राजियांचा गड...

Submitted by जिप्सी on 19 February, 2015 - 01:06

सह्याद्री - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्‍या वेड्यांचा हा महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवराय". शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!

"राजगड" स्वराज्याची पहिली राजधानी. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडाचं सभासद बखरीमधील अजून एक नाव म्हणजे मुरबाद डोंगर (मुरुंबदेव डोंगर). मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकारने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणापेक्षा मोठा आहे. सन १६४६ ते १६४७ दरम्यान शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबतच राजगड किल्ला जिंकू घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली.

अफजलखानाविरुद्ध रचलेली व्युहरचना, तानाजींनी 'आधी लगीन कोंडाण्याचे' म्हणत आखलेली सिहंगड मोहीम, आग्रावारीहून गोसाव्याचे रुप घेउन सुखरुप आलेले महाराज, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या ह्या गडावरूनच स्वराज्याची जडण घडण सुरु होती. जवळपास वीसपंचवीस वर्षे शिवाजीराजांचे इथे वास्तव्य होते..

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
चोर दरवाजा वाट
प्रचि ०४
पाली दरवाजा
प्रचि ०५
गुंजवणे दरवाजा
प्रचि ०६
पद्मावती तलाव
प्रचि ०७
पद्मावती देवी
प्रचि ०८
पद्मावती माची
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
महाराणी सईबाईंची समाधी
प्रचि १२
सुवेळा माची
प्रचि १३
राजगडावरील सूर्योदय
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
चिलखती बुरूज आणि सुवेळा माची
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
नेढं
प्रचि २१
बालेकिल्ला
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
संजीवनी माची
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६
जय महाराष्ट्र!!!!
प्रचि ३७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच नेहेमी प्रमाणे

मला खास आवडलेला १५वा आणि नेढ्याचा जवळून काढलेला फोटो पण हवा होता म्हणजे त्याच्या भव्यतेची यथार्थ कल्पना येते.

एक सो एक प्रचि आहेत जिप्स्या...
गडच किती देखणा त्यात स्थापत्यशैली पण उत्कृष्ट. लवकरच जाणे होईल पुन्हा एकदा. Happy

शिवरायांना मानाचा मूजरा...

तव शौर्याचा एक अंश दे | तव धैर्याचा जरा स्पर्श दे ||
तव तेजातील एक किरण दे | तव जीवनातील एकच क्षण दे ||

अप्रतिम आलेत फोटो. आजच्या दिवशी राजगडाचं दर्शन ते ही जिप्सी बरोबर !!!
असे फोटो मला कधी तरी काढता येतील का ? Sad Sad Sad

वा वा वा ! केवळ जबरी फोटो !
संजिवनी माचीचे अतिशय सुरेख आलेत.
नेढ्याचे जवळून किवा नेढ्यात बसून नाही का काढले ?