कोबीची कोल्हापूरी मसाल्यातली भाजी

Submitted by दिनेश. on 13 April, 2015 - 05:28
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांना पुरेल
माहितीचा स्रोत: 
आमचं कोल्हापूर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु.................

खरं तर या भाजीत फोटो काढण्यासारखे काही नाही.>>>>> जबरी आलाय फोटो.

दिनेशदा, आजच्या दोन्ही पाककृती बनवायला एकदम सोप्प्या आहेत. लवकरच करून खाण्यात येतील.

हो खरंच वेगळी भाजी.

ती नेहमीची भाजी कुणालाच आवडत नाही घरात. आता ही ट्राय करेनच.

मस्त

धन्यवाद..
कोबी कुळातल्या भाज्या शिजताना, तो टिपीकल सल्फरचा वास येतो तो अनेकांना आवडत नाही. पण या भाजीत तो वास लपतो. अवश्य करून बघा.

पावभाजी मसालाही वापरता येईल, पण तो कांद्यात परतावा लागेल.

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

कोबि जरासुधा पान्च्ट निघाला तर भाजी बेकार लागते, त्यामुळे मी फक्त मसाला घालुन बघेन .. पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड!

कोबीची भाजी प्रेशर कूकरात... एवढंच वाचून मला कल्पनेनेच कसंसंच झालं. सॉरी!!
फोटोतली भाजीत पाहून अर्धा किलो कोबी-अर्धी वाटी डाळ-कपभर पाणी-कूकरला प्रेशर आल्यावर दोन मिनिटांनी गॅस बंद हे प्रमाण असेल असं वाटत नाहीये. डाळपालक गरगट्ट शिजतो तशी कोबी वरणात शिजल्यासारखी दिसतेय.

कोबी असलेली पावभाजी ( एका नातेवाईकांच्या घरी ) खाऊन पाहिली आहे. चांगली लागली होती. शिवाय नुकताच कांदालसूण मसाला उचलून आणलाय त्यामुळे करुन बघणार ही कृती.

@डाळपालक गरगट्ट शिजतो तशी कोबी वरणात शिजल्यासारखी दिसतेय.>>> ल्येकिन हम खात्री से कय सकत्ये है,की इसकी चव ऐसे बनाने से अच्छी लगेगीच!

कोबि???????????????? बापरे, नुसत्या कल्पनेनेच घाबरायला होते.. एकदा हिंमत करुन बघु काय कोबीची भाजी करुन पाहण्याची???

मंजूडी, सॉरी कशाला ? नाही आवडत तर नाही करायची.. सरळ आहे !
मला आवडते अशी मिळून आलेली. जे करून बघतील, आणि ज्यांना आवडेल ते कळवतीलच.

पदार्थांच्या बाबतीत ( शाकाहारी, अर्थातच ) मी फारसे पूर्वग्रह ठेवत नाही. त्यामूळे नवे नवे पदार्थ करून बघत असतो.

पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड!>>>> +१०००
पाणी आणि कोब्या कधीच नै .. हिम्मत झाली यदाकदाचीत तर करुन बघण्यात येईल दा ..
मी दोन्ही कोब्या फक्त वाफेवर शिजवते त्यामुळे तो वास येत नै.. कोब्या ड्रायच आवडतात मला ..
घरी डाळ कोबी करते नेहमीच . रेसीपी टाकेल म्हणते Happy

पाणि कुकर कोबी डोन्ट गो टुगेदर इन माय माइन्ड! >>> एका पाणित कोबी आणि एका पाणित कुकर असे पकडणे खूप सोपे आहे Happy आले की तिन्ही टुगेदर.

दिनेश, कोबीचा वास या भाजीत मरत असेल पण भाजी शिजेपर्यंत त्या वासाने भाजी खायची इच्छाच मरून जाते Happy

मी कोबीची भाजी बेबी कूकरमध्येच करते. पण पाणी अजिबात घालत नाही. चटणी मसाला किंवा हिरव्या मिरच्या किंवा गरम मसाला यापैकी एक काहीतरी वापरते . डाळ किंवा ओलं खोबरं किंवा मोड आलेले मूग वगैरे घालतेच.

बेबी कूकरला कोबी दीड मिनिटांनी बंद करायचा आनि प्रेशर उतरलं की झाकण काढायचं. भाजी नीट मिक्स करून घ्यायची. व्यवस्थित शिजते आणि इतका गचका अजिबात होत नाही. आणि, कूकरमध्ये शिजवल्याने अजिबात वास वगैरे येत नाही. एकदम बेष्ट!!!

भाकर्‍या आणि इडल्या म्हणतात बुवा आमच्यात ! भाकरी असेही अनेकवचन होते पण इडलीचे इडल्याच.
होसुमी मध्ये बेबीला प्रेमाने बेब्या म्हणतात तसं कोबीला कोब्या म्हटल्यासारखं वाटतंय Lol
रच्याकने, काही लोकं ती कोबी तर काही लोकं तो कोबी असं म्हणतात.

>>> अगो | 13 April, 2015 - 21:39

.
होसुमी मध्ये बेबीला प्रेमाने बेब्या म्हणतात तसं कोबीला कोब्या म्हटल्यासारखं वाटतंय हाहा

<<<

Lol

तसेही स्ट्रक्चरली बेबी आणि कोबीमध्ये अफलातून साम्य आहे म्हणा

मस्त आहे रेसेपी. माझी आई हीच भाजी बनवत असे आम्ही लहान असताना. भरपुर डाळ.. कोबी आणि भरपुर पाणी घालून वर मसाला शिंपडून गलगल शिजलेली ती भाजी भाकरीबरोबर यम्मी लागायची.

Pages