मोफत मराठी पुस्तकं

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
3 वर्ष ago

ही लिंक कुठे टाकायची हे नक्की न कळल्यानी इथे देतो आहे:
https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0...

४४४ पुस्तकं महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

यादी बघितली. सगळी पुस्तकं वाचली जाणार नाहीत पण तरी काही नावं वाचून अरे हे वाचायला हवं असं वाटलं. धन्यवाद लिंक इथे दिल्याबद्दल.

खूप छान! दुर्मिळ खजिना.
ह्यातील काही पुस्तकं नक्कीच वाचली जातील.
धन्यवाद!

जबरदस्त... यादी वरवर चाळली. वेळ कमी पडेल ईतकी छान छान पूस्तके आहेत.

माहितीकरिता शतशः धन्यवाद...

खतरनाक...इतके सारे बुक्स ते हि ई-बुक .. त्यातही ते मराठी मधे... वॉव. Happy आजच्या दिवसाची सुरुवात झक्कास झाली . काय वाचु अन काय नको असं होतयं . विचार करतेय आधी सर्वच्या सर्व डाऊनलोडच करुन घ्यावेत... शतशः आभार तुमचे शेअर केल्याबद्दल.. _/\_ Happy

मी ही लींक माझ्या इतर मित्रमैत्रीणींना पुढे पाठविली तर चालेल का ? जे मायबोलीचे सदस्य नाहीत अशांना ?

सुंदर...अप्रतिम...याला म्हणतात खजिना, खर्‍या अर्थाने.

सुरुवातीचा एक तास निव्वळ पुस्तकांची नावे वाचण्यातच व्यस्त केला....जातककथा संग्रह दिसलयक्षणी तिकडे धाव घेतली. डाऊनलोडही चटदिशी होत असल्याने व फॉन्ट्सचीही कसली अडचण जाणवत नसल्याने वाचन आनंद मुक्तपणे घेता आला. ग्रंथालयच अवतरले आता संगणकावर असेच म्हटले पाहिजे.

इलियदचा समावेश पाहून तर अत्यानंद झाला.

धन्यवाद आश्चिग, नावे वाचुन खुप उत्सुकता निर्माण झाली पण तरीही मुद्दाम विकत घेऊन ही पुस्तके वाचली गेली नसती. आता मात्र वाचली जातील.

टीना, आश्चिगने लिंक शेअर केलीय जी सार्वजनिक आहे. त्यामुळे आपण ही लिंक पुढे पाठवुन आपल्या मित्रमंडळींना श्रीमंत करु शकतो. Happy

खूप छान! दुर्मिळ खजिना.

माहितीकरिता लाख लाख धन्यवाद...

खूप छान! दुर्मिळ खजिना.
माहितीकरिता लाख लाख धन्यवाद... >>>>> +१००

टीना, त्यात विचारायचं काय? मी फक्त लिंक दिली ....
लोकांचे धन्यवादसुद्धा महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाला जायला हवे ...

वाह वाह....खूप खूप धन्यवाद....मोठा खजिनाच उघडून दिल्याबद्दल....
महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ
आणि ही महिती तुम्ही आमच्यापर्यन्त पोहोचवल्याबाद्दल...

माझ्यासाठी खजिनाच.. महाराष्ट्र सरकारचा एक छान कार्यक्रम. यात आणखीही पुस्तके येत राहतील अशी आशा ठेऊ या.

धन्यवाद आशिष. !

पण महा सरकारने ती पिडीएफ करण्याऐवजी व्यवस्थित डिजिटल केली असती तर आणखी मजा आली असती.

धन्यवाद Happy
काल वर्तमानपत्रात ही बातमी दुव्यासकट वाचली होती पण इथे तो दुवा देऊन काम सोपं केलंस एकदम. आता बघते आणि हवी ती पुस्तके डा.लो करते. महाराष्ट्र सरकारने या योजनेअंतर्गत अतिशय अनमोल पुस्तके प्रकाशित केली होती आणि आता त्यापैकी अनेक्/बहुतेक आउट ऑफ प्रिन्ट आहेत.

Pages