मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह

Submitted by दिनेश. on 9 February, 2015 - 07:59

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

दुसर्‍या दिवशी आम्ही सलालाह बीच, येमेन बॉर्डर वगैरे बघायला गेलो. माझ्या अत्यंत आवडत्या जागांपैकी हि एक जागा आणि अविस्मरणीय रस्त्यांपैकी एक.

पिकासा वरून पोस्ट करत राहताना काहीतरी प्रॉब्लेम येतोय. सध्या पुरते ( मला जमेल त्या ) इंग्रजीमधे लिहिलेय. घरी गेल्यावर एडीट करतो. तोपर्यंत फोटो बघा !

1) बाहेर पडल्यावर नेहमीप्रमाणेच ओबडधोबड डोंगर दिसू लागले


2)

3)

4) आणि एका झोकदार वळणानंतर असा समुद्रकिनारा दिसू लागला.

5)

6)

7) त्या किनार्‍यावर मनरीफ नावाची गुहा आहे. तिचा बराचसा भाग मोकळा आहे पण थोडीफार सावलीही असते.

8)

9)

10) या जाळीखाली आहे ते ब्लो होल. भरतीच्या प्रत्येक लाटेबरोबर या विवरातून १०/१५ मीटर्स कारंजे उसळते.
मला यावेळी भरतीची वेळ गाठता आली नाही. म्हणून त्या उसळत्या पाण्याचा फोटो नाही ( अमित झब्बू देणार आहे. ) सध्या त्यावर झाकण आहे ( तरी पाणी उसळतेच ) आम्ही मागच्या वेळी गेलो होतो त्यावेळी असे कव्हर नव्हते, आणि आम्ही गेलो त्यावेळी भरतीची वेळ सुरु होत होती. आधी या विवरातून ( तीन आहेत ) गुरगुरल्यासारखा आवाज येतो. त्यावेळी त्यात एखादा कागद किंवा पिशवी टाकली तर हवेत उडून जाते. मग अगदी मोठा आवाज यायला लागतो. त्यावेळी जर त्यात कोकचा रिकामा कॅन टाकला तर तो टम टम आवाज
करत बाहेर फेकला जातो, आणि मग मात्र पाण्याचे फवारे उसळायला सुरवात होते. आणखी एक लाट, आणखी एक लाट बघू असे करत करत, तिथून पाय निघतच नाही कुणाचा.

11) इथला समुद्र अशांत आहे आणि अर्थातच पोहण्यासाठी योग्य नाही. तरीही ही जागा एवढी सुंदर आहे कि इथे समुद्रात स्वतःला झोकून द्यायचा अनावर मोह होतो. ( सबब नुकताच प्रेमभंग वगैरे झालेला असेल तर जाऊ नये )

12)

13)

14)

15)

16)

17)

18)

इथे काही डेझर्ट रोझेसची झाडे आहेत. यावेळी फुललेली नव्हती, पण मागच्या भेटीत खुप फुललेली बघितली होती.

19) या आहेत नेहमीच्या साध्यासुध्या बकर्‍या.. ओह, साध्यासुध्या नव्हे, हा त्यांचा हायकर्स ग्रुप आहे.

20) अगदी बघत बसावा, असा हा समुद्रकिनारा आहे.

21) समोर कि पाठीमोरा, न कळे, न कळे...

22) इथे एका रेस्टॉरंटच्या गॅलरीमधून मस्त दृष्य दिसत असते. इथे तुरळक फ्लेमिंगोज पण होते.

23) आणि मग आम्ही येमेन बॉर्डरच्या दिशेने निघालो. हा रस्ता इतका सुंदर आहे कि त्यावरुन परत परत प्रवास
करु शकेन. शिवाय या रत्यासोबत माझ्या मित्राची म्हणजेच मोंगियाची एक रम्य आठवण निगडीत आहे. आम्ही या किनार्‍यावर रमलो होतो आणि सूर्यास्त झाला. मी मोंगियाला म्हणालो, " देखो यार, यह दिन तो अपने जिंदगीसे चला गया. आज के आज जो करनेके लिये सोचा था, वो अबतक करना चाहिये था. आज का दिन तो हमने हमेशा के लिये खो दिया. " तो म्हणाला, , " दिनेशभाई ऐसे तो ना कहो, मै आपको आजही का दिन वापस दिला सकता हूँ " मला कळेना हा काय बोलतोय. त्याने आम्हाला गाडीतत बसवले आणि भन्नात वेगाने तो आम्हाला अश्या एका जागी घेऊन गेला, जिथून सूर्य परत दिसू लागला. मी आनंदाने त्याला मिठीच भारली.

यावेळी मी ड्रायव्हरला जरा स्लो चालवायला सांगितली होती, कारण मला शूट करायचे होते. त्याचे दोन छोटे व्हीडीओज यू ट्यूबवर आहेत.

. मी अपलोड केलेले हे दोन व्हीडीओ बघा बरं...

https://www.youtube.com/watch?v=W0FclL9bpM0

https://www.youtube.com/watch?v=mgunha7RV2I

24)

25)

26)

27)

28)

29)

30)

31)

32)

33)

34)

35)

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, कसलं भीषण सौंदर्य आहे हे. एकीकडे करकरीत कोरे, अंगावर येणारे तरीही सुंदर डोंगर आणि दुसरीकडे शांतवणारा अथांग सागर. किती पराकोटीची विरुद्धता!

मामी>>+१०००.......... त्या दोन्ही क्लिप्स भन्नाट आहेत....
आणि तो समोर की पाठीमोरा............ बेस्ट!! त्या डेझर्ट रोझला फुलं आली होती का?
सगळे फोटो फार म्हणजे फारच अप्रतिम!!

Awesome

आभार,
मामी, एकदा जाऊन या.. जवळच तर आहे. ट्रांझिट मधेही होईल.

शांकली.. मागच्या भेटीत फुललेला बघितला होता डेझर्ट रोझ. यावेळेस ड्राय होता तो भाग.

दिनेशदा,

सर्व आठवणी परत जाग्या केल्या बद्दल धन्यवाद !! सलाला चा समुद्र खुपच रफ असतो, मिरबाथ बीच बघितला
का ?
सलालाच्या ककिनार्यावरच्या केळी, नारळाच्या बागा बघितल्यातर केरळ मध्येच आहोत अस वाटत, पण त्या केळ्या, नारळाला (शहाळ्यांना) भारता सारखी चव नसते !!

तो पक्षी सामोरा आहे ( सावली पडलेली दिसत आहे )

खुप सुरेख.... स मु द्रा चा रंग काय मो ह क आहे..
आ का श आ णि स मु द्र खुप साम्य आhe रng.
पाठमो र्‍या खासच...
प्र. ची १२ पा हुन स मु द्रात ऊडी घ्यावी शी वाट् ते Happy

विवेक.. बीच बघायचाच नव्हता. नद्याच बघायच्या होत्या. ( बीच इथे रोजच बघतो ! ) पण सलालाह कायम स्मरणात राहणारी जागा आहे, एवढे नक्की !

वाह, सारेच फोटो भारीएत ...

पक्ष्याचा फोटो तर गमतीशीरच .. Happy (आपल्याकडेच चोच आहे त्याची - पण ती जरा खाली असल्याने पटकन नीट कळत नाहीये - दांची कमाल की फोटोग्राफी ... लै खास ... )

दिनेशदा, कसलं भीषण सौंदर्य आहे हे. एकीकडे करकरीत कोरे, अंगावर येणारे तरीही सुंदर डोंगर आणि दुसरीकडे शांतवणारा अथांग सागर. किती पराकोटीची विरुद्धता!>>> +१००

मस्त फोटो, दिनेश. तो समुद्र कसला कातील दिसतोय - दोन्ही अर्थांनी. इतकं नितळ नीळं पाणी बघून मस्त वाटतय तोच त्यातल्या त्या महाकाय शीळा दिसतात.

हे घ्या झब्बू Happy

आम्ही गेलो होतो तेव्हा पावसाचे दिवस होते आणि कॅमेरामधले सेल संपल्याने मोबाईलच्या कॅमेर्‍यातून फोटो काढावे लागले. फोटोची क्वालिटी फारशी चांगली नाही त्यामुळे.

1346395856882.jpg1346395858022.jpg1346395858467.jpg1346395858835.jpg1346395858980.jpg1346395859469.jpg1346395859923.jpg

मस्त.. पुर्वी ते कव्हर नव्हते त्यावेळी फार जोरात उडत असे पाणी. ते विवर फक्त वरूनच रुंद आहे, आत माणूस पडेल एवढे रुंद तेव्हाही नव्हते. कव्हर घालायला नको होते.

जबरदस्त फोटोमैफल ..
२० नंबरचा फोटो पाहुन फरहान अख्तरची कविता आठवली .
पिघलते निलमसा बहता हुआ ये समा
नीली नीलीसी खामोशीया..............