तडका - राजकिय शत्रु,...!

Submitted by vishal maske on 9 April, 2015 - 01:15

राजकिय शत्रु,...!

प्रत्येक-प्रत्येक निवडणूकाचे
वेग-वेगळे स्वरूप असते
खरे मित्रत्व आणि शत्रुत्वही
इथे मात्र प्रसंगानुरूप असते

भुतकाळातले अंदाज कधी
वर्तमानात कतरू असतात
अन् खरे वाटणारे मित्र सुध्दा
कधी राजकारणात शत्रु असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्यासारखे महान कवी मायबोलीवर आलेत या नुसत्या कल्पनेनेही खरोखर गहिवरुन येत आहे. सकाळ झाली कि मी आवर्जुन तुमच्या लिखाणाची वाट बघतोय. माझी तर वासनाच उडून गेली आहे काव्य लिखाणावरुन. उरलेलं आयुश्य तुमचं साहित्य वाचण्यात घालवावं असा मानस आहे.
एक विनंती होती तुम्हाला. ऐकाल न नक्की. खरं बघायला गेलं तर काव्यक्षेत्रात आमच्यासारखे नवोदित येतातही आणि जातातही. पण इथे मायबोलीवर आम्हालाही काही तुटकमुटक लिहायला जागा ठेवत जा. अख्खं पान जर तुम्हीच बरबटून ट्।एवले तर आम्ही कुठे बरे जावे.....
याकरिता तुमच्या दोन कडव्याच्या कवितासदृश पोष्ट दमादमाने पोष्टाव्यात.....

कळावे आपला पंखा
सं.ज.वा.
मो.न. आवश्यकता नाही
रा. गरज नाही
तालुका जिल्हा कशाला हवेत

@उरलेलं आयुश्य तुमचं साहित्य वाचण्यात घालवावं असा मानस आहे.>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif वारलो रे वारलो!

@अख्खं पान जर तुम्हीच बरबटून>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif

चल-खाली उतरु,...!

प्रत्येक-प्रत्येक टमरेलाचे
वेग-वेगळे स्व रूप असते
कुणी गवता आड,
तर कुणी झाडा आड-दिसते!

लवकर करून गेलेले कधी
दुरून बघत असतात
अन् दगड पुरवणारे मित्र ..अचानक
डबडे पळवून नेतात.

https://lh3.googleusercontent.com/-JzdxFGOQU4g/U96Bo-ExL7I/AAAAAAAACeU/qg20_NBM6Wo/s640/blogger-image--1681305898.jpg

खुशाल घुस्स्स्के
गवताडा, उठोदादा, लीड..
मो.२२२२२२२२२२

कवितेलाही वीट यावा कवींचा, असे काही नासके असतात...
बुरसाळलेल्या शब्द पावांना उष्ट्या तडक्यांचे ' मस्के' असतात....।

फुलझड्यां (दिवाळीतल्या-सुरसुरया) सम तुशारलेले भाव चित्तीचे उतरवायास हवे कवितेत....
संख्येने ' विशाल' तरी फटाके लवंगी मात्र निम्मे फ़ुसके असतात...।

स दा नकोशे...,
खोली नं 420,
रूपमहाल प्रेम गल्ली,
संपर्क डायल करा 101 किंवा 100

आपणा सर्वांचे मन:पुर्वक आभार,
कारण माझ्या वात्रटिकांना तुमच्या सारखे नकारक का होईना पण नियमित वाचक मिळाले,
आणि तुमच्या विचारांची पातळीही मला तुमच्या प्रत्येक-प्रत्येक अभिप्रायावरून समजुन आली,
स्वत:ला साहित्यिक म्हणवुन घेणारे परंतु बिनडोक विचारांचे साहित्यिक या शब्दाचे कलंकही मला या ठिकाणी पहायला मिळाले,
इतरांच्या साहित्यावर किती जळावे याची कवडीमात्र अक्कल नसणारे बिनडोकही इथे आहेतच
कारण माझ्या वात्रटिकांवर जळता जळता त्यांच्या नैतिकतेचा धूर निघालेलाही त्यांना कळत नाही,
पण असो,
काही असे बिनडोकही असायला हवे
कारण माझ्या वात्रटिकांवर नकारक का होईना पण अभिप्राय देत असतात
याचा मला फायदाच आहे
कारण तुमचा प्रत्येक अभिप्रयाय माझ्या वात्रटिकेला वरवर घेऊन येत आहे
आणि त्यातुन तुमचा जळजळाट स्वभावही दिसुन येत आहे
तुम्ही असेच जळत राहोत आणि तुमच्या जळण्यातुन मला असाच आनंद मिळत राहो ही इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो
पुनश्च एकदा सर्वांचे आभार,

वाचत रहा प्रत्येक नव्या दिवसाला नवा विचार... नवी वात्रटिका...