एक रंज्यक/ मजेशीर घटना - आजीची आणि आमची

Submitted by विश्या on 27 January, 2015 - 06:30

आज आमच्या धाग्यावर (कोपुवर ) अचानक आजीचा विषय निघला आणि मनाने अचानक भूतकाळातील (आजीबाबत घडलेल्या ) घटनांवर फुंकर मारली , त्यातलाच एक प्रसंग मांडत आहे .

माझ गाव कोल्हापूर जिल्ह्यात वसलेले , वारणा नदीच्या काठावर , आणि माझ घर हि (त्यावेळी) कौलारू , स्वयपाक घराच्या वरती एक काच जी कौलांच्या मधोमध बसवलेली कारण (दिवसा सूर्यप्रकाश सरळ घरात येईल व विजेचा वापर कमीत कमीत करता येईल यासाठी ) , माझे कुटुंब खूप मोठे असल्यामुळे कधी आजीला स्वयपाक घराचा ताबा घेण्याची वेळ येत नसे , पण नेमका तो एक दिवस ज्या दिवशीची घटना सांगण्यासाठी हा धागा काढला आहे .

त्या दिवशी घरातील ३ चुलते त्यांचे कुटुंब घेऊन सौन्दातीला गेले होते , आणि माझी आई (चार नंबरची ) शेणी (गौर्या ) लावण्यासाठी गेली होती तर धाकटी चुलती धुणे धुवत होती , अमी लहान होतो (चौघे - सक्खे आणि चुलत भाऊ ) आणि शाळेला जायला उशीर होतोय म्हणून सारका जेवण पाहिजे म्हणून कांगावा करत होतो (त्यावेळी जेवण पाहिजे म्हणून रडावं लागत होत आणि आता मुलांना जेव म्हणून सांगून सांगून रडावं लागत ) , मी तर अक्षरश पाठच घेतली होती , आणि त्यामुळेच आजीने आज स्वताच , स्वयपाक घराचा ताबा घेऊन आमाला काही तरी झटपट होईल असे काहीतरी करून द्यावे म्हणून ठरवून जेवण्याच्या खोलीत आली होती , थोडासा अंधुक असा प्रकाश होता स्वयपाक घरात आणि त्यावली झटपट बनवता येईल आणि सर्वाना आवडेल असा एकाच पदार्थ असायचा तो म्हणजे झुणका (पिठलं) आणि भाकरी , म्हणून आजीने पिठलं करण्याचा विचार करून बेसनच्या पिठाचा दाबा शोधला आणि काही वेळातच पिठलं आणि भाकरी खायला दिली (आजी ची मायाच असते तेवढी ) आणि अमी चौघे हि हाताश्या सारके त्यावर तुटून पडलो पण काही दोन तीन घासातच आमाला जाणीव झाली कि काहीतरी भलताच खातोय , आणि तेवढ्यात अचानक पोटात खळ खळ वाजून लागले , अचानकच पोटात कळ मारू लागली , चौघांना एकदमच धन्डली (decentry ) लागली , पोटात दुकू लागले , आजीने लगेच काहीतरी प्रथम उपचार केले पण काहीच चालेना शेवटी , काकूला ला दंगा ऐकू आला आणि आता येताच तिला अंदाज आला पोरांची पोट बिघडली एकदम , सासू बाईंनी एकदमच मिरच्या घातल्या बहुतेक पिट्ल्यत , पण कसलाच विचार न करता चौघा हि "कुंभाराच्या दवाखान्यात पळवले (जवळच होता त्यामुळे ) , डॉक्टरांनी तपासून लगेचच काही औषधे दिली आणि झोपून राहायला सांगितले , अन्नातून काहीतरी भलतच गेले आहे पोटात त्यामुळे अचानक चौघांना एकदम संडासला लागले "

तर हा किस्सा घडला , आता काय घडले तर , त्यावेळी "निरमा कंपनीचा निरमा हा सेम टू सेम बेसन पिठासारखा दिसायचा , (जर हातात घेतले तरच खडबडीत पनावरून जाणवायचे कि हा निरमा आहे ) त्यादिवशी काकूने धुणे धुवायला जाताना कपडे कमी असल्याने थोडासा निरमा घेतला आणि गडबडीत निर्म्याचा डबा आणि स्वयपाक घरातच ठेवला , आजीला बिचारीला त्या अंधुक प्रकाशात निरमा आणि बेसनचे पीठ यामधला फरक नाही समजला आणि तिने नातवंड भुकवलित म्हणून गडबडीने झुणका आणि भाकर खायला करून दिली होती .आणि मग पुढे मग २ दिवस अमी शाळेला सुट्टी ठोकून मस्त घर ते पारडा फिरत होतो .

भूतकाळातील आजीच्या आठवणी सांगताने मन भरून येते , त्या प्रेमळ आठवणी , फक्त एक क्षण मागे गेलोत तरी अखंड slide show च मनासामोरून प्रवास करताना दिसतो .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy
थोडक्यात वाचला म्हणायचं तुम्ही मुलं. पण निरमा पावडर पाण्यात विरघळली कशी नाही ह्याचं आश्चर्य वाटलं.

आमच्या ओळखीच्या एक आजी खेड्यात रहातात. एके दिवशी त्यांच्या मोठ्या मुलीच्या डिलीव्हरीची बातमी येणार होती आणि मुलीच्या काळजीनं त्यांना खुप दडपण आलं होतं. त्यात संध्याकाळी वीज नव्हती गावात. त्या सगळ्या मनःस्थितीत त्यांनी धाकट्या मुलीच्या डोक्यावर डिंक चोळला, त्या इतक्या ताणात होत्या की हाताला त्याचा चिकटपणाही जाणवला नाही त्यांना. आज मुली त्या आठवणीने खुप हसतात आणि त्याही त्यात छान हसत सामील होतात Happy

पण निरमा पावडर पाण्यात विरघळली कशी नाही ह्याचं आश्चर्य वाटलं >>> पाण्यात विरघळला हि असेल पण हळद आणि मिरचीची फोडणी दिल्याने रंग एकूणच पिठल्या सारका झाला होता . आणि त्यात प्रकाश हि पुरस नव्हता .

जस्ट अ थॉट..
हेच जर एखाद्या सुनेकडुन घडलं असतं तर काय झालं असतं? आणि घरतल्यांच्या प्रतिक्रिया काय असत्या?

हेच जर एखाद्या सुनेकडुन घडलं असतं तर काय झालं असतं? आणि घरतल्यांच्या प्रतिक्रिया काय असत्या? >> Lol

वाट्टोळ केल वं माया लेकराइचं ... Lol

विश्या, आजीला काय वाटले असेल ना?:स्मित: लेख आटोपशीर लिहीलात, पण तो कथा-ललित विभागात हवा होता, त्या ऐवजी तो गुलमोहर-कला विभागात आलाय.

आई गं! लहानपणी एकदा मला आईने तुपसाखर पोळीचे रोल दिले डब्यात आणि पीठीसाखरेऐवजी खाण्याचा सोडा घातला Sad मधल्या सुट्टीत डबा खाताना दोन घासांत काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले त्यामुळे डबा खाल्लाच नाही. पण मग नंतर आईच्या पण लक्षात आले आणि ती घाईघाईने नवीन डबा घेऊन शाळेत आली Happy आणि मग बाईंच्या स्पेशल परवानगीने त्यादिवशी माझी मधली सुट्टी थोडी उशिराने झाली Proud

अग्निपंख - हेच जर एखाद्या सुनेकडुन घडलं असतं तर काय झालं असतं? >>>>>> खरतर आजीचे वय त्यावेळी ६५ असावे तर सुनांचे वय ३५ ते ४५ च्या दरम्यान त्यामुळे शक्यता फारशी कमी असे होण्याची पण तरीही झालेच असते तर मिनी रामायण झाले असते घरात .
सीमा - माझे गाव किणी , तालुका - हात्कंगले , जिल्हा कोल्हापूर . आणि तुमचे गाव कोणते ?

हा हा हा
सहीये !! Lol
आमच्या ओळखीच्या एका आजी बाईंनी असेच डायजिन च्या ऐवजी लॅक्टो कॅलेमीन प्राषन केले होते....
झाले असे की मुळात आमच्या नागपुराला मे महिन्यात मरणाची गरमी, अश्या वेळी हाता-पायांना झोपताना बरेच दा लॅक्टो कॅलेमीन लावतात, त्याने बराच थंडावा मिळतो, ह्या आजींना गरमी मुळे पोटात त्रास होत होता, आग पडल्या सारखे वाटत होते, म्हणुन त्या बिचार्या डायजिन घेण्यासाठी फ्रिज उघडुन पाहात होत्या, त्यांना चश्मा न लावल्याने तसे ही फार से दिसले नसावे....लॅक्टो कॅलेमीन व डायजिन दोन्ही चा गुलाबी रंग त्यांनी पाहिला आणि डायजिन च्या ऐवजी लॅक्टो कॅलेमीन पिउन घेतले.....सुदैवाने फार त्रास झाला नाही, व दोन दिवस हॉस्पिटलात घालवुन आजी बाई पुन्हा वापस घरी आल्यात Happy Lol

एका ओळखीच्या काकुंनी एकदा आमटीत गोडा मसाला म्हणून शिककाई पावडर टाकली होती. Lol दोन्ही डबे सारखेच असल्यामुळे गोंधळ झाला म्हणे.

गोष्ट आहे मजेशीर, खरंतर तुम्हा चारही भावडांची जी गडबड उडाली असेल एकाच वेळी जाण्यासाठी तीचा विचार करून जास्त हसायला आले. पळा पळा कोण पळे पुढे ........:D

एकाच वेळी जाण्यासाठी तीचा विचार करून जास्त हसायला आले. पळा पळा कोण पळे पुढे ........हाहा >>> त्या वेळी आमच्याकडे उघड्यावरच पान्दीला (जिथ फक्त या कामासाठीच जातात ) जात असे त्यामुळे नंबर वगेरे लावावे लागत नसे म्हणून वाचले नाहीतर .................

आई ग्ग...

एक सदाशिव अमरापूरकचा आंधळ्या-बहिर्या-मुक्याचा चित्रपट आठवला.. त्यात त्याची बायको ऑमलेट करताना अंड्याच्या जागी शँपू वापरते आणि पहिल्याच घासाला त्याच्या तोंडाला फेस येतो .. अन चेहराभर पसरतो.. तुमचे तसे नाही झाले का Wink

तुमचे तसे नाही झाले का >>> ऋमेश , आमाला सर्वाना एकदम decentry चा त्रास झाला त्यामुळे लगेच इस्पितळात पळवल . एक दोन सुया टोचल्या आणि पाण्याची बाटली (सलाईन ) पण लावली होती .

सुनिधी - नाव खूप छान आहे तुमचे , हे नाव ऐकले किंवा वाचले कि माईक समोर उभे राहून अगदी जोशात गाणे गाणारी सुनिधी चौहान आठवते (उदा :- न ना रे ...न ना रे.....न ना रे ......न ना रे , बरसो रे मेघा मेघा , बरसो रे मेघा ) या स्वरात .

स्वाती - बरोबर आहे त्यादिवशी सगळेच खूप घाबरले होते एकदम ३ तिघांना सलाईन आणि इस्पितळात दाखल केले होते त्यामुळे .

आज वाचले हे सारे....वाचताना गंमत वाटते खरे....पण प्रत्यक्ष तुम्हावर काय बाका प्रसंग गुदरला होता त्याची जाणीव झाली म्हणजे अंग शहारतेच. आजीचा दोष तसा काहीच नाही, पण घडते असे कधीकधी....आणि मग लक्षातही राहते.

मी माझ्या इथल्याच (मायबोलीवरील) मित्राला घरी चहा करून देत होतो....आणि बोलताबोलता दुधात साखरेऐवजी चक्क दोन चमचे कोलम तांदुळ टाकले होते....(साखरेच्या नेहमीच्या डब्यातील स्टॉक संपल्यामुळे मोठ्या शिलकेच्या डब्यातील पिशवी बाहेर काढली होती, पण मित्रासमवेत बोलण्यात दंग असल्याने साखरेऐवजी त्याच आकाराची तांदळाची पिशवी हाती आली आणि एका गुंगीतच जणू साखरेऐवजी तांदुळ टाकले.....). चहा उकळल्यानंतर गाळणीने कपात गाळताना पाहिले की समस्त तांदळाची प्रेते गरम दुधावर तरंगत होती...घाबरलोच. निरखून पाहिल्यावर चूक लक्षात आली...मित्राने पाहाण्याअगोदरच घाईघाईने चहाचे भांडे सिंकमध्ये रिकामे केले. पण त्याच्या नजरेतून हा घोटाळा सुटला नाही. काय झाले ते त्याला समजले आणि खो खो हसत राहिला....

दुसर्‍या दिवशी त्याने हा सारा प्रकार आमच्या "कोल्हापुरी धाग्या" वर कथन केला...तिथल्या समस्त भाच्यांनी मग ह्या मामाच्या चिंध्याच केल्या.

दुसर्‍या दिवशी त्याने हा सारा प्रकार आमच्या "कोल्हापुरी धाग्या" वर कथन केला...तिथल्या समस्त भाच्यांनी मग ह्या मामाच्या चिंध्याच केल्या. >>>> मामा त्यावेळी मी कदचीत माबो वर नसेन नाहीतर त्याच वेळी माझ्याकडून हा धागा इथे पोस्टला गेला असता .

पण तुमचा प्रसंग हि छान नमूद केलात , मजेशीर होता .

अरे कसला मजेशीर....माझे मलाच नंतर हसू येऊ लागले. तरी बरे तांदुळच होते....मीठ असते तर विरघळून गेले असते आणि मग मी तेच अफलातून रसायन अविनाशला दिले असते.....अग्ग्गागा, त्याने पहिल्याच घोटाला केविलवाणी किंकाळी फोडली असती.

>>(उदा :- न ना रे ...न ना रे.....न ना रे ......न ना रे , बरसो रे मेघा मेघा , बरसो रे मेघा )<<

ती श्रेया आहे घोषालांची, सुनीधी नाही हो Wink

ती श्रेया आहे घोषालांची, सुनीधी नाही हो >>> लगता है गलती से मिस्टेक हो गया, तो आप बिडी जलैले जिगर से पिया , जिगर मा बडी आग है . हे गाणे आठउ शकता .

मस्त धागा.

आमच्याकडे मोठ्या चिनी मातिच्या बरणीमधे लोणचे घालायची आई. एकदा लोणचे घातले आणि बरणीचे तोंड बांधून घेतले. एक महिन्यानीच ते लोणचे खायला मिळणार होते. आईने चुकुन बाबांचा पगार त्या बरणीत ठेवला. त्यावेळी फक्त बाबाच नोकरी करायचे आणि आम्ही शाळेत जाणारे ७ अपत्य. आईला काही केल्या पैसे सापडले नाही. आम्ही उधारीने तो महिना काढला. मग महिन्याभराने आईने बरणीचे झाकण उघडले तर त्यात प्लास्टिकच्या पिशवीत बाबांचा पगार होता. पण त्या आधीचा महिना आईने खूपच व्यस्थित घालवला. इतके मोठे कुटुंब आणि पगार नाही. बचत नाही.

Pages