलता येत नाही / ऐकू येत नाही / इतर लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत - ज्यात ऑटीझम पण येतो, अशा मुलांना कम्युनिकेट करण्यासाठीची ही एक पद्धत. पूर्वीच्या लेखांमध्ये लिहीलेली पेक्स(पिक्चर एक्स्चेंज कम्युनिकेशन सिस्टीम)चेच हे थोडे प्रगत रूप. ह्यात जनरली ग्रुपनुसार शब्दांचे चौकोन असतात, ते दाबून वाक्यं तयार करायची व ते मशिन/ अॅप तुमचे वाक्य वाचून दाखवते. थोडक्यात तुमच्या मुलाचा आवाज! (आवाज नावाचेही एक अॅप आहेच! )
ऑटीझम जगतात http://www.assistiveware.com/product/proloquo2go प्रोलोकोटूगो हे अॅप फारच प्रसिद्ध आहे. परंतू एकतर ते महाग आहे ( जवळजवळ २५०$) व तिथली ती ग्रीड सिस्टीम काही मला आवडत नव्हती. शेवटी हे एकॉर्न पसंत पडले कारण त्यात ग्रीड व्ह्यू नसून ट्री व्ह्यू आहे. तुम्ही जसेजसे अॅप वापरत जाल तसे ते अॅप प्रेडीक्टही करू लागते. एकंदरीत उपयोगी पडेल असे वाटले.
व उपयोग झालाच. विकत घेतल्याच्या दुसर्याच दिवशी, मुलगा शाळेतून आला व आयपॅड मागू लागला. (पेक्सचे आयपॅडचे चित्र देऊन. ) मी त्याला दिला नाही. व हे अॅप इन्ट्रोड्युस केले. आय वाँट आयपॅड हे वाक्य कसे तयार करायचे शिकवले. व त्याने लगेचच तसे करून दाखवले. मग त्याला अर्थातच आयपॅड दिला मी. पण या नवीन संवादाच्या माध्यमामुळे मुलगा खुष झाला. क्युरिअस झाला. व एके दिवशी त्याने उगीचच ते अॅप चाळत असताना आय लव्ह यू हे वाक्य तयार केले.
खूष होऊन माझ्याकडे आयपॅड घेऊन आला व तेच सेम वाक्य ५-७ वेळेस तरी मला ऐकवले! आईकडून रोज सत्रांदा तरी ऐकलेले वाक्य परत आईला ऐकवू शकलो याचा त्याला इतका आनंद झाला !! त्याने तोंडातून ते शब्द नाही उच्चारले तरी एकाअर्थाने he 'said' I Love You !
मला तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी आठवण मिळाली!! ती तुमच्याशी शेअर केल्यावाचून कशी राहीन मी!?
Have a Happy Mother's Day !!
कसलं गोड!!!
कसलं गोड!!!
मला वाचुन एव्हढा आनंद झाला की
मला वाचुन एव्हढा आनंद झाला की तो डोळ्यातुन बाहेर पडला तर तुम्हाला किती आनंद झाला असेल ना!
Hats off! Happy mothers day.
अभिनंदन!! छान लिहिलय
अभिनंदन!! छान लिहिलय
अभिनंदन !
अभिनंदन !
क्या बात है ! मस्तच.
क्या बात है !
मस्तच.
क्या बात है ! मस्तच.
क्या बात है !
मस्तच.
क्या बात है ! मस्तच.
क्या बात है !
मस्तच.
अरे वा!! मस्तच !!!
अरे वा!!
मस्तच !!!
खरच खूप ग्रेट आहात तुम्ही.
खरच खूप ग्रेट आहात तुम्ही. त्याने आय लव यु म्हटले हे वाचताना डोळ्यात टचकन पाणी आले.
वॉव ! ग्रेट! टेक्नॉलॉजीचं
वॉव ! ग्रेट! टेक्नॉलॉजीचं केवढं मोठं वरदान आहे !! मवॉ, तुझ्या लेकाला पण क्रेडिट आहे, त्याने ते अॅप इतके झटकन आत्मसात केलं अन त्याचा सगळ्यात बेस्ट उपयोग करून तुल मदर्स डे गिफ्ट दिलं!! हॅपी मदर्स डे!!
मनापासून अभिनंदन! खूप छान
मनापासून अभिनंदन! खूप छान वाटलं वाचून!
मनापासून अभिनंदन! खूप छान
मनापासून अभिनंदन! खूप छान वाटलं वाचून!
वा! छानच की! तंत्रज्ञानाचा
वा! छानच की!
तंत्रज्ञानाचा विजय असो!
Happy Mother's day!
Happy Mother's day!
वाह ! खूप छान हो .. खूपच
वाह ! खूप छान हो .. खूपच छान..
आपल्या आनंदात आम्हाला सामील करून घेतलात याबद्दल शतशः आभार माते..
आनंदाश्रू थांबेचनात ...
सुंदर! Happy Happy Mother's
सुंदर!
Happy Happy Mother's Day!!
अशी उपयोगी अॅप्स्स जरा स्वस्त झाली तर किती बरे होईल. खुप लोकांना फायदा घेता येईल.
हाउ स्वीट ! हॅप्पी मदर्स डे
हाउ स्वीट ! हॅप्पी मदर्स डे मदर वॉरियर.
तुझा मुलगा खूप हुषार आहे. ही विल मेक यु प्राऊड वन डे
खूप खूप छान. किती अनमोल
खूप खूप छान. किती अनमोल गिफ्ट मिलाल. तुमच्या पिल्लूला माझ्याकडून गोड पापा. आणि तुम्हाला अशीच छान छान गिफ्ट्स मिळत राहो.शुभेच्छा!
Happy Mother's Day पुढच्या
Happy Mother's Day
पुढच्या मदर्स डेला तुम्ही याहूनही उत्तम बातमी ऐकवाल, याची खात्री आहे.
खूप छान. मदर्स डे च्या
खूप छान. मदर्स डे च्या शुभेच्छा आणि तंत्रज्ञानाचे आभार.
वॉव!!! कसलं भारी.. मस्तच
वॉव!!! कसलं भारी.. मस्तच अगदी!! हॅप्पी मदर्स माय डे!!
किती मस्त
किती मस्त
अभिनंदन आणि Happy Mother's
अभिनंदन आणि Happy Mother's Day !!
वॉव !! खुप आनंद झाला वाचुन.
वॉव !! खुप आनंद झाला वाचुन. Happy Mother's Day to u too.
अभिनंदन !
अभिनंदन !
खूप मस्त वाटले वाचून.
खूप मस्त वाटले वाचून. अभिनंदन! वॉरीयर पिल्लूशी मस्त गप्पा रंगू दे! Happy Mother's Day!
खुप छान
खुप छान
मदर वॉरियर............मस्तच!
मदर वॉरियर............मस्तच! तुम्हा दोघा मायलेकरांचं अभिनंदन आणि तुला मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिनन्दन
अभिनन्दन
Congo :*
Congo :*
Pages