इंडिया पासेस चायना - टू बिकम फास्टेट ग्रोईंग इकॉनॉमी

Submitted by केदार on 13 February, 2015 - 01:59

China Vs India.jpg

नोट तिसर्‍या आणि चौथ्या तिमाही मधील ग्रोथ.

पूर्ण आर्टिकल कालच्या WSJ मध्ये मिळेल

प्लिज नोट - आपण चायनाच्या इकॉनॉमीला सरपास केले नाही, तर ग्रोथ रेटला. अर्थव्यवस्थेच्या माझ्या मागच्या लेखात (निवडणूकीपूर्वीच्या) मी अर्थव्यवस्थेस वाईट दिवस आले आहेत असे लिहिले होते. त्या लेखातच वल्ड बँक आणि इतरही डेटा लिहिला होता. वल्ड बँक आणि गोल्डमन ह्यांनी पुढची दोन वर्षे भारत फार काही पुढे येऊ शकणार नाही,असे नोंदवले होते. पण गेल्या दोन तिमाहीत हे चित्र हळू हळू पण नक्कीच चांगल्या दिशेने बदलत आहे. अर्थात ह्यात मी शेअरबाजार वगैरे आणत नाहीये. त्या लिंकवर हे सर्व जास्त व्यवस्थित वाचायला मिळेल.

गो इंडिया !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

GDP in USD ( Billions )
China - 10355
India - 2048
http://knoema.com/nwnfkne/world-gdp-ranking-2014-data-and-charts

Population -
China - 1,393,783,836
India - 1,267,401,849
http://www.worldometers.info/world-population/population-by-country/

आपल्यापेक्षा ५ पट मोठ्ठा आहे हो चायना चा GDP . आणि लोकसंख्या मात्र जवळ जवळ तितकीच !!

१) आनंद आहे. पण यात प्रत्यक्ष ग्रोथ किती आणि base year,factor cost vs. current prices मुळे पडलेला व ग्रॉस व्हॅल्यु अ‍ॅडिशनच्या नव्या कन्सेप्टमुळे पडलेला फरक किती याचे उत्त्तर ही आकडेवारी काढणार्‍या अधिकृत संस्थेलाच अजून शोधायचे आहे.
Taken at face value, the Indian economy will grow by 7.4 per cent this fiscal, outpacing China to become the world’s fastest growing economy. But a revision in the method of calculation has left analysts and the government’s own chief economic advisor doubting how far the data can be trusted.

२) ग्रॉस व्हॅल्यु अ‍ॅडेड हा कन्सेप्ट समजून घ्यायला वेळ झालेला नाही. थोडक्यात समजावणे शक्य असल्यास कृपा करावी,

३) या वरच्या बदलांमुळे युपीएच्या अमदानीतल्या शेवटच्या वर्षाचा ग्रोथ रेटही व त्यामुळे युपीए २ चा सरासरी ग्रोथ रेट लक्षणीयरीत्या वाढला म्हणे?

४) डिसेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन फक्त १.७% इतकं वाढलं अशी आजची हेडलाइन आहे. त्यात अजूनही परिस्थिती काळजीचीच आहे असे म्हटले आहे.

सध्या सगळेच ग्रोथ नविन परिमापकाने मोजणे सुरु केले आहे त्यामुळे बराच फरक पडला आहे असे म्हणतात.
या नविन परिमापकाने आधीचे ग्रोथ देखील मोजुन बघितले का?>

केदार तू पण?

भारताचा GDP ग्रोथ रेट खरोखरच वाढला असेल तर आनंदच आहे पण मला जेवढे समजले त्याप्रमाणे फक्त नंबर्स वाढलेत कारण ते मोजायची पध्दत बदलली आहे शिवाय चीनचा ग्रोथ रेट कमी झालाय म्हणून.

http://www.reuters.com/article/2015/02/08/us-india-economy-gdp-idUSKBN0L...

मोदीला फक्त गोलमाल करायला जमते. मोजायची पध्दत बदलायला काय कारण होते? नुसते ४ आण्याच्या कोंबडीसाठी १२००चा मसाला दाखवण्याकरीता ?

आपल्यापेक्षा ५ पट मोठ्ठा आहे हो चायना चा GDP . आणि लोकसंख्या मात्र जवळ जवळ तितकीच !!>>>>

"प्लिज नोट - आपण चायनाच्या इकॉनॉमीला सरपास केले नाही, तर ग्रोथ रेटला. " हे लिहिल्यावरही बहुदा तुम्ही दुर्लक्ष केले असावेत. असो !!

मयेकर,

in the last three months of 2014, the highest growth rates were reported for services: electricity, gas, water supply and other utility (10.1 percent); trade, hotels, transport, communication and services related to broadcasting (7.2 percent); financial, real estate and professional (15.9 percent) and public administration, defence and other services (20 percent).

The manufacturing sector expanded 4.2 percent; mining and quarrying went up 2.9 percent and construction rose 1.7 percent. In contrast, the farm sector shrank 0.4 percent.

The government estimates annual growth at 7.4 percent in the fiscal year ending in March 2015 from a revised 6.9 percent expansion a year earlier.

तुमचा नविन डेटाचा प्र्श्न आणि त्यावरचे हे ग्राफिक उत्तर

india-gdp-growth-annual_1.png

१.७ आहे डिसे मध्ये हे खरेच.

IIP remains an area of concern, showing no improvement at all. GDP showing pickup in consumption and demand is not reflected in IIP numbers," said DK Joshi, chief economist,

पण त्याच लेखात हे ही आहे.

"The proactive measures taken by the government in the last eight months have contributed to this. The RBI has also started the easing cycle and CII expects that the RBI would reduce interest rates by another 100 bps in the course of the year," the Confederation of Indian Industry said in a statement. The first nine months of the fiscal saw 2.1% growth in industrial production compared with just 0.1% in the corresponding period last year

Read more at:
http://economictimes.indiatimes.com/articleshow/46215431.cms?utm_source=...

इथे लोकं युपीए मध्ये आणत आहेत. त्यावरून मला वाद घालायचा नाही. सध्या तरी चित्र मार्च २०१४ पेक्षा जास्त चांगले आहे. त्याला इकॉनॉमीक भाषेत इयर ऑन इयर ( YoY) म्हणतात.

केदार तू पण?

भारताचा GDP ग्रोथ रेट खरोखरच वाढला असेल तर आनंदच आहे पण मला जेवढे समजले त्याप्रमाणे फक्त नंबर्स वाढलेत कारण ते मोजायची पध्दत बदलली आहे शिवाय चीनचा ग्रोथ रेट कमी झालाय म्हणून. >>

मनिष अरे एकाच वाक्यात अन प्रश्नही आणि उत्तरही ??

तू पण म्हणजे .. मोदींचा भाट? अरे राजा हे आकडे आहेत, ते खरे बोलतात. YoY ग्रोथ नसेलच झाली तर माझे काही म्हणणे नाही.

मोदींनी GDP मोजण्याचे बदलून सगळी आकडेवारी खोटी केली हे म्हणणे असेल तर त्यावर मला काही मत द्यायचे नाही.

-----

इकॉनॉमिक्स इज डीप,

जिडीपी वाढतोय ते खरे आहे आणि IIP मध्ये ग्रोथ नाही हे ही खरेच आहे.

मनिष अरे एकाच वाक्यात अन प्रश्नही आणि उत्तरही ?? >> मला जेवढे समजले तेवढे मी लिहिले. मला समजलेले चूक पण असू शकतं म्हणूनच तर तुला विचारलं. जर खरोखरच ग्रोथ रेट वाढला असेल तर चांगलेच आहे.

मोजण्याची पद्धत का बदलली यामागील कारण कोणी सांगु शकेल का?
आणि त्या बदललेल्या पद्धतीनुसार मागील ग्रोथचे मुल्यमापन परत एकदा करुन पाहिले आहे का?

खरे आहे अभियांताना ही माहिती समजणे जड जात असेल. मला नेहमी फायनान्स हा विषय फार जड जातो समजायला. ईकॉनॉमिक टाईम्स मला कधीच झेपला नाही. प्रत्येक वाक्यात एक एक परिभाषा, सज्ञा असते. ती सज्ञाच माहीती नसेल तर ते वाक्य कळत नाही. केदार इथे जे लिहितात ते वाचल्या जाते पण समजत नाही ह्याचे शल्य नेहमीच सोबतील येते Sad असो.

मुळ आर्टिकल न वाचताच इथे घमासान चर्चा होणार आहे हे माहित आहे म्हणुन मला जे महत्वाचे वाटले ते इथे चिकटवतेय म्हणजे ज्यांना खरेच रस आहे त्यांना काहीतरी मिळेल.

Of course, China’s economy is still four times the size of India’s.

“There’s no comparison between these growth rates because of the size of the economy of China,” said Ashish Kumar, director general of the Central Statistics Office as he announced the new GDP growth numbers. “If this kind of growth continues and China continues to perform at a lower level, then still it will take 20 to 30 years to catch up.”

Still, if it can keep up this pace at least India will be gaining some ground. More importantly, a return to high growth might mean India is following in China’s footsteps and entering a take-off phase.

The South Asian nation needs to revamp its economy to help create more manufacturing jobs and savings if it wants to become the next China, said Frederic Neumann, an economist at HSBC in a recent report.

“That’s a challenging transformation,” he said. “India may never quite match the rapid ascent of China, but even at a slightly slower speed it will start to make waves.”

मुळ आर्टिकल न वाचताच इथे घमासान चर्चा होणार आहे हे माहित आहे >> +१

म्हणून मी पण साशंक होतो हे द्यायला. मोदी गँग किंवा आपोझिट गँग तुटून पडतेच आणि ज्यांना खरेच काही लिहायचे /शेअर करायचे ते बाजूलाच राहतात. पण जित्याची खोड . तरी मोदी व काँग्रेस ही नावं टाळली होते.

माझा इकॉनॉमिस्ट मित्र जो मोदींचा कट्टर विरोधक आहे तो लिहितो, "इट्स अनफेअर टू क्रिटिसाईज NDA दॅट देअर आर ओन्ली स्पिचेस आणि सेल्फिज, थिंग्स आर बिइंग ड्न .. लेटस गिव्ह इट टू देम"

असो सगळेच विरोधक खिलाडू असतात असे नाही त्यामुळे मोदी बॅशिंग साठी इतर धागे आहेत, प्लिज तिकडे धुमाकूळ घालावा ही नम्र विनंती.

पद्धत बदलली तरी आकड्यांचा ताळ्मेळ सरकारला घालुन दाखवावा लगेलच. दाखवायचे म्हणुन काहीही गोलमाल आकडे सरकार दाखवते असे म्हणता येणार नाही.

मयेकर वॅल्यु अडेड अप्रोच मधे वॅल्यु अॅडेड टॅक्सेस आणि सबसीडी यांचा संबध येतो.

ते ग्राफिक उत्तर माझ्या प्रश्नाचे नाही. जीडीपी मोजण्यासाठी ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड हा कन्सेप्ट वापरण्यात आला , तो नक्की काय असा माझा अ‍कॅडॅमिक प्रश्न होता.

मी लिंक दिलेल्या बातमीत ते थोडक्यात लिहिलेले होते, पण मला कळले नव्हते.The GDP growth in 2010-11 was calculated based on factor cost which has now been changed to constant prices to take into account gross value addition in goods and services as well as indirect taxes. Besides, the base year has been shifted to 2011-12 from 2004-05 earlier.

आता थोडा वेळ आणि ताण देऊन विचार केला तर लक्षात आले की :
आधी जीडीपीसाठी कॉस्ट हा आधार होता तर आता (मार्केट) प्राइस आहे. (अकाउंटिंग मधले एक तत्त्व : closing stock is valued at cost price or market price, whichever is lower. हे उगाचच आठवले.) त्यात इनडायरेक्ट टॅक्सेसचीही भर घातली. म्हणजे उत्पादन खर्चाऐवजी बाजारभावाने जीडीपी मोजले जाणार व याला ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड असे नाव मिळणार. माझी समजूत चुकीची असू शकेलही. पण याचा सरळसरळ अर्थ डेटा इन्फ्लेट केला गेला असा होतो. त्यामागे काही काळेबेरे आहे असे म्हणत नाही. पण सार्वत्रिक चित्र चिंतेचे असताना हा डेटा व ग्रोथ रेट त्याच्याशी मेळ खात नाहीत.
आधार वर्ष बदलण्याने काय फरक पडला असेल याची कल्पना नाही, पण हे पिरियॉडिकली होतच असते, त्यामुळे त्यात विशेष काही नसाव

२) या विक्रमाबद्दल भारतातलेच अर्थतज्ज्ञ अजून आनंद मानायला तयार नाहीत.
अ) “We will be watching the February 9 release with great care and dwell deeply into what we see there. At this point, it is premature to take a strong view based on these GDP numbers,” राजन : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर..
आ) Assocham said the revision was confusing as “investment is yet to revive, consumer demand is not returning with a significant pace despite a sharp reduction in crude oil prices.”

या बदललेल्या गृहितकांवर २०१२-१३ आणि २०१३-१४ चे वृद्धीदर रिव्हाइज केले गेले होते ते पाहून आपण कन्फ्युज्ड असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटले. चालू वर्षाच्या वृद्धीदराबद्दलही त्यांनी कन्फ्युज्ड असायला हवे.

चालू वर्षातल्या वाढीचा मोठा भाग सर्व्हिसेस सेक्टरमधल्या वाढीचा व युटिलिटीजमध्ये सरकारने केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आहे.

अंदाजापेक्षा कमी टॅक्स कलेक्शन (ज्यामुळे सरकार खर्चात काटकसर करत सुटलेय), कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल, पायाभूत उद्योगांत (कॅपिटल गुड्स, बेसिक इंडस्ट्रीज), कन्झ्युमर ड्युरेबल्स मधली व वाहन विक्रीतील मंदी ही विक्रमी वृद्धिदराशी जुळत नाहीत.

मोदींच्या मेक इन इंडीयाचा भारताला फारसा फायदा दिसणार नाही ,इंडस्ट्रीयल ऑटोमेशनमुळे लेबर कमी लागतो ,त्यामुळे कमी रोजगार निर्मित होतील. त्याऐवजी सर्विस इंडस्ट्रीला मोदीँनी प्राधान्य द्यायला हवे.

चालू वर्षातल्या वाढीचा मोठा भाग सर्व्हिसेस सेक्टरमधल्या वाढीचा व युटिलिटीजमध्ये सरकारने केलेल्या गुंतवणुकीचा परिणाम आहे >>>

हे मी देखील वर लिहिले आहे. in the last three months of 2014, the highest growth rates were reported for services:

या विक्रमाबद्दल भारतातलेच अर्थतज्ज्ञ अजून आनंद मानायला तयार नाहीत. >>>

ह्याला विक्रम वगैरे मी तरी म्हणत नाहीये. ती न्युज दिली इतकेच. तुम्ही दिलेल्या लेखात ते फक्त कॉशस आहेत एवढेच लिहितात. त्यात काळेबेरे आहे असे नाही, इनफॅक्ट लेखाचे टायटलच, Don't rush in using new GDP data for policies असे आहे.

(अकाउंटिंग मधले एक तत्त्व : closing stock is valued at cost price or market price, whichever is lower. हे उगाचच आठवले.) त्यात इनडायरेक्ट टॅक्सेसचीही भर घातली. म्हणजे उत्पादन खर्चाऐवजी बाजारभावाने जीडीपी मोजले जाणार व याला ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड असे नाव मिळणार. माझी समजूत चुकीची असू शकेलही. पण याचा सरळसरळ अर्थ डेटा इन्फ्लेट केला गेला असा होतो. >>>>>>

BTW तुम्ही जे अकाउंटीग चे तत्त्व देताय ते कंपनीच्या किंवा भारताच्या बॅलन्श शीट साठी असते. स्टॉक व्हॅल्युशन साठी. नाहीतर प्रॉफिट वाढवून दिसतो म्हणून ! तसे बघीतले तर अकाउंटीगचे आणखी एक तत्व म्हणजे डिप्रिशीएशनचे प्रोव्हिजन करा. जे आपण करतो. पण हे तत्त्व देखील GDP मध्ये वापरले जात नाही. त्यामुळे सगळेच अकाउंटींग प्रिन्सिपल जसेच्या तसे लागू होतात असे नसते.

खरेतर जर तुम्ही वल्ड बँकेच्या तक्त्याकडे नजर घातली तर, "याचा सरळसरळ अर्थ डेटा इन्फ्लेट केला गेला असा होतो" असे लिहिले नसते. वल्ड बँक देखील सर्व देशाचे जीडीपी कम्पेअर करताना मार्केट रेट वापरते. उदा दाखल हा एक डेटा.

http://data.worldbank.org/indicator/NY.GDP.MKTP.KD.ZG

GDP growth (annual %)
Annual percentage growth rate of GDP at market prices based on constant local currency. Aggregates are based on constant 2005 U.S. dollars. GDP is the sum of gross value added by all resident producers in the economy plus any product taxes and minus any subsidies not included in the value of the products. It is calculated without making deductions for depreciation of fabricated assets or for depletion and degradation of natural resources.

म्हणजेच अप्रत्यक्ष कर वल्ड बँक अ‍ॅड करते. त्यामुळेच अरविंदन पण त्याच लेखात डायरेक्ट प्रश्नावर "Are the new GDP numbers on a par with international standards? " उत्तर देताना "The improvement in data, methods and analysis are simply superb and on a par with international standards." असे लिहितात.

-------

आता येथे काही जण इंटरनॅशनल सॅन्डर्ड वापरले ह्याचे खापर मोदीवर फोडत आहेत. कान्ट हेल्प देअर !!

I wonder my posts really have any confrontational or partisan approach. I have tried to be as objective as possible. Thank you for making me aware of international standards, I wasn't earlier...(2) some economists like submit balls don't value growth rates influenced mainly by govt spending as in utility sector.(3) the other indicators like tax collections, consumer spending and corporate earnings do not match with this new estimated growth rate. I didn't see any celebrations here on india overtaking China. The mood is of mostly disbelief. (4) The growth rates for previous two years have been revised too, and now those are respectable numbers, and that contradicts one of your old thread's proposition.

It will indeed be a matter of pride if india becomes the fastest growing economy, which it is likely to become sooner or later. But we must also remember that China manages and decides it's own growth rate and I am not talking about statistics alone. They might be thinking long term. In their own interest and pausing to moderate the growth. Which had a lesson for india too.

आता येथे काही जण इंटरनॅशनल सॅन्डर्ड वापरले ह्याचे खापर मोदीवर फोडत आहेत. कान्ट हेल्प देअर !! > अहो या आधी देखील पंतप्रधानांवरच खापर फुटत होते हे विसरलात का? आता मोदींवर फुटत आहे. हिशोब बरोबर होत आहे. Light 1 :कळवा: :ठाणे:

The growth rates for previous two years have been revised too, and now those are respectable numbers, and that contradicts one of your old thread's proposition. >>

शुअर आणि आय डोन्ट माईंड दॅट!. रिव्हाईज्ड रेट नुसारही तो दर कमीच आहे. खूप उच्च वगैरे नाही Wink

नाउ सिन्स यु आर टॉकिंग लास्ट इयर --

"कंपन्यांचे निराशाजनक तिमाही निकाल, पायाभूत उद्योगांत (कॅपिटल गुड्स, बेसिक इंडस्ट्रीज), कन्झ्युमर ड्युरेबल्स मधली व वाहन विक्रीतील मंदी ही विक्रमी वृद्धिदराशी जुळत नाहीत." हे आत्ताचे तुमचे वाक्य

आणि माझे मागच्या वर्षीच्या लेखातील अशी अनेक वाक्य. मग आत्ता जर जुळत नसतील तर मागच्या वर्षी (आणि त्या मागच्या काही) कसे आय ऑल वेल होते?

I wonder my posts really have any confrontational or partisan approach >> ते शेवटचे वाक्य तुमच्या साठी नाही.

पण पार्टिसन अ‍ॅप्रोच वाटला : डेटा इन्फेट करणे हा वाक्यप्रचार.

राहिली गोष्ट सेलिब्रेशन तर त्या सेलिब्रेशन करण्यासारखे काही नाही. वर लिहिल्यावर पण तुम्ही परत तोच प्रश्न विचारला. बातमी शेअर करण्यासाठी लिहिले आहे.

Thank you for making me aware of international standards, I wasn't earlier.. >>> वेलकम. !

They might be thinking long term. In their own interest and pausing to moderate the growth. >> पॉसीबल. पण मेक इन इंडिया जर खरेच झाले तर चायना ची गती नो व्हेअर टू हाईड अशी पुढच्या २० वर्षात होऊ शकते. लॉंग रेंज प्लानिंग इज डिफरंट बॉल गेम.

अहो या आधी देखील पंतप्रधानांवरच खापर फुटत होते हे विसरलात का? >>> कसे विसरेल. मी पण फोडतच होतो ना ? पण जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणावे, मग ते मनमोहनांनी करो वा श्री ऋग्वेद ह्यांनी.

आता मोदींवर फुटत आहे. >>. अहो पण खापर फोडण्यासाठी त्यांनी काय केले ते तर कळू द्या? इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड फॉलो करणे हे का? मग मज्जाय Light 1

चांगले म्हणावे पण म्हणत असलेले कुठे दिसले नाही हो. असो वेळ गेली. मोदींनी चांगले केले तर बोलुच.
सध्या बॅकेचे डेबिटकार्ड नविन रिन्यु करत असताना विसा मास्टर कार्ड देण्याऐवजी रुपी देत आहेत. जनधनवाल्यांबरोबर बिझिनेसवाल्यांच्या माथी देखील मारले जात आहे. ऑनलाईन शॉपिंग करणार्‍यांना रुपी वापरायला जड जात आहे. बर्‍याच तक्रारी येत आहेत. इतक्या घाईघाईत स्वतःचे योजना राबण्याऐवजी किमान पुर्णपणे चालुन करुन टेस्टिंग बघुन मगच मार्केट मधे आणायला हवी होती. असो आपल्या राजकारण्यांची जुनी खोड आहे त्यात मोदी देखील हळुहळु शामिल होत आहेत.

इंटरनॅशनल स्टॅन्डर्ड फॉलो करणे हे का? > जिथे आकडे फुगले ते स्वीकारले गेले. त्याला इंटरनॅशनल स्टँडर्ड मुलामा दिला. याउलट मनमोहन साहेबांनी उगाच आकडे फुगवण्याचा खेळ न खेळता खरे आकडे दाखवले. ते लोकांना रुचले नाही. आता मुलामा देउन मोदी पचवायला लावत आहे. मज्जाय Light 1
वैधानिक इशारा :- जास्त बाहेरचे चटकमटक चमचमीत खाउ नये. तब्येत बिघडण्याचा धोका अधिक असतो.

कबीर. | 13 February, 2015 - 14:07
मोजण्याची पद्धत का बदलली यामागील कारण कोणी सांगु शकेल का?
आणि त्या बदललेल्या पद्धतीनुसार मागील ग्रोथचे मुल्यमापन परत एकदा करुन पाहिले आहे का? >>

तुमच्या प्रश्नाचे उत्तर वर दिले आहे Wink याहुन चांगले उत्तर तज्ञांना विचारावे

लेखकाचा तसा हेतु नसला तरीही शीर्षक सेन्सेशनल आणी दिशाभूल करणारे आहे.

समजा भरत ला पन्नास हजार पगार आहे आणी चंदूला दोन लाख. यावर्षी भरत ला ७.३% पगार वाढ मिळाली आणी चंदूला फक्त ६.९ %. तरीही भरत ने चंदूला मागे टाकले असे आपण म्हणत नाही. इंडिया पासेस चायना चा ध्वनर्थ तसाच होतो.

टू बिकम फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी हा शीर्षकाचा उत्तरार्धही चुकीचा आहे. टू बिकम फास्टेस्ट ग्रोइंग लार्ज इकॉनॉमी असे हवे. यापेक्षा जास्त ग्रोथ रेट असलेल्या लहान इकॉनॉमीज जरूर असतील.

मुळात ग्रोथ रेट ची तुलना ही आकार जवळजवळ सारखा असलेल्या इकॉनॉमीज बाबतीतच योग्य आहे. बिहारचा ग्रोथ रेट महाराष्ट्र्र्रपेक्षा जास्त असेल. अमेरिकेचा ग्रोथ रेट भारतापेक्षा फार कमी आहे पण म्हणून भारतात येण्यासाठी अमेरिकन लोकांची झुंबड उडत नाही.

स्वस्त मनुष्यबळ आणी पर्यावरणाबद्दल बेफिकिरी हे चीनचे दोन कॉम्पीटिटिव अ‍ॅदवान्तेजेस आहेत. जसजसा चीनचा विकास होईल तसतचे चिनी लोकांचे जीवनमान उंचावेल आणी त्यांच्या पगाराच्या अपेक्षाही वाढतील आणी स्वस्त मनुष्यबळ हा फायदा कमी होईल आणी ग्रोथ रेट मंदावेल हे अपेक्षितच होते. त्यामुळे भारताचा वेग चीनपेक्षा वाढला याऐवजी चीनची इकॉनॉमी हळू हळू स्थिरावते आहे असे जास्त सांयुक्तिक आहे.

स्वस्त मनुष्यबळ आणी पर्यावरणाबद्दल बेफिकिरी हे चीनचे दोन कॉम्पीटिटिव अ‍ॅदवान्तेजेस आहेत.>>
थोडे दिवस थांबा हे दोन्ही 'अ‍ॅडव्हान्टेजेस' आपल्याकडेही नक्कीच असतील, स्वस्त मनुष्यबळ तर अधिपासूनच आहे आणि उद्योग वाढू न देणारे दुष्ट पर्यावरणीय कायदे रिव्होक होताहेत http://qz.com/255772/the-11-environmental-disasters-narendra-modi-blesse...
आणि पर्यावरण्वाद्यांना देशद्रोही ठरवले जात आहे, http://www.firstpost.com/india/greenpeace-activist-stopped-at-delhi-airp...
सैंय्या भये कोतवाल अब डर काहेका!

बरेच इकॉनॉमिस्ट या वाढलेल्या आकड्यांमुळे आश्चर्य चिकीत झाले आहेत. बर्‍याच जणांचे असे मत पडले की जी वाढ दिसुन येते आहे त्याच कारण प्रायवेट कंझमशन एक्स्पेंडीचुअर मधे आहे. गेल्या २०१२ पासुन बर्‍याच राज्यांच्या निवडणुका होत आहेत २०१४ ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या नंतर अनेक राज्यांच्या होत आहेत. तपशीलात जात नाही पण यावर सुद्धा कॉन्स्पीरसी थिअरी असतिल.

दोन दिवस उशिरानेच इथे लिहायला वेळ झाला. क्षमस्व.

१) मनीष यांनी जे "केदार तू पण?" असे म्हटले, तेच माझ्या मनात आले. कारण नुसता एक आकडा किंवा बातमी पाहून धागा काढणे तुमच्यासारख्या अर्थतज्ज्ञाकडून अपेक्षित नाही. तर त्याबद्दलची सविस्तर व संतुलित माहितीही अपेक्षित आहे. जर इथल्या वृत्तपत्रांत, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर व देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यासकट अनेक तज्ज्ञ ही आकडेवारी नीट समजून घेतली पाहिजे, तिचा व सद्य परिस्थितीचा ताळमेळ दिसत नाही असे म्हणत असतील , तर त्याची किमान नोंद तुमच्याकडून अपेक्षित होती. किंवा नक्की कशामुळे ही एवढी मोठी उडी आपण मारली त्याचे कारण हवे होते.

२) <<<माझ्या "The growth rates for previous two years have been revised too, and now those are respectable numbers, and that contradicts one of your old thread's proposition." या विधानावरचे तुमचे उत्तर " शुअर आणि आय डोन्ट माईंड दॅट!. रिव्हाईज्ड रेट नुसारही तो दर कमीच आहे. खूप उच्च वगैरे नाही" >>>

वर्ल्ड बँकेने त्यांच्या पद्धतीनुसार पुन्हा मोजलेले ग्रोथ रेट्स (लिंक( दिल्याबद्दल आभार. भारताचे तिथे उपलब्ध असलेले ग्रोथ रेट अजिबात उच्च नाहीत हे अगदी नीट स्पष्ट होते आहे. (यावरून तुम्ही अजिबात पार्टिझन नाही हेही सिद्ध झाले.)

2010 2011 2012 2013
China 10.4 9.3 7.7 7.7
Germany 4.1 3.6 0.4 0.1
India 10.3 6.6 4.7(५.१) 5.0(६.९)
Indonesia 6.2 6.5 6.3 5.8
Japan 4.7 -0.5 1.8 1.6
South Africa 3.1 3.6 2.5 1.9
United Kingdom 1.9 1.6 0.7 1.7
United States 2.5 1.6 2.3 2.2
त्या टेबलमधले ग्रोथ रेट्स हे रिव्हिजन पूर्वीचे आहेत हा भाग आणखी वेगळा .रिव्हाइज्ड ग्रोथ रेट्स कंसात दिले आहेत. The revised numbers show GDP growth rose from 4.7 per cent to 5.1 per cent for 2012-13 and from five per cent to 6.9 per cent for 2013-14.

आधीच्या काळातले नुसते ग्रोथ रेट्स पाहून किंवा कसेही ऑल इज वेल असे मी म्हटल्याचे आठवत नाही. पण त्या काळातल्या नोंदवल्या गेलेल्या ग्रोथ रेटबद्दल कोणी शंका घेतल्याचे आठवत नाही.

<<<अरे राजा हे आकडे आहेत, ते खरे बोलतात. YoY ग्रोथ नसेलच झाली तर माझे काही म्हणणे नाही. >>> युपीएच्या काळात ग्रोथ झाली पण व्हावी तितकी झाली नाही असे तुम्ही म्हणालेलात. तद्वतच YoY ग्रोथ झाले पण हे आकडे सांगतात तितकी खरेच झाली का? याचे उत्तर नजीकच्या भविष्यकाळात मिळेलच.

-------

वाढत्या ग्रोथ रेटमागचे एक कारण वाचनात आले. सर्व्हिसेस सेक्टरने नोंदवलेली चांगली वाढ आणि गेल्या ३-४ वर्षांत वाढलेले सर्व्हिस टॅक्सचे दर.

मोदींनी भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे ढोल बडवायला सुरुवात केली आहे. पण अर्थमंत्र्यांना, अर्थतज्ज्ञांना मात्र ग्राउंड रिअलिटी लक्षात घेऊनच पुढची वाटचाल करावी लागेल.
अनेक तज्ज्ञांनी सूचना केली आहे की हा वृद्धिदर मोजणार्‍या भारतीय सांख्यिकी संस्थेने काही काळ जुन्या व नव्या पद्धतीने असे दोन्ही दर मोजून घोषित करायला हवेत.

सर्वाधिक ग्रोथ रेटच्या बाबत भारताने चीनचे सर्वोच्च स्थान पटकावले, पण आकडेवारीबद्दलच्या विश्वसनीयतेबाबतही आपण चीनची जागा घेऊन नये ही एक सिन्सियर विश आहे.
There are a number of issues that follow. I think there would be legitimate questions raised by overseas analysts and investors about the credibility of Indian data (there's enough of that already, given the jumpiness of indices like the IIP). Thus, we ascend the dais - previously occupied almost solely by China (oh, happy day!) - of countries whose macroeconomic prints are often taken with a generous fistful of salt.

जाता जाता, भाववाढीचे दर मोजायचे आधार वर्ष व पद्धतही बदलली जाणार आहे. Arithmetic mean ऐवजी geometric mean धरले जाणार आहे. यामुळेही भाववाढ कमी झाल्याचे भासण्याची शक्यता आहे.

चांगली पोस्ट आहे मयेकर.. मोदीभक्तांनी त्या आकडेवारीवरून लगेच मोदींचा डंका पिटायला चालू केला होता. त्याचवेळी केदारचा हा बाफ बघितल्यावर हे तसेच काहीसे आहे असं वाटलं म्हणून "केदार तू पण" हा प्रश्न. केदारला मी जेव्हढा ओळखतो आणि तो स्वतःही जे क्लेम करतो (आणि माझा त्याच्या क्लेमवर विश्वास आहे) की तो न्यूट्रल आहे त्यावरून त्यानं असा बाफ उघडावा हे काही मला झेपले नाही म्हणून तो प्रश्न.
जर खरोखरच ग्रोथ झाली असेल आणि देशाचा फायदा होत असेल तर चांगलेच आहे.

Pages