६०० किमी बीआरएम - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी ३

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

२४ जाने २०१४ ला आयोजकांनी ३०० आणि ६०० च्या ब्रेव्हेचे आयोजन केले होते. मी ६०० साठी भाग घेण्याची तयारी केली होती. त्याप्रमाणे नाव नोंदवले आणि डी डेची उत्सुकतेने पाहत होतो. एकदम ६०० असल्यामुळे हा पूर्ण आठवडा टेपरींग मुळे मी कुठेही राईड करायची नाही असे ठरविले होते. त्या आधीच्या शनिवारी १०० + आणि रविवारी ६५ अशी पूर्वतयारी केली व आठवडाभर पूरक डायट चालू केला.

ह्या वेळचा रूट होता, पुणे-वाई-महाबळेश्वर-सातारा-कोल्हापूर-निपाणी-सातारा-पुणे त्याला सह्याद्री स्पेशल असे नाव आहे.

ह्या ब्रेव्हे २०० किमी पासून सुरू होतात ते पार १२०० किमी पर्यंतचा असतात. २००, ३००, ४०० आणि ६०० केली की तुम्ही सुपर रॅन्डो म्हणून क्वालिफाय होता. आणि दर चार वर्षानी होणारी पॅरिस - ब्रेस्ट - पॅरिस ही आंतरराष्ट्रीय रेस करायला क्वालिफाय होता. ( त्या वर्षी सुपर सिरीज केली तर)

किमी - अवधी

200 Km – 13.5 Hrs
300 Km – 20 Hrs
400 Km – 27 Hrs
600 Km – 40 Hrs
1000 Km – 75 Hrs
1200 Km – 90 Hrs

माझी ६०० किमी ब्रेव्हे असल्यामुळे मला ती ४० तासात पार करणे आवश्यक होते.

कंट्रोल पाँईट्स -

पहिला सकाळी ६ ते ७ विद्यापीठ
दुसरा - महाबळेश्वर - पहिल्या दिवशी सकाळी ९:४५ ते २:३०
तिसरा - सातारा - पहिल्या दिवशी दुपारी ११:१५ ते ५:४५
चौथा - निपाणी - पहिल्या दिवशी दुपारी ४ ते दुसरा दिवस सकाळी ४
पाचवा - येलुर फाटा - पहिल्या दिवशी संध्याकाळी ६ ते दुसर्‍या दिवशी सकाळी ९
सहावा - कॅफे कॉफी डे दुसर्‍या दिवशी रात्री १० वाजे पर्यंत.

http://www.audaxindia.org/event-e-137 वर फेलो रायडर्स मध्ये ह्या ६०० मध्ये कोणी कोणी भाग घेतला आहे त्यांची नावे कळतील.

आयोजक ह्या राईडच्या डिटेल्स मध्ये लिहितात, " A bit of a tough 600, climbing up to Mahabaleshwar, descending to Satara by Medha Ghat and continuing to Nippani, before returning to Pune." ह्यातील बीट ऑफ टफ कडे लोकांच आधी दुर्लक्ष होतं आणि ही राईड इतर ६०० पैकी किती टफ आहे ते सायकल चालवतानाच कळतं.

आम्हा पेलटॉन ग्रूप पैकी ह्या वेळी ५ जण ब्रेव्हे मध्ये भाग घेणार होते. ( दॅटस व्हाय वी आर पेलटॉन ! ) सुधाकर आणि अभिषेक ३०० साठी तर मिहिर, राकेश आणि मी ६०० साठी. मिहिर ने अगदी डिटेल्ड अशी सेगमेंटवाईज / ब्रेकवाईज एक्सल बनवली आणि ती राकेश आणि माझ्यासोबत शेअर केली. त्याला बेस धरून मग आम्ही बेस्ट केस आणि वर्स्ट केस सिनारिओ ठरविले आणि "प्लान द वर्क आणि वर्क द प्लान" अशी तयारी केली.

बुधवारी आणखी एकाला माझी सायकल पाहायची होती म्हणून त्याने मला विद्यापीठ सर्कलला बोलावले. सकाळी तिथे पोचायच्या रस्त्यावर ६:३० ला सायकल पंक्चर झाली. आणि ह्या घटनेमुळे माझे मनोबल अर्धेच झाले. ६०० मध्ये किती पंक्चर होतील, किती वेळ जाईल असे काहीसे मनात येऊ लागले. पण त्याकडे निग्रहाने दुर्लक्ष करून मी शुक्रवारी सायकल परत एकदा तपासून घेण्यासाठी १० किमीची राईड केली नी सज्ज झालो.

आम्ही सकाळी ६ ला सगळ्यांनी सुरूवात केली. ३०० ची लोकं आधी निघाली. राईड मध्ये थोडे पुढे मला सुधाकर भेटला आणि त्याला बाय म्हणून पुढे निघालो. अभिची बॉटल पडली त्यामुळे तो थांबला. असे होत होत थोड्याच वेळात सगळे आपापल्या पेस प्रमाणे विखुरले. कात्रज येईतो समोर आता आणखी एक केदार, आणि सेकंड लॉट मध्ये मी आणि राकेश आणि २ ते ३ मिनिटांच्या अंतरावर मिहिर असे उरलो.

कात्रज चढून वेगात खाली आलो आणि बायो ब्रेक म्हणून टोल नाक्यापाशी थांबलो. तिथे आम्ही परत एकदा "वर्क द प्लान" आहे की नाही की खात्री करून घेतली आणि पुढे असणार्‍या खंबाटकी कडे निघालो. शिवापूर ते शिरवळ थोडा उताराचा रस्ता असल्यामुळे सगळेच वेगात होते. ह्या रस्त्यावर आम्हाला मागच्या वेळी २०० साठी माझ्यासोबत असणारा अर्जुन आणि श्री ठिपसे भेटले.

आम्ही खंबाटकीच्या पायथ्यापाशी नाश्ता केला. खंबाटकी आरामात पार पडला. आमच्या पाच जणांपैकी ह्या चढाचा "राजा" होता मिहिर. तो आणि मी सोबत होतो, पण त्याने जबरदस्त पेडल मारत मुसंडी मारून आधी पार केला. आणि वाई कडे निघालो. इतक्या वेळात मस्त गप्पा वगैरे चालू होत्या आणि आमचा आजचा "किलर घाट" पसरणी यायच्या आधी हेवी शुगर इनटेक जरूरी आहे असे सर्वानूमते ठरवून आम्ही घाट पायथ्याला ऊसाचा रस प्यालो. मे बी अ बिग मिस्टेक, म्हणजे रस नाही तर तो रसवंतीवाला. त्याने रसात पाणी टाकले बहुदा. पुढे त्यामुळे अर्जुनाचे पोट दुखायला लागले.

पसरणी हा लोकांना पसरवणारा घाट आहे. १४ किमीची सलग चढण ! ७०३ मिटर्स पासून जो चढ होतो तो १२६४ मिटर्स पर्यंत चढावा लागतो आणि तेव्हा सकाळ नसते, शिवाय आधी ९० किमी सायकल चालवून दोन घाट झालेले असतात आणि मग लागतो पसरणी !

पहिले अर्धा किमी आम्ही एकमेकांच्या दृष्टिक्षेपात होतो पण अल्पावधीतच मी सर्वांना मागे टाकत, "जय बजरंगा, हूप्पा हुय्या" "हर हर महादेव" चा घोषा लावत जोरात, हाय केडन्स मध्ये पुढे निघालो. पसरणी चढताना उजव्या बाजूला देखील चढ दिसत राहतो. उलट्या L सारखा. आणि तो संपतच नाही. हॅरिसन्स फॉली पर्यंत मी १ तास ८ मिनिटात येऊन पोचलो आणि तिथून मग उरलेला घाट आणखी १२ एक मिनिटात संपवला आणि त्या गावात पाणी पिण्यासाठी ब्रेक घेतला. ५ एक मिनिटानंतर अर्जुन पण आला. मिहिर आणि राकेश कुठे आहे हे त्यालाही माहिती नव्हते, मग तिथे थांबण्यापेक्षा हळू हळू पुढे होऊ असा निर्णय घेऊन आम्ही पुढे महाबळेश्वरला निघालो. आणखी चढ !

मध्येच मॅप्रो मध्ये ब्रेक घ्यावा असे वाटले पण तो मोह टाळत मी पुढे निघालो अर्जुन थकला होता तो थांबला. सगळीकडे स्ट्रॉबेरी दिसत असूनही मजेत खाता येत नव्हत्या हे दुःख होतेच. मी महाबळेश्वरला कंट्रोल पाँईट होता तिथे येऊन माझ्या वेळेची नोंद करून, स्टॅम्प घेतला आणि मग निवांत गप्पा मारत थांबलो. कारण माझ्या आधी फक्त तिघे जण येऊन पोचले होते. ते तिघेही पुण्यातील प्रो रायडर्स आहेत. मग हळू हळू माझ्या ग्रूप मधील सर्वच जण पोचले. आम्ही तिथून निघालो.

दिड एक वाजत असल्यामुळे जेवायचे कुठे ना निर्णय घेणे आवश्यक होते. आयोजक म्हणाले की मेढाला जेवण मिळेल, फक्त १२ किमी डाऊन हिल. आम्ही १० मिनिटात पोचू असा विचार करून निघालो. पण हाय रे दुर्दैव ! मेढा ३० किमी आहे आणि डाऊन हिल सुरू पहिल्या १० किमी नंतर होतं आणि उतार संपल्यावर ही १० उरतातच. कसे तरी तिथे पोचलो. आणि जेवलो.

आता सव्वा तीन वाजले होते, ऊन मी म्हणत होते, रस्ता नावालाच होता, आणि भरीस भर म्हणून हेडविंड्स मधून अश्या रस्त्यावर सायकल चालविणे कठीण झाले होते १ तासापूर्वी आम्ही जेवण्यासाठी कुठे मिळेल का ह्याचा शोध घेत होतो. निदान कसेतरी काही खायला मि़ळाले होते हे सोडले तर सगळे ऑड्स एकत्र झाले होते. आणि मनाने कच खायला सुरूवात केली की काय असे वाटतेय न वाटतेय ह्या विचारात असतानाच पाठीमागून राकेश सोबतीला आला आणि म्हणाला, "आपले सर्व गणित / प्लॅन बिघडला आहे, काय करायचं? पुण्याला निघायचे की पुढे जायचे?" त्या सोबत बोलतो न बोलतो तितक्यात पाठीमागून मिहिर आला न म्हणाला, " कंट्रोल पाँईट आला की कुठे वळायचे, उजवीकडे की डावीकडे?" मी जोरात हसून उत्तर दिले, अरे तेच तर राकेश सोबत मी बोलतोय अशातच आम्ही ठिपश्यांना गाठलं. ते आम्ही जेवताना पुढे गेले होते.

केळघर घाट (मेढा) हा इतका अवघड आणि चांगला रस्ता नसणारा घाट आहे की बास रे बास. मध्येच खड्डे वगैरे असल्यामुळे आणि त्या आधीचा काही रस्ता खराब असल्यामुळे मी त्या उतारावार हॅन्डलबारची ग्रीप जणू "डेथ ग्रीप" सारखी पकडली होती. त्यामुळे (आणि माझ्या रोजच्या ट्रेनिंग मुळे सुद्धा) माझी Ulner Nerve डॅमेज व्हायला सुरूवात झाली. आणि त्यामुळे माझ्या उजव्या हाताच्या करंगळी आणि त्या बाजूची रिंग फिंगर ह्यावरचे नियंत्रण जायला सुरूवात झाली. ह्याला सायकलिस्ट पल्सी असे म्हणतात. पहिलेंदा जेंव्हा झाले होते तेंव्हा मला वाटले की माझ्या बोटांना पॅरालिसिस झाला आहे. आणि मी घाबरलो होतो. आज मात्र सवयीमुळे काही वाटले नाही. (हे लिहिताना माझा त्या दोन्ही बोटांवर अजिबात कंट्रोल नाही. पण दोन एक आठवड्यात येईल परत)

मन मोठं गमतीशीर असतं. क्विट करायला फक्त एक खूप छोट कारण पुरतं. राकेशचे पण बरोबर होते आम्ही ४:१५ला सातारा गावात (आझादनगर) होतो आणि तिथे कंट्रोल असल्यामुळे तेथून स्टॅम्प घेणे आवश्यक होते. तिथे कसेतरी पोचलो, पोचे पर्यंत मी राकेशला म्हणत होतो की, आपण जाऊ पुढे, जे होईल ते होईल. फार तर थोड्यावेळाने क्विट करू. पण त्याने ऑलमोस्ट निर्णय घेतला की नाही. कंट्रोल पाँईटला अब नही तो कब नही, फक्त उजवी कडेच जायचे आणि तुला सोडायचे असेल तर चार तासानी मी पण सोडेल पण निपाणी रत्यालाच जायचे असे मी राकेशला म्हणत असताना ठिपश्यांनी ऐकले व त्यांनीही राकेशला मानसिक आधार देऊन तयार केले. सो वि नेल्ड दॅट बिग मोमेंट. आता प्रश्न असा होता की निपाणीला कधी पोचू? मिहिरच्या प्लान प्रमाणे रात्री एक वाजता पोचलो असतो पण आम्ही आता खूप वेळ घालवला व हेड विंडस ने स्पीड गेला त्यामुळे एक वाजता पोचणे शक्य नव्हते.

इथे ठिपसे पण आमच्या चौघांमध्ये अ‍ॅड झाले. आम्ही पाच जण झालो. शिवाय त्यांनी जेवण नीट केले नव्हते आणि आम्ही नुकतेच केले होते. त्यांना अजून ४५ मिनिटे थांबावेच लागले असते. मग आमच्या "वर्क द प्लान" चा बोर्‍या वाजला असता. काही तरी करू असे म्हणून आम्ही फास्ट निघालो. मी ठरलेले ठिकाण क्रॉस कधी केले ते कळाले नाही, सर्वांना मागे सोडून मी सातारा - उंब्रजच्या खिंडीपाशी आलो तितक्यात मला एका बाईक वाल्याने थांबवले व सांगीतलं की मागचे सायकलवाले थांबा म्हणत आहेत. १५ मिनिटात इतरही पोचले अन मग तिथे ठिपश्यांना जेवण करायचे होते म्हणून आम्ही खिंड उतरून जेवायला थांबलो. त्यात आणखी ४० मिनिटे गेली.

६ वाजले. रनिंग अगेन्स्ट द टाईम अजून १२० किमी गाठायचे होते. माझ्या मुळ प्लान प्रमाणे आम्ही ११:३० ला पोचायला हवे होतो पण आता अवघड झाले. आत्ताही व्यवस्थित गेलो तर कदाचित १ पर्यंत पोचू असे मी मिहिर, अर्जून आणि राकेशने ठरविले. रात्र व्हायला सुरू झाली होती. ठिपश्यांनी मला रिक्वेस्ट केली की, "तू फार फास्ट चालवत आहेस, प्लीज माझ्या साठी स्लो जा. मला होणार नाही." त्यांना नाही म्हणणे मला खूप अवघड गेले
पुढच्या स्टॉप पर्यंत जाऊ मग वेळेचा अंदाज घेऊन ठरवू असे आम्ही तिघांनी ठरविले आणि निघालो. रात्री ८ ला चहा प्यायला थांबलो. तर एक बाईकवाला शोधत आला आणि ठिपश्यांनी थांबायला सांगीतले आहे असे निरोप दिला. मग तिथे थांबलो. ४५ मिनिटे ! क्लॉक इज टिकिंग ! चिडचिड, फ्र्स्ट्रेशन ! आय निड स्लिप, अरे काय करायचं? असे बोलणे सुरू झाले. नेक्स्ट स्टॉप वर ठरवू असे मी परत म्हणालो. मॉरली त्यांना सोडून द्यावे असे आम्हाला वाटत नव्हते हे खरे आहे पण नाऊ वी वर रायडींग हिज राईड. माझा वेग वगैरे फक्त स्टॉप वर येई पर्यंत, मग तिथे वाट बघा ! मग आणखी दोन तास राईड, पुढचा स्टॉप आणि परत तेच चक्र

येलूर फाट्याला आम्ही जेवायला थांबलो तेंव्हा ११ वाजले होते. अजून ७५ किमी बाकी होते. वी गेव्ह अप अवर प्लान ! रात्री ठिपश्यांना एकटे सोडायचे नाही, कितीका वाजेनात असे ठरवून आम्ही सोबत राहिलो अन निप्पानीला रात्री २:४५ ला पोचलो. ३४० किमी संपले !!

मी रात्री ३ वाजता पोचल्यावर शॉवर घेतले. ३:४५ चा गजर लावून आम्ही झोपायचा प्रयत्न केला. झोप येणे शक्य नव्हते. गजर झाल्यावर एकेकाने शॉवर घेणे वगैरे केले आणि आम्ही ४:४५ च्या आसपास निघालो.

आता एक कॅच होता. येलूरचा साई इंटरनॅशनला कंट्रोल पॉईंट फक्त सकाळी ९ वाजेपर्यंतच चालू राहणार होता. म्हणजे ७५ किमी त्या आधी गाठणे आवश्यक होते.

मिहिर आणि मी स्ट्रॅटजी ठरवत निघालो की काय करता येईल आणि किती वाजेपर्यंत पुणे गाठता येईल. मी दोघांनाही मनात ७ चे टारगेट ठेवा असे सारखे बजावत होतो. म्हणजे रेस क्लोज टाईमच्या ३ तास आधी पोचता येईल. रात्री १० वाजता वेळ संपणार होती.

थोड्याच वेळात दिवस उजाडणारा होता. आणि मला माझ्या स्पीडने जाता येणार होते. कारण रात्र संपली की ठिपश्यांना काही प्रॉब्लेम आला असता तरी दिवसा मदत मिळू शकते आणि मलाही मॉरली काल रात्री तसे करणे बरे वाटत नव्हते, पण आज दिवस काही वाटले नाही.

आम्ही दर ३० किमीला छोटा ब्रेक घ्यायचे ठरवले. आणि पहिल्या स्टॉप पासून मी आता माझ्या नॉर्मल स्पीडने यायचे ठरविले आणि येत राहिलो. १०-१५ मिनिटात मिहिर आणि राकेश येत असत. मग आम्ही पाणी वगैरे पिऊन परत पुढचा स्टॉप ठरवून निघत असू. येलूरच्या साई इंटरनॅशनलला मी ८ च्या आधी येऊन पोचलो. ७५ किमी संपले. आता फक्त २०० ! आता मित्रांची वाट बघायची अन नाश्ता करायचा होता. तिथे मग मोठ्ठा ब्रेक घेतला ९ वाजे पर्यंत तिथे सगळे येऊन पोचले. अर्जुनाला पोटाचा त्रास आणि झोपेचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याने रेस सोडली. पण रिक्षा करून तो ही आला होता. आम्ही निघताना ठिपसे पण आले. पण कराड्ला भेटू असे सांगून आम्ही निरोप घेतला.

मिहिरने वॉटसअ‍ॅप बघून सुधाकर आणि अभिषेकने ३०० वेळेच्या आत पूर्ण केली हे सांगीतलं!

येलूर ते कराड मी एका तासात आलो. ७-८ मिनिटांनी राकेश अन १२-१५ मिनिटात मिहिर पोचला. चहा वगैरे घेऊन आम्ही परत सातार्‍यात भेटू असे ठरवले. इनफॅक्ट मिहिर मला म्हणाला, की तू खूप फास्ट जात आहेस. तू ५ किंवा ६ ला पोचशील, तू निघ पुढे. पण मी त्याला नाही, सोबत जाऊ, मी थांबत जाईन असे म्हणून निरोप घेतला आणि सातार्‍याला आम्ही परत भेटलो. तिथून खंबाटकीच्या अलिकडे अन सुरूरच्या पुढे जे हॉटेल्स आहेत तिथे ४ वाजता भेटायचे ठरले होते, मी ३:५०-५५ ला जाऊन पोचलो. तितक्यात मिहिरचा समस आला की ते ४:३० पर्यंत येतील. मग मी निवांत होऊन आराम केला. राकेश आला पण त्याला आवाज देतोय तितक्यात तो निघून गेला. त्याला माझा आवाज ऐकू आला नसावा. मिहिर ४:४५ ला तिथे आला. मग आम्ही ५:१५ च्या आसपास परत निघालो. आता पुणे केवळ ७५ आणि अजून साडेचार तास हातात होते.

शिरवळ पर्यंत वेगात येऊन पोचलो. घरी फोन केला की मला घ्यायला चांदणी चौकातील कॅफे कॉफी डे ( शेवटचा स्टॉप) ७:३० पर्यंत ये. खेड शिवापूर पर्यंत वेग चांगला होता. पण नंतर प्रचंड ट्रॅफीक मुळे सायकल चालवायला खूप त्रास झाला. इतका की शेवटचे १० किमी गाठायला मला सव्वा तास लागला.

आम्ही तिघेही एकत्रच ८:१५ ला येऊन पोचलो. ६०० किमी संपले! ते क्षण वर्णन करणे अशक्य आहे !

600 BRM.png

मला एकुण ३० तास १० मिनिटे सायकल चालवावी लागली आणि ३८ तास १५ मिनिटात आम्ही हे ६०० (ब्रेक्ससहित) पार पाडले.

CCD मध्येअमित, सुधाकर आणि अभिषेक आमचे स्वागत करायला आले होते. सरप्राईज !! खूप छान वाटलं, इतकं की हे लिहितानाही मला ते क्षण आठवत आहेत.

विषय: 

आता पुढचे लक्ष काय? >>.

खरं तर माहिती नाही. मे बी १००० पण त्यासाठी सलग तीन दिवस, तीन रात्र अशी सायकल चालवावी लागेल स्लिप ट्रेनिंग ( रादर नो स्लिप ट्रेनिंग आधी करावी लागेल. मग १००० चे ठरवीन. ) एकदा तरी १००० करणार हे नक्की. कधी ते माहिती नाही.

आणि ६०० ला झोप नसतानाही सलग दोन दिवस एक रात्र चालवून फारसा काही त्रास झाला नाही. त्यामुळे १००० विदीन रीच वाटत आहे.

धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे नेहमीच धैर्य मिळते.

सुपर्ब! अभिनंदन! भारतात ह्या अशा शर्यती पूर्ण करणाऱ्यांना काहीतरी विशेष बक्षीस मिळाले पाहिजे. इथल्या रस्ते (पक्षी: खड्डे) आणि ट्रॅफिकचा विचार करता!

भारतात ह्या अशा शर्यती पूर्ण करणाऱ्यांना काहीतरी विशेष बक्षीस मिळाले पाहिजे. >>

हो मिळतं ना. हे बघ. मलाही मिळालं, रेस पूर्ण व्हायच्या आधीच. http://www.hughston.com/hha/a_15_3_2.htm

ऑन लाईटर नोट - सर्व शहरात सायकल लेन्स हव्यात. पुण्यात सायकल लेन्स वर भाजीवाले, कारवाले आणि मोटारबाईकवाले असतात. BRT सारख्या सायकल लेन्स मोठ्या शहरात ठेवायलाच हव्यात.

केदार सर, अभिनंदन. प्लीज फोटो टाका विजेत्यांचे. सर्वात आधी कोण पोचले त्याबद्दल नाही लिहिले. तुमचा क्रमांक कितवा आला? छान वाटल सर्व वाचून. एकदा सायकलीने सिंगापुरला या Happy

सर्वात आधी कोण पोचले त्याबद्दल नाही लिहिले. तुमचा क्रमांक कितवा आला? >>.

अपूर्व आणि हिरेन दोघेही प्रो रायडर्स जे आधीपासून पुढे होते ते एकत्र ५:३० ला पोचले.

आम्ही तिघे एकत्र ८:१५ ला पोचलो. म्हणजे नंबरच काढायचा तर एकत्र फिनिश असल्यामुळे दुसरा म्हणा किंवा तिसरा.

सर्वांना धन्यवाद Happy

लै भारी !!!

राईड चा रुट जबरदस्त होता, मी गाडी चालवायला वैतागलो त्या पसरणी मधे आणि तुम्ही सायकल चालवत गेलात _/\_

इतका की शेवटचे १० किमी गाठायला मला सव्वा तास लागला.<<< बापरे, तो खेड शिवापुर च्या पुढचा टोल नाका फारच वैतागवाडी झाला आहे.

Pages