'मायबोली'मध्ये अपूर्ण लेखन कसे कराल?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

बरेचदा असं होतं, की आपल्याला काहीतरी लिहायची सुरसुरी येते, पण योग्य ती सॉफ्टवेअर्स उपलब्ध नाहीत म्हणून किंवा त्या बाबत फारशी माहिती नाही, म्हणून लिहिले जात नाही.

मायबोलीवर आपल्याला आपले लिखाण लिहून, ते सेव्ह करायची सोय आहे. मदतपुस्तिकेमध्ये असलेल्या http://www.maayboli.com/node/1523 दुव्याच्या अनुषंगाने आणि वेळोवेळी या विषयावर आलेल्या प्रश्नांकडे पाहून असं वाटलं, की मायबोलीच्या 'अप्रकाशित लेखन' या सुविधेचा लाभ बरेच मायबोलीकर काही ना काही कारणाने घेऊ शकत नाहीयेत/ घेत नाहीयेत.

माझ्या कुवती आणि समजूतीनुसार यात थोडी भर घालायचा प्रयत्न करत आहे. त्याचा फायदा लेखकांना व्हावा अशी आशा आहे. मी स्टेप बाय स्टेप लिहायचा प्रयत्न करत आहे.

------------
आपण लिहिण्यास सज्ज आहोत, किमान सुरूवात तरी करायचीच आहे. त्यामुळे आपण मायबोलीवर लॉगिन केलेय. आता पुढे-

सर्वप्रथम, लॉगिन केल्यानंतर स्क्रीनच्या उजव्या हाताला, आपल्या लॉगीनच्या नावाखाली एक मेन्यू येतो. त्यात एक विभाग आहे- 'नवीन लेखन करा'. त्यावर टिचकी मारली, की आपल्याला जे साहित्य लिहायचे आहे, त्यासाठी सुविधा उपलब्ध होते.

आपल्या लेखनाचे 'शीर्षक', 'विषय' आणि 'प्रकार' लिहिलात की लेखनासाठीची जागा उपलब्ध होते. लक्षात ठेवा, की आपल्याला सध्या नुसतेच काहीतरी सुचले आहे.. त्याचे शीर्षक आपण ठरवलेच असेल असे नाही, पण आपणच आपला लेख नंतर ओळखावा, म्हणून त्याला एक नाव देणं आवश्यक नाही का? त्यामुळे, सध्या टेंपररी काहीही शीर्षक दिले तरी चालेल. लिखाणाच्या कुठल्याही टप्प्यावर आपण शीर्षक, तसेच विषय आणि प्रकार बदलू शकतोच.

त्याखाली आहे 'मजकूर' टायपायची जागा. तिथे आपल्याला आपल्या मनात योजलेले लिखाण लिहायचे आहे.

या लेखनाच्या जागेखाली 'साहित्य लेखन स्थिती' आहे.. तीत 'संपूर्ण' आणि 'अपूर्ण' अशा दोन स्थिती आहेत. सध्यातरी आपल्याला आपले लिखाण 'अपूर्ण' ठेवायचे आहे. त्यामुळे आधी 'लेखन स्थिती अपूर्ण' सीलेक्ट करा.

1.jpg

थोडे लिहून झाले, आता आपल्या हातातला वेळ संपलाय. लेखन अर्धवट लिहून झाले आहे. पुढे काय कराल? त्याही खालच्या Preview आणि Save टॅब्ज दिसत आहेत? Preview केले, की लेखन कसे दिसेल हे समजते आणि Save केले की लेखन सेव्ह होऊन प्रकाशित होईल. वेळोवेळी ही Save टॅब सीलेक्ट केलीत, की तेव्हतेव्हाचं लेखन आपोआप सेव्ह केलं जातं.

पण आपल्याला तर प्रकाशित करायचे नाहीये ना? मग Save का दाबायचं?- कारण, Save केल्याशिवाय सेव्ह होणार नाही! आणि घाबरायचं कशाला?- आपण त्याआधीच 'अपूर्ण' स्थिती सीलेक्ट केल्यामुळे Save ची कळ दाबली, तरी लेखन लोकांसमोर येणार नाही. त्यामुळे एकदा 'अपूर्ण' ची खात्री करून घेऊन Saveची कळ दाबा.

यानंतर काय होईल, की 'मायबोलीवर नवीन लेखन' मध्ये आपले अपूर्ण लेखन आपल्या दिलेल्या टेंपररी शीर्षकासकट दिसायला लागेल. एक क्षण वाटेल, की अपूर्ण लेखन दिसतंय की काय? पण घाबरू नका.. जर 'अपूर्ण' सीलेक्ट केलं असेल, तर ते लोकांसमोर 'संपूर्ण' स्थिती केल्याशिवाय येणार नाही.

आता, दुसर्‍या दिवशी आपल्याला पुढे लिहायचे आहे. कसे शोधणार, तो अपूर्ण लेख कुठे गेला ते?

त्यासाठी, लॉगिन करा. मेन्यूमधल्या 'माझे सदस्यत्व' मध्ये जा. उजव्या कोपर्‍यात चार टॅब्ज दिसतील..
१. अवलोकन
२. पाऊलखुणा
३. संपादन
४. खाजगी जागा

त्यातल्या 'पाऊलखुणा'वर टिचकी मारा. डावीकडे पुन्हा दोन टॅब्ज दिसतील- 'लेखन+प्रतिक्रिया' आणि 'फक्त लेखन'. यातल्या, 'फक्त लेखन'वर टीचकी मारा. इथे, तुम्ही केलेल्या सर्व लेखनाच्या लिंक्स दिसतील. यात सहाजिकच 'ते अपूर्ण लेखन'ही असेल. संपूर्ण आणि अपूर्ण लेखनातला फरक कसा ओळखाल- जे लेखन अपूर्ण आहे, त्याची पार्श्वभूमी गुलाबी आणि कड 'डॉटेड' आहे. अशी-

2.jpg

या स्क्रीनशॉटमधलं 'गंमत' हे लेखन अपूर्ण स्थितीत आहे. आता त्याचं संपादन मला करायचं असेल, तर कसं करू?
१. शीर्षकावर टिचकी मारा.
२. 'संपादन'वर टिचकी मारा.
३. लिहायला लागा.

पुन्हा अपूर्ण असलं, तर वरच्यासारखंच सेव्ह करा.

आता, कधीतरी असं लिहिता लिहिता, लेखन पूर्ण होईल. आता ते लोकांना दिसेल असं करायचं आहे. कसं करायचं?
अगदी सोपं- लेखन स्थिती 'संपूर्ण' करा. एकदा 'प्रतिसाद तपासा'मध्ये जाऊन शुद्धलेखन तपासा, पॅरा दिलेत का पहा आणि Save करून टाका. Save केलंत की 'मायबोलीवर नवीन' मध्ये ते सगळ्यांना वाचायला उपलब्ध होईल.

मात्र, यात सध्या एक त्रुटी आहे, तो म्हणजे, ज्या दिवशी आपण लिहायला सुरूवात करून, लेखन पहिल्यांदा सेव्ह केले, त्याच दिवशी 'संपूर्ण' केलेले लेखन प्रकाशित होते.
म्हणजे, मी १ ऑगस्टला काही लिहायला घेतलं, पण माझं लिहून झालं १५ ऑगस्टला. लेखन स्थिती 'संपूर्ण' मी जरी १५ ऑगस्टला केली, तरी, ते 'प्रकाशित' झालेलं असतं १ ऑगस्टलाच! Sad त्यामुळे ते लोकांच्या नजरेसमोर येत नाही. मग इतकं लिहून उपयोग काय, जर ते नजरेसमोर येणार नसेल तर?- असा प्रश्न पडेल.. त्यावरही उत्तर आहे Happy

संपूर्ण लिहून झाले, की सगळं लिखाण सीलेक्ट करा आणि नवीन विन्डोमध्ये योग्य तो लेखन प्रकार निवडून पेस्ट करून सेव्ह करा. हे लेखन लगेच त्याच दिवशी सर्व लोकांसमोर येईल.

पण मग, ते लेखन जे १ ऑगस्टला केलंय, ते डीलीट करायचे कसे? तीही सोय आहे. 'संपादन' वर गेलात, की त्या लेखनाच्या पानाच्या सर्वात खाली Preview Save बरोबर Deleteची टॅब येईल. ती टॅब निवडा, आणि जे जुनं लेखन खोडून टाका. तेच लेखन नवीन दिवशी ऑलरेडी लोकांसमोर प्रकाशित झालेलं आहेच Happy
--------

कदाचित पुढे-मागे ज्या दिवशी लेखन 'संपूर्ण' होईल, त्याच दिवशी ते प्रकाशित होण्याची सोय उपलब्ध होईल. हा भाग टेक्निकल असल्याने, ते तसे का होत नाही, कधी होईल याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही.

सध्यातरी ही सोय उत्तम आहे. कुठेही ऑनलाईन असाल, तरी लेखनात व्यत्यय येणार नाही. 'पेन ड्राईव्ह' नेमका विसरला, त्या मशिनवर लिहून ठेवलंय ईत्यादी अडचणी येणार नाहीत. क्लायंटकडे, मीटींगमध्ये, कुठेही असलात, तरी लेखन करता येईल Wink

शुभेच्छा.

विषय: 
प्रकार: 

पूनम, छान आणि उपयुक्त माहिती.

मी http://maayboli.com/node/add/story-gulmohar हे पान सेव्ह करून ठेवलं आहे. ऑफलाईन असताना हे पान उघडून त्यात मला जे लिहायचं आहे ते टाईप करते आणि वर्डपॅड उघडून त्यात पेस्ट करून सेव्ह करते. लेखन पूर्ण झाल्यावर परत इथे पेस्ट करून हव्या त्या विभागात प्रकाशित करते. पण हे काम क्लायंटकडे असताना करता येणार नाही. Happy

चांगली माहिती आहे. मी एकदा प्रयत्न केला होता, पण काहीतरी चुकले असावे असे वाटले तेव्हा कारण ते अर्धवट लेखन दिसू लागले होते निदान मला तरी. आता पुन्हा वरती लिहील्याप्रमाणे प्रयत्न करतो. नाहीतर सध्या येथे लिहून वर्ड मधे ठेवावे लागते तात्पुरते Happy

थोडक्यात ( Wink ) पण चान्गली माहिती दिली आहे Happy
याचबरोबर बरहा बाबतच्या टिप्स देखिल दिल्यातर अधिक चान्गले होईल Happy

अरे! लोकांनी वाचलं का? बरं आहे का? शंकासमाधान होतंय ना? धन्स Happy हे नेमकं मायबोली नूतनीकरणाच्या वेळेतच आल्याने, किती लोक वाचतील शंका होती. असो. अजून काही शंका असल्यास, नि:शंक विचारा Proud

असंच ट्यूट बरहाबद्दलही लिहिणार आहे. लिहिलं की सांगेन. त्यासाठी काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर विचारा- विपूमध्ये, म्हणजे त्यावरही लिहिता येईल.

पूनम धन्यवाद! बरहा बद्दलही लिही वाट बघतोय. Happy

पण >> मी http://maayboli.com/node/add/story-gulmohar हे पान सेव्ह करून ठेवलं आहे. ऑफलाईन असताना >> हे ऑफलाईन असताना म्हणजे नेट चालू नसताना कस काय लिहिता येईल?

पूनम, धन्यवाद ! नविन लोकांनाही कळेल असं किती व्यवस्थित कळेल असं लिहिलं आहेस ! Happy

पूनम, धन्यवाद. छान माहिती दिली आहेस. पण झालं काय की ही माहिती वाचण्याच्या आधीच मी एक लेख लिहिला आणि तो पूर्ण झाला होता म्हणून ' संपूर्ण ' वर क्लिक केले ( जे करण्याची आवश्यकता नव्हती ). नतीजा असा झाला की तो लेख आलाच नाही. गायब झाला. तो रिव्हाइव्ह करता येईल का? ( तो लिहायला मला दोन तास लागले होते ).

तेज, प्रश्न समजला नाही Uhoh लेखन संपूर्ण झाले होते, पण 'अपूर्ण' स्थिती सिलेक्ट केली होती का?
असं असेल, तर तुमच्या 'सदस्यत्वा'च्या 'पाऊलखुणा'त जा. तिथे 'फक्त लेखन' पहा. तिथे गुलाबी पार्श्वभूमीवर तुमचा लेख असेल, तर तो अजून अप्रकाशित आहे. (लेख सहसा 'गायब' होत नाहीत) तसं असेल, तर 'संपादन' करून लेखन स्थिती 'संपूर्ण' करा.

पण लेख ज्या दिवशी लिहायला घेतला आहे, त्या दिवशी प्रकाशित होईल हे लक्षात ठेवा ('संपूर्ण' कधीही केला, अगदी दोन महिन्यांनी जरी, तरी.), त्यामुळे तो पहिल्या पानावर दिसणार नाही (ऑल्दो, पब्लिश झाला असेल). मग तुम्हाला मुख्य पानावर 'तारखेनुसार लेखन' आहे तिथे जाऊन पहावं लागेल. त्या तारखेला प्रकाशित झालेला दिसेल.

मी काही वेगळंच समजले असेल, तर पुन्हा सांगता का? मदत करता येईल.

सॉरी पूनम , बहुदा मी नीट सांगू शकले नाही. परत सांगते. मी लेख एका बैठकीत पूर्ण लिहिला आणि संपूर्ण स्थिती सिलेक्ट केली म्हणजे त्या गोलावर क्लिक केले. तर तेव्हा त्या गोलाभोवती एक डॉटेड चौकोन दिसू लागला. मग मी सेव्ह केले. पण संपूर्ण स्थिती च्या गोलावर क्लिक करायची जरूरच नव्हती ना? कारण बाय डिफॉल्ट ती संपूर्ण स्थितीच होती. मग मी पाऊलखुणात जाऊन पाहिले तर माझा लेख नव्हता. पहिल्या पानावरही माझा लेख नव्हता. म्हणून मग तुला विचारलं.
माझं काय चुकलं ते बहुदा मला कळलंय् पण ते दुरुस्त कसं करायचं ?

पौर्णिमा छान माहिती.मी बारिक सरिक गोष्टीसाठि अवलला त्रास देत असते.लिहिण्याची ,प्रतिक्रिया देण्याचि उर्मी तांत्रिक अडचणित दाबलि जाते.मला टाइप करायला खुप वेळ लागतो एका बैठकित लिहिणहि शक्य नसत.पण अता पुर्विसार्ख संपुर्ण स्थिती अपुर्ण स्थिती अस येतच नाही सेव्ह करायच तर पोस्टच होत. अशावेळी झालेल लिखाण पोस्ट नकरता सेव्ह करायच तर सेव्ह कस करायच. बर्‍याच वेळा लाइट गेले कि सेव्ह केल नसल्याने खुप लिहिलेला मजकुर जातो अडमिनला मी माझी अडचण लिहिलि होति पण काहि झाल नाहि. कदाचित माझ कळवण्यात चुकल असेल.काय करता येइल?
.तांत्रि द्रुस्ट्या मी अगदी नर्सरीत आहे. कदाचित माझ्या शम्का बालबोध असतील.

वा वा. मी अगदी असेच करते पहिल्या पासूनच.

ज्या दिवशी आपण लिहायला सुरूवात करून, लेखन पहिल्यांदा सेव्ह केले, त्याच दिवशी 'संपूर्ण' केलेले लेखन प्रकाशित होते. म्हणजे, मी १ ऑगस्टला काही लिहायला घेतलं, पण माझं लिहून झालं १५ ऑगस्टला. लेखन स्थिती 'संपूर्ण' मी जरी १५ ऑगस्टला केली, तरी, ते 'प्रकाशित' झालेलं असतं १ ऑगस्टलाच! >>>
हे बर्‍याच नवख्या लोकांना समजत नाही. आणि मदत पुस्तिकेत लेखना संदर्भात जी मदत देऊ केली आहे, तिथे ह्याचा उल्लेख आहे की नाही माहीत नाही.

>>>>या लेखनाच्या जागेखाली 'साहित्य लेखन स्थिती' आहे.. तीत 'संपूर्ण' आणि 'अपूर्ण' अशा दोन स्थिती आहेत. सध्यातरी आपल्याला आपले लिखाण 'अपूर्ण' ठेवायचे आहे. त्यामुळे आधी 'लेखन स्थिती अपूर्ण' सीलेक्ट करा.<<<<
अशी स्थितीही दिसत नाही....
आणि चित्रातल्या प्रमाणे Screen ही दिसत नाही...
कृपया मार्गदर्शन करावे...

या लेखनाच्या जागेखाली 'साहित्य लेखन स्थिती' आहे.. तीत 'संपूर्ण' आणि 'अपूर्ण' अशा दोन स्थिती आहेत. सध्यातरी आपल्याला आपले लिखाण 'अपूर्ण' ठेवायचे आहे. त्यामुळे आधी 'लेखन स्थिती अपूर्ण' सीलेक्ट करा.>> मला 'साहित्य लेखन स्थिती' हा पर्यायच दिसत नाहिये. आणि माझे सदस्यत्व मधे पाऊलखुणा पण दिसत नाहिये.
असं का होत असेल? हे पर्याय दिसण्यासाठी काय करावं लागेल?

@निरु
'अपूर्ण' इतक्यात प्रकाशन नको" हा पर्याय आधी मायबोलीवर उपलब्ध होता. मात्र आता तो पर्याय, मायबोली प्रशासकांनी बंद केला आहे.

@गायत्री१३
"पाऊलखुणा" हे बटन देखिल प्रशासकांनी माझे सदस्यत्व मधुन काढुन टाकले आहे. तरिही तुम्हाला, तुमच्या पाऊलखुणा पाहायच्या असतील तर तुमच्या सदस्यत्वच्या दुव्याच्या शेवटी "/track" असे टाईप करा, तुम्हाला तुमच्या पाऊलखुणा दिसतील. Happy

उदा. http://www.maayboli.com/user/35886/track