भारतिय चित्रपटांचे जनक दादासाहेब तोरणे का दादासाहेब फाळके?

Submitted by कोकण्या on 22 March, 2015 - 11:13

आपण सर्व जन दादासाहेब फाळके यांना भारतिय चित्रपट सृष्टीचे जनक मानतो. पण विकि पीडिया वाचताना लक्षात आले कि पहिला चित्रपट दादासाहेब तोरणे यांनी दादासाहेब फाळकेंच्या आधि १ वर्ष भक्त पुंडलिक चित्रपट बनवला होता. पण दादासाहेब तोरणे यांचा नामोल्लेख कुठेही कधीहि आला नाहि. दादासाहेब फाळके यांनी चित्रपट सृष्टी साठि केलेल कार्य हे नक्किच दादासाहेब तोरणे यांच्या पेक्शा भरीव आहे पण पहिला चित्रपट बनवन्याचा यशस्वी प्रयत्न तर दादासाहेब तोरणे यांनी केला होता हे विसरता येनार नाहि. मग दादासाहेब तोरणे कायमच पडद्या आड कसे राहिले.

https://en.wikipedia.org/wiki/Dadasaheb_Torne

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२२ मिनिटे व ४० मिनिटे हा तांत्रिक फरक आढळला.

(कलाक्षेत्रात 'तो' विषय येऊ नये अशी मनोमन प्रार्थना) Happy

इंटरेस्टिंग माहिती , विकी वरील माहिती वाचली. दादासाहेब तोरणेंना त्यांच्या कामाचं श्रेय मिळायला हवं.

मयेकरांनी दिलेल्या लिंकमधून हे कारण ..

Experts believe that Pundalik missed out on the honour as the movie was a shooting of a popular Marathi play. Also, since the cameraman, Johnson, was a British national, the film was processed in London. Therefore, the negatives of the film-reel remained in the UK, while Torne could only get the positives home.

जर एखाद्या नाटकाचीच शूटींग असेल आणि त्यातही ते शूटींग करणारा कॅमेरामन ब्रिटीश असेल आणि प्रोसेसिंगही तिकडेच जाऊन केले असेल तर उरले काय हा प्रश्न आहे..

..............

पण याउपर तिथेच दादासाहेब तोरणेंच्या काही अचीव्हमेंट्स सुद्धा सापडल्या

Dadasaheb Torne’s studio, Saraswati Cinetone, produced many other movies like Shyamsundar, Aut Ghatkecha Raja, Bhakt Pralhad, Chhatrapati Sambhaji, Thaksen Rajputra, Savitri, Raja Gopichand, Devyani among others. Interestingly, Shyamsundar was the first Indian movie to celebrate its silver jubilee. Dadasaheb also introduced the concept of double roles in Aut Ghatkecha Raja.

पण काहीही असो, या सर्वात दोन्हीही मराठी माणूसच असल्याने भाषिक अभिमान मात्र वाटतोय.

जनक कुणी का असाना, पण ते दाक्षिणात्य चित्रपट आणि आत्ताचे बॉलीवुडचं मुबलक उगवणारं गवत पाहुन दोघेही तडफडत असतील..

जनक कोणाला म्हणावे ?
पूर्वी विमान उडवणयाचे प्रयोग झाले होते . पण शास्त्रशुद्धरित्या आणि सातत्याने ते प्रयोग करून शास्त्र विकसित करणे याला जनक म्हणतात. म्हणून राईट बंधू विमानाचे जनक !
तोरणे यांनी पहिला चित्रपट बनवल असला तरी पुढे चित्रपट्सृष्टीचा पाया घालण्यात , ती इंडस्ट्री डेवलप करण्यात फाळके यांचे योगदान आहे. त्यामुळे जनक हे फाळकेच आहेत.

शाहिर, प्रश्न नुसता जनक म्हणण्याचा नाही, पहिला चित्रपटाचा मान देखील हरेश्चंद्राला जातो.

@ऋन्मेऽऽष : इथे आपल्याला चित्रपट या संज्ञेचा विचार करावा लागेल आणि त्याची व्याख्या एवढी सहज सोपी नाहिये. तांत्रिकदृष्ट्या पहिले चलतचित्र ज्याचा निर्माता आणि दिग्दर्शक भारतीय होता ते चलतचित्र (व्हिडीओ) भक्त पुंडलिक हे आहे. पण याचे बरेच प्रोसेसिंग विदेशात झाले होते . सध्या सुद्धा चित्रीकरण आनि प्रोसेसिंग विदेशत होते पण आपण त्याला भारतीय चित्रपट म्हणून मान्यता देतोच ! आता मुद्दा असा आहे नाटकाच्या चित्रीकरणाला चित्रपट म्हणता येइल का ?
सध्याच्या व्याख्येनुसार नाही पण प्राथमिक संकल्पना म्हणून नक्कीच स्वीकारार्ह आहे. त्याकाळच्या बजेट , तंत्र यानुसार हा मार्ग स्वीकारला होता.
योग्य पुरावे असतील तर भक्त पुंडलिक हा पहिला चित्रपट मानावयास हरकत नाही.

जनक मात्र दादासाहेब फाळकेच !

लोकहो,

पहिल्या प्रतिसादात म्हंटल्यानुसार प्रश्न २२ मिनिटे आणि ४० मिनिटे असा असल्याचे दिसले. तोरणेंनी २२ मिनिटांची फिल्म तयार केली होती जी फीचर फिल्म बनू शकत नव्हती त्यामुळे तोरणेंना जनक समजले जात नाही. हा उल्लेख एका साईटवर आढळला.

दादा साहेब तोरणे यांनी "जसा" चित्रपट बनवला , तसा चित्रपट, नंतर कोणीही बनवला नाही !! या वरून त्यांनी जे बनवले ते चित्रपट नसून एक साधे शुटींग ( चित्रण ) होते . एका नाटकाचे .. मग त्याला चित्रपट का म्हणावे ?