ऑफलाईन लेखन 'बरहा'मध्ये कसे कराल?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'ऑनलाईन' असताना 'मायबोली'त लेखन कसे करायचे, ते आपण इथे- http://www.maayboli.com/node/9728 पाहिले. आता 'ऑफलाईन' लेखन कसे करायचे ते पाहू.
विविध मराठी फॉन्ट आपल्याला उपलब्ध आहेत, जसे की 'मंगल', 'गार्गी' इत्यादी, जे वापरून आपण वर्डपॅड किंवा नोटपॅडमध्ये मराठीत लिहू शकतो. 'बरहा' हे सॉफ्टवेअर वापरूनही मराठीत उत्तम प्रकारे लिहिता येतं.

'बरहा'त कसे लिहायचे हे पायरीपायरीने पाहूया-
१) बरहा लिहिण्यासाठी 'बरहा' सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे लागते. www.baraha.com वर टीचकी मारा. तिथून बरहा संगणाकावर डाऊनलोड करा..

3.JPG

हे एकदा डाऊनलोड केलेत, की इतर कोणताही मराठी फॉन्ट नसला, तरी मराठीमधून लिहू शकाल.

२) या स्क्रीनशॉटमध्ये क्रमांक २ वर Download Baraha Unicode, BarahaPad, BarahaIME असे दिसत आहे. हेही अतिशय उपयुक्त आहे, आणि तेही संगणकावर उतरवून घ्या.

३) आता डेस्कटॉपवर 'New Baraha Document', 'Baraha IME' असे icons दिसायला लागतील. यातले 'Baraha IME' सुरू केलेत, की मराठी लिहायला सुरू होईल.. मग अचानक, ऑफिसच्या इन्ग्रजी वर्ड डोक्यूमेन्टमध्ये जन्क दिसायला लागेल Happy ही बरहा आयएमईची कमाल. हे सुरू केलेत, की तुमचा डीफॉल्ट फॉन्ट मराठी होतो, त्यामुळे सगळीकडे वेगळेच काहीतरी दिसू लागते Happy हे disable करण्यासाठी f11 ही कळफलकावरची कळ दाबा, म्हणजे इन्ग्रजी हे इन्ग्रजीतच लिहाल. मराठीत लिहायचे असल्यास, परत f11 दाबा.. f11 हे इन्ग्रजी-मराठी टॉगल स्विच असल्यासारखे आहे 'बरहा'तले.

४) 'नवीन बरहा डॉक्यूमेन्ट' उघडलेत की ऑफलाईन मराठीत लिहायला सुरूवात करता येईल. यासाठी बरहा आयएमई मात्र बन्द ठेवा. फक्त हे नवीन डॉक उघडा. उघडलेत की असे दिसेल-

4.JPG

नवीन बरहा डॉक हे दोन भागात विभागलेले असते. यातला खालचा भाग आहे, ज्यात आपण इन्ग्रजीत लिहायचे असते. जिथे लाल गोल केला आहे, ते बटण दाबले, की वरच्या भागात त्याच इन्ग्रजी मजकूराचे मराठीकरण होईल.
त्याच बारमध्ये सर्वात शेवटी '?' हे चिन्ह दाबलेत, कि 'हेल्प', अर्थात मदत मिळेल. त्यात 'Transliteration Rules' आहेत. त्यात मराठी शब्द लिहिण्यासाठी कोणते इन्ग्रजी अक्षर वापरायचे हे दिलेले आहे..

'मायबोली'मध्ये आपण लिहितो, तसेच ९९% लिहायचे आहे, पण काही अक्षरे जबरदस्त बुचकळ्यात पाडतात, म्हणून इथे मला अवघड वाटलेली आणि त्या नियमांमध्येही न सापडलेली काही अक्षरे देते..

अ) रफार द्यायचा असेल, तर कळफलकावरचे '^' चिन्ह द्या.. उदा. 'वार्‍यावरची वरात' लिहायचे असेल, तर बरहात ते vaar^yaavarachee असे लिहा.. दिसताना ते 'र'चा पाय मोडल्यासारखे दिसते, पण पब्लिश केल्यानंतर बरोबर दिसते. मात्र, ते लिखाण मायबोलीत पेस्ट केलेत, तर 'र'चा पाय मोडलेलाच रहातो Happy मायबोलीच्या नियमाप्रमाणे vaaRyaavarachee असे केलेत, की तेही ठीक होते.

ब) सर्वात छळतो तो 'ज्ञ'! हे अक्षर बरहात शोधायला फार कष्ट घ्यायला लागतात बरं Happy 'ज्ञानेश्वर' लिहायचे असेल तर चक्क 'j~jaaneshwar' असे लिहा. थोडक्यात, ज्ञ=j~j

क) अनुस्वार Mने द्यायचा, .n बरहात चालत नाही.

ड) k~ap k~ep = कॅप
k~op= कॉप
k~Mp= कँप
kA~Mp= काँप
बाकी, काना, मात्रा, वेलांटीचे नियम 'मायबोली'प्रमाणेच.

५) हे लेखन सेव्ह करा. वरच्या भागात जे मराठी झालेलं लेखन आहे, ते तसंच्या तसं मराठी (युनिकोड) सपोर्ट करणार्‍या कोणत्याही संकेतस्थळावर पेस्ट करू शकता- जसं ब्लॉगवर, मायबोलीवर वगैरे.

आधी म्हटलं तसं, सतत ऑनलाईन राहता येणं शक्य नसेल, तर बरहात लिहून सेव्ह करून, एकदमच लिखाण पूर्ण करून ते प्रकाशित करू शकता.

लिहिते व्हा,
शुभेच्छा.

विषय: 
प्रकार: 

हे छान केल माहिती दिली ते Happy
(फक्त शीर्षकात "मायबोलीकरता 'बरहा'मध्ये "ऑफलाईन" लेखन कसे कराल?" असे केले तर जास्त बरे)

पूनम,
सुरेख आणि उपयुक्त माहिती!
बरहा डायरेक्टबद्दल लिहिलं होतं मी कुठेसं, ते ही अतिशय उपयुक्त आहे कारण ते वापरुन थेट Microsoft Word/ Wordpad मध्ये तुम्हाला मराठीत लिहिता येईल (Arial Unicode MS font वापरुन). बरहाचे Writing pad वापरायची गरज नाही. नियम हे तू वर सांगितलेलेच लागू होतात.

होय क्षा, बरहा डायरेक्ट, बरहा आयएममीने थेट मराठीत लिहू शकतो.. तेव्हा मग न्यू बरहा डॉकची आवश्यकता नाही.

लिंब्या, बदललंय.

क्ष, फक्त देवनागरीत अन ते ही वर्ड वगैरेमधे लिहायचे तर बरहा डायरेक्ट उपयोगी पडते, पण त्यावेळेस, अन्सी फॉर्म वापरला जातो ज्यातिल लेखन वेबपेजवर युनिकोड मधे पेस्ट केल्यास नीट दिसत नाही.
त्यामुळेच, वेबपेजकरता (इथे मायबोलीवर पेस्ट करण्यासाठी) लेखन करायचे असल्यास ते युनिकोड मधे होणे आवश्यक व वर ते कसे होते ते दिले आहे. येवढ्याच साठी वर शीर्षकामधे सुधारणा सुचवली आहे! Happy

>>>>> तेव्हा मग न्यू बरहा डॉकची आवश्यकता नाही.
वर्ड / एक्सेल वा तत्सम MS प्याकेजेस मधे बरहा डायरेक्ट वापरुन लिहायचे असल्यास ते अ‍ॅन्सी फॉर्ममधेच लिहीता येते, जो फॉर्म नन्तर कॉपीपेस्ट करुन वेबपेजेसच्या युनिकोड फॉर्म मधे चालत नाही! म्हणून ऑफलाईन लेखनास वरील न्यू बरहा डॉकचा उपायच योग्य होय.
(मात्र, बरहा डायरेक्ट ऑन करून जर युनिकोड फॉर्म सिलेक्ट केला असेल, तर येथिल मजकुराच्या खिडकीत देखिल डायरेक्ट देवनागरीत लिहीता येते! Happy )

>>पण त्यावेळेस, अन्सी फॉर्म वापरला जातो ज्यातिल लेखन
वर लिहिल्याप्रमाणे बरहा डायरेक्ट (माझ्या अनुभवानुसार) Arial Unicode MS फाँट वापरते. त्यामुळे अशा प्रकारची अडचण येण्यास कारण नसावे.

हा पहा नमुना
***
हे लेखन बरहा डायरेक्ट वापरून, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये केलेले आहे
***

qÉÉWÒûUaÉQûÉuÉUÏ qÉÉWÒûUaÉQûÉuÉUÏ aÉ iÉÑfÉÉ uÉÉxÉ, pÉ£ü rÉåiÉÏsÉ SzÉïlÉÉxÉ ||kÉ×.||

ÌmÉuÉVåû mÉÉiÉVû aÉ ÌmÉuÉVåû mÉÉiÉVû oÉяåûSÉU, AÇaÉÏ MüÉcÉÉåVûÏ ÌWûUuÉÏaÉÉU
ÌmÉiÉÉÇoÉUÉcÉÏ aÉ ÌmÉiÉÉÇoÉUÉcÉÏ ZÉÉåuÉÔlÉ MüÉxÉç, pÉ£ü rÉåiÉÏsÉ SzÉïlÉÉxÉ ||1||

लग्गेच प्रयोग करुन बघितला रे भो!
वर्डमधे बरहा वापरुन लिहीलेली आरती इथे पेस्ट केली तर अशी दिसत्ये
माझ्याकडे, वर्डमधे अ‍ॅन्सी फॉर्म वापरुनच देवनागरी नीट दिसते
युनिकोड वापरलेले चालत नाही, अन तेथिल लेखन इथे चिकटत नाही! Sad

एक खांबी तंबु समिती, मदत समिती व प्रशासक यावर मदत मिळु शकेल काय?

पूर्वीप्रमाणेच \dev2 ची सुविधा मिळाली तर ....

प्रतिसाद kandapohe | 12 August, 2009 - 15:41
मित्रहो नव्या माबोवर एक गोष्ट मात्र मला न आवडणारी आहे. जुन्या माबोवर लिहीताना आधी नोटपॅडवर मिंग्लीशमधे लिहीले व इथे चिकटवले व प्रतिसाद तपासला की आपोआप देवनागरीत बदलायचे. त्यामुळे हाफीसात हळुच लेखन करता येत असे. विंग्रजीमधे लिहीत असल्याने शेजारच्याला पण कळत नसे. आता इथेच लिहायला लागत असल्याने पंचाईत होते. यावर काही उपाय आहे का?

संपादन प्रतिसाद deepurza | 12 August, 2009 - 15:42
उपाय निघाला तर फार बरे होइल,खरच.

प्रतिसाद limbutimbu | 12 August, 2009 - 15:52 नवीन
कान्द्या, अगदी अगदी!
देव ट्यागची सुविधा खरच मस्त होती याकरता!
अगदी वर्ड फाईल उघडून रोमनमधे बदडत बसल तरी फरक पडत नसे, या डोळ्याचे त्या डोळ्याला कळत नसे!
पुन्हा तशी काहीशी सुविधा मिळाली तर फार बरे होईल

प्रतिसाद nandini2911 | 12 August, 2009 - 15:55 नवीन
होय, त्या सुविधेमुळेच मी रेहान्चे भागच्या भाग लिहायचे... अता जमतच नाय

मदत उपलब्ध आहे Happy मी आधी लिहिलेलं 'मायबोलीत अपूर्ण लेखन कसे कराल? (वर लिंक आहे) ती वाचा.. तिथे असलेला मन्जूचा प्रतिसाद वाच.. तिने दिलेल्या लिंकवर जा.. ती सेव्ह कर.. मग तुझं मिन्ग्लिश लिखाण तिथे पेस्ट कर..

आणि एकखांबी समिती काय? ही कॉम्प्लिमेन्ट की शालीआडून? Happy

केपी, त्यातल्या त्यात http://www.maayboli.com/jslib/html/dvedt.html या ठिकाणी तसे ऑफलाईन करता येते. तु मिंग्लिश बडव, मग ते वरच्या लिंक मध्ये टाक. आणि मग मायबोलीसाठी दुरुस्त कर (जसे की तिकडे .n चालतो, इथे M लागतो इ.)

यासाठी तुम्हाला ३ वेगवेगळ्या खिडक्या चालू ठेवाव्या लागतील.
१. नोटपॅड - मिंग्लिशीत लिहायला
२. बरहा पॅड - मिंग्लिश मराठीत बदलून घ्यायला व कॉपी करायला
३. अर्थातच ब्राऊझरमध्ये मायबोली

रेसिपी: Happy
१. नोटपॅडमध्ये मिंग्लिशीत लिहून घ्या, हे असे
Step1.JPG
२. हे लिखाण बरहापॅडमध्ये डकवा, हे असे
Step1-2.JPG
३. Convert बटण दाबून हे लिखाण मराठीमध्ये बदलून घ्या, हे असे (या साठी तुमच्या बरहापॅडची प्राथमिक भाषा मराठी ठेवणे आवश्यक आहे)
Step1-3.JPG
४. मराठी लिखाण दिसते तिथे एकदा टिचकी मारुन मग माऊसचा उजवा कान दाबून बदललेले लिखाण कॉपी करून घ्या, हे असे
Step3.JPG
आणि सरळ मायबोलीच्या लिखाणाच्या खिडकीत डकवा, जे असे दिसेल -

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणाते वारी
हारी पडलो आता तुजवीण संसारी
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥

अरे वा मिलींदा. ये अच्छा प्लॅन है. Happy

आणि एकखांबी समिती काय? >>>
कवतिक. खरच स्वतः मेहनत घेऊन मदत करत आहेस म्हणुन. Happy

k~ap k~ep = कॅप
k~op= कॉप
k~Mp= कँप
kA~Mp= काँप
vaar^yaavarachee = वार्‍यावरची
j~jaaneshwar = ज्ञानेश्वर

बरहातील माझी ही अडचण तुला कशी कळली पुनम? :p खरच, तुझे खुप खुप आभार. Happy

धन्यवाद पुनम. मी ही बरहा वापरते पण ते र्‍या, ज्ञ व. साठी खुप त्रासदायक व्हायच. ते इथे कळल.
हे बरहात लिहिलेल लिखाण मी कॉपी करुन मायबोलित डकवु शकते नीट दिसत पण ब्लॉगर.कॉम साईट वर ते तसच्या तस पेस्ट होत नाही. तिथे मायबोलित सेव्ह केलेल लिखाण कॉपी पेस्टल्यावर व्यवस्थित दिसत.

>>>>>>> रफार द्यायचा असेल, तर कळफलकावरचे '^' चिन्ह द्या.. उदा. 'वार्‍यावरची वरात' लिहायचे असेल, तर बरहात ते vaar^yaavarachee असे लिहा.. दिसताना ते 'र'चा पाय मोडल्यासारखे दिसते, पण पब्लिश केल्यानंतर बरोबर दिसते. मात्र, ते लिखाण मायबोलीत पेस्ट केलेत, तर 'र'चा पाय मोडलेलाच रहातो मायबोलीच्या नियमाप्रमाणे vaaRyaavarachee असे केलेत, की तेही ठीक होते.

आत्ताच बरहा वापरुन वर्डमधे अ‍ॅन्सीमोडमधे लिहीत होतो तर वार्‍यावरची वरात हे लिहायला rxyaa असे लिहीले तरी चालतय असे दिसून आले, नेमके काय हवे?

वा,वा,वा, पूनम, 'ज्ञ' बद्दल आभार. Happy

बाकीचे अ‍ॅ, ऑ, र्‍य वगैरे दिलेयत त्यांनी 'मदती'मध्ये. ते जमतं लगेच.
पण ज्ञ अजिबात सापडेना.

@kandapohe
इथेच वर असलेल्या बटनांमधे "Apple " या संगणकाचा लोगो असलेल्या बटनावर टिचकी मारली तर पूर्वीप्रमाणे एका खिडकीत रोमन आणि दुसर्‍या खिडकीत देवनागरीत दिसू लागेल. थोडक्यात Dev हा टॅग न वापरता देखील पूर्वीप्रमाणे लिप्यंतराची सोय आहे.

मदत, मदत! Happy

अवग्रह कसा देतात बरहामध्ये?
'ऽ' म्हणायचंय मला. (अवग्रह हे नाव बरोबर आहे ना?)
मायबोलीवर लिहिताना 'a~' टंकलं की हे येतं.
S, s (इंग्रजी एस्)पेक्षा वेगळा आकार आहे याचा.

मला वाटतं बराहात अ‍ॅ लिहिता येत नाही ...~e असं लिहिलं की ऍ असंच येतं. मायबोलीसारखा अ‍ॅ नाही लिहिता येत Sad आणि वार्‍यावरचा हा शब्द वाऱ्यावरचा असाच लिहिता येतो. हे सगळ्यांचंच होतं की मला नियम सापडले नाहीयेत अजून ?

Pages