फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन चिकित्सा

Submitted by shantanuo on 8 August, 2009 - 00:41

मराठीत काही टंकायचे म्हणजे शुद्धलेखन ही एक कायमची डोकेदुखी बनून राहते. फायरफॉक्स हा न्याहाळक वापरत असाल तर मात्र यातून एक मार्ग आहे. फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया.
फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या.

https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/

इंटरनेट एक्स्पोअर वापरणाऱ्यांसाठी अशी सुविधा आहे की नाही ते मला माहीत नाही.

फायरफॉक्स पुन्हा सुरू करा. आता चुकीचे मराठी शब्द लाल रंगात दिसू लागतील. त्या शब्दांवर राईट क्लिक करून योग्य शब्द निवडता येईल. उजवी क्लिक करून "चेक स्पेलिंग" च्या पुढ्यात बरोबरची खूण दिसते आहे याची खात्री करून घ्या. तसेच लॅग्वेजेस या पर्यायात आता मराठी दिसू लागले पाहिजे आणि त्या पर्यायावर क्लिक केली की त्याच्यापुढे बरोबरची खूण येईल.

एखादा शब्द बरोबर असून लाल रंगात अधोरेखित होत असेल तर तो शब्द आपण आपल्या व्यक्तिगत संग्रहात "ऍड टू डिक्शनरी" हा पर्याय वापरून जमा करून ठेवू शकता.
डिक्शनरीने चुकीचा शब्द सुचविला तर त्याचा अर्थ मूळ स्रोत सुधारायला हवा.
या दुव्यावर कोणता शब्द डिक्शनरीत नको ते नोंदवा म्हणजे पुढील आवृत्तीत सुधारणा करता येईल.
(वरील मजकुराची शुद्धलेखन चिकित्सा फायरफॉक्स मधील हेच एक्श्टिंशन वापरून केलेली आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ! जमले मला. अ‍ॅड-ऑन बरोबर डिक्शनरी पण डाउनलोड करायला हवी का?
मला प्रथम हे जमले नाही पण मग तुमच्या ब्लॉग वरुन डिक्शनरी कॉपी केल्यावर दिसायला लागले.

फायरफॉक्स ३.०+ व्हर्जन पाहिजे. महागुरू आपण बहुधा २.० व्हर्जन वापरत असाल त्यामुळे आपल्याला डिक्शनरी डाऊनलोड करावी लागली.

मस्तच सोय झाली ही, अ‍ॅडमीनचं जाम डोकं खाल्ल होतं शुध्दलेखन चिकित्सक मायबोलीवर हवा म्हणून.

धन्यवाद शंतनू Happy

माझ्या कडे फायरफॉक्स ३.०.१३ व्हर्जन आहे. असो, नेमके काय झाले होते माहिती नाही पण राईट क्लिक केल्यानंतरही लँग्वेज वगैरे दिसत नव्हते. मी दुसर्‍या संगणकावर परत प्रयत्न करुन पाहतो.
ह्या सुविधेसाठी अनेक धन्यवाद !

माझ्या दुसर्‍या मशिन वर इन्स्टॉल करुन पाहिले. सगळे व्यवस्थित येते आहे. डिक्शनरी वगैरे कॉपी करायची गरज नाही पडली.

बासुरी व श्यामली यांना हे एड-ओन इन्स्टॉल करणे जमलेले नाही असे दिसते.

1) tools -- add-ons मध्ये गेल्यावर extensions Tab मध्ये मराठी डिक्शनरी अशी नोंद दिसते का?
नसल्यास वर दिलेल्या दुव्यावरून पुन्हा डाऊनलोड करून घ्या. (reinstall add-on)
असल्यास ही डिक्शनरी डिसेबलावस्थेत आहे का?
2) इंग्रजीचे स्पेल चेक फायरफॉक्समध्ये मुळातच असते. आपल्या फायफॉक्समध्ये इंग्रजीचे स्पेल - चेक आपसुकच होत आहे की नाही ते पाहा.
3) राईट क्लिक केल्यावर Languages असा पर्याय व त्यापुढे इंग्रजी व मराठी असे दोन पर्याय दिसतात का?
राईट क्लिक केल्यावर Check Spelling या पर्यायापुढे बरोबरची खु़ण दिसते का?
4) आपण फायरफॉक्सचे कोणते व्हर्जन वापरता? Help - About Firefox
फायरफॉक्सचे अगदी नवीन संस्करण पुन्हा स्थापित करून बघता येण्यासारखे आहे का? (reinstall firefox)
आपण विंडोजचे कोणते व्हर्जन वापरता?
माफ करा, फार चौकशा होत आहेत पण फक्त चालत नाही असे म्हणून काय चुकत आहे ते मला कसे कळेल?

हे जबरी आहे. Happy पण काही सुधारणा हव्यात. जसे नेहरुंना हा शब्द चुकीचा दाखवून बदल मात्र नेहरु ला असा हवा असे दिसते. तसेच अधिकार्‍याला किंवा कुठल्याही र्‍ ला तो शब्द कोषात नाही असे दाखवत आहे.

विंडोज फायरफॉक्स मध्ये करुन बघितले.अशी सोय उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. मॅक मध्ये नाही करता आले, त्याबद्दल काही करता येईल का.
मात्र डिक्शनरीत बर्‍याच शब्दांची भर घालायला हवी. मि, पानी, आनी, चुक, उघडु, क्रुश्न, क्रुति असे चुकीचे लिहीले जाणारे, वारंवार लागणारे शब्द दुरुस्त केले जात नाहीत. पण मराठी स्पेलचेकला सुरुवात झाली ही चांगलीच बाब आहे.

>> पण काही सुधारणा हव्यात. जसे नेहरुंना हा शब्द चुकीचा दाखवून बदल मात्र नेहरु ला असा हवा असे दिसते.
नेहरू या शब्दाने सुरू होणारे ५ शब्द मला विदागारात सापडले. हे शब्द बरोबर आहेत का?
नेहरू
नेहरुंच्या
नेहरूंच्या
नेहरूंना
नेहरूंनी
नेहरूंपासून

पहिल्या आणि दुसर्‍या रू बद्दल कोणी काही मार्गदर्शन करू शकत असेल तर खाली दिलेल्या पानावरील पी.डी.एफ. वाचून त्यातील चुकीचे शब्द गुगल कोडवर "इश्यूज" सेक्शन मध्ये त्याच पानावर नोंदवा. म्हणजे हे शब्द पुढील आवृत्तीत सुधारले जातील.
http://code.google.com/p/hunspell-marathi-dictionary/issues/detail?id=9

>> तसेच अधिकार्‍याला किंवा कुठल्याही र्‍ ला तो शब्द कोषात नाही असे दाखवत आहे.
अधिकार्‍याला हा शब्द जुन्या युनिकोडच्या नियमानुसार अधिकाऱ्याला असा लिहावा लागतो. हे असे का झाले याबाबतचा माझा तर्क असा...
सुरवातीला जेंव्हा युनिकोडने देवनागरीसाठी संकेत ठरवले तेंव्हा फक्त हिंदी भाषाच विचारात घेतली असावी. हिंदीत असा अर्धा र नसल्याने त्याला युनिकोडमध्ये स्थान मिळाले नसावे. या विषयावर अधिक चर्चा दुसरीकडे झालेली आहे.

http://mr.upakram.org/node/1845

>> हे फक्त विंडोजमधे चालतेय का?
मॅकची कल्पना नाही. पण लिनक्सवर नक्की चालते. (मी उबंटू लाईव्ह सेशनमध्ये नेहमी वापरतो. व्हर्जन ८.४)

फायरफॉक्स ३.५ मध्ये हे चालेल का? प्लगील इन्स्टॉल होतोय पण राईट क्लिक केल्यावर लँग्वेजेस असा ऑप्शन येत नाहिये...