AIB पोल

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2015 - 00:41

..
पोलचा संदर्भ -
AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.
http://www.maayboli.com/node/52596
...

पोल का काढावासा वाटला?

खरे तर वरील धागा उघडतानाच मला पोल काढायचा पर्याय होता, पण तेव्हा मला वाटले की या प्रकाराला सर्वच स्तरातून विरोध होईल, त्यामुळे पोलची अशी गरज भासणारच नाही. आणि त्या धाग्यावर आपल्याला या कार्यक्रमाचे काय दूरगामी परीणाम होतील यावरच फक्त चर्चा करावी लागेल.

पण तसे झाले नाही, बरेच लोकांना तो कार्यक्रम चक्क भावलाही. अन समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली.

म्हणून मग पोल हा मुद्दाम काढला कारण इथे गुप्त मतदान होते. जे या केसमध्ये गरजेचे आहे.
कारण

१) बरेच जण असे असतील जे या कार्यक्रमाला इतक्या खालच्या पातळीचे समजत असतील जे त्या धाग्यावर मतही व्यक्त करायची त्यांची इच्छा नसेल. अश्यांची संख्या समोर येईल.

२) बरेच जण असतील ज्यांना हा कार्यक्रम आवडला असेल पण चारचौघात कबूल करायचा संकोच वाटत असेल ते देखील इथे त्याला गुप्त समर्थन नोंदवतील. (पण अश्यांना विनंती करेन, ज्या कार्यक्रमाला तुम्हाला उघड समर्थन द्यायल संकोच वाटतो त्याला आपण का प्रोत्साहन देतोय याचाही एकदा नक्की विचार करा)

तळटीप - पोलचा निकाल फक्त लोकांची आवड आणि वैयक्तिक मत दर्शवेल. हा कार्यक्रम योग्य वा अयोग्य याचे ते दर्शक नसेल.

तळटीप क्रमांक दोन - इथे शक्यतो AIB वर चर्चा न करता पोलच्या संदर्भातच काही लिहायचे अस्ल्यास लिहा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तटस्थ नाही.
काहींना कार्यक्रम आवडला काहींना नाही. आवडला म्हणून त्यांनी नीचतम पातळी गाठली आहे आणि नाही आवडला म्हणून त्यांना समाजाच्या कल्याणाची कळकळ आहे असे नाही. कोणाला दूध पिणे आवडते कोणाला नाही. सर्वांनी वेगन झालेच पाहीजे किंवा दूध हेच पूर्णान्न आहे आणि बाकी खाणे बंद करावे असा अट्टाहास नसावा.

असलेली एक प्रकारची सोय वापरुन तू मतदान घेतो आहेस, ती कल्पना भारी आवडली. शाब्बास... Happy
>>> नाही - असे वाईट कार्यक्रम होऊ नयेत. <<<<
[मला यामधे अजुन एक पर्याय हवा होता की "असले कार्यक्रम "कायद्याने वा निदर्शनाने" बन्द पाडावेत" ]

यामधे तृटी आहेत रे भो.... तिनही पर्यायांना मत दिले जाऊ शकते, व दिलेले मत विड्रॉ करता येत नाही. Sad मायबोली प्रशासन "सुयोग्य पोल सुविधा' केव्हा देऊ शकेल? पूर्वी ऑर्कुटवर छान सुविधा होती.

सोनू, दूधाच्या ऐवजी तुम्ही दिलेल्या उदाहतणात भांग घेतली तर?
लिंबुकाका म्हणतात तसे, सार्वजनिक ठिकाणी अशी भांग घेण्याला कायद्याने विरोध करता यायला हवा.

हो ऑर्कुटवर छान सुविधा होती.
एका पर्यायाला मत द्यायचे की मल्टीपल याची सेटींग पोलकर्ता ठरवू शकत होता.
तसेच पोलला एण्ड डेटही टाकू शकत होता.
तसेच समूहावरचेच सभासद मत देऊ शकतात की ऑर्कुटवरचे कोणीही असाही ऑप्शन होता.
.... गेले ते दिवस !

मायबोलीवर देखील स्पर्धांचे पोल होतातच, फक्त ते पोल काढायची सुविधा सभासदांना नाही इतकेच.
निदान मान्यवर सभासदांना तरी अशी सुविधा पुरवायला हवी. (मान्यवर म्हणजे पोल काढायची हौस असलेले Proud )

मी त्या बीबी वर काहि लिहिलेले नाही. लोकसत्तामधल्या एका बातमी वरून या कार्यक्रमाबद्दल कळले. तिथे दिलेल्या क्लीप्स देखील बघितल्या नाहीत. पण तिथे दिलेल्या एका जेष्ठ अभिनेत्रीवरच्या तथाकथित विनोदाचा, आणि तोही जाहिररित्या केला गेल्याचा निषेध करावासा वाटला.

दिनेश,

मी तुम्हाला प्लस वन दिलेले आहे. त्या ज्येष्ठ अभिनेत्रीला आईसारखे समजणे म्हणजे मूर्खपणा आहे अश्या अर्थाचे एक अत्यंत थर्डक्लास आणि सडलेले विधान परवा एका आय डी ने केले व स्वतःच्या सदस्यत्वाची पातळी उंचावून घेतली. मी तेथेही निषेधच केला होता.

Sad

खरंच बेफि, किळस आली अगदी. ती अभिनेत्री असे करणार नाही, पण खरोखरच यासंबंधात तिने कायदेशीर कार्यवाही करावी असे वाटतेय. त्यांच्या संघटनेने माफी मागण्याची मागणी केलेलीच आहे.

इतर कुणा स्त्रीला आई मानू नका, स्वतःला आई आहे ना, मग तीदेखील कुणाची आई असेल, आणि जरी नसली तरी एक व्यक्ती आहे, तिला आत्मसन्मान आहे, एवढे तरी लक्षात असू द्या.

तशाच स्वरूपाचा काहीतरी विनोद रीमा लागू वरही होता त्या कार्यक्रमात.. मला नीट लक्षात नसल्याने त्यावर लिहिलं नाही.. वाईट विनोद होते ते खरोखर.. करण्याआधी संबंधित कलाकारांची परवानगी घ्यायलाच हवी होती..

तो रोडीजचा रघुराम की कोण त्याचाही जन्म काय कुठून कसा झाला हे सांगताना त्याच्याही आईचा आणि मातृत्वाचा अपमान झालाच. ऐकतानाही ते खूप वंगाळ वाटलेले. बहुतेक कित्येक जण अश्या विनोदांचे समर्थन करत आहेत त्यांना बरेच काही समजले नसण्याचीही शक्यता आहे.

मी त्या बीबी वर काहि लिहिलेले नाही. लोकसत्तामधल्या एका बातमी वरून या कार्यक्रमाबद्दल कळले. तिथे दिलेल्या क्लीप्स देखील बघितल्या नाहीत. पण तिथे दिलेल्या एका जेष्ठ अभिनेत्रीवरच्या तथाकथित विनोदाचा, आणि तोही जाहिररित्या केला गेल्याचा निषेध करावासा वाटला.
>> तो आणि तसे विनोद पाहूनही जे लोक "त्यांच्या" अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करा म्हणतात अशांच मला काही कळत नाही . यात त्या अभिनेत्रीची काहीही चूक नसताना जी बदनामी झाली त्याच काय ?
Sad
की फक्त सलमान खान कडे ताकद आहे म्हणून त्याच्या फॅमिलीवरचे जोक तुम्ही काढणार ?

ऋन्मेष, सस्मित, साती, झंपी, लिंबूदा, गामा, बेफी ,केदार जाधव ,महेश आणि AIB च्या विरोधात लिहिणारे बाकीचे आयडीज सगळ्यांच्या पोस्ट्स आवडल्या
ज्या कळकळीने तुम्ही AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी धाग्यावर लिहिलत Hats of to all of you .........

मनरंग, मला तितकं मुद्देसुद लिहिता येत नाही.

बेफी. साती, लिंबु, केदार ह्यानी जे लिहिलय तेच मलाही म्हणायचय.
हे सगळं बघुन भिती वाटते कधी कधी. कुठे चाललोय आपण ह्याची.

बेफी -
त्या ज्येष्ठ अभिनेत्रीला आईसारखे समजणे म्हणजे मूर्खपणा आहे अश्या अर्थाचे एक अत्यंत थर्डक्लास आणि सडलेले विधान परवा एका आय डी ने केले व स्वतःच्या सदस्यत्वाची पातळी उंचावून घेतली. मी तेथेही निषेधच केला होता. >>>>>>>या विधानाबद्दल :
मी स्वतः वैद्यबुवांचे ते तुम्ही म्हणता ते विधान वाचले आहे आणि त्याचा अर्थ असा अज्जिबातच वाटला नाही. तुम्ही आणि इतर काही आयडीज कार्यक्रम न बघताच "लोकांच्या आई बहिणीवरून विनोद झाले " म्हणून बोंब मारत होतात त्याला उत्तर म्हणून वैद्यबुवा म्हणाले कुणाच्या आईवरून जोक्स नव्हते. एक्सेप्ट - फरिदा जलालवरून जोक होता, जर तिच्यावर जोक म्हण्जे "आईवरून जोक " असं म्हणत असाल तर.
यावरून बुवांनी फरिदा जलाल आई म्हणण्यास लायक नाही असे विधान केले असे म्हणणे म्हणजे निव्वळ कांगावा आहे!आणि निष्कारण वैयक्तिक विधान पण.... किंवा तुमची समजण्यात चूक झाली!! (अर्थात तुम्ही हे इथे मान्य करावे अशी अपेक्षा नाही)

>>>यावरून बुवांनी फरिदा जलाल आई म्हणण्यास लायक नाही असे विधान केले असे म्हणणे म्हणजे निव्वळ कांगावा आहे!आणि निष्कारण वैयक्तिक विधान पण.... किंवा तुमची समजण्यात चूक झाली!! (अर्थात तुम्ही हे इथे मान्य करावे अशी अपेक्षा नाही)<<<

मै देवी,

मी काय करावे हेही तुम्हीच लिहावेत ह्यावरून तुमच्याकडून काय अपेआ ठेवाव्यात हे स्पष्ट होते आहे.

ते असो!

अट्टल बीभत्स रस वाटप करणारा - असे माझ्याबद्दल म्हणणार्‍या बुवांना तुम्ही माझ्या काही लेखनाच्या लिंका इथेच देता का ज्यात असा कोणताही रस वगैरे नाही, किंबहुना, बीभत्स मी आजवर काहीही लिहिलेले नाही हे सिद्ध करण्यासाठी एखादा परिच्छेद वगैरे लिहाल का प्रोअ‍ॅक्टिव्हली? बीभत्स, अश्लील, उच्छृंखल, वाह्यात, धीट, अतीवास्तववादी ह्या शब्दांचा कीस पाडण्याचा पेशन्स तुम्ही ठेवावात ही अपेक्षा आहे. बुवांसाठी इतक्या धावून आला आहात, तर एखाद्या माझ्यासारख्या उल्लक आय डी साठीही धावून या की?

ते करणार नसाल तर बुवांसाठी धावून का आलात? मी त्यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नसताना अगदी 'ती पोस्ट मी वाचली होती' वगैरे कोर्टात साक्ष द्यावी तसे का सांगत आहात?

कधीतरी खर्‍याची कास धरा? Proud

नेहमीच काय आपला तो बाळ्या!

>>>यावरून बुवांनी फरिदा जलाल आई म्हणण्यास लायक नाही असे विधान केले असे म्हणणे म्हणजे निव्वळ कांगावा आहे!आणि निष्कारण वैयक्तिक विधान पण.... किंवा तुमची समजण्यात चूक झाली!! (अर्थात तुम्ही हे इथे मान्य करावे अशी अपेक्षा नाही)<<<

मै देवी,

मी काय करावे हेही तुम्हीच लिहावेत ह्यावरून तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात हे स्पष्ट होते आहे.

ते असो!

अट्टल बीभत्स रस वाटप करणारा - असे माझ्याबद्दल म्हणणार्‍या बुवांना तुम्ही माझ्या काही लेखनाच्या लिंका इथेच देता का ज्यात असा कोणताही रस वगैरे नाही, किंबहुना, बीभत्स मी आजवर काहीही लिहिलेले नाही हे सिद्ध करण्यासाठी एखादा परिच्छेद वगैरे लिहाल का प्रोअ‍ॅक्टिव्हली? बीभत्स, अश्लील, उच्छृंखल, वाह्यात, धीट, अतीवास्तववादी ह्या शब्दांचा कीस पाडण्याचा पेशन्स तुम्ही ठेवावात ही अपेक्षा आहे. बुवांसाठी इतक्या धावून आला आहात, तर एखाद्या माझ्यासारख्या क्षुल्लक आय डी साठीही धावून या की?

ते करणार नसाल तर बुवांसाठी धावून का आलात? मी त्यांच्या नावाचा उल्लेखही केलेला नसताना अगदी 'ती पोस्ट मी वाचली होती' वगैरे कोर्टात साक्ष द्यावी तसे का सांगत आहात?

कधीतरी खर्‍याची कास धरा? Proud

नेहमीच काय आपला तो बाळ्या!

AIB च समर्थन करणारे सगळे ज्या प्रकारे एकमेकांना डिफेंड करताहेत ,ते धक्कादायक आणि आश्चर्यकारक आहे

असे कार्यक्रम होऊ नयेत, अन्यथा इथे संस्कृती, थोर परंपरा इ. ची आठवण करुन दिली जाते आणि मग न्यूनगंड का काय ते म्हणतात ते येतो. (आणि असे कार्यक्रम करायचेच असतील तर येथील आणि समाजातील संस्कारधुरीणांची पुर्वपरवानगी घेणे अत्यावश्यक करावे).
कुठे नेऊन ठेवला रे माझा नैतिक भारत.

असे कार्यक्रम होऊ नयेत, अन्यथा इथे संस्कृती, थोर परंपरा इ. ची आठवण करुन दिली जाते आणि मग न्यूनगंड का काय ते म्हणतात ते येतो. (आणि असे कार्यक्रम करायचेच असतील तर येथील आणि समाजातील संस्कारधुरीणांची पुर्वपरवानगी घेणे अत्यावश्यक करावे).
कुठे नेऊन ठेवला रे माझा नैतिक भारत.

संस्कृती
हा आता फ़क्त एक शब्द राहिलाय
जिथ पैशासाठी हीन पातळी वरचे विनोद केले जातात ,ज्यांच्यावर केले जातात ते सुद्धा एन्जॉय करतात
जिथ आई बहिणीविषयी स्टेजवरून हिणकस भाषेत बोलल जात ,यात कुणाला काही खटकत नाही
उलट अशा हीन पातळीला जाऊन बोलण म्हणजे हिम्मत अस समजल जात
आणि प्रेक्षक सुद्धा हा सगळा अश्लीलतेचा बाजार यु ट्यूबवर पाहुन कार्यक्रम आवडला म्हणतात
अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली ह्या सगळ्या प्रकाराच समर्थन केल जातय
उलट ह्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांना गप्प बसवल जातय
तुम्हाला आवडत नाही तर तुम्ही बघु नका
बाकी ज्यांना पाहायचा आहे त्यांनी पाहावा. ज्यांना नको आहे त्यांनी दुर्लक्ष करा.
एवढ बोलल की झाल
जिथे लोकांना हे माहितीये की भावी पीढ़ी आता इतकी पुढारलीये की असे कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने विशेष नाहीत
तिथे खरच संस्कृती शिल्लक आहे का ?

बेफी, मी खर्‍यासाठी आणि बाळ्यासाठी दोन्हीसाठी धावून जाते Happy तुम्ही संधी द्या दोन्हीपैकी एकात समाविष्ट होण्याची, मग तुमच्यासाठी पण धावून येईन हं Happy
"बीभत्स मी आजवर काहीही लिहिलेले नाही" >>>> असली ग्यारन्टी मी कशी देणार बॉ, त्यासाठी तुमचे "आजवरचे" लेखन वाचायला हवे, ते बीभत्स नाही हे पटायला हवे किंवा मग तुम्ही बाळ्या हवेत !! Happy

>>>बीभत्स मी आजवर काहीही लिहिलेले नाही" >>>> असली ग्यारन्टी मी कशी देणार बॉ, त्यासाठी तुमचे "आजवरचे" लेखन वाचायला हवे, ते बीभत्स नाही हे पटायला हवे किंवा मग तुम्ही बाळ्या हवेत !<<<

मी 'बाळ्या' असायला हवा की नाही हे नंतर बघू.

पण मी काय लिहिले आहे ते न वाचताच बुवांच्या त्या कमेंटवर तुम्हाला काही म्हणावेसे वाटले नाही ह्याचा अर्थच असा आहे की आपल्या बाळ्या नक्कीच बरोबर असणार हे तुमचे मत आहे. किंवा मग, धावून कोणासाठी जायचे हे ठरलेले असणार मनामध्ये!

काहीतरी एक मान्य करा की?

Proud

मी 'बाळ्या' असायला हवा ह्याबाबत - माझी वैयक्तीक गरज अजिबातच नाही. गंमत वाटते ती अश्या 'भलत्या आय डी साठी' धावून जाण्याची. स्पष्ट विचारायचे तर मी ज्या आय डी चे नांवही घेतले नाही तो स्वतःही ह्यात पडत नसताना तुम्हाला त्याच्यावतीने केस डिफेंड करायची गरज काय? तुम्ही धाग्यावर मत लिहा आणि मोकळ्या व्हा की? प्रतिसादावर का मत लिहिताय?

Proud

>>>तुम्ही संधी द्या दोन्हीपैकी एकात समाविष्ट होण्याची, मग तुमच्यासाठी पण धावून येईन हं<<<

मी म्हणजे तुम्हाला नुकताच दृष्टीस पडलेला एक बालक नव्हे जो कसा वागतो हे बघून त्याच्याबद्दल मत बनवावे. Proud

माझ्या ज्या लेखनावर तुमचे 'सकारात्मक' प्रतिसाद आहेत त्याच्या लिंका द्या त्या आय डी ला येथे आणि 'चांगले ठणकवा' Lol

मनरंग इतकेही निराश होऊ नका..
पोलचा आतापर्यंतचा निकाल बघा..

१६ जणच या कर्यक्रमाचे समर्थन करत आहेत तर ६१ जण विरोध..
जे ४७ जण तटस्थ आहेत याचा अर्थ त्यांनाही कर्यक्रम बघण्यात रस नाही, फक्त विरोध करण्यात स्वारस्य नाही इतकेच.

तर टोटल १२४ जणांपैकी १६ जण म्हणजे जेमतेम १२ टक्के जण याला समर्थन देत आहेत तर हि तितकीही चिंतेची गोष्ट नाही.
कारण इथे मतदान करणारे आपण सारे सोशलसाईटवर ये-जा असणारे आहोत. समाज हा एवढाच नाही. माझ्या थंम्ब रुलप्रमाणे सर्वच समाजाचा विचार करता नक्कीच हे प्रमाण १२ टक्केचे ८-१० ट्क़्यावर येईल..

थोडक्यात, मला नाही वाटत हा शो आता फारसा तग धरेल, वा त्यासाठी त्यांना यातील अश्लीलता काढावी लागेल. आणि त्यानंतर कदाचित शो इतका पाणचट होईल की २ टक्क्यांनाही बघण्यात स्वारस्य राहणार नाही.

तळटीप - इथे ९० टक्के ते बरोबर आणि १० टक्के ते चूक असा अर्थ घेऊ नये, तर ९० टक्के ते बहुमत एवढाच अर्थ घ्यावा. Happy

थँक्यु मै. एग्जॅक्टली त्याच अर्थानी लिहिलं होतं.

पण मी काय लिहिले आहे ते न वाचताच बुवांच्या त्या कमेंटवर तुम्हाला काही म्हणावेसे वाटले नाही ह्याचा अर्थच असा आहे की आपल्या बाळ्या नक्कीच बरोबर असणार हे तुमचे मत आहे. किंवा मग, धावून कोणासाठी जायचे हे ठरलेले असणार मनामध्ये!>>>>> लागले का रडायला परत? कोणी ह्यांच्या करता धावून येण्याची तसदी घेत नाही म्हणून दुसरं कोणी कोणाकरता धावून आलं की हे कंपू कंपू म्हणून बोंबलायला लागतात. Lol

गंमत वाटते ती अश्या 'भलत्या आय डी साठी' धावून जाण्याची. स्पष्ट विचारायचे तर मी ज्या आय डी चे नांवही घेतले नाही तो स्वतःही ह्यात पडत नसताना तुम्हाला त्याच्यावतीने केस डिफेंड करायची गरज काय? तुम्ही धाग्यावर मत लिहा आणि मोकळ्या व्हा की? प्रतिसादावर का मत लिहिताय?>>>>>>>>> भलत्या? भलत्या? अहो मी फ्रेंड आहे नं त्यांचा?
मी स्वतः नाही पडलो कारण तेव्हा ह्या बाफं वर हे असं काही चाललय हे मला माहित नव्हतं.

ऋन्मेष, तुझ्या शेवटच्या प्रतिसादाला प्लस वन दिला आहे.

पोलचा आतापर्यंतचा निकाल बघुन बरं वाटलं. असले सवंग आणि थिल्लर कार्यक्रम होऊ नयेत असे मानणारा मोठा वर्ग भारतीय समाजात आहे हे चांगले लक्षण आहे.

असले आचरट कार्यक्रम ही विनोद, अभिनय, कला सगळ्याचीच एका अत्यंत हीन पातळीवर उतरू केलेली थट्टा आहे. 'अमेरिकेने गू खाल्ला म्हणून आपणही खावा, छान चव असते' अश्या प्रकारचं एक दिवाळखोर अंधानुकरण आहे हे.

(ज्या लोकांना माझे उपरोक्त मत पटत नाही, त्यांनी ते वाचू नये ! मी कुठे तुमच्या डोळ्यासमोर धरलं आहे किंवा कानाला पिस्तुल लावुन 'वाचाच' म्हटलंय !)

आता बघा, आपण फार सभ्य आणि ते कार्यक्रम फार हीन दर्जाचे हे सांगता सांगता सुद्धा फार छान व्याकरण वापरलत तुम्ही रसप.
नेमकं हेच बरीच लोकं सांगत होती त्या आधीच्या बाफं वर. साजिरा ह्यांनी आधीच लिहिलं (तुमच्या विषयी लिहिलं असं नाही पण एक जनरल उदाहरण दिलं होतं)तसच एग्जॅक्टली तुम्ही एकही शिवी किंवा अपशब्द न वापरता समोरच्याला अत्यंत किळस येइल असं बोललात. ह्याची समोरच्याला किळस येऊ शकते ह्याची तुम्हाला कल्पना ही नव्हती किंवा घेणं देणं सुद्धा नव्हतं.

अजून दुसरी एक गोष्ट (हे विधान जनरल आहे, तुम्हाला उद्देशून नाही रसप) म्हणजे "ह्या कार्यक्रमामुळे काही संसकृती वगैरे बुडत नाही" असं ज्यांचं म्हणणं होतं त्यांच्या पोस्ट्स मधली भाषा पाहिली तर हे लक्षात येइल की त्या कार्यक्रमाचा़ काँटेंट त्यांनी पाहिला, त्यातल्या काही लोकांना तो आवडला काही लोकांना नाही आवडला तरीही एकानी सुद्धा अर्वाच्य किंवा किळसवाणं वाटेल अशा भाषेत त्या बाफं वरच काय पण इतर बाफंवर पण कधी लिहिलेलं दिसत नाही.
ह्याचाच अर्थ असे काही कार्यक्रम फक्त पाहिले किंवा आवडले म्हणजे लगेच एखाद्या व्यक्तीची बुद्धी गहाण पडून त्याची वैचारिक पातळी घसरुन संस्कृतीचा र्हास( ?) होत नाही. ही मंडळी त्यांच्या मुलांना सुद्धा असच वाढवतील/वाढवतात. समोर काय दिसतय, काय एकायला येतय आणि ते हँडल कसं करायचं हे आधी स्वतः आणि मग मुलांना शिकवलेले पाहिजे.
अंधानुकरणाचाही एक मुद्दा आहे, जो योग्य आहे. अमेरिकेत लोकांनी काही केलं तर लगेच भारतात तेच करायलाच पाहिजे का? आजिबात नाही. मुद्दा त्या अंधानुकरणाचा निषेध करताना जो एक दांभिकपणा दाखवला जातो तो आहे.

आवं विलायती पावनं, त्ये म्होट्या लोकांस्नी चालतंया तर लहान लेकरास्नी कशापायी अडवता वं ? द्येउं द्या की त्यान्ना पन करकच्चून शिवी आन मंग कुनाला नाय आवडलं कुनाला आवडलं याची कशापरीस पर्वा करायची म्हंतो मी ? कालच्याला टग्या का टण्या नी आसलीच येक पोष्ट लिवली तर ती उडली, म्हनुन काय आता हितल्या सरपंचाला फाशी देनार का ?

गेला बाजार नाटकास्नी तरी कशापायी पायजेल ते शेणसार बोर्ड का काय ? ज्याला न्हाई पटत त्यो न्हाई तिकीट काडनार, अन न्हाई बघनार. सो सिम्प्ल कि वं पावणं

म्या काय म्हंतु,
न्यू जंगली कबुतर नावाचं नाटक लिवाय घितु. आता एआयबी पासुन करंट घेवुन तसलं डायलॉक त्यात भरतु. काय काय लोकांस्नी चाललंय न्हवं ? मंग माज्या आगामी नाटकातले काय काय डायलॉक हितं हाणु का ? बगा बरं चालतंय का समद्यास्नी ?

गोल गोल लिवलं, घरातल्यांची नावं लिवली (गा .... Proud ), फुलबच्चन मोड मंदी गेलं तरी काय उपेग न्हाय बगा. बेशिकमंदीच लोच्या हाय न्हवं. लै आमी साइड घेतुया बगा प्रोग्रामची, पन आमच्यावर तसा डाव केला की आमाला चालत न्हाई.

आन वर आमीच दुस-यास्नी डब्बल टायर म्हननार बगा Proud

आले का लेवलला. आता तुमच्याशी डोस्कं लावायचं तर आमास्नि किती मजलं खाली उतरून यायला लागल वं ?
तुमचं काय व्हतंय म्हाईतय का ? बेशिकमधी हाय लोचा आन बच्चन बनून हिरोगिरी बी करायचीय. मंग थोबाड, गाडाव असलं काय काय भारी भारी लिवाय जाताय आन सपशेल आपटताय. त्याच्यात तुमची यत्ता बी म्होरच्याला कळतीया.

न्हाई पन शेवटी आमी पडलो अडानी म्हनल्याव काय चुकलं माकलं तर साभळुन घियाचं. तुम्ही शैनी मानसं न्हाई का ?
( आता पयला प्यारा आमच्या भाषेत लिवायचा तर आसं बी म्हनता आलं असतं की बाबा ढुंगनात न्हाई गू अन चाललंय हागाय... पन त्ये हितं चाललं का ? एआयबी चाललं कारन ती म्होट्टी मानसं ! )

Pages