लॉस एंजल्स, कॅलिफोर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:44

लॉस एंजल्स मधले मायबोलीकर

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
riksha 2.jpg

Poster1.jpg
--
छोट्या दोस्तांसाठी घेऊन येत आहोत.....

moon 3.jpg
---
या गणेशोत्सवात समांतर विश्वातून एक गणेशभक्त येणार आहे तुम्हाला भेटायला. तुम्ही भेटणार का त्याला?

enrollment.jpg
---
पाककृती स्पर्धा.
सोळा आण्याच्या गोष्टी.
हास्यलहरी आणि शब्दधन.
घेताय ना मग भाग?

मायबोली गणेशोत्सव २०१९ या गृपचे सभासद व्हा.
https://www.maayboli.com/node/71330

लॉस एंगेल्स एयरपोर्ट जवळच्या भागात इंडियन असणारे रेंटल अपार्टमेंट महित आहे का, स्कुल डिस्ट्रिक्ट कोनट चांगल आहे, धन्यवाद।

लॉस एंजलिस मधले मायबोलीकर, सगळे ठिक आहात ना? या आठवड्यातल्या तिथल्या भि़षण आगीचे वृतांत वाचताना व त्याने झालेल्या हानीचे फोटो बघताना कससच होत. बर्‍याच हॉलीवुड सेलीब्रीटीजची घरे बेचिराख झाली आहेत. काळजी घ्या.

मुकुंद ,आम्ही आणि माहितीतले सर्व मायबोलीकर सुखरूप आहेत. काही जणांना इव्हॅक्युएट करावे लागले आहे पण आता परत घरी पोचले आहेत.
पण काही भाग प्रचंड उध्वस्त झाला आहे Sad काही दिवसांनी कळेल काय नुकसान झाले आहे ते.

थँक्स मुकुन्द विचारपूस केल्याबद्दल,
आम्ही सुरक्षित आहोत पण घराच्या खिडकीतून दिसणारे लांबवरचे देखणे डोंगर जळताना बघणे फार स्केअरी आहे , रात्री तर जास्तच भयानक दिसते!
Screenshot_20250110_165901_Gallery_0.jpgScreenshot_20250110_165735_Gallery_0.jpgIMG_20250110_165626_030.jpg

आमचा एरीआ सेफ असला तरी शहरात चालु असलेल्या अनेक वाइल्डफायर पैकी एक घरापासून ५ मैलावर होता, दुसरा ७ मैलावर, सुदैवाने हानी झाली नाही त्या भागात तरी हेवी विन्ड्स, पोल्युटेड हवा ही संकटं अजुनही आहेत.
सर्वात नुकसान केलेला पॅसिफिक पॅलिसेड्स इथून लांब होता तसा, तरी ३० मैलावर !
शहराचे प्रचंड आवडते , खूप अ‍ॅटॅच्गमेन्ट असलेले लँडमार्क्स जळून भस्म झालेले बघणे अनबिलिवेबल आहे, सर्वात आवडता मालिबु मधला पॅसिफिक कोस्ट हायवे जळत होता आणि तिथली ओशनफ्रन्ट घरं सगळी इतिहासजमा झाली आहेत !
फार फार वाइट होते २ दिवस , विन्ड्स कमी होतील विकेन्डला पण सोमवार मंगळवार पुन्हा डेंजरस विन्ड्स वॉर्निंग आहे.

डिजे काळजी घ्या.
माझी भाची थाऊजंड ओक्स मधे आहे. तिने आता हेच सांगितले. काल सतत रेड अलर्ट येत होते त्यांना. पण आज जरा कमी झाली आग. प्रचंड पॅनिक होते. इकडे या म्हटले तर विमानाने जाऊ नका म्हटले आहे म्हणे.
मालिबू, पॅसिफिक कोस्ट हायवेच्या बाजूचे दोन्ही बाजूची घरं, दुकानं, इमारती, पॅलिसेड्स वगैरे सगळं खाक झाले. उडणाऱ्या ठिणग्या भयंकर दिसत आहेत. काका अपलॅन्ड मधे आहेत त्यांचे लाईट गेले आहेत. गाडीत चार्ज करता आहेत. वीस हजार एकर जळून गेले म्हणे. फार अस्वस्थ करणारे आहे.

सर्वांनी काळजी घ्या. Stay safe.

मालिबुचे हिन्दु टेम्पल डायरेक्ट पॅसिफिक कोस्ट हायवेवर समुफ्रकिनार्‍यावर नाहीये , त्यामुळे सेफच असावे.
त्यांच्या वेबस॑इटवर टेम्पल फायर वॉर्निंगमुळे बन्द असल्याचे लिहिलय , काही डिस्ट्रक्शन झाल्याचे लिहिले नाहीये त्यामुळे सुरक्षित असावे !