३०० किमी बीआरएम - माझी लाँग डिस्टन्स सायकलींग कहाणी २
भारतातील सर्वात कठिण अशी २०० ची बीआरएम पूर्ण केल्यावर १४ दिवसांनीच ३०० बीआरएम पण होती.
ह्या वेळचा मार्ग होता. विद्यापीठ - सातारा - उंब्रज - सातारा - बाणेर
एक मन म्हणत होते की भाग घ्यावा. आणि दुसरे नाही. कारण मी ह्या दोन आठवड्यामध्ये आणखी एक सायकल घेतली होती आणि त्या सायकलवरच करावी असे मला वाटत होते. पण त्या सायकलवर माझी लाँगेस्ट राईड होती केवळ ६२ किमीची ! आणि पोझिशन चेंज व रिलेटिव्हली अननोन बाईकवर एकदम ३०० किमी करणे म्हणजे जरा रिस्कीच होते. अर्थात बाईकला रिस्क नाही तर मला, कारण बाईक पोझिशन चेंज झाल्यावर काही आठवडे खांदे, मान वगैरे दुखू शकतात.
ग्रूप मध्ये मेसेज टाकला करू का? कारण चेंज पोझिशन मुळे मी कन्फ्यूज्ड होतो. अमित म्हणाला की परत विचार कर, चेंज पोझिशन वगैरे बद्दल आणि करायची तर माझ्या जुन्या बाईक वर कर, त्यावर तू आरामात पूर्ण करशील. अमितने लिहिलेल्या मुद्द्यांवर मी विचार केला आणि माझे + आणि - पाँईटस शोधले. तर सुधाकर म्हणाला, तू अगदी आरामात मारशील. त्याने अगदी गणितच मांडले २५ * १४ ब्रेक्ससहीत! सर्वांनीच आपापले मत नोंदवले.
बेव्हेच्या आठवडाभर आधी ही चर्चा रंगली, अजूनही मी नाव नोंदवले नव्हते. मग दोन दिवस बाकी असताना गुरूवारी अचानक नोंदवले. फार तर काय चेंज पोझिशन मुळे जर त्रास झाला तर रिटायर होऊ पण निदान आपल्याला आपली नवी बाईक पूर्ण कळेल.
रात्री हायवेवर खूप वेळ चालवावी लागते त्यामुळे ब्रेव्हे मध्ये शक्तीवान लाईट लागतो. तो लाईट (तेवढा पावरफुल) माझ्याकडे नव्हता, तो आणला. माझ्याकडे अगदी १५०, २०० ल्युमिन्सचा आहे. पण मग हा १२०० ल्युमिन्सवाला आणला. बॅटरी चार्जही केली. आणि सर्व साहित्याच्यी जमवाजमव करून शुक्रवारी संध्याकाळी तयार झालो.
स्पर्धेचा दिवस उजाडला. शनिवार ! सकाळी ५ ला घरातून विद्यापीठ सर्कल कडे जायला निघालो. ६-७ किमी गेल्यावर माझा तो नवा लाईट बंद पडला ! सर्व कनेक्शन पाहिले. तरी लाईट चालू झाला नाही. म्हणजे ती चायनिज बॅटरी चार्ज झालीच नाही! सुरू होण्याआधीच माघार घ्यावी लागणार होती. पण तरीही तिथपर्यंत गेलो.
तिथे आयोजक फरहाद आणि दिव्या होते. त्यांना कहाणी सांगीतली, तर फरहाद म्हणाले की माझ्याकडे स्पेअर आहे, मी देतो तुला काळजी नको. ये ! फरहादांनी त्यांची बॅटरी दिली आणि माझा दिवा लागला ! थँक्यु फरहाद!
ब्रेव्हे कार्ड घेताना तिथे विवेक आला, त्याची कार्बन बाईक मी मागे चालवली होती त्यामुळे त्याची माझी ओळख होती. त्याने अचानक स्पॉट रजिष्ट्रेशन केले. मागच्या वेळचे अर्जून, तिसरा केदार आणि होले अण्णा व त्यांचे मित्र ही होते. तिसरा केदार आणि होले अण्णा व त्यांचे मित्र हे ६०० करणार होते, तर अर्जून माझ्यासोबत ३०० ला होता.
कार्ड स्टॅम्प करून आम्ही सर्व ३०० आणि ६०० वाले सकाळी ६ ला निघालो. ह्या नंतर १-२ जण सोडले मला बाकीचे लोकं कधीही दिसले नाही. मी पुढे निघालो होतो, माझ्या पाठीमागे मिहिर होता. मिहिर आणि मी "रोड बाईक" बद्दल गप्पा मारत निघालो. तो आणि मी "स्टरावा अॅपवर" एकमेकांचे मित्र आहोत आणि एकमेकांच्या राईडस फॉलो करतो. सिंहगड फ्लायओव्हरपाशी विवेक देखील सोबत आला.
कात्रज चढ आला तसे मी पुढे निघालो. मिहिरची सोबत इथे सुटली. माझ्या पाठीमागे विवेक होता. आता ह्या राईडचा मी "लिडर" होतो. कात्रज उतरून शिरवळ केंव्हा आले ते कळले नाही. कात्रज सोडल्या आम्ही दोघे (मी अन विवेक) ४० च्या स्पिडने पुढे जात होतो. विवेकला पाणी रिफिल करायचे होते म्हणून मग आम्ही शिरवळ सोडल्यावर ( तेथील श्रीराम वडापावचा मोह टाळून! ) ६-७ किमी नंतर एक ब्रेक घेतला. तिथे १५-२० मिनिटे होतो. तितक्यात मिहिर दिसला. मिहिर सोबत थोडावेळ सायकल चालवून आम्ही दोघे परत पुढे निघालो.
खंबाटकी आला आणि आम्ही दोघांनी चढायला सुरूवात केली. टॉप यायच्या आधी एक हेअर पिन आहे. मी त्या हेअर पिनला ओलांडायच्या प्रयत्नात असताना माझ्या पाठीमागचा ट्रक माझ्या समोर येऊन अचानक थांबला. आमच्यात हार्डली ५-७ फुट अंतर होते. मी माझे शू पेडल मधून अनक्लिट केले. डावा निघाला कारण तो पाय खाली होता. पेडल मधून अनक्लिट करताना पायाची पोझिशन ६ वाजल्याची असली तर पटकन अनक्लिट होते. पण उजवा पाय वर असल्यामुळे अन क्लिट करता आला नाही. आणि मी थोडा लवंडलो. पडलो असे म्हणता येणार नाही, पण उजव्या हातावर अन पायावर लॅन्ड झालो अन उजवा पाय अनक्लिट झाला नाही. मग त्या अवस्थेत सायकल वाकडी वगैरे करुन पाय (शू) अनक्लिट करून मी परत उभा राहीलो. तितक्यात माझ्या बाजूच्या कारवाल्याने कार थांबवून ट्रकवाल्याला असे अचानक का थांबवले असे बोलायला देखील सुरूवात केली होती. त्या फॅमिलीला थँक्यू म्हणून मी परत पोझिशन घेणार तर चेन पडल्याचे दिसले. मग चेन नीट लावून परत सुरूवात केली.
ह्या गडबडीत २० एक मिनिटे गेली. आणि मी परत स्वार होऊन टॉप कडे निघालो. तिथून उतारावर मस्त पैकी ५५-६० किमीने खाली आलो आणि सातार्याच्या मार्गावर लागलो. सातारा जसे जसे जवळ आले तसेतसे माझ्या उजव्या पायात कळा येऊ लागल्या. सातारा गेले तेंव्हा मी जी पी एस चेक केला. मी ऑलरेडी २७.५ किमी प्रतीतासाच्या स्पिड ने हे ११०-१५ किमी पार केले होते. १०:१५ वाजले होते.
अशातच मी एका खड्यातून सायकल नेली आणि माझा मागचा लाईट पडला. तो मी परत आणतोय तितक्यात एक ट्रॅक्टर त्यावरून गेला. एकंदरीत आज लाईटस आणि मी ह्यांचे काही जुळत नव्हते.
उंब्रजचा चेक पाँईट यायला केवळ ३० किमी राहिले होते. ( १५० किमीवर तो होता म्हणजे. अर्धा रस्ता संपणार होता.) पण मी आता खूपच त्रासात होतो. आता माझी स्पिड कमी होऊन ही १२ ते १५ किमी प्रतितास झाली होती. सातार्यानंतर दोन तासानंतर मी पोचलो तेंव्हा १२:३५ झाले होते इथे येई पर्यंत मी ऑलमोस्ट गिव्ह अप करणार होतो.
विवेक तिथे ऑलरेडी होता. त्याला येऊन २० एक मिनिटे झाली होती. आणि मी विचार केला की माझ्या पायात प्रॉब्लेम असूनही मी केवळ २० मिनिटे उशीरा पोचू शकतो. तर मग अजून १५० करायलाच हवेत. केवळ १२:३५ वाजले होते आणि अजून रात्री २ पर्यंत वेळच वेळ होता. गिव्ह अप चा विचार जो पायामुळे आला तो सोडला. विवेक म्हणाला की आपण सातार्यात जाऊन लंच करू. मग आम्ही दोघे निघणार तितक्यात ६०० करणारे डॉ बबन देखील तिथे येऊन पोचले. आम्ही बेस्ट लक वगैरे म्हणून निघालो.
माझ्याकडे अॅन्टी पेन स्प्रे होता. जो मी कदाचित पोझिशन चेंज मुळे खांदे दुखले तर म्हणून ठेवला होता, तो काढून ऑलमोस्ट अर्धा उजव्या पायावर ओतला आणि सातारा गाठले. पण इथेही मी मागे पडत होतो. विवेकला समोर जायला सांगून मी आरामात घ्यायचे ठरवले. प्रत्येक ५ किमी नंतर थांबत होतो. पाय अजूनही दुखत होताच. ते ३५ किमी कसे काढले कुणास ठावूक ! सातारा आले आणि मी चांगले रेस्तराँ शोधू लागलो. एक बरासा ढाबा पाहून तिथे वळलो, तर तिथे विवेकची सायकल दिसली ! आणि त्यामुळे परत माझा कॉन्फिडन्स वाढला. मग आम्ही दोघांनी जेवण वगैरे उरकून परत पुण्याकडे जाण्यास सुरूवात केली. मी परत एकदा स्पे मारून घेतला.
अनिल कुंबळेने मला त्या ६० -७० किमीच्या काळात खूप मदत केली. मी सारखी त्याची ती बॉलिंग आठवत होतो आणि त्याला त्या ओव्हर्स मध्ये व्हिज्वलाईज करत होतो. प्रत्येक वेळी जेंव्हा उजवा पाय पेडलवरून खाली येत होता तेंव्हा मला त्रास होत होता.
सातार्यावरून निघून सुरूर येईपर्यंत आम्ही दोघे बर्यापैकी सोबत होतो. पाय अजूनही दुखत होताच. पण मी तिकडे लक्ष द्यायचे नाही असे ठरवले. विवेक पुढे गेला कारण मला स्पिड मध्ये जाता येत नव्हते. पण गुड न्यूज अशी होती की गेले ३० एक किमी मी थांबलो नव्हतो. ! त्या नादात आता मला परत २५ किमीचा स्पिड मिळत होता हे लक्षात आले. मी खंबाटकी उतरला आणि शिरवळ क्रॉस केले. इथे मला परत विवेक दिसला. त्याने ही थंब्स अप केले आणि ऑल वेल असे मी त्याला कळवले.
शिरवळ क्रॉस करून पुढे कुठेतरी कामतच्या रेस्तराँ मध्ये थांबलो तेंव्हा फक्त ५:४० झाले होते. आता पुणे केवळ ४५ किमी होते. एव्हाना १२ तासाच्या आत २५५ किमी झाले होते.
मी मस्त पैकी दोसा अन चहा घेतला आणि माझ्या ग्रूप मेंबर्सना कळवले की मी सेफ आहे आणि केवळ ४५ उरले. ते सर्व माझ्या अपडेटची बहुदा वाटच पाहत होते. कारण एकाच मिनिटात सगळ्यांनी रिप्लाय दिला. हर्षद, किरण, भावे, आशू, अमित, सुधाकर, मनोज, भारत, केडी, ओंकार सर्वांनी जबरी, मस्त, आता तू पहिलाच येऊ शकशील असे रिप्लाय दिले. त्यांच्या त्या रिप्लाय मुळे मला खूपच आधार मिळाला.
कामत मधून निघताना बॅटरी लाईटला जोडायची होती म्हणून मी टॉप ट्युबवर पाहिले तर बॅटरीच गायब! खंबाटकीच्या उतारावर मला एक थड असा आवाज आला होता. तो बॅटरीचा होता हे आत्ता २५-३० किमी नंतर कळाले. थोडक्यात फ्रंट लाईटला परत एकदा बॅटरी नाही आणि बॅक लाईट फुटलेला ! मी काळजी करू लागलो. वेळ खूप होता. अजून ८ तास होते आणि ४५ किमीच गाठायचे होते. फारतर घरून जुना लाईट देखील मागवता आला असता.
तितक्यात मला तो कामतचा वेटर म्हणाला की आपके पिछेके जॅकेट मे एक लाईट बहुत देरसे जल रहा है! आता हा कोणता लाईट म्हणून मी पाहिले तर तो, मी सेल फोन चार्ज करण्यासाठी जे पावर बुस्टर घेतले होते त्यात देखील एक LED होता तो जळत होता. तो देखील मी सुरू न करता. त्याबद्दल मी टोटली विसरलो होतो. म्हणजे बॅक लाइटचा प्रॉब्लेम सुटला.
ती सारी कायनाथ की काय ती आपल्या पाठीमागे असते ह्याचा अनुभव आला !
मग किराणा दुकानातून एक टॉर्च घेतला आणि सेलो टेपने तो स्टेम वर गुंडाळला. आता देअर वॉ़ नो स्टॉपिंग. पण ह्यात ४५ मिनिटे गेली. आणि मी परत स्टार्ट घेऊन निघालो.
कात्रज घाटातून उतरताना मी माझा आजपर्यंतचा मॅक्स स्पिड ६०.१ (सायकलवर !! ) गाठला आणि बावधनला येऊन ट्रॅफिक मध्ये अडकलो. हळू हळू करत मी बरोबर ९ वाजता कॅफे नुकच्या कंट्रोल पाँईंटला पोचलो आणि साईन ऑफ केले ! विवेक माझ्या २० मिनिटे आधी येऊन पोचला होता. ३०० पूर्ण करणारा तो पहिला आणि मी दुसरा. दुसरे दिवशी मिहिरने सांगीतले की त्याने ९:४५ ला पूर्ण केली. फेसबुक वर एक फोटो आला त्यात पाच लोकांनी रात्री १:३० पूर्ण केल्याचे कळवले. एकुण १३ पैकी ११ जनांनी पूर्ण केली.
ह्यावेळी एक इटालियन देखील ह्या ब्रेव्हे मध्ये होता. माझी सायकल पाहून तो अगदी OMG झाला होता कारण त्याला ती सायकल खूप आवडते.
जीपीएस ने कुठेतरी सिग्नल सोडले कारण पूर्ण राईड ही ३११-१२ किमीची झाली.
माझे स्पिड प्रोफाईल. किमी १४० ते २२० मध्ये स्पिड अगदीच कमी दिसेल कारण तेंव्हाच तो त्रास जास्त होता.
सुधाकरने प्रिडिक्ट केले होते की मी १४ तासात पार करेन. माझे स्वतःचे प्रिडिक्शन हे १६ तासांचे होते. पण मी १५ तासात पूर्ण केली. आणि ह्या ६ ते रात्री ९ च्या १५ तासात मध्ये मी काय काय पाहिले. गुड स्पिड -नो स्पिड, प्रचंड त्रास आणि परत वेग आणि नंतर समाधान !
आम्हाला (सायकल आणि मला) घ्यायला कॅफे नुकला प्रज्ञा आली. सॅडल ते एकदम कार सीट ट्रान्झिशन इतके सुखद वाटले की बास!
प्रज्ञा म्हणाली की मी अजूनही फ्रेश वाटतोय. मी म्हणालो, हो अजून १०० टाकेन असं वाटतंय खरं !
ह्या सायकलची किंमत काय आहे हो
ह्या सायकलची किंमत काय आहे हो केदार?
सायकलीवर बसलं की पाठकणा ताठ
सायकलीवर बसलं की पाठकणा ताठ राहतो का हो? मला पुढे वाकून सायकल चालवायला अजिबात जमत नाही. त्यामुळे तशी सायकल चालवणाऱ्यांबद्दल कमालीचं औत्सुक्य आहे. >>
कणा ताठच राहतो. कंबरेतून वाकायचे. खरेतर सायकल चालविण्याची हीच योग्य पोझिशन आहे. लांब पल्ल्यात फ्लॅटबार्स फारसे उपयोगाचे नाहीत. पण लोकांना ते सहज शक्य वाटतात त्यामुळे आवडतात.
ह्या पोझिशन साठी आपले "कोअर" मात्र चांगले हवे. (आणि घाबरायची गरज नाही, ते आपोआप बिल्ड होत जाते.)
ह्या सायकलची किंमत काय आहे हो केदार >>>
त्यापेक्षा तू सर्च कर. माझे मॉडेल cannondale. Synapse Carbon 105 6 आहे. 
अबब ३०० अभिनंदन.
अबब ३००
अभिनंदन.
केदार, माहितीबद्दल धन्यवाद!
केदार,
माहितीबद्दल धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
केवळ जबरी !!! ... ह्या लेखाचे
केवळ जबरी !!! ... ह्या लेखाचे फक्त शीर्षक वाचले होते. आज सगळे वर्णन वाचले. गेल्या स्पर्धेपेक्षा ही स्पर्धा जास्त खडतर झाली ( वाढलेल्या अंतरामुळे नाही ! )
वर्णन वाचताना आपल्या आजूबाजूला एक वेगळेच जग आहे जे तिथेच राहूनही आपल्याला अजिबातच माहीत नाही असे वाटत होते
तुला अगदी मनापासून __/\__ !
आजूबाजूला एक वेगळेच जग आहे जे
आजूबाजूला एक वेगळेच जग आहे जे तिथेच राहूनही आपल्याला अजिबातच माहीत नाही असे वाटत होते >>
अभिनंदन,
अभिनंदन,
केदार, याहीपुढच्या रेसचे
केदार, याहीपुढच्या रेसचे वर्णन कधी?
ग्रेट ग्रेट ग्रेट.....
ग्रेट ग्रेट ग्रेट..... अभिनंदन... चिकाटीला शाबासकी !
हा सर्व रस्ता मला तोंडपाठ आहे (अर्थात बस/स्कूटर ने गेल्याने). तुझे वर्णन वाचले अन अंगावर शिरशिरी आली, असे आतून वाटते की आत्ता उठावे अन चालू पडावे!
पण आता अवघड वाटते या वयात, तरीही मी प्रयत्न करणारच !
५०/६० चा स्पीड सायकलला कसा काय झेपतो? भिती नै वाटत? मी मुलखाचा घाबरट आहे, सायकलने उताराला जरा वेग घेतला तरि लगेच हात ब्रेकवर जातो.
सायकल चालवित असतानाच स्पीड कळू शकेल असे काय वापरता येईल?
केदार, याहीपुढच्या रेसचे
केदार, याहीपुढच्या रेसचे वर्णन कधी? >>
आज लिहितोय.
सायकल चालवित असतानाच स्पीड कळू शकेल असे काय वापरता येईल? >> सायक्लो कॉम्प. धन्यवाद लिंबू.
तू काय चन्द्रावरही जाशिल
तू काय चन्द्रावरही जाशिल बाबा सायकलीने .
__/\__
६०० चे वाचून अबब झाल मला
धन्यवाद केदार... नेटवर सर्च
धन्यवाद केदार... नेटवर सर्च केले... कॉस्ट मिनिमम १८,००० रुपयांपासून पुढेच आहे...
(सध्या तरी अंदाजपंचे वेग ठरवायला लागेल, किंवा अॅन्ड्रॉईड फोन हॅन्डलवर उघडून बसविण्याची सोय करावी लागेल. )
देशी बनावटीत जरा स्वःस्तात मेकॅनिकल स्पीडोमीटर वगैरे नसते का काही?
अजुन एक प्रश्न, या अशा रेसमधे कधी काळी खंबाटकी वगैरे घाटात चढावर ताकद संपलि तर सायकल हातातून ढकलत न्यायची वेळ आली तर तसे चालते का?
अशा रेस कमीतकमी किती अंतराकरता सुरू होतात?
तू काय चन्द्रावरही जाशिल बाबा
तू काय चन्द्रावरही जाशिल बाबा सायकलीने >>
अशा रेस कमीतकमी किती अंतराकरता सुरू होतात? >> 200
अशा रेसमधे कधी काळी खंबाटकी वगैरे घाटात चढावर ताकद संपलि तर सायकल हातातून ढकलत न्यायची वेळ आली तर तसे चालते का? >>> हो. पण मोटारीत घालून नाही. आणि हो महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेतच त्या पॉईंटला पोचायचे असते. नाहीतर नंतर पोचूनही डिड नॉट फिनीश चे पाप माथी लागते.
लिंबू स्वस्त स्पिडोमिटर २००० रू पासून आहेत.
>>>> लिंबू स्वस्त स्पिडोमिटर
>>>> लिंबू स्वस्त स्पिडोमिटर २००० रू पासून आहेत. <<<< य्ये हुई ना बात.... (अरे मजसारख्या हौशी म्हातार्याकरता इतका(च) खर्च परवडणे शक्य आहे रे भो)
कृपा करून असे सांग की पुण्यात मला कुठे मिळू शकेल?
aero bars म्हणजे काय?
aero bars म्हणजे काय?
पुण्यात मला कुठे मिळू शकेल?
पुण्यात मला कुठे मिळू शकेल? >> डिकॅथलॉन वाघोली, लाईफ सायकल, टिळक रोड किंवा इतर सायकलीचे दुकानं.
एरो बार्स साठी गुगल कर
ती डिकॅथलॉनची दुकानं फार भारी
ती डिकॅथलॉनची दुकानं फार भारी आहेत. काही विकत घ्यायचं नसलं तरी तिथे तास-दीड तास मस्त जातो.
तिथलं कँपिंगचं सामान पाहून तर मी अक्षरशः हरखून गेले होते. आपल्या देशात कँपिंगची पद्धत अजून रूढ झालेली नाही. पण काय एक-एक वस्तू होत्या त्यातल्या! :स्वप्नाळू बाहुली:
पुन्हा एकदा, अवांतराबद्दल सॉरी, हां
केदार, धन्यवाद. तुझ्या त्या
केदार, धन्यवाद. तुझ्या त्या दिलेल्या साईटवर पुढल्या महिन्यात रजिस्टर करतो.
अन सरावही चालू करतो. तू तर इथे हे सर्व लिहून फार उपकार केले आहेस. नेहेमीच्यातच काहीतरी नविन वेगळे करण्याची स्फुर्ती मिळत्ये.
गुगल करुन बघतो.
>>>> ह्या सायकलची किंमत काय
>>>> ह्या सायकलची किंमत काय आहे हो केदार >>> त्यापेक्षा तू सर्च कर. माझे मॉडेल cannondale. Synapse Carbon 105 6 आहे. <<<<

बघितली...... डोळे विस्फारुन मोठे झाले ते हाताने झाकायला लागलेत
अरे लाखाचा खेळ आहे रे हा तुझा... तुला भिती नै वाटत लाखाच्या सायकलीवर बसताना अन भिक्कार ट्रॅफिकमधुन जाताना ?
आपण तर बोवा सायकलीवर बसायच्या ऐवजी तिला घासुन पुसुन डोक्यावर घेऊन बसलो अस्तो !
सायकलींग इज एक्सपेन्सिव्ह
सायकलींग इज एक्सपेन्सिव्ह हॉबी. फक्त लोकांना वाटत नाही. जनरली माझ्या त्या सायकलची किंमत रस्त्यावर कोणी विचारली तर "१२५००" असते.
माझा मेहुणा (सचिन गावकर) १०
माझा मेहुणा (सचिन गावकर) १० महिने / २५ राज्ये सायकलने पूर्ण करायला ६ जानेवारी निघाला आहे.. आता केरळामधे आहे.. कुणाला त्याची प्रगती बघायची असल्यास....
https://www.facebook.com/pages/Touring-cyclogy/1580797572150116?pnref=story
>>>> जनरली माझ्या त्या
>>>> जनरली माझ्या त्या सायकलची किंमत रस्त्यावर कोणी विचारली तर "१२५००" असते. >>>>
ही झाकली मुठ साडेबाराहजाराची आयडीया खास आहे... लक्षात ठेविन.
तुझे तिनही धागे पोराला वाचायला दिले, त्याने वाचले.
आता त्याची ही शक्यता आधी कल्पनेच्या विश्वात वाईपर्यंत नेऊन भिडविणे हे जमले तर तो रिअल मधे निदान कात्रज बोगद्यापर्यंत जायचा प्रयत्न करेल. नै?
पण २०० किमीच्या रेसमधे फक्त भोर शक्य आहे असे तो मानसिकदृष्ट्या म्हणतोय
तो रूट त्यालाही माहित आहे, मी दोनतिनदा सुमोने मांढरदेवीला गेलोय, पलिकडे वाईतही उतरलोय.
डेकॅथलॉन, कँपिंगचे सामान
डेकॅथलॉन, कँपिंगचे सामान वगैरे भारतात पण सुरू झाले? ग्रेट!!!
>>>> किंवा अॅन्ड्रॉईड फोन
>>>> किंवा अॅन्ड्रॉईड फोन हॅन्डलवर उघडून बसविण्याची सोय करावी लागेल. ) <<<
केदार, परवा पुण्यात टिळकरोडवरील लाईफ सायकल या दुकानात गेलो होतो. डिजिटल स्पीडोमीटर (ओडोमीटर असेही म्हणतात म्हणे) १००० रुपयांचा मिळाला, बसवला, मस्त चालतोय. वायरलेस १४०० ला होता. अन मग सर्व मॉडेल्स त्यावरील किमतीची होती, घ्यायचीच नसल्याने मी फिचर्सच्या जास्त चौकशा केल्या नाहीत.
तसेच वर उल्लेखिलेले अॅन्ड्रॉईड फोन हॅन्डलवर अडकवण्याचा पाऊचही १००० ला आहे, पण तो आत्ता घेतला नाही, नंतर घेईन.
हेल्मेट तिथे महाग होती म्हणजे १५०० च्या पुढे, अन माझे बजेट पाचसहाशेचे होते, सबब आत्ता ते नाही घेतले.
मग काल घर ते आळंदीअलिकडे डूडूळगाव अन परत असे जाऊन आलो. जाऊन येऊन माझे ३१ किमी झाले. वेग साधारणतः सरासरी १९ पडला. तो वाढायला हवा आहे.
तसेच हे देखिल जाणवले की गिअर नसल्याने चढावर बरीच एनर्जी/वेळ वाया जात्ये व उतारावर ३२ किमि पेक्षा जास्त स्पीड सहजगत्या घेता येत नाहीये, त्यासाठी गिअरच हवेत. बघु, पुढे मागे गिअरची सायकल घेईन.
पण मजा येत्ये बरका.
ग्रेट आहात. वाचताना सुद्धा
ग्रेट आहात. वाचताना सुद्धा थ्रिलिंग वाटलं.
वा वा लिंबू. कधी ये
वा वा लिंबू.
कधी ये माझ्यासोबत राईडला. बरेच दिवस माबो कॉमन राईड झाली नाही. एखाद रविवारी करूयात.
सिंगल स्पीड वर प्रॅक्टिस प्रो लोकं करतात, तुझी आपोआप होतेय.
सर्वांना परत धन्यवाद.
ह्यानंतर मी ६०० देखील पूर्ण केली. http://www.maayboli.com/node/52481
Pages