आज आमच्या धाग्यावर (कोपुवर ) अचानक आजीचा विषय निघला आणि मनाने अचानक भूतकाळातील (आजीबाबत घडलेल्या ) घटनांवर फुंकर मारली , त्यातलाच एक प्रसंग मांडत आहे .
माझ गाव कोल्हापूर जिल्ह्यात वसलेले , वारणा नदीच्या काठावर , आणि माझ घर हि (त्यावेळी) कौलारू , स्वयपाक घराच्या वरती एक काच जी कौलांच्या मधोमध बसवलेली कारण (दिवसा सूर्यप्रकाश सरळ घरात येईल व विजेचा वापर कमीत कमीत करता येईल यासाठी ) , माझे कुटुंब खूप मोठे असल्यामुळे कधी आजीला स्वयपाक घराचा ताबा घेण्याची वेळ येत नसे , पण नेमका तो एक दिवस ज्या दिवशीची घटना सांगण्यासाठी हा धागा काढला आहे .
त्या दिवशी घरातील ३ चुलते त्यांचे कुटुंब घेऊन सौन्दातीला गेले होते , आणि माझी आई (चार नंबरची ) शेणी (गौर्या ) लावण्यासाठी गेली होती तर धाकटी चुलती धुणे धुवत होती , अमी लहान होतो (चौघे - सक्खे आणि चुलत भाऊ ) आणि शाळेला जायला उशीर होतोय म्हणून सारका जेवण पाहिजे म्हणून कांगावा करत होतो (त्यावेळी जेवण पाहिजे म्हणून रडावं लागत होत आणि आता मुलांना जेव म्हणून सांगून सांगून रडावं लागत ) , मी तर अक्षरश पाठच घेतली होती , आणि त्यामुळेच आजीने आज स्वताच , स्वयपाक घराचा ताबा घेऊन आमाला काही तरी झटपट होईल असे काहीतरी करून द्यावे म्हणून ठरवून जेवण्याच्या खोलीत आली होती , थोडासा अंधुक असा प्रकाश होता स्वयपाक घरात आणि त्यावली झटपट बनवता येईल आणि सर्वाना आवडेल असा एकाच पदार्थ असायचा तो म्हणजे झुणका (पिठलं) आणि भाकरी , म्हणून आजीने पिठलं करण्याचा विचार करून बेसनच्या पिठाचा दाबा शोधला आणि काही वेळातच पिठलं आणि भाकरी खायला दिली (आजी ची मायाच असते तेवढी ) आणि अमी चौघे हि हाताश्या सारके त्यावर तुटून पडलो पण काही दोन तीन घासातच आमाला जाणीव झाली कि काहीतरी भलताच खातोय , आणि तेवढ्यात अचानक पोटात खळ खळ वाजून लागले , अचानकच पोटात कळ मारू लागली , चौघांना एकदमच धन्डली (decentry ) लागली , पोटात दुकू लागले , आजीने लगेच काहीतरी प्रथम उपचार केले पण काहीच चालेना शेवटी , काकूला ला दंगा ऐकू आला आणि आता येताच तिला अंदाज आला पोरांची पोट बिघडली एकदम , सासू बाईंनी एकदमच मिरच्या घातल्या बहुतेक पिट्ल्यत , पण कसलाच विचार न करता चौघा हि "कुंभाराच्या दवाखान्यात पळवले (जवळच होता त्यामुळे ) , डॉक्टरांनी तपासून लगेचच काही औषधे दिली आणि झोपून राहायला सांगितले , अन्नातून काहीतरी भलतच गेले आहे पोटात त्यामुळे अचानक चौघांना एकदम संडासला लागले "
तर हा किस्सा घडला , आता काय घडले तर , त्यावेळी "निरमा कंपनीचा निरमा हा सेम टू सेम बेसन पिठासारखा दिसायचा , (जर हातात घेतले तरच खडबडीत पनावरून जाणवायचे कि हा निरमा आहे ) त्यादिवशी काकूने धुणे धुवायला जाताना कपडे कमी असल्याने थोडासा निरमा घेतला आणि गडबडीत निर्म्याचा डबा आणि स्वयपाक घरातच ठेवला , आजीला बिचारीला त्या अंधुक प्रकाशात निरमा आणि बेसनचे पीठ यामधला फरक नाही समजला आणि तिने नातवंड भुकवलित म्हणून गडबडीने झुणका आणि भाकर खायला करून दिली होती .आणि मग पुढे मग २ दिवस अमी शाळेला सुट्टी ठोकून मस्त घर ते पारडा फिरत होतो .
भूतकाळातील आजीच्या आठवणी सांगताने मन भरून येते , त्या प्रेमळ आठवणी , फक्त एक क्षण मागे गेलोत तरी अखंड slide show च मनासामोरून प्रवास करताना दिसतो .
काय हालत झाली असेल.
काय हालत झाली असेल.
निरमाने तुमची धुलाई केली
निरमाने तुमची धुलाई केली म्हणायची>>> फक्त बाहेरूनच नाही तर आतून पण सफाई झाली चांगली .
मस्त धाग >>> धन्स बी .
आणि माझी आई (चार नंबरची )
आणि माझी आई (चार नंबरची ) >>
चार नंबरची आई म्हणजे? आणि तुमच्या आई ची आणि काक्वांची काय प्रतिक्रिया होती ?
करायला गेलो १ आणि झालं दुसरंच असा धागा काढा ना कुणीतरी . भरपूर किस्से येतील
चार नंबरची आई म्हणजे? >>>
चार नंबरची आई म्हणजे? >>> त्याच काय आहे आमच घरात एकत्र कुटंब पद्धती होती त्यावेळी आणि आईला धरून ५ जावा जावा आहेत , तर प्रत्येकीला बोलवण्यासाठी एक नाव ठरलेल असायचं , थोरली आई , २ नंबरची आई , असेच शेवटच्या चुलतीला माय असे म्हणायचो .
आजीबाईंचे वयपरत्वे गोंधळ होणं
आजीबाईंचे वयपरत्वे गोंधळ होणं हे खरंतर सहाजिक आहे. हे सगळे मजेदार प्रकार वाचून मझ्याही आजीचे काही उद्योग सांगणं आलंच! माझी आजी (वयवर्षे तेव्हा साधारण ८०) एकदा आईला स्वयंपाकात मदत म्हणून भरल्या वांग्याची भाजी करण्याकरता वांगी चिरायला बसली. एक किडकं वांग चिरलं जाऊन-मसाला भरून भाजीत पोहोचलं. आणि शेवटी नेमकं मझ्या पानात. पुढे २-३ वर्ष वांग्याच्या भाजीचं नाव टाकलं मी. आजीची अजून एक मजेदार आठवण म्हणजे, आजी तेव्हा तुळशीची मालिका पहायची (क्योंकी सांस भी कभी बहु थी). सक्काळ सक्काळ रिपीट टेलिकास्ट चालू असे. आजीनी टी.वी. लावला तेव्हा इंग्लिश चॅनल लागलं आणि त्यावर निदान सकाळ्च्या पारी तरी टाळावी अशी दृष्य चालू होती. इकडे आजीबाई दिसतंय ते तुळशी म्हणून डोळे किरमिजे करून पहात बसल्या. असले गोंधळ चालूच असतात पण गोंधळाचा राजा म्हणजे मझ्या मित्राच्या आजीने ओडोमॉसने एकदा दात घासलेले!!
छान किस्से सांगितलेस . ओडोमास
छान किस्से सांगितलेस . ओडोमास ने दात घासणे म्हणजे तर अजून जर मस्त .
प्रियतनय, त्यावरून आठवलं
प्रियतनय, त्यावरून आठवलं माझ्या आज्जीला अग्ली बेटी ही हिंदी सीरीयल वाटली होती.
Pages