कुपर्टिनो, कॅलिफोर्निया बद्दलची माहिती

Submitted by मामी on 26 February, 2015 - 04:39

कॅलिफोर्नियाचं कोकण झालंय का नाही हे पाहण्याच्या मिषानं यंदाच्या उन्हा़ळ्याच्या सुटीत (जून-जुलै २०१५) तिथे प्रस्थान ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तर तिथे राहणार्‍या / न राहणार्‍या / राहून आलेल्या / रहायला जाणार असलेल्या / न जाऊनही सल्ले देण्यास उत्सुक असलेल्या अशा सर्व सज्जनांकडून खालिल मुद्द्यांवर सल्ले अपेक्षित आहेत :

१. आम्ही ३ ते ४ आठवडे तिथे असू. कुपर्टिनो बेस ठेऊन आजूबाजूला भटकून येण्याचा मानस आहे. त्यामुळे कुपर्टिनो मध्ये एखादं अपार्टमेंट (२-३ बेडरुम्स) हायर करणार आहोत. हाऊसही चालेल. गेटेड कम्युनिटी असेल तर उत्तम. अशा घराबद्दल कोणाला कल्पना असल्यास सांगावे. कोणता एरीया मध्यवर्ती पडेल ते ही सुचवावे.

२. सेफ्टी इश्शुज काय आहेत?

३. लेकीकरता एखादा आर्ट्/क्राफ्टचा समर कोर्स असेल तर प्लीज सुचवा. १ किंवा २ आठवड्याचा असेल तर जमू शकेल.

४. कार हायर करण्याबाबत काही सल्ले असतील तर नक्की द्या. इथून इंटरनॅशनल लायसन्स घेऊन आलं तर तेवढं पुरेसं आहे की तिथेही कच्चं लायसन्स काढावं लागेल?

५. जवळपासची, सहसा माहित नसलेली पण प्रेक्षणीय स्थळे सुचवलीत तर छान होईल.

६. खाण्यापिण्याची फेमस ठिकाणं सुचवालच.

७. अजून काही मुद्दे राहिले असतील तर नम्रपणे ध्यानात आणून द्यावेत.

विसु: सज्जन शब्दामुळे बिचकू नका. तो असाच लिहिलाय. तुम्ही सल्ले द्या बिन्दास!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५. कार चालवायला इंटरनॅशनल लायसन्स ची पण गरज नाही. आपलं नेहेमीचं आर टी ओ चं लायसन्स चालतं. अगदी पूर्वीचं पोथी लायसन्स वर मी चालवल्येय. रेंटल कार इन्शुरन्स देत असलेलं क्रेडीट कार्ड वापरणं शक्य असेल तर ते वापरा. (इन्शुरन्स घ्यायचा असेल तर ते पैसे वाचतील)

कार चालवायला इंटरनॅशनल लायसन्स ची पण गरज नाही. आपलं नेहेमीचं आर टी ओ चं लायसन्स चालतं. >>> खरंच????? वाह वा! इतकी सुखद बातमी दुसरी नाही. त्या आरटीओच्या ऑफिसात जायचं म्हणजे प्रचंड धीर गोळा करून जावं लागतं. महापकाऊ प्रकरण.

मामी.. ठिकाणं सुचवतेय.. पहिले वेगास Wink हॉलीवुड, युनिव्हर्सल स्टुडिओज, योसेमाईटी (गर्मी असेल का?) .. बाकी सिलिकॉन व्हॅलीतच राहताय..
बाकी बेकर्स सांगतीलच Happy

विसु Proud

मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस की माझ्याकडे कम्पलसरी यायचे. आपण फिरू सगळीकडे मग! Happy

बेकरीच्या गटगला मी तिकडे येऊ शकते तेव्हा. मी समरमध्ये तिथे असायची शक्यता आहे! Happy

>>>>बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां>>>>
या एकदा दाखवीन मजा टाईप वाटतंय Lol

बाकी विवेचन येईलच प्रेक्षणीय जागांबद्दल पण बेकरीकरही अगदी प्रेक्षणीय आहेत .. एकदा तरी भेटाच त्यांनां >> :D. मामी, तोपर्यंत एखाद दोन सज्जनही शोधून काढू आम्ही.

बाय द वे. स्पेसिफिकली कुपर्टिनोच का? मध्यवर्ती हवे असेल तर सनीवेल, सांता क्लारा, सॅन होजे, फ्रीमॉण्ट, मिलपीटस चे बरेच भागही आहेत. कुपर्टिनो चालेलच पण थोडा वाईड एरिया ठेवा सर्च करायला.

मामी, लॉस एंजिलीसमध्ये आलीस की माझ्याकडे कम्पलसरी यायचे. आपण फिरू सगळीकडे मग! >>> +१. आपण मधे माझंही नाव घाला Happy

एकदा तरी भेटाच त्यांनां >>> Proud

रायगड तू एले ला शिफ्ट झालीस? सहीच!!

एलेचा धागा काढायचा का गटगचा? >>> Rofl आजच्या दिवसातला बेस्ट जोक म्हणून आपण हे वाक्य डिक्लेअर करूया. त्या धाग्यावर एलेकर सोडून सगळे असतील आणि शेवटी कोणी भेटणार नाही ते वेगळंच Proud

म्हणूनच हसतीय मी रमड. जाऊदे आपण आपली प्रंपरा पाळूया. आणि सगळे एलेकर्स तिकडे बेकरीत भेटुया! ते जास्त इझी आहे बहुतेक. Proud

मामी, भारतातून येउन एक महिन्याकरिता घर रेण्ट केल्याचे ऐकले नाही. तरी या साईटवर चेक करा
www.vrbo.com

येथे माहिती विचारून आणखी लिहीतो. काही हॉटेल्स सुद्धा वीकली किंवा मंथली मिळतात. त्यात किचन व लॉण्ड्री असलेली मिळाली तर तो ही एक पर्याय आहे.

कार चे मला नक्की माहीत नाही, पण अमित ने वरती लिहीलेले आहेच.

येथे खाण्यापिण्याची ठिकाणे विशेष माहीत करून घ्यावी लागणार नाहीत Happy

आर्ट/क्राफ्ट कोर्स ही सहज मिळतील तेव्हा, कारण तेव्हा येथे सुट्टी असते.

मामी, तुम्हाला extended stay america सारखी hotels उपयोगी पडू शकतील. तेथे मिनी kitchen आणि laundry वगैरे असते

airbnb किंवा तत्सम बेड एन्ड ब्रेकफास्ट सायटीवरून कोणी राहिलंय का? रिव्हू, फोटो बघून चांगल वाटतं आणि डील सही दिसतात बरेचदा, आठवडा/ महिना सहज मिळतं. (मला स्वतःला अनुभव नाही)
मामी तुमचं मूळ लायसन्स इंग्रजी मध्ये आहे हे गृहीत धरून वरची पोस्ट आहे.

Pages