शक्करकंदी चाट (वेग वेगळे प्रकार)

Submitted by देवीका on 21 January, 2015 - 14:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

थंडीचा मौसम सुरु झाला की उत्तर भारतात(खास करून पंजाब, दिलली वगैरे ) शक्करकंद घेवून गाड्या लागतात. उत्तर भारतातून हि रेसीपी अर्थात पलीकडे गेली असणार.

४ लाल रताळी

शक्करकंद मसाला १:
अर्धा चमचा चाट मसाला,
बारीक चिरलेली कोरडी केलेली पुदीना पानं,
पादेलोण किंवा काला नमक,
१ चमचा लाल मिर्च,
चिमटीभर काळं मिरी
वरील सर्व एकत्र करून ठेवावं.

आणि सगळ्यात शेवटी वेगळ्या कपात २ चमचे लिंबू रस,२ चमचे ताजा गोड संत्रा रस एकत्र करून तयार ठेवावा. नाहितर लिंबू व संत्र ताजे काप्पोन पिळावे.

दुसरा प्रकारः
पुदीना चटणी: ४-५ ताजी पुदीना पानं, लिंबू रस एक चमचा,कोथींबीर्, २ चमचे संत्रा रस, पाव चमचा लाल मिर्च, काळंमिरी चिमटीभर, काला नमक एकत्र बारीक वाटून ठेवावं.

कुरकुरीत पीठी कवरः एक चमचा तांदूळाचं पीठ, चवीला मीठ, चिमटीभर आरारूट पीठी.

क्रमवार पाककृती: 

प्रकार १:
१.स्वच्छ धूवून रताळी शेगडीवर भाजावी. तोवर बाजूला बसून हात शेकत गप्पा माराव्या शेगडीच्या गरमीत.
२.रताळी काळी झाली की सालीसकटच कुस्करावी ओबडधोबड. वरील शक्करकंद मसाला #१ टाकून लिंबू व संत्रा रस पिळून मग गरमा गरम खावं.
रताळ्याची गोडसर चव, आंबट तिखट चव एकदम मस्त लागते. शेवटी द्रोणात उरलेला लिंबू रस व संत्रा रस प्यावा.

दुसरा प्रकार :
जरा खटपटीचा आहे. पण तोही छान लागतो.
भाजलेलया रताळ्याला गोल फोडी करून कापलयावर गरम असतानाचा वरची पीठी लगेच भुरभुरावी. आणि लोण्यात दोन तीन मिनिटंच तळून (शॅलो फ्राय) काढून मग प्लेट मध्ये मांडून वरून पुदीना चटणी लावावी. शेजारी गोड दह्यात जरासा चाट मसाला टाकून द्यावा.
एक घास दह्याचा, एक घास गरमागरम शक्करकंद-पुदीना चटणी एकत्रित मस्त लागतं.
पहा करून. नक्की आवडेल.

थंडी पळून जाईल. मस्त चटकदार सोपा पदार्थ नाश्ता म्हणून खातात.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

शेगडीवर कोळश्यात भाजलेली रताळी मस्त लागतात, नसेल तर गॅस आहेच. पण उकळू नका. ती चव येणार नाही.
रताळी काळी झाली तर आतून नैसर्गिक साखर करपून चव छान लागते.

माहितीचा स्रोत: 
पडोस की अस्मा. मूनमून मार्केट मधली रेसीपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिवाळ्यातला आवडता पदार्थ. संध्याकाळी मार्केटात गल्लोगल्ली शक्करकंदी चाटवाले हातगाड्या लावून उभे असतात. Happy

देवकी मस्तच. तुमच्याकडे शेगडी आहे वाचून खूप आवडल.
मुंबईत झवेरी बाजारच्या गल्लीत सुद्धा शेगडीवर भाजून देतात. अजून टेस्ट नाही केल.

बी, मी वरती लिहिले आहे आता.
आणि अलपना ह्यांनी लिहिलयाप्रमाणे, उत्तरभारतात आणि लाहोर वगैरे ठिकाणी मिळतो हा पदार्थ.

सोपा, रुचकर आणि थंडीत खायला मजा येइल असा आहे.

धन्यवाद सर्वांना.

आरती, हो शेगडीवरच भाजून छान लागते. गॅस वर सुद्धा होइल पण केले नाही कधी.

अवन मध्ये सुद्धा होइल बहुधा, मी नाहि केले कधी.

देवीकाताई, हा प्रकार मी वांद्र्याला लघुवाद न्यायालयाच्या (Small Cause Court) बाहेर नेहमी पाहतो. आता जरूर हादडणार.

नरेश माने, वांद्रा कोर्टाजवळ स्कायवॉकच्या शेवटी खाली असतो तो रताळी शेगडीवरुन भाजून देणारा. मी दोन तीनदा तिथून आणून खाल्ली आहेत. तोच म्हणताय का तुम्ही? पण तो फक्त मसाला घालतो त्याच्या तुकड्यांवर. संत्रं, पुदिना व लिंबाचा रस नसतो.

अश्विनी के, तोच म्हणतोय मी. शेगडीवर रताळी नेहमी दिसतात भाजताना कधी खाल्ले नाही हा धागा आला म्हणुन ते काय आहे ते कळले. बाकीचे जिन्नस आपण घरी बनवु शकतो. पण आता कुतुहल चाळवलंय तर हादडणारच.:D

एल्कोमार्केट्च्या आसपास या दिवसात संध्याकाळी हमखास असतो रताळीवाला. कोळशाच्या शेगडीवर रताळी भाजतो. जराजराशी झाली की आतून भाजली जायला शेगडीची निखार्‍याखालची खिडकी उघडून त्यात टाकतो. मस्त खमंग, खरपूस भाजून झाली की वजन करून सोलून त्याचे तुकडे कापून त्यावर मसाला आणि लिंबू पिळून देतो.

याचा श्रीमंत चुलत भाऊ इंदोरच्या सुप्रसिद्ध् सराफ्यात आणि छप्पन बाजारात भेटला. गराडू!

गराडू म्हणजे मराठीत अथवा इंग्रजीत कोणता कंद ते माहित नाही. पण भले मोठे कंद असतात हे. खालच्या फोटोत आहे तो म्हणे लहानच आहे. या कंदाचं बाहेरचं आवरण काढून टाकून त्याचे छोटे चौकोनी तुकडे करतात. मागणीनुसार वजन करून ( १ प्लेट = १०० ग्रॅम) ते तळतात आणि मग एका पातेल्यात काढून घेऊन ते मसाला आणि भरपूर लिंबू रसात घोळावून बोलमधून टुथपिकनं खायला देतात. गरमागरमच खायचे अप्रतिम लागतात!

खालील फोटो छप्पन बाजारातील आहेत.

मी रेसिपी वाचून लिहिणारच होते की किमान त्या चाटच्या गाडीचा तरी फोटो टाका, इतक्यात मामीचे फोटो आलेच! वॉव. तोंपासु!

ते वरचं कंद आहे. इंदोरला खाल्लय.

पण रताळ्याला वेगळी चव असल्याने छान लागतं. कंद ला वेगळी चव तेव्हा दोन्ही वेगळ्या चवीचे मस्त लागतात खायला.

-----------------
बाकी, आठवण काढून दिल्याबद्दल थांकू देवीका. करायला पाहिजे.(शेगडी शोधायला लागेल पासून सुरुवात...)

मस्त आहेत रेसिपीज.
मामी ते फोटो कसले तोंपासु आहेत.
आम्ही पण गोराडू कोनफळ किंवा पर्पल यॅम ला म्हणतो.

शक्करकंदी चाट पुण्यात मिळते का कुठे ? घरी करण्याअगोदर एकदा गाडीवरचे खाऊन बघावे असे वाटतेय.

धन्यवाद सर्वांना.

मामी, हे सुरण आहे. फोटो बद्दल धन्यवाद.

झंपी, बरोबर. कंद म्हणजे सुरण असे काही प्रादेशिक भागात म्हणतात. गुजरात मध्ये सुद्ध कंद म्हणून काही भागात म्हणतात. तर गराडु म्हणजे सुद्धा सुरण. असो.

फोटो वेळ मिळालयावर टाकेन.

रस्त्यावर खाताना, ते सुरण आहे का रताळं हे तपासून खा. कारण सुरणाची अ‍ॅलर्जी असु शकते कोणाला. बाहेर गाडीवर नीट धुवत सुद्धा नाहीत कंद. तेव्हा जपून. Happy

कंद ही एक जनरल टर्म आहे. जमिनीखाली वाढणारं ते कंद / कंदमूळ. आता यात असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत. ते सगळे कंद. पण एक कंद दुसर्‍यापासून वेगळा असू शकतो.

गराडू म्हणजेही सुरण असेल असं वाटत नाही. गराडूचा आकार वेडावाकडा असतो सुरणाचा आकार नेहमी गोलच पाहत आले आहे. पण मलाही नक्की माहित नाही. नेटवर शोधलं तरी सापडलं नाही.

प्राजक्ता, रताळ्याच्या होतील का ते माहित नाही. सुरणाच्या कर. रताळी फारच पिठुळ असतात. सुरणाच्या फोडी खुटखुटीत राहतील.

Pages