स्लो कुकरमधे करण्याच्या पाककृती

Submitted by webmaster on 11 July, 2008 - 21:17

स्लो कुकरमधे करण्याच्या पाककृती

या अगोदरचे हितगुज इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(जुन्या विभागातला पूर्वा यांचा संदेश)
Poorva
Friday, July 11, 2008 - 9:10 pm:
Dinesh, Slow cooker madhye bhajya kashya karavya? Rassa bhajya ki koradya?
Mhanje sakali 5 vajata sandhyakalchi bhaji karun fridge madhye thevun jate sadhya, slow cooker madhye theun gele tar mulanna garamagaram khayala milel asa vichar kela.
Orchid, moogacha shira pan sanga.

काहि मर्यादीत प्रमाणात स्लो कूकरमधे तेल तापवून फोडणी वगैरे करता येते. मर्यादेपेक्षा तपमान वाढले, तर बहुतेक कुकर आपोआप बंद होतात.
मग त्यात रस्सा भाज्या करताना आधी भाज्या आणि मग ग्रेव्हीचा मसाला वगैरे टाकायचा. तेलाशिवाय केल्या तर फारच उत्तम आणि फोडणी त्यात न करता वेगळी करुन वरुन घातली तरी छान.
आधी भाज्या करुन ठेवल्या असतील तर त्या या कुकरमधे पाणी घालुन त्यात भाज्यांची भांडी ठेवुन गरमहि करता येतात. यावेळी दोन तीन पदार्थ गरम करता येतात.
या कुकरमधे आपोआप बंद व्हायची सोय असतेच.
भाज्यात डाळ वगैरे असेल तर ती आधी भिजवून घेतली तर छान. एरवीही कुठलीही डाळ शिजवायची आधी भिजवून ठेवली तर लवकर शिजते.

स्लो कुकर मधे चिकन पण छान शिजते.

चिकनचे तुकडे करुन आपल्या हव्या त्या ग्रेव्ही मधे, थोड तेल आणि दही (हवं असेल तरच) घालुन ४-५ तास (आदल्या रात्री) मॅरिनेट करुन ठेवायचे. सकाळी कुकर ऑन करायचा. किती वर सेट केलाय त्याप्रमाणे ४-५ तासात मस्त चिकन गेव्ही तय्यार. वरतुन हवं तर क्रीम, कोथिंबीर घालायची.

मी दम आलु पण करते. छोटे बटाटे थोडे बेक करुन घेते. तळत नाही त्यामुळे तेल कमी... Happy
बटाट्यांना टोचे मारुन दम आलु ग्रेव्हीत टाकायचे. स्लो कुकर मधे लावायचे. मस्त शिजतात आणि ग्रेव्ही पण मस्त आत मुरते. वरतुन क्रीम, खवा, रिकोटा, ड्रायफ्रुटस, कोथिंबीर इ इ घालुन सर्व्ह करायचे.

स्लो कुकरात दाल माखनी, राजमा, छोले, इ. इ पण करता येते.

मटकीची उसळ, चवळीची उसळ पण... Happy आधी फोड्ण्या करुन घ्यायच्या आणि मग कुकर लावताना वर्तुन घालायच्या.

स्लो कूकरमध्ये सगळे छान होते. सूप, ओटमील,फिरनी, गव्हाची खीर, मँगो शिरा,निहारी, पाया सूप्,पुलाव. मी तर केक,ब्रॉउनी सुद्धा केलीय. मस्त मॉइस्ट होते.

ते वरती मायक्रोवेव इडली साचा मला जराही नाही आवडला. चिवट लागतात इडल्या मला तरी. त्याच रोजच्या इडली पात्रात मस्त हलक्या व फुलतात. एकदा धोणास केले होते तेही चामट लागले.

स्लो कूकर म्हणजे काय >> माझ्या मते शिट्टीशिवाय असलेला electric cooker.
मी सध्या तोच वापरतोय.. भात शिजायला त्यात अर्धा-पाउण तास लागतो.

धन्स केदार. बघितला केपी Happy माझ्या पुण्याच्या नणंदेकडे आहे, पण त्यालाच स्लो कूकर म्हणतात हे आत्ता कळले.
केदार, अर्धा पाऊण तास भात शिजायला लागतो म्हणजे जास्तच आहे की !

म्हणजे जास्तच आहे की >> म्हणुनच स्लो म्हणतात ना आशु Proud
पण एकट्या माणसाला ठिक आहे की.. भात लावुन ठेवायचा..आणि उरलेल्या वेळात बाकी गोष्टी करता येतात.. शिट्ट्या मोजायला नको...

>>>>उरलेल्या वेळात बाकी गोष्टी करता येतात.. शिट्ट्या मोजायला नको...
कुकर लाऊन उरलेला वेळ केद्या बाहेर शिट्ट्या मारायला मोकळा.. Proud

विकिपेडिया वर स्लो कुकर आणि राईस कुकर असे दोन कुकर आहेत... हे दोन्ही एकच का? इथे मालदिव मध्ये दोन्ही प्रकार दिसतात... पण सगळ्याना राईस कुकरच म्हणतात.

नाही. स्लो कुकर वेगळा. याला क्रॉक पॉट पण म्हणतात. त्याचे जे भांडे असते ते काचेसारखे (कोरेल ची भाडी ज्याची बनलेली असतात तसलेच. काय म्हणतात ते नक्की आठवत नाही अत्ता.) असते. स्लो कुकरला टाइमर असतो तसेच टेम्प सेटिंगही असते. स्लो कुकर च्या मागे आयडिया ही की, त्यात अन्न शिजायला ठेवले की सेट टेम्प ला अन्न शिजते आणि आपल्याला सारखे लक्ष ठेवायला लागत नाही. स्लो कुकरच्या झाकणाला व्हेंट नसते. पदार्थ आतल्या वाफेवर शिजतो.

राईस कुकर चे भांडे हे धातु चे असते. राईस कुकर ला कुक आणि वॉर्म असे दोनच ऑपशन्स असतात. भात झाल्यावर जर तसाच वॉर्म वर ठेवला तर बर्‍याच वेळेला भात खाली लागण्याची शक्यता असते. राइस कुकर च्या झाकणाला व्हेंट असते. वाफ बाहेर पडायला.

राईस कुकर मधे भात १०-१२ मिनीटात होतो....आणि मस्त मोकळा होतो Happy पुलाव, भाज्या उकडायला ही हा उपयोगी पडतो. खाली भात लावायचा आणि वर चाळणीत बटाटे, बीन्स, कॉलि. इ इ उकडायचे. ही चाळणी कुकर बरोबरच येते.

स्लो कुकरमधे गाजर हलवा खुप छान होतो. गाजर तुपात परतुन त्यात साखर, खवा, दुध, बदाम काजु, मिल्क्मेड ई. आपल्या आवडीनुसार घेऊन, परतुन शिजवायला ठेवायचे. जेवढे जास्त शिजेल तेवढा छान लागतो हा हलवा. माझी मैत्रीणतर आदल्या दिवशी ठेवते लोवेस्ट सेटींगवर दुसर्या दिवशी पर्यंत मस्त मुरतो हलवा. मी अजुन ट्राय केले नाही पण खाल्ला आहे तिच्याकडे! छान लागतो हा हलवा!

स्लो कूकरमध्ये आदल्या रात्री उसळी लोवेस्ट (लो वेस्ट नव्हे) सेटींगवर शिजायला ठेवल्या तर सकाळपर्यंत मस्तच होतात. काळ्या चण्याचे तर मस्त कॉन्सोमे स्टाईल सूप पण होते.

राइस कुकर मध्ये मी नारळी भात केला... भात १/२ वाटी, तूर डाळ १/४, घालून अर्धा शिजवून घेतला, मग खोबर्‍याची पावडर १/२ वाटी, साखर १/२ वाटी, काजू आणि १/२ सफरचन्द घालून शिजवला... खूप छान झाला होता...

मी परवाच एक ड्च अवन घेत्ले आहे. जाड बुडाचे भांडे. त्यातही हे प्रकार मस्त होतील असे वाट्ते आहे.

मी सध्या राईस कुकर विकत घ्यायचा विचार करतेय. पण राईस कुकरपेक्षा स्लो-कुकरचा उपयोग जास्त होतो का? म्हणजे जास्त पदार्थ करता येतात का? का दोन्ही वेगवेगळ्या कामासाठी वापरले जातात? राईस-कुकर आणि स्लो-कुकर ह्याबद्दल डिटेल मार्गदर्शन कोणी करू शकेल का?

हे दोन्हीचा वापर जरा वेगळा आहे. भाताचा कूकर्(राईस कूकर ) हा ज्यास्त करून भात्,पुलाव वगैरे साठी ठिक आहे किंवा ज्यास्त उपयुक्त असे म्हणता येइल.. slow cooker ह्यामध्ये आपण temp & time हे adjust करून वरच्या बर्‍याच गोष्टी करता येतात.
राईस मध्ये एवढी flexibility & same efficiency ( based on the uses ) नाहीये.

तुम्ही जर भाताचे भरपूर प्रकार खाणार असाल तर छान आहे. माझ्या मैत्रीणीने राईस कूकर मध्येच एकदा कढी केली व काहीतरी प्रॉबलेम झाला होता.(भरपूर पाणी घालून बाहेर आले, जसे कूकरमध्ये होते तसे) तसे राजमा, छोले जरा घट्ट पैकी होतात असे मी एकले आहे, मी केले नाहीये.

हे सर्व मी ईलेक्ट्रीक राईस कूकर विषयी लिहिले आहे, मायक्रोवेव नाही. Happy

धन्यवाद मनुस्विनी. मलाही इलेक्ट्रीक राईस कुकर बद्दलच माहिती हवी होती. आयुष्यातली २५-३० वर्ष भारतात काढून अचानक अमेरिकेत आलं की इथल्या अनेक स्वयंपाकाच्या भांड्यांबद्दल भयंकर कन्फ्यूज व्हायला होतं. अश्यावेळी मायबोली हा मोठ्ठा आधार वाटतो मला.

मंडळी,

काल स्लो कुकर मधे साबुदाणा खिचडी केली. अप्रतिम झाली Happy

आधी जिर्‍याची फोडणी करुन घेतली. भिजवलेल्या साबुदाण्यात दाण्याचे कुट, मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि उकडलेल्या बटाट्याचे तुकडे टाकले.
कुकर लोएस्ट सेटिंग ला ऑन केला. फोडणी कुकर मधे घातली. वरतुन साबुदाणा मिक्ष्चर घातले. नीट कालवले. झाकण ठेऊन एक वाफ आणली. एकदा ढवळले मग झाकण जरा कलते ठेऊन मधुन मधुन ढवळले.
तेल खुप कमी लागले. खिचडी खाली अजिबात लागली नाही. सारख लक्ष ठेवायला लागल नाही. तासाभरात मोकळी खिचडी तय्यार.... Happy
ट्राय करुन बघा.....

Pages