वुड डक्स ...

Submitted by rar on 27 April, 2015 - 10:00

तुम्हाला कोणाला सावंतवाडीला मिळणारी लाकडाची खेळणी आठवतात का? त्या खेळण्यात एक बदक असायचं, विविध रंगांचं. स्प्रींगमुळे त्याची मान हलायची.... ते बदक म्हणजे 'वुड डक' !
उत्तर अमेरिकेतल्या अनेक पानथळीच्या जागी हे वुड डक्स आपला संसार थाटतात. त्यातले काही स्थलांतरही करतात.
वुड डक हा एक अतिशय देखणा, रंगांची मुक्त उधळण असलेला पक्षी. थोडासे लाजाळू, स्वतःला सांभाळून असणारे हे वुडडक्स म्हणजे फोटोग्राफीसाठी पर्वणीच !
एखाद्या पानथळीच्या जागी मालार्ड, स्वान किंवा कॅनडीयन गीज जेव्हा लोकांना न बिचकता बिनधास्त मुक्तपणे संचार करत असतात, त्याच ठिकाणी तळ्याच्या किनारी वाढलेल्या एकाद्या झाडाच्या फांद्यांमधे, आडोशाला, अडचणीत जिथे सहज माणसं पोचू शकणार नाहीत अश्या कोपर्‍यात हे वुड डक्स असतात.
फिरायला गेलं की वाकडी वाट करुन, थोडंसं आडबाजूला जाऊन ह्या वुडडक्सला पाहणं हा माझा आवडता छंद. माणसांची चाहूल लागली की हे पटकन लपून बसतात. मग काहीही न बोलता, आवाज करता १०-१५ मिनीट तिथं थांबलं, की आपलं अस्तित्व त्यांना सरावाचं तरी होतं, किंवा त्याचा पूर्णतः विसर तरी पडतो. मग ते त्यांच्या लपलेल्या जागेतून बाहेर येतात आणि पाण्यात विहार करायला लागतात...
वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी आवश्यक, चांगली दूरच्या पल्ल्याची टेलेफोटो लेन्स असलेला कॅमेरा सध्यातरी माझ्याकडे नाही. पण छोट्या कॅमेरॅवर हे इतके 'क्लोसअप' असलेले पक्षांचे फोटो काढण्याची एकमेव ट्रीक म्हणजे प्रचंड पेशन्स आणि खूप काळ कोणतीही हालचाल न करता एका जागी बसून त्यांना चाहूल लागू न देता, हळूहळू त्यांच्या जवळ जावून, थोडक्यात पक्षांना 'गंडवून' त्यांचे फोटो काढणे...
ह्या वुडडक्सचे काही फोटो माझ्या Nikon Coolpix वर ....
इतकं मुक्त आणि तरीही शिस्तबद्ध रंगकाम पाहून ह्याचा निर्माता कोण असावा हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही !!

ही फीमेल वुड डक :

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages