..
पोलचा संदर्भ -
AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.
http://www.maayboli.com/node/52596
...
पोल का काढावासा वाटला?
खरे तर वरील धागा उघडतानाच मला पोल काढायचा पर्याय होता, पण तेव्हा मला वाटले की या प्रकाराला सर्वच स्तरातून विरोध होईल, त्यामुळे पोलची अशी गरज भासणारच नाही. आणि त्या धाग्यावर आपल्याला या कार्यक्रमाचे काय दूरगामी परीणाम होतील यावरच फक्त चर्चा करावी लागेल.
पण तसे झाले नाही, बरेच लोकांना तो कार्यक्रम चक्क भावलाही. अन समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू झाली.
म्हणून मग पोल हा मुद्दाम काढला कारण इथे गुप्त मतदान होते. जे या केसमध्ये गरजेचे आहे.
कारण
१) बरेच जण असे असतील जे या कार्यक्रमाला इतक्या खालच्या पातळीचे समजत असतील जे त्या धाग्यावर मतही व्यक्त करायची त्यांची इच्छा नसेल. अश्यांची संख्या समोर येईल.
२) बरेच जण असतील ज्यांना हा कार्यक्रम आवडला असेल पण चारचौघात कबूल करायचा संकोच वाटत असेल ते देखील इथे त्याला गुप्त समर्थन नोंदवतील. (पण अश्यांना विनंती करेन, ज्या कार्यक्रमाला तुम्हाला उघड समर्थन द्यायल संकोच वाटतो त्याला आपण का प्रोत्साहन देतोय याचाही एकदा नक्की विचार करा)
तळटीप - पोलचा निकाल फक्त लोकांची आवड आणि वैयक्तिक मत दर्शवेल. हा कार्यक्रम योग्य वा अयोग्य याचे ते दर्शक नसेल.
तळटीप क्रमांक दोन - इथे शक्यतो AIB वर चर्चा न करता पोलच्या संदर्भातच काही लिहायचे अस्ल्यास लिहा.
अॅडमिन साहेब याच विषयावरच्या
अॅडमिन साहेब
याच विषयावरच्या लॉक लावलेल्या धाग्यावरच्या बुवांच्या पोस्टस पहाव्यात. गाढव, थोबाड वगैरे जी भाषा वापरली आहे त्याच संदर्भ दिला आहे. अर्थात या पोस्ट्स उडवल्याने काहीही बिघडत नाही.
ज्या लोकांना हा कार्यक्रम आवडलेला नाही त्यांच्या निषेधाला दांभिक वगैरे ठरवण्याच्या मुद्याला या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे.
दांभिक, गाढव, थोबाड ह्याच्या
दांभिक, गाढव, थोबाड ह्याच्या उत्तरादाखल तुमची भाषा?
जरा बघा की, काही ताळमेळ तरी आहे का?
रसप, उपरोध कळला.
रसप, उपरोध कळला.:स्मित:
त्येच म्हणतो मी. म्हणून तर
त्येच म्हणतो मी. म्हणून तर काल नादाला लागलो नव्हतो
पण काय पण असू. रडीचा डाव नाय खेळत आपण.
एक तर एआयबीचा शो नाही झेपत आपल्याला तर नाही झेपत म्हणतो. झेपतो म्हणून दुस-याला दांभिक म्हणत नाही, म्हटलोच तर मग तशी भाषा आपल्याला वापरली तर तक्रारी करत बसत नाही. आणि सर्वात महत्वाचं..
आपण उताणं पडलो आहोत हे कळतं राव एकेकाला.
बालक, तुझं चालू दे बाळा.
काही काही पोस्टी वाचून
काही काही पोस्टी वाचून शाळेतल्या गणिताची आठवण आली.
एक माकड एका खांबावर एका तासात ३ मीटर चढते आणि २ मीटर खाली उतरते...
>>रसप, उपरोध कळला<< आईशप्पथ,
>>रसप, उपरोध कळला<<
आईशप्पथ, यापेक्शाहि तगडा उपरोध त्या धाग्यावर टग्याने केला होता. मस्त जाळं लावलं होतं; धागा उडाला नसता तर एकेक करुन दांभीक पुरोगामी मासे जाळ्यात अलगद अडकले असते...
राज अशी आमची स्ट्रेटेजीची
राज
अशी आमची स्ट्रेटेजीची सिक्रेट भस्स्कन बोलून काय मिळालं तुम्हाला?
ओह बाॅय, दॅट वाॅज योर
ओह बाॅय, दॅट वाॅज योर स्ट्रेटजी? जीज, वाॅट ए वेस्ट आॅफ माय टाइम...
राज मी तो धागा वाचलेला
राज मी तो धागा वाचलेला नाहीये, ज्याबद्दल तुम्ही बोलताय. आणी प्रतीगामी, पुरोगामी ही विश्लेषणे मी मला लावुन घेत नाही. मला जो दाम्भिकपणा वाटला त्याबद्दल मी लिहीले. रसपची पोस्ट घाणेरडी मग रणवीर आणी करन जोहर ने फरिदा जलालबद्दल जी मुक्ताफळे उधळली ती कौतुकास्पद आहेत का?
Whoa! That holier than thou
Whoa! That holier than thou attitude! I guess you are no different then (as you try to claim with your mysterious posts).
Now I feel bad I wasted my precious 30 seconds trying to be friendly with you. I'd have rather spent them catching some daambhik fishes.
राजभौ रडतराऊ ओळखता येतात ना ?
राजभौ
इग्नोरास्त्र सोडा.
रडतराऊ ओळखता येतात ना ?
>> जी मुक्ताफळे उधळली ती
>> जी मुक्ताफळे उधळली ती कौतुकास्पद आहेत का?<<
अजिब्बात नाहि. टग्या भाऊंनी "किपींग अप विथ द जोन्स" वाल्यांसाठी काहि सुभाषितं लिहीली होती. थोडक्यात, माबोचं वल्लभभाई स्टेडियम होणार होतं पण अॅडमिनने तलवार चालवली. दांभीकपणा म्हणजे एआयबी ने केलं तर फ्रिडम आॅफ स्पीच पण तेच टग्याने केलं तर तक्रार. कळतोय का विरोधाभास? अर्थात तो तुम्ही केलेला नाहि अशी माझी समजुत आहे...
राज. कळले.
राज.:स्मित: कळले.
राज ए आयबी नी कार्यक्रम
राज
ए आयबी नी कार्यक्रम करताना आणि पुढे युट्युब वर अपलोड केलं तेव्हा सुद्धा पुर्वसुचना दिलेली होती. सो बेसिकली तो कार्यक्रम फक्त त्या करताच होता. इथे त्या विषयी चर्चा करताना, कोणाचं रोस्ट करत नसताना वाट्टेल तशी भाषा वापरायची गरज नाही इतका कॉमन सेन्स नाहीये का?
उलट उदाहरण घ्यायचं तर, उद्या अर्जून कपूर, रणवीर सिंघ टिव्ही वरच्या मुलाखतीत असले शब्द वापरुन बोलायला लागले तर तो बिन्डोकपणाच आहे.
वैद्यबुआ, नुसते नेटवर
वैद्यबुआ, नुसते नेटवर अवलम्बुन राहु नका. करण जोहरला विचारले की फरिदा जलाल वर अशी कमेन्ट केलीत, तशी तुमच्या आईवर झाली तर? तो म्हणाला माझी आई फार कूल आहे. आता जास्त काय अपेक्षा करणार म्हणा.
फरीदा जलाल ने मात्र नापसन्ती व्यक्त केली. थोडक्यात काय तर आई-बापावरुन शिव्या दिल्या आणी त्याविरुद्ध ( देणार्याविरुद्ध ) कुणी बोलले तर ते दाम्भिक पण ते डिफेन्ड केले गेले तर करणारे पुरोगामी. वॉव! काय सन्ज्ञा आहे. मान गये भई!
त्याच इन्डस्ट्रीतल्या शाहरुख, सलमानने पण त्या कमेन्ट विरुद्ध नापसन्ती व्यक्त केलीय.
करण जोहरला विचारले की फरिदा
करण जोहरला विचारले की फरिदा जलाल वर अशी कमेन्ट केलीत, तशी तुमच्या आईवर झाली तर? तो म्हणाला माझी आई फार कूल आहे.
>>>>>
खरेच असे म्हणाला ??
तर मग खरेच कठीण आहे ..
चूक कबूल करा, माफी मागा.. खोटी खोटी का होईना, .. पण या अश्या कॉमेंट स्विकारेल अशी माझी आई कूल आहे म्हणत तुम्हाला फोलो करणार्यांना तुम्ही काय आदर्श घालून देत आहात याची तरी तमा बाळगा.
बाकी त्याची आई त्या शो ला हजर होतीच.. ती सुद्धा तो कार्यक्रम बघत होती.. आणि एक मुलगा सुद्धा आपल्या आईसमोर हे करत होताच.. त्यामुळे त्यांच्या व्याख्येनुसार ती कूल आहे हे समजले होतेच, पण म्हणून इतर कोणीही स्त्री अशीच कूल असावी अशी अपेक्षा कशी ठेऊ शकता..
आणि हो, शो खाजगी होता आणि
आणि हो, शो खाजगी होता आणि त्या आधी आम्ही १८+ साठीच आहे म्हणत वॉर्निंगा दिल्या होत्या असा युक्तीवाद करणार्यांनो,
त्याच्या व्होटसपवर छोट्या छोट्या क्लिप्स फिरत आहेत, ज्या घराघरात पोहोचल्या आहेत, त्यात कुठेय तुमची ती वॉर्निंग ???
ऋ, तुला मानले दोस्त.
ऋ, तुला मानले दोस्त.
संपादित.
संपादित.
आय अंडरस्टँड रश्मी. ज्यांच्या
आय अंडरस्टँड रश्मी. ज्यांच्या एक्स्पेन्स वर जोक केले गेले ते सगळेच त्याबाबतीत कूल (कूल म्हणजे एक्सेप्टिंग ह्या अर्थानी)नसतील हे पण मी समजू शकतो. नीट बघितलं तर डायरेक्ट जोक सहसा सगळे त्या रोस्ट मध्ये सामिल होते त्यांच्यावर होते. इतर काही जोक हे त्या रोस्ट मध्ये सामील नसलेल्या बाहेरच्या मंडळी वर डायरेक्ट नव्हते पण त्यांच्या एक्स्पेन्स वर होते.
उदाहरणः त्या रोडीज वाल्याला करण जोहर तू विशाल ददलानीनी किमोथेरपी घेतली तर कसा दिसेल तसा दिसतोस असं म्ह्णाला. इथे जोक हा डायरेक्ट विशाल दादलानी वर नव्हता.
फरिदा जलालचे म्हणाल तर, काय वयस्कर बायकांकडे वाईट नजरेने बघतो ह्या अर्थाचा पण आणखिन ग्राफिक ट्विस्ट देऊन केलेला जोक होता.
आणि त्या सलमान शहारुखचे सांगू नका आजिबात, एक नंबरचे इगोटिस्ट आणि बुरसटलेल्या विचारांचे लोकं आहेत ती.
वैद्यबुवा एक लक्षात घ्या
वैद्यबुवा एक लक्षात घ्या अमेरीका आणी तिथली जीवन शैली मोकळेपणाच्या पलीकडली आहे. तिथे रेप झालेल्या स्त्रीशी सुद्धा कुणी फटकुन वागत नाही, का तर तो तिचा दोष नाही हे त्याना समजले आहे. पण भारतात असे व्हायला बराच काळ लोटणार आहे. ऋन्मेष म्हणतो त्यात तथ्य आहे.
आजकाल बलात्कार आणी बाकी दृष्यान्चे सुद्धा शुटिन्ग करुन ते फेसबुक वर वगैरे टाकले जातेय. हे असले नेट वापरणार्या ८ किन्वा ९ वी तल्या मुलाने/ मुलीने बघीतले तर त्याचा काय परीणाम होईल याची कुणाला कल्पना आहे का? माझी ९ वी मधली भाची आणी माझा ८ वी मध्ये असणारा पुतण्या फेसबुक बघतो. चूकुन असे बघीतली गेली तर लहान वयात सन्स्कारी मने, शिकवण पण मारली जाईल.
आम्ही विरोध करतो तो याच कारणाने. शिव्या तर याच बेसिक आहे, आता वरपर्यन्त म्हणजे कुठे हे लोण पोहोचणार आहे हे माहीत नाही.
रश्मी, युट्युब, फेस्बूकवर
रश्मी, युट्युब, फेस्बूकवर आमचीही मुलं जातात आणि त्यांच्या नजरेस ह्या गोष्टी पडायची टोटल पॉसिबिलिटी असते. आज आपण फेसबूक, युट्युब ह्या गोष्टींवर पाळत ठेवून राहिलो तरी शाळेतून सुद्धा बरीच मौलिक माहिती मुलांना कळते. सरतेशेवटी मुद्दा असा आहे की ह्या गोष्टी आजूबाजूला आहेतच आणि पुढेही असतील आणि मुलांशी नीट कम्युनिकेशन ठेवून त्यांना हे हँडल कसं करायचं ते आपण पालक म्हणून शिकवलं पाहिजे (आधी आपणही शिकलं पाहिजे).
आता ह्याचाच अर्थ मी(किंवा इतर बरीच लोकं) लगेच त्या रोस्टचं समर्थन करतोय असा नाही होत. ते रोस्ट एक कॉमेडीचा प्रकार आहे जो सगळ्यांनाच खपेल असा नाहीये येवढच काय ते खरय आणि तेवढच महत्व त्याला दिलं जावं हा मुद्दा आहे.
त्यावरुन लगेच मुलाबाळांच्या मनावर वाईट संस्कार होत आहेत, संसकृतीची वाट लागत आहे असे गळे काढायची गरज नाहीये (तुम्ही काढताय असं नाही म्हणत आहे).
बाकी ऋनमेषचे म्हणाल तर आता पर्यंत मांडलेल्या एकाही मुद्द्यात फार मेरिट नाहीये,त्याला आणखिन बरच शिकायची गरज आहे.
जंगली कबूतर लिहायला घेतलं
जंगली कबूतर लिहायला घेतलं पाहीजे.
फक्त सुरुवातीला वॉर्निंग दिली की झालं ना ?
की ते रोस्ट आणि बेक असल तरच बाबा अलाऊड आणि कुक्ड असेल तर नाही ? नाही म्हणजे असले नियम निघाले की इंडीयन पीनल कोड बदललं की सेन्सॉरशिप ची मसंदशीप झाली ? काही कळत नाही. आपण फार म्हणजे फार फार अडाणी लोक आहोत, एका साप, नाग आणि गारुड्यांच्या देशात राहत आहोत. आपल्याला म्हणजे ना...जाऊद्या आता !
बाकी ऋनमेषचे म्हणाल तर आता
बाकी ऋनमेषचे म्हणाल तर आता पर्यंत मांडलेल्या एकाही मुद्द्यात फार मेरिट नाहीये,त्याला आणखिन बरच शिकायची गरज आहे.
>>>>>>>
सर, जेव्हा आपण योग्य बाजुने बोलत असतो तेव्हा मुद्दे असे शोधावे लागत नाहीत. बस प्रामाणिकपणे जे काही वाटते ते बोलणे पुरेसे ठरते
त्याला आणखिन बरच शिकायची गरज
त्याला आणखिन बरच शिकायची गरज आहे.<<<
ऋन्मेष,
लावून टाका शिकवणी.
बेफिकीर, वेगळी शिकवणी लावायची
बेफिकीर,
वेगळी शिकवणी लावायची गरज नाही.
मी मायबोलीवर लॉगिन करतानाच माझ्यातला ज्ञानाचा सारा अहंकार बाहेर ठेऊन, मायबोलीला विद्यापीठ समजत आणि येथील प्रत्येक लेखकाला गुरू समजतच प्रवेश करतो. कारण येथील प्रत्येक पोस्ट हि काहीतरी शिकवूनच जाते.., चांगलेवाईट !
मायबोली व्हर्साटाईल झालय काही
मायबोली व्हर्साटाईल झालय
काही लोक याला गूगल समजतात, काही शिकवणी तर काही जण थेट प्रवचनकार बनून ऑडीयन्स शोधायला येतात.
आणि हो, शो खाजगी होता आणि
आणि हो, शो खाजगी होता आणि त्या आधी आम्ही १८+ साठीच आहे म्हणत वॉर्निंगा दिल्या होत्या असा युक्तीवाद करणार्यांनो, >>
ऋन्मेष भौ, एहढे धागे विणतोस तू. एक एआयबी च्या धर्तीवर पण येऊ दे की. पहिल्या पोस्टमधे किंवा हेडर मधे वॉर्निंग द्यायची फक्त. ज्यांना एआयबी चाललंच आहे त्यांचे उल्लेख त्या पद्धतीने केले तर ते लोक ऑव्जेक्षण घेतील असं वाटत नाही. (सेन्सॉर बोर्डाचा उल्लेख करून पण काहींच्या टकु-यात घुसंना, उलट बिबडोकपणा वगैरे म्हणायला लागलेत
मेंदूचा अर्धांगवायू ? )
या पोलचं अॅनालिसीस
या पोलचं अॅनालिसीस करूयात
एआयबी सारख्या कार्यक्रमाच्या विरोधात ८३ मतं आणि समर्थनात २३. समर्थनातल्या मतांमधे फारतर एक दोन ने वाढ होऊ शकते. पण विरोधात असलेलं पब्लिक दिल्लीप्रमाणे एकत्र आलं तर हा आकडा फुगू शकतो. हे जे २३ आहेत ते सर्वत्र एकीने हल्ला करतात. पण जे ८३ आहेत ते विखुरलेले आणि फारसे अध्यात मध्यात नसलेले लोक असतात. त्यामुळं २३ जणांच्या चाव्यांना ८३ चा एकत्रित विरोध कधी दिसून येत नाही. विश्लेषणातून ही एक थिअरी जन्माला आलेली आहे. इतरांनीही विश्लेषण चालू ठेवावे ही विनंती.
आंग्रे यंग गंगी! काय
आंग्रे यंग गंगी! काय म्हन्तीस? झालं का पानी बीनी भरुन सकाळचं?

उताणे पडल्यालं वळखू येईना अन
उताणे पडल्यालं वळखू येईना अन चालले ...हुं
चालू ठेवा प्रयत्न. कधी न कधी बच्चन व्हाल.
काय हो बच्चनभाऊ टण्याच्या
काय हो बच्चनभाऊ
टण्याच्या पोस्टची तक्रार का केली होती ? लॉजिक कळळ नाही ब्वॉ ! एआयबी स्टँडर्डपेक्षा कमी पडली का ?
( उडण्याआधी वाचली म्हणून विचारतोय)
लॉजिक कळत नाय तुला म्हणून तर
लॉजिक कळत नाय तुला म्हणून तर म्हंटलं जा पाणी भर.
अन इतकं आंग्रे पण होऊ नकोस! पार गेलीस चुकीच्या गल्लीत तुझ्या कळशा घेऊन. नक्को तिथे पानी भरायला जाऊ नकोस! गप बस एका जागी!
मी जातो झोपायला, उद्या बोलू.
आश्शं व्हय. बलं बलं. यत्ता
आश्शं व्हय. बलं बलं.
यत्ता पैली
झोपायला का अॅडमिनच्या विपूत रलायला चालला बाला ?
चिडकं चिडलं
तुमच्यात पुरूषाला आली गेली
तुमच्यात पुरूषाला आली गेली म्हणतात का हो ? तुमची मुलं कशी बोलत असतील याचं चित्र आलं डोळ्यासमोर
ते चिडके बुवा जाऊ देत. रोडीज
ते चिडके बुवा जाऊ देत.
रोडीज वगैरे अमेरीकन कन्सेप्टची इथं काही एक गरज नाही जर मोकळेपणा हवाच असेल तर मग नाटकांना तरी कशाला सेन्सॉरशिप हवी ? हा कार्यक्रम मनोरंजनाच्या अंतर्गत येतो. नियमाप्रमाणे अशा कार्यक्रमांना नाटकांसाठी जे सेन्सर बोर्ड आहे त्याची परवानगी लागते. कार्यक्रम सादर करण्यापूर्वी त्यांना त्याची स्क्रीप्ट द्यावी लागते.पण हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित कार्यक्रम असले की ते ही प्रोसीजर धुडकावून लावतात. गणेशोत्सवात या सर्व गोष्टींचं ज्ञान कार्यकर्त्यांना पोलीसांच्या कृपेने होतं. कॉलनीतल्या गणेशोत्सवात मुलांसाठी पुरस्कार आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले होते. नशीब म्हणून आधी चौकीवर कल्पना द्यायला गेलो तेव्हां पीआयने सर्टीफिकेट आणायला सांगितलं तेव्हां कॉलनीतल्या एका नाट्यकर्मीच्या ओळखीने स्क्रीप्ट वगैरे बनवून सोपस्कार पार पाडले गेले.
करण जोहरच्या या कार्यक्रमात जी भाषा वापरली गेली ती पाहता जर या कार्यक्रमाला असे सर्टीफिकेट मिळत असेल तर मग मराठी नाटकांवर अन्याय कशाला करायचा ? ओवेसीला बंधनं कशाला घालायची ? ओवेसीला जी परवानगी मिळाली होती त्यात कार्यक्रमाचं शूटींग होता कामा नये, सहाच्या आत कार्यक्रम संपला पाहीजे, चार भिंतीच्या आतच आवाजाची पातळी राखली गेली पाहीजे, क्लोज्ड सर्कीट टीव्ही लावता कामा नयेत, बाहेर प्रेक्षक उभे राहू नयेत, कार्यक्रम सार्वजनिक झाल्यास आयोजकांना अटक करण्यात येईल अशी बंधनं होती.
हा जर कायदा असेल तर करण जोहरला वेगळा कायदा आहे का ? एक तर अमेरीकेचे कायदे पाळा किंवा भारताचे. इथं अमेरीकेचं किंवा इतर देशांचं उदाहरण देण्याचं कारण नाही. इथला कायदा काय आहे त्याबद्दलच बोललं गेलं पाहीजे. रोडीज मधे काय होतं वगैरे उदाहरणं द्यायचं काय कारण आहे ? ते काय आदर्श वगैरे उदाहरण आहे कि काय ? काही च्या काही लॉजिक लावून झोडपण्याचे उद्योग बंद व्हायला हवेत. दांभिक कोण आहे ते सांगायचीही गरज नाहीये. त्याच भाषेत इथं पोस्टी लिहीलेल्या चालत नाही स्वतःला आणि म्हणजे एआयबी सहन करा. कमाल आहे.
रच्याकने.. 'वैद्य' पेक्षा
रच्याकने..
'वैद्य' पेक्षा 'डॉक्टर' आडनाव जास्त शोभेल.
आणि 'नयनीश' पेक्षा 'आयगॉड'.
-------------------
माझे बदललेले मत :-
हा एक जबरदस्त कार्यक्रम होता.
सहभागी लोक, आयोजक, प्रक्षेपक ह्यांची बुद्धिमत्ता व सर्जनशीलता केवळ वादातीत आहे.
कल्पकता तर मिनिटा-मिनिटात ठासून भरली होती.
मुखर्जी, चटर्जी, गुलजार वगैरे बायल्यांनी लावलेल्या पांचट विनोदाच्या फुटकळ सवयी मोडून, भारतीय रसिकांचा प्रवास खऱ्या अर्थाने परिपक्व, वास्तववादी, निखळ, निर्भेळ अश्या विशुद्ध विनोदनिर्मिती व ग्रहणाकडे सुरु झाला असून त्या प्रवासाला गती देणारा हा एक महत्वाचा धक्का होता.
ह्यातले विनोद तरल, हळवे, खुसखुशीत, खुमासदार, वैश्विक, बुद्धीप्रामाण्यवादी, तर्काधिष्ठित, मार्मिक, सर्वधर्मलिंगरंगसमभाववादी होते.
ह्या व अश्या कार्यक्रमांमुळे (च) भारत खऱ्या अर्थाने आधुनिकतेकडे आश्वासक वाटचाल करणाऱ्या कलेचा आश्रयदाता देश म्हणवला जाईल.
असे कार्यक्रम वरचेवरच नव्हे खालच्याखालीही होत राहायला हवे.
इंटरनेटच नव्हे तर गल्लोगल्ली - उंबर, बदामाच्या झाडांखाली सांडलेल्या फळांसारखे पडलेले - जे गणपती स्थापन होत असतात, त्या उत्सवांतसुद्धा व्हायला हवे, जेणेकरून खऱ्या अर्थाने तळागाळातल्या कुशलतेला चालना मिळेल व ही परिपक्वता अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून एक खूप मोठे सामाजिक, बौद्धिक, वैचारिक प्रबोधन घडून येईल.
रसप तुमचा कोंबडा
रसप
तुमचा कोंबडा गावगप्पांपेक्षाही वेगात प्रवास करतो अशा अर्थाचं काहीतरी विधान होतं त्यात.
ज्यांना आवडला आहे ते मूळ इंग्रजी संवाद देतील काय ?
http://epapermt.timesofindia.
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31838&articlexml=08022...
वैद्यबुवा एवढ्या तेवढ्या
वैद्यबुवा एवढ्या तेवढ्या कारणामुळे संस्कृती बुडते हे मानणार्यातली मी नाहीये, पण म्हातारी मेल्याचे दुख: नाही तर काळ सोकावेल, हे वर कुठेतरी लिंबुभाऊनी लिहीलेय, तेच खरे होतेय की काय याची भीती वाटु लागलीय.
माझ्याच कॉलनीतली दोन मुले कायम मुर्खासारखी बोलत असतात, अगदी सिनेमातल्या पाणचट डॉयलॉगपासुन सर्व काही. माझी मुलगी या सगळ्या मुलात खेळते, त्यामुळे निदान या वाईट गोष्टी तिच्यापासुन दूर राहाव्यात अशी माझी ईच्छा असेल तर काय वाईट?
तुम्हाला अजूनही भारतातले वातावरण आणी अमेरीकेतील वातावरण यातला फरक लक्षात आलेला नाहीये असेच नाईलाजाने म्हणावे लागतेय.
माझे म्हणणे हेच आहे की अमेरीकेच्या या शो चे अंधानुकरण करण्या ऐवजी मग या लोकांनी तिथल्या इतर चांगल्या शोची नकल का नाही केली? असतील की या पेक्षाही सरस कार्यक्रम. नेमके वाईटच का उचलले जातेय तिथुन? हाच फरक पडतोय ना आपल्या आणी अमेरीकेच्या वातावरणातुन.
तुमच्या जॉन केरीना घरासमोरचा बर्फ साफ केला नाही म्हणून दंड झाला, आणी तो त्यांनी भरण्याचे कबुल पण केले किंवा भरलाही असेल. भारतात हे घडेल? अहो अमेरीकेमधले कायदे, व्यक्ती स्वातंत्र्य्र हे भारतापेक्षा फार वरचे आहे. बर्याच जणाना माझी ही तुलना नाही आवडणार पण जे चांगले आहे त्याला मी चांगलेच म्हणणार.
म्हणून माझ्या असल्या शोना विरोध आहे.
रश्मी तै श्रीपाद ब्रह्मेंचा
रश्मी तै
श्रीपाद ब्रह्मेंचा लेख वाचलात का मटातला ? वर लिंक दिलीय.
अमेरीकेत हा कार्यक्रम सादर होणं आणि भारतात यातला नेमका फरक त्यांनी दिला आहे जे तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत आहात. अमेरीकेत चालतं म्हणून इथे का नाही ही एकांगी भूमिका आहे हे त्या भूमिका घेणा-यांना कधी समजणार कोन जाणे !
ब्रह्मे म्हणतात अशा कार्यक्रमांनी संस्कृती बुडत नाही, तद्वत दुर्लक्ष करावे (अनुल्लेखाने मारावे). पण अडचण अशी आहे की मीडीयातून फारच गवगवा झाला शिवाय नेटवर कार्यक्रम सार्वजनिक करण्यात आला. सादरकर्ते लोक हे तरुणाईचे आयडॉल होते. संस्कृती बदलणार असेल तर आपण कोण अडवणार ? ती तशी बदलेलही. पण एव्हढं होऊन निषेध झालेला आहे म्हणजे लोकांना आवडलेलं नाही यात दांभिकपणा कसला आलाय ?
याउलट या भाषेचं समर्थन करणा-यांना आपण कशाचं समर्थन करतोय हे नीट कळालेलं आहे का ? तेव्हढा मोकळेपणा त्यांच्या स्वतःच्या व्यक्तीमत्त्वात आहे का ? असेल तर त्यांना ही भाषा चालणारे का ? (सेन्सॉरशिपचा मुद्दा आता सोडून देतो).
याच अंकातला हा आणखी एक
याच अंकातला हा आणखी एक लेख.
http://epapermt.timesofindia.com/Article.aspx?eid=31835&articlexml=08022...
लेखक मानसोपचार तज्ञ आहेत तसेच विशिष्ट विचारसरणीचे आहेत हे कळतं. तरी काही मुद्दे नाकारता येणार नाहीत.
आंग्रे अहो पण एकटे
आंग्रे अहो पण एकटे वैद्यवुवाच कुठे याचे समर्थन करतायत? भारतातल्या लोकानी पण याचे समर्थन केलेय की. ( मायबोलीवरच्या). म्हणून मी एकट्या वैद्यबुवा ना अमेरीकेचे प्रतिनीधी म्हणून धोपटु शकत नाही ना.:फिदी: त्यानी का एकाच बाजूने सी सॉवर वर बसाव? भारतातल्या दुसर्या प्रतिनीधीना पण बसवा की दुसर्या पारड्यात.:खोखो:
रश्मी तै मी कुणाचं नाव
रश्मी तै
मी कुणाचं नाव घेतलेलं नाही. त्यांनी फारच चमचमीत भाषा वापरून वर एडमीन कडे तक्रार करून मोकळे झाले होते. माझ्या दृष्टीने तो एपिसोड संपला आहे. त्यांच्याकडून कुठे कोप-यात चालूच राहीला तर घेणं देणं नाही
असो.
भारतातला रॅशनॅलिस्ट गट आहे त्याबद्दल नंतर कधीतरी.
रॅशनेलिस्ट थिंकिंग ही फक्त
रॅशनेलिस्ट थिंकिंग ही फक्त थिंकण्याची गोष्ट आहे की अंगी बानवण्याची पण ?
बोले तैसा चाले या म्हणीप्रमाणे फक्त तळीराम वागला.
इतके दिवस संघ, भाजपा हे किमान
इतके दिवस संघ, भाजपा हे किमान खाजगीत जसे आहेत तसेच सार्वजनिक जीवनात असे वाटत होते. पण या कार्यक्रमाला सांस्कृतिक खात्याने परवानगी दिली असेल तर बंदी आणू शकत नाही असे विधान भाजपा नेत्यांनी केले. एरव्ही याच लोकांनी हल्ला माजवला असता यात शंका नाही.
( परवानगी काय काँग्रेसच्या सांस्कृतिक खात्याने दिली होती का ?)
बोले तैसा चाले उक्तीनुसार वागणारे लोक भिंग घेऊन शोधण्याची वेळ आलीय कि काय असं वाटतंय.
चैतन्य दादा, उपरोक्त दोन्ही
चैतन्य दादा,
उपरोक्त दोन्ही लेख मी तरी आधीच वाचले होते.
ब्रम्हेंचा लेख लिहिण्यासाठी लिहिल्यासारखा वाटला. असे काहीच हाती आले नाही, जे फेसबुकेत्यादी ठिकाणी सांडलेले नव्हते.
व्हेअरअॅज डॉ. देशपांडे ह्यांचा लेख 'विनोद ही किती कंटाळवाणी गोष्ट आहे' हे सिद्ध करेल असा आणि इतका रटाळ आहे. त्यांनी टिपिकल साहित्य समीक्षक कसं विच्छेदन करतात, तसं केलं आहे. बोअर.
@ रसप बदललेले मत
@ रसप बदललेले मत
आज मी हा कार्यक्रम माझ्या तीन
आज मी हा कार्यक्रम माझ्या तीन महिन्यांच्या मुलाला दाखवणार आहे. (हो. तो कार्यक्रम अजूनही यु-ट्यूबवर आहे. आणि +१८ च्या सेक्शनमध्ये तो कधीच नव्हता)
मी मोठ्या हौशीने माझ्या मुलाचं नाव 'साहिर' ठेवलं. पण साहिरच्या काव्यातली तरलता आउटडेटेड आहे. आता थिल्लरपणा महत्वाचा आहे. ठेवलेलं नाव तर बदलू शकत नाही, पण आत्तापासून त्याला 'अपग्रेड' करायला लागतो.
(No subject)
Pages