AIB पोल

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 February, 2015 - 00:41

..
पोलचा संदर्भ -
AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.
http://www.maayboli.com/node/52596
...

पोल का काढावासा वाटला?

खरे तर वरील धागा उघडतानाच मला पोल काढायचा पर्याय होता, पण तेव्हा मला वाटले की या प्रकाराला सर्वच स्तरातून विरोध होईल, त्यामुळे पोलची अशी गरज भासणारच नाही. आणि त्या धाग्यावर आपल्याला या कार्यक्रमाचे काय दूरगामी परीणाम होतील यावरच फक्त चर्चा करावी लागेल.

पण तसे झाले नाही, बरेच लोकांना तो कार्यक्रम चक्क भावलाही. अन समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली.

म्हणून मग पोल हा मुद्दाम काढला कारण इथे गुप्त मतदान होते. जे या केसमध्ये गरजेचे आहे.
कारण

१) बरेच जण असे असतील जे या कार्यक्रमाला इतक्या खालच्या पातळीचे समजत असतील जे त्या धाग्यावर मतही व्यक्त करायची त्यांची इच्छा नसेल. अश्यांची संख्या समोर येईल.

२) बरेच जण असतील ज्यांना हा कार्यक्रम आवडला असेल पण चारचौघात कबूल करायचा संकोच वाटत असेल ते देखील इथे त्याला गुप्त समर्थन नोंदवतील. (पण अश्यांना विनंती करेन, ज्या कार्यक्रमाला तुम्हाला उघड समर्थन द्यायल संकोच वाटतो त्याला आपण का प्रोत्साहन देतोय याचाही एकदा नक्की विचार करा)

तळटीप - पोलचा निकाल फक्त लोकांची आवड आणि वैयक्तिक मत दर्शवेल. हा कार्यक्रम योग्य वा अयोग्य याचे ते दर्शक नसेल.

तळटीप क्रमांक दोन - इथे शक्यतो AIB वर चर्चा न करता पोलच्या संदर्भातच काही लिहायचे अस्ल्यास लिहा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा सगळा दोष राखी गुलझार या अभिनेत्रीचा आणि राकेश रोशन या चित्रपटनिर्मात्याचा आहे.

असे कार्यक्रम होऊ नयेत.
[असेही नुकत्याच बातमीनुसार प्रकरण आता 'न्यायप्रविष्ट' असल्याने एकूणातच न बोललेले बरे.]

हा सगळा दोष राखी गुलझार या अभिनेत्रीचा आणि राकेश रोशन या चित्रपटनिर्मात्याचा आहे.
>>>>>>>

???????????

हा सगळा दोष राखी गुलझार या अभिनेत्रीचा आणि राकेश रोशन या चित्रपटनिर्मात्याचा आहे.
>>>>>>> हा 'करण अर्जुन' वर केलेला जोक असावा.

दै. सामना'च्या 'फुलोरा' पुरवणीतील आजची आणि शेवटची 'बॉलीवुडी' -

~ ~ ~ ~ बॉलीवुडी ~ ~ ~ ~

~ ~ भंपक ~ ~

एकदा एक सद्गृृहस्थ स्वत:साठी कुडता-पायजमा घेतो. घरी येऊन पायजमा घालून पाहिल्यावर त्याला समजतं की तो दोन इंच मोठा आहे. तो त्याच्या म्हातार्‍या आईला पायजमा दोन इंच कापून देण्याची विनंती करतो. आई म्हणते, ‘मला त्रास नको देऊस. बायकोला सांग.’
बायको म्हणते, ‘मी स्वयंपाक करतेय. मुलीला सांगा.’
मुलगी म्हणते, ‘मला अभ्यास आहे. लहानीला सांगा.’
लहान मुलगी ऐकून न ऐकल्यासारखं करून खेळायला निघून जाते.
तो खट्टू होऊन पायजमा तसाच ठेवून देतो. नंतर सर्वांना उपरती होते आणि एकानंतर एक चौघीही येऊन पायजमा प्रत्येकी २ इंच कमी करतात. आता पायजम्याचा बर्म्युडा झालेला असतो. तो कापणार्‍या व्यक्तींपैकी कुणालाही तो बर्म्युडा करायचा नसतो. पण हेतू कितीही चांगला असला तरी परिणाम जास्त महत्त्वाचा असतो.

लहानपणी ऐकलेली ही गोष्ट आज का आठवतेय? सांगतो.

यू ट्यूबवरील एका कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली काही लोकांनी काही लोकांची ‘पायजम्याआतले जोक्स’ मारून खिल्ली उडवली. आपल्या देशाचे संविधान सर्वांना अभिव्यक्तीस्वातंत्र्य देत असले तरी आपल्या स्वातंत्र्योपभोगाने कुणाच्या पायजम्याचा बर्म्युडा तर होत नाही ना याचा विचार करणे हे सर्व स्वातंत्र्ये, संविधाने, जन्मसिद्ध हक्क वगैरेंच्या वर असलेली ‘माणुसकी’ भाग पाडत असते. एकदा पायजम्याचा बर्म्युडा झाला की ‘हेतू काय होता?’ याने काही फरक पडत नाही!

दुसरं असं की, आपले बिनधास्त विनोद लोकांच्या पचनी पडतील, असे संविधानाच्या जोरावर ठरवून आपली प्रगल्भता दाखवण्यापेक्षा कार्यक्रमात सहभागी कलाकारांनी आपल्या चित्रपटांच्या परिपक्वतेतून ते दाखवून देणं जास्त संयुक्तिक ठरलं असतं. म्हणजे एकीकडे ७१ च्या युद्धात हिंदुस्थानची फाळणी होऊन बांगलादेश बनला असं काहीसं दाखवून आपला सपशेल बिनडोकपणा दाखवायचा (चित्रपट - गुंडे) आणि दुसरीकडे कमरेखालचे विनोद लोकांनी झिडकारल्यावर ‘तुमची बौद्धिक पातळी नाही’ म्हणायचं! हे म्हणजे सव्वाशे किलो वजनाच्या माणसाने समतोल आहारावर भाष्य करण्यासारखं आहे!

अखेरीस, पहिल्या ओळीत बसून सर्व चावटपणावर खिदळणार्‍या एका व्यक्तीने अगदी काही महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्राच्या साईटवर आलेल्या स्वत:च्या फोटोवरून महिला सबलीकरण, स्त्री-दाक्षिण्य वगैरेंच्या बाता मारल्या होत्या, हे उगाच आठवलं.

http://www.saamana.com/2015/February/14/Link/FULORA18.HTM

http://epaper.saamana.com/epaperimages/1422015/1422015-md-fl-4/6383218.JPG

- रणजित पराडकर
- ....‪‎रसप‬....

29_14-Feb-15.JPG

एकीकडे ७१ च्या युद्धात हिंदुस्थानची फाळणी होऊन बांगलादेश बनला असं काहीसं दाखवून आपला सपशेल बिनडोकपणा दाखवायचा (चित्रपट - गुंडे) आणि दुसरीकडे कमरेखालचे विनोद लोकांनी झिडकारल्यावर ‘तुमची बौद्धिक पातळी नाही’ म्हणायचं!
>>>>>>>>
हाहा
बाकी कंबरेखालचे विनोद हा विनोदाचा सर्वात सोपा प्रकार आहे. कारण ऐकणारे बरेच लोक ते कंबरेखालचे उल्लेख ऐकूनच हसतात. या विनोदांच्या नादात कित्येक शब्दांना कित्येक क्रियापदांना आज दोन दोन अर्थ प्राप्त झाले आहेत. दुसरा अर्थ अर्थातच घाणेरडा! ओळखीतले काहीजण अश्या शब्दांचा दुसरा अर्थ घेऊन बघावे तेव्हा विनोदनिर्मितीच्या प्रयत्नात अक्षरशा इरिटेट करत असतात.

>>>कारण ऐकणारे बरेच लोक ते कंबरेखालचे उल्लेख ऐकूनच हसतात<<<

अगदी अगदी! ते विनोदही खूप मजेशीर होऊ शकतात की नाही ह्यावर विचारही करायची विनोदनिर्मात्याला गरज भासू नये इतके 'ठ' दर्जाचे विनोद रसिक असतात हे! त्यांना नुसता ढुंगण ह्या शब्दातील ढ ऐकायला मिळाला तरी ते सातमजली हसून पैसे वसून झाल्याच्या आनंदात असतात.

काही बॅचलर्स ओन्ली व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर राबता असल्यामुळे लक्षात येते (आणि अनेक वर्षे अनेक प्रकारचे विनोद वाचायला मिळालेले असल्यानेही माहीत आहे) की फक्त प्रौढांसाठी किंवा कंबरेखालचे म्हणता येतील असे खूप विनोद अतिशय सरस (सकस नव्हे) असू शकतात. पण ते कानावर पडेपर्यंत थांबणार कोण? रेकॉर्डेड हसण्याचा आवाज ऐकून स्वतः हसत टाळ्या वाजवणार्‍यांचे अमाप पीक आलेले आहे.

>>>>अगदी अगदी! ते विनोदही खूप मजेशीर होऊ शकतात की नाही ह्यावर विचारही करायची विनोदनिर्मात्याला गरज भासू नये इतके 'ठ' दर्जाचे विनोद रसिक असतात हे! त्यांना नुसता ढुंगण ह्या शब्दातील ढ ऐकायला मिळाला तरी ते सातमजली हसून पैसे वसून झाल्याच्या आनंदात असतात.<<<

दुर्दैवाने हे असेच आढळ्लेय.
नुकताच एका कॉलेजच्या वॉट्स अप ग्रूपमधून बाहेर पडले. मुलामूलींचा एकच ग्रूप.

वय वाढलेले पण अक्कल नसलेले लोकं भलती सलती से* वरील चित्रं आणि जोक्स. त्यात इतकं खिदळून हसण्यासारखं काहीच नाही.
अश्लील वगैरेचा प्रश्ण नाही पण विनोद करताना अरे कसला वापर करताय? पॅथेटीक

मी बातम्या बघत नाही त्यामुळे हा प्रकार माहिती नव्हता. इथे माहिती करुन दिल्याबद्दल धन्यवाद. तो रोस्ट बघायला मिळाला नाही पण AIB च्या youtube वरच्या चित्रफिती बघताना वेळ मस्त गेला! त्या प्रत्येकाचे AIB बाहेरचे videos पण मस्त आहेत. अर्थात सगळेच विनोद सगळ्यांनाच आवडतील / पचतील / समजतील असे शक्य नाही... आणि अशी अपेक्षा करणे पण चूकच!
पुन्हा एकदा धन्यवाद!!

पाहिला कार्यक्रम …. काही तथाकथित "फ़ेमस " लोकांनी केवळ (कु)प्रसिद्धी मिळवण्याकरीता बनवलेला एक ये*झ* कार्यक्रम होता…।

Pages