मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह

Submitted by दिनेश. on 5 February, 2015 - 05:50

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी Happy http://www.maayboli.com/node/52568

मागच्या भागात हे लिहायचे राहिले होते. दुसर्‍या दिवशी ब्रेकफास्ट झाल्यावर मी टॅक्सीची चौकशी केली, पण होटेलतर्फे थेट हे काम होण्यासारखे नव्हते. पण तिथेच एक काँटॅक्ट मिळाला आणि मी टॅक्सी बूक केली.
त्या टॅक्सीवाल्याचे नाव अहमद तबूक ( फोन नंबर +९६८ ९९५८१८८५ )

दोन दिवस भटकायचे होते. दिवसाचा ५० रियाल रेट ठरला. एक दिवस पूर्व सलालाह आणि एक दिवस पश्चिम सलालाह बघायचे असे ठरले. त्याचा अनुभव खुप चांगला आला. मी त्याला चहा पाजायच्या ऐवजी तोच मला चहा पाजत असे. अनेक ठिकाणे दाखवली, शिवाय प्रत्येक ठिकाणी मला निवांत वेळ दिला. ठरल्यापेक्षा जास्तच पैसे मी त्याला स्वतःहून दिले.

पण एक मजा लिहायलाच हवी. सलालाह च्या आसपास भरपूर उंट दिसतात. मी त्यांच्याकडे बहुतेक कौतूकाने बघत असणार ( निदान त्याला तसे वाटले. ) त्याने सहज विचारले, " डू यू लाईक कॅमल्स ? " मीदेखील सहजच उत्तरलो, " सॉर्ट ऑफ " ह्याचा अर्थ त्याने काय घेतला माहीत आहे ? मला तो एका खास जागी घेऊन गेला. तिथे चक्क कॅमल मीट होते. हा घेऊन आला कि माझ्यासाठी. म्हणाला खा Happy माझ्या डिप्लोमसीचा कस लागला अगदी !

हा एवढा कंठाशी आलेला प्र्संग सोडला तर बाकी सहल मस्त झाली.

1) पांडवलेण्यांकडे डोळे भरून पाहून घेतले

2)

3)

4)
सलालाहच्या भोवती अशा डोंगररांगा आहेत. या डोंगरावर जाणारे रस्ते रात्री छानच दिसतात.

5)

6)

7)
हे सर्व डोंगर खरीफ सिझनमधे हिरवेगार होऊन जातात.

8)

मला एक तरी धबधबा दाखव असे सांगितल्यावर तो मला इथे घेऊन आला.

9) परीसर निर्जन, (पळस) तरुंचे दाट पुढे बन

10) धोत्राही होता, भग्न शिवालय तेवढेच काय नव्हते.

११) नदीचे मूळ

१२) नदीचा उगम

13) या बीचवर आपण परत येणार आहोत.

14) एक छोटासा किल्ला

15) किल्ल्याच्या खालचे गाव

16)

17) किल्ल्यावरून दिसणारे दृष्य

18)

19)

20) या वस्तू खालच्या संग्रहालयात आहेत.

21)

21) फोटोतली खवणी बघितली का ?

22)

23) Made in China

24) दिवसभर कायकाय खातच होतो ( कॅमल मीट नाही रे बाबांनो ) संध्याकाळी हॉटेलवर फक्त २ पराठे मागवले. तेही पोटभर झाले.

25) दुसर्‍या दिवशी परत भटकायला सुरवात.

26 )

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दा, ६ व्या फोटोतल्या झाडाला किती एकाकी वाटत असेल ना...
आणि ९ वा फोटो बघून कात्रजच्या घाटाची आठवण झाली...ती दारावरची तोरणं आणि कुशन्स गुजराथी वाटताहेत!
शिवाय 'उखळ मुसळ जाते....' हे पण आपल्याकडच्या जुन्या आठवणी देणारेच!! (ह्यांचं उखळ मात्र खलबत्त्यातल्या खला सारखं आहे).. त्यांच्याकडे कांडप पुरुष करतात वाट्टं!
सगळे फोटो सह्ही!! Happy

ओमान , भारताला जवळचा म्हणतो ते यासाठी. सगळी आपलीच छाप असते.

तो फोटो जूना असेल म्हणून, पण बायकाही कामे करतात. ओमानमधे बुरखा नाही. तिथल्या मुली अगदी उजळ माथ्याने आणि ताठ मानेने वावरतात. या जात्याचा आणखी एक प्रकार असतो. याचा खुंटा थोडा लांब असतो आणि तो वरती एका कमानीला बांधलेला असतो. त्यामूळे आपल्या जात्याच्या खुंटा सरकतो, तसे होत नसावे.

ओमानमधे घरे फक्त या दोन रंगातच असतात. पांढरीशुभ्र किंवा अशी मातीच्या रंगाची. आपण ज्यांना भडक मुसलमानी रंग म्हणतो, तसे घरांना अजिबात दिलेले नसतात. तिथली उष्णता हेदेखील कारण असावे, रंगांच्या निवडीमागे.

फोटो सुरेख आले आहेत. खूप उन होते का? आणि आजिबात लोकं दिसत नाहीयेत! म्हणजे टुरिस्ट नाहीत आणि स्थानिक लोकं ही नाहीत! रस्त्यांवर गाड्याही नाहीत फारश्या. फार कमी लोकसंख्या आहे का तिथे?

किती रखरखाट आहे.. जवळ जवळ ओसाडच ..

संग्रहालयातील भांडी गोड आहेत अगदी..

तुला आम्बे आवडतात का? याच चालीवर डू यू लाईक कॅमल असं होतं ते.. कॅमल राईड करता नव्हता विचारत तो Biggrin

खैर अब तुम्हे भी पता है , हीही!!!

नेहमीप्रमाणे सुंदर फोटो!!!!!!

त्या फोटोत दाखवली आहे तशी खवणी आपल्या येथे सुध्दा असते. पण फोटोतल्या खवणीची रचना वैशिष्टपुर्ण आहे तिला खालुन एका बाजुने लाकडी आधार दिला आहे आणि वरून बसणार्‍याच्या पाठीला आधार मिळावा अशी व्यवस्था केली आहे. आपल्या येथे आढळणार्‍या खवणीला खालुनच दोन्ही बाजुने लाकडी आधार असतो.

हा भागही छान. असे बारके समुद्राकिनारीचे गाव दिसले की मला नेहमी तिथे एक अत्तराची टपरी टाकावी असे वाटते. निवांत सुकून की जिंदगी. ते पराठे दही चटणी मस्त दिसते आहे.

आभार..
जिज्ञासा.. उन असतेच. पण गल्फमधले हिवाळ्यातले उन सुखकारक असते. फारसे गरम होत नाही. तसाही हा तिथला टुरिस्ट सिझन नाही, त्यामूळे कुठेच गर्दी नव्हती.

वर्षू, एकदा भेट देच.. जवळच तर आहे आणि पुढच्या भागातले फोटो बघून तर तूला नक्कीच जावेसे वाटेल. कॅमल मीट नाही खाल्लेस तर त्याच्या दूधाचे आइस्क्रीम खाऊ शकतेस ! हे प्रकार आता टुरिस्ट साठी व्हायला लागलेत. पुर्वी असे काही समोर यायचे नाही.

नरेश, तसे बघितले तर अरबी जेवणात नारळाचा वापर होत नाही. पण सलालाह मधे नारळाची लागवड पूर्वापार होत असावी.

अमा, ओमानमधला एखादा सुक अक्षरशः सुगंधी असतो. अनेक प्रकारची अत्तरे असतात. मोगरा, बकुळ, गुलाब यांची अत्तरे तिथेच तयार होतात. ( हि फुले तिथे फुलवतात. )

काही फोटो फार रखरखित वाटले. नदिचे उगमस्थाम मनोहारी आहे एकदम.
पराठा तोंपासु. Happy
दिनेश किती सुंदर फोटो आणि वर्णन करता तुम्ही Happy

नदीचा उगम बांधून काढायची पद्धत आपल्यासारखीच वाटली. फक्त आपल्याकडे स्वच्छता नावाला पण नसते.

धबधब्याचा फोटो बघून जळात पाय सोडून बसलेला औदुंबर आठवला.

सॉलिड मस्त फोटो.

तो जेवणाचा फोटो बघून भूक लागली आणि आता उपास सुरु झालाय. का मी ह्यावेळी तुमचे लेख वाचायला येते Lol