देवयानी - कोथरुडमधील एक उत्तम रुग्णालय

Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2015 - 03:42

दिनांक १७ जानेवारी २०१५ रोजी कोथरुडमधील देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक वैद्यकीय शिबीर भरवण्यात आले होते. ह्या शिबीरात तनिष्का ह्या सकाळ पेपर्सने स्थापन केलेल्या महिलांच्या व्यासपीठाशी संलग्न अश्या अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवला. ह्या शिबीरात सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. सकाळ पेपर्सचे श्री डी आर कुलकर्णी (तनिष्का - पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा प्रमुख व प्रमुख उपसंपादक) ह्यांनी ह्या शिबीराचे हेतू विशद केले. त्यानंतर श्री सुतार ह्यांचे भाषण झाले. त्यानंतर देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. श्रीरंग लिमये (अस्थिरोग तज्ञ) ह्यांनी आपले विचार मांडले. तसेच डॉ. स्वप्ना लिमये (स्त्रीरोगतज्ञ) व डॉ. वैशाली पाठक (फिजिशियन) ह्यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती दिली व महिलांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसनही केले. विशेषतः, शिबीराच्या ह्या सत्रात प्रत्येक वयोगटातील महिलेने कोणताही त्रास होत नसतानासुद्धा कोणकोणत्या तपासण्या केल्याच पाहिजेत ही अतिशय महत्वाची माहिती पुरवण्यात आली.

अश्या प्रकारचे उपक्रम अनेक रुग्णालयांमध्ये होत असतात. चांदणी चौक ते वारजे ह्या हायवेलगत, डेक्कन जिमखाना ते कर्वेनगर ह्या भागात व पौड रोड परिसरात अनेक लहानमोठी रुग्णालये आहेत. बहुधा सर्वात मोठे रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे असावे. ह्या रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी रुग्णालय हे नवीन व अद्ययावत रुग्णालय आहे.

देवयानी रुग्णालयाशी सुरुवातीला माझा संबंध आला तो माझ्या सासर्‍यांना अ‍ॅडमीट केले तेव्हा! त्यानंतर माझ्या वडिलांचा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा त्यांच्यावरील शस्त्रक्रिया तेथेच झाली व मध्यंतरी मला स्वतःलाच उच्च रक्तदाबाचा त्रास झाला तेव्हा मीही तेथेच उपचार घेतले. माझ्या सोसायटीत राहणार्‍या एका ४२ वर्षे महिलेला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आम्ही तिला तेथेच अ‍ॅडमीट केले होते. एकदा एका रस्त्यावरील अपघातग्रस्त प्रौढालाही मी तेथे नेलेले होते. गेल्या काही महिन्यांत विविध कारणांनी देवयानी रुग्णालयाशी माझा परिचय होत गेला व त्या रुग्णालयाची खासियत मला अधिकाधिक समजत गेली. किंबहुना, एकापेक्षा अधिक खास बाबी! आजवर मी अनेक रुग्णालयांचे अनुभव घेतलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला देवयानीची काही वैशिष्ट्ये जाणवली ती अशी:

१. कोथरुड हे गेल्या काही वर्षात जणू कायापालट झालेले असे एक उपनगर असून येथे सर्व आर्थिक स्तरातील नागरीक फार मोठ्या प्रमाणावर राहतात. कोथरूडची लोकसंख्या तूर्त सहा ते सात लाखाच्या दरम्यान आहे असे समजते. ह्या भागात असलेल्या रुग्णालयांवर रुग्णांचा बराच भारही पडत आहे व अनेक रुग्णालयांच्या काही ना काही मर्यादाही आहेत, जसे सर्व 'निदान व उपचार यंत्रणा' नसणे, पार्किंग प्लेसचा प्रॉब्लेम, रुग्णाकडे वैयक्तीक लक्ष पुरवले जाणे वगैरे! देवयानी हे रुग्णालय भर डहाणूकर कॉलनीत असून बहुसंख्य कोथरुडकरांसाठी ते कुठूनही दहा ते बारा मिनिटांत पोचण्यासारखे आहे. ह्या रुग्णालयाची स्वतःची पार्किंग प्लेस तर आहेच पण आजूबाजूला सार्वजनिक जागेतही पाकिंग करणे शक्य आहे. देवयानी हे एक अत्याधुनिक रुग्णालय असून तेथे उपलब्ध असलेल्या 'निदान व उप्चार यंत्रणा' तसेच इतर सुविधा आपण वेबसाईटवर पाहू शकताच. इतर कित्येक रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी हे प्रथमदर्शनीच छाप पाडते ते तेथील अत्यंत स्वच्छ इन्टेरियर्समुळे! एखाद्या स्टार हॉटेलसारखी येथील अंतर्गत रचना आहे. एलेव्हेटर्स अत्याधुनिक, पुरेसे व वेगवान आहेत. रिसेप्शन, प्रवेशद्वार, विविध विभाग, चोवीस तास चालू असलेले औषधांचे स्टोअर, अद्ययावत संगणक प्रणाली व अत्यंत मित्रत्वाने वागणारे कर्मचारी हे सगळेच घटक व्यवस्थापनाचा रुग्णाबाबतचा केअरिंग अ‍ॅप्रोच दर्शवतात. इमर्जन्सी सेवेसाठी सर्व कर्मचारी व यंत्रणा त्वरीत कार्यान्वित होतात. मुळात रुग्णालयात येणारा रुग्ण व त्याचे नातेवाईक हे नेहमीच काहीसे भेदरलेले, गोंधळलेले व खर्चाचा आकडा किती असेल ह्या चिंतेत असलेले असतात. अश्या नागरिकांना हमखास दिलासा मिळेल असे वर्तन सर्व कर्मचारी वर्गाचे आहे. भारतासारख्या देशात जेथे कस्टमर ओरिएन्टेशन ही संज्ञा अजून रुजूही शकलेली नाही तेथे ह्या रुग्णालयात अगदी मामा, मावशी हे कर्मचारीसुद्धा रुग्णाशी हसतमुख नाते निर्माण करतात. ह्या सगळ्याच्या मुळाशी डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. श्रीरंग लिमये व डॉ. स्वप्ना लिमये ह्यांची सेवाभावी विचारधारा आहे हे सहज जाणवते. रुग्णालयात अजून स्वतःची केटरिंग व्यवस्था नाही. मात्र त्या परिसरात पन्नास मीटर्सच्या त्रिज्येत आहार, फळे, ज्यूस असे सर्व काही मिळते. माझ्या अनुभवाप्रमाणे येथील चार्जेसही इतर रुग्णालयांइतकेच आहेत.

२. रुग्णालयात भरती होणार रुग्ण व त्याचे नातेवाईक ह्यांची सर्वात मोठी मानसिक गरज म्हणजे 'माझी सर्वांना काळजी आहे' ह्या इच्छेची पूर्तता होणे! देवयानीमध्ये नेमके हेच होते. अनावश्यक व्यावसायिकता न आणता डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठक हे सर्व रुग्णांशी आत्मीयतेचे नाते जोडतात.

३. देवयानीने पुण्यातील एकाहून एक तज्ञ डॉक्टरांना आपल्याशी संलग्न करून घेतलेले असून त्यांच्या नियमीत भेटी तेथे असतात.

४. प्रवेश, भरतीदरम्यानच्या उपचारांचा खर्च, मेडिकल स्टोअरमधील आर्थिक व्यवहार व डिसचार्जच्या वेळच्य अप्रक्रिया अतिशय सुलभपणे पार पडतात.

श्रीमती देवयानी लिमये ह्या स्वतः स्त्रीरोग तज्ञ असून त्या आता ७८ वर्षांच्या आहेत. त्यांनीच स्थापन केलेले हे रुग्णालय आधी त्याच परिसरात थोड्या लहान स्वरुपात होते. आता ते भव्य स्वरुपात पुनर्निर्मीत झालेले असून रुग्णांसाठी अतिशय सहाय्यभूत ठरत आहे. देवयानी रुग्णालयामध्ये इतरही विविध योजना आहेत, स्वतःच्या रुग्णवाहिकाही आहेत. अतिशय मोठ्या रुग्णालयांमधील गोंधळून टाकणारा पसारा आणि अतिशय लहान रुग्णालयांमधील मर्यादीत उपचार ह्या दोघांच्या तुलनेत हे मिडियम साईझ मात्र अत्याधुनिक रुग्णालय निश्चितच खूप सोयीचे आहे.

खाली काही छायाचित्रे देत आहे.

प्रवेशद्वारः

IMG_5207.JPG

रिसेप्शनः

IMG_5204.JPG

इमारतः

IMG_5208.JPG

डॉ. श्रीरंग लिमये शिबीराचे शुभारंभीय भाषण करताना:

IMG_5240.JPG

सकाळचे श्री डी आर कुलकर्णी महिलांना उपक्रमाची माहिती देताना:

IMG_5253.JPG

व्यासपीठावर डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठकः

IMG_5254.JPG

डॉ. स्वप्ना लिमये महिलांना मार्गदर्शन करताना:

IMG_5261.JPG

डॉ. वैशाली पाठक उपस्थित महिलांच्या शंकांची उत्तरे देताना:

IMG-20150117-WA0031.jpg

धन्यवाद!

========================

-'बेफिकीर'!

----------------------------------
मायबोलीच्या धोरणानुसार लेखात काही छोटे बद्ल केले आहेत : वेबमास्तर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफींना आढळलेले अंतिम सत्य...

बेफिकीर 27 June, 2014 - 10:49
डील विथ इटः

दीनानाथमधील दोन न्युरोसर्जन्सच्या कन्सल्टिंग रूम्स शेजारी शेजारी! एकाकडे तुफान गर्दी आणि एकाकडे चिटपाखरू नाही. पहिला ब्राह्मण व दुसरा मराठा!

पुण्यातील यच्चयावत नामांकित डॉक्टर्स ब्राह्मण!

रत्ना मेमोरिअलशी, पूना हॉस्पीटलशी, दीनानाथशी, जोशी हॉस्पीटलशी कनेक्टेड डॉक्टर्सपैकी अगदी सहज ९० टक्के डॉक्टर्स ब्राह्मण!

ब्राह्मणेतर डॉक्टरांचा (माझा वैयक्तीक) अनुभव अत्यंत भिकार!

ब्राह्मणेतर नॉनमेडिकल स्टाफबाबतचा माझा वैयक्तीक अनुभव वाईट! ब्लड घ्यायला नस न सापडण्यापासून ते बेपर्वा वृत्तीपर्यंत काहीही!

ही सर्व विधाने जातीवाचक वाटतील ह्यात शंका नाही. पोस्ट स्वतःच उडवायला मी तयार आहे. पण हे सत्य संकेतस्थळावर पोस्ट उडवून नाकारता येणार नाही.

यावर मी लिहिले होते....

रॉबीनहूड | 27 June, 2014 - 11:10
बेफिकीर तुम्ही डॉक्टरांची जातीनिहाय केलेलवत्वर्गवारी आणि त्यांची गुण वत्तेशी घातलेली सांगड ही माझ्या मते चुकीचीच आहे. पोस्ट उडवायचे कारण नाही. जे मनात आहे ते येऊ द्या. त्यातून मनातले गैरसमजही दूर होतील. पण हार्टच्या बाबतीत पुण्यात प्रत्येकाला डॉ हिरेमठ आणि रणजीत जगतापच का हवे असतात. ? अगदी मायबोलीवरील डॉ शिंदेंचंही उदाहरण देता येईल..की ते केवळ अपवाद आहेत.? पुण्याच्या मूळ सामाजिक सेट अप नुसार पुण्यात ब्राम्हण डॉक्टरांची संख्या मोठी असणे अगदी स्वाभाविक आहे. परन्तु पुणे वगळता इतर मोठी शहरे जसे नाशिक, औ.बाद , सातारा इत्यादी ठिकाणी नॉन ब्राम्हण डॉक्टर आहेत आणि सर्वसाधारण जेवढी व्यवसाय निष्ठा असते तसे ते सेवाही देत आहेतच. आणि पुण्यात कमी दर्जाचे ब्राम्हण डॉक्टर म्नाहीतच की काय? तो त्यांचा वैयक्तिक दुबळे पणा आहे त्याला जात चिकट वून जनरलायझेशन करणे योग्य नाही

यावरून सुरुवात कोठे झाली हे लक्शात यावे....

अच्छा हे स्कोर सेटलिंग चालू आहे होय!
अवांतर- काही लोकांना जात-जात ब्राहमण अब्राह्मण असे खेळ खेळायला फार आवडते.त्यांच्या साठी एक खेळ.
अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही- प्रा प्रतिमा परदेशी

डॉक्टरांची बदनामी न करता उलट प्रोत्साहनपर लिहून त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्याचा बेफिकिर यांचा समाजसेवी उपक्रम आवडला.

लेखातील अनेक वाक्ये फार आवडली. त्यातही बिफ़िकीर यांची ओघवती लेखनशैली साध्यासाध्या गोष्टींना कशी झळाळी देऊन जाते, त्याची प्रचिती येते.
उदा.
"रुग्णालयात अजून स्वतःची केटरिंग व्यवस्था नाही. मात्र त्या परिसरात पन्नास मीटर्सच्या त्रिज्येत आहार, फळे, ज्यूस असे सर्व काही मिळते. माझ्या अनुभवाप्रमाणे येथील चार्जेसही इतर रुग्णालयांइतकेच आहेत."

५० मिटरच्या त्रिज्येतील चार्जेसही इतर रुणालयांइतकेच ठेवण्यापाठी रुग्णालय व्यवस्थापनाची सेवाभावी वृत्तीच असावी, हे जसे हायलाईट केले आहे, तशाच वाखाणण्यासारख्या इतरही बर्‍याच गोष्टी बेफ़िकीर यांच्या लिखाणातून आढळतात.
जसे:
रुग्णालयाची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणतात,
ह्या रुग्णालयाची स्वतःची पार्किंग प्लेस तर आहेच पण आजूबाजूला सार्वजनिक जागेतही पाकिंग करणे शक्य आहे.

एखाद्या स्टार हॉटेलसारखी येथील अंतर्गत रचना आहे. एलेव्हेटर्स अत्याधुनिक, पुरेसे व वेगवान आहेत.

अशी अनेक वाक्ये रुग्णालयाच्या वास्तूची वैशिष्ट्ये हायलाईट करतातच, त्याशिवाय

"भेदरलेल्या रुग्णाला खर्चाचा आकडा सांगून आश्वस्त करणार्‍या कर्मचार्‍यांमुळे व्यवस्थापनाची सेवाभावी वृत्ती दिसते," अशा प्रकारच्या वर्णनांतून व्यवस्थापनाबद्दलचे वर्णन करत ह्यूमन एलिमेंटही हायलाईट करतात.

हे सगळे वाचून लेखकाच्या लेखन- हातोटीबद्दलचा आदर तात्काळ दुणावतो.

***

हुडोबा,
इतरत्र श्री बेफ़िकीर यांनी टाईप केलेल्या त्या" ब्राह्मण डॉक्टरच कसे श्रेष्ठ, त्यांच्या बाजूचे बिगर ब्राह्मण डॉक्टर कशा माश्या मारतात, इतकेच नव्हे तर ब्राह्मण असेल, तर नर्सिंग स्टाफलाही नस ताबडतोब सापडते" इ. प्रतिसादाला तुम्ही इथे उगंच आणलं आहे. एकतर त्यांना काल काय बोललो ते आज लक्षात रहात नाही.
ज्या मायबोलीकरांना डिट्टेलवार वाचायचं असेल, ते http://www.maayboli.com/node/49618?page=4 या लिंकवर जाऊन वाचतीलच की!

असो.

***
पुन्हा एकदा, इतर रुग्णालयांइतकेच चार्जेस असलेल्या या सेवाभावी रुग्णालयाचा विषेश परिचय करून दिल्याबद्दल बेफ़िकीर यांचे अभिनंदन.

अशाच प्रकारच्या (पुण्यातील) इतरही रुग्णालयांची माहीती त्यांनी द्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो.

टीपः
१. वरील प्रतिसाद हा बेफिकीर यांच्या लेखा/लेखनाबद्दल आहे. रुग्णालयाबद्दल नाही, हे कृपया ध्यानी घ्यावे.
२. सकाळच्या माध्यमातून बालाजी तांबेंसारख्या अनेक (सेवाभावी) वैद्यकीय सेवांना (मोफत) हायलाईट केले जाते. तसेच बेफिक़ीर यांनी इथे करण्याचे मनावर घेतले आहे, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
३. जातीयवादी विचारसरणीचा पुरस्कार करणार्‍यांचा निषेध. त्याबद्दलची चर्चा इथे करून रुग्णालयाचे पावित्र्य कमी करू नये ही विनंती.

*
टंकनचुकीची दुरूस्ती:

"भेदरलेल्या रुग्णाला खर्चाचा आकडा सांगून आश्वस्त करणार्‍या कर्मचार्‍यांमुळे व्यवस्थापनाची सेवाभावी वृत्ती दिसते,"
हे वाक्य,
"भेदरलेल्या रुग्णाला हसतमुखाने खर्चाचा आकडा सांगून आश्वस्त करणार्‍या कर्मचार्‍यांमुळे व्यवस्थापनाची सेवाभावी वृत्ती दिसते," असे वाचावे.

क्षमस्व.

दवाखाना व डॉक्टर यांची जाहिरात करणे हा कायद्याने गुन्हा आहे>>>
असा काही कायदा आहे ? Uhoh माहिती नव्हतं, कारण एक चिंचवड मधल्या (पंचतारांकित) इस्पितळाचे होर्डिंग्ज NH4 वर चिंचवड जवळ दिसुन येतात, हल्ली बातम्यांच्या वाहिन्यांवरही अँजीओप्लास्टी, ह्र्दय शस्त्रक्रिया इ. इ. अमुक तमुक रुपयांमध्ये करुन मिळेल हे सरकत्या पट्ट्यांमध्ये दाखवत असतात.
शिवाय वर्तमानपत्रामध्येही अपत्य प्राप्ती साठीच्या रुग्नालयांच्या जाहीराती मुबलक आहेत.
असो... काउंचे धन्यवाद ह्या कायद्याबद्द्ल माहिती दिल्याबद्दल..

इब्लिसांचा प्रतिसाद खरंच सपोर्टिव्ह आहे की तिरका?

एका हॉस्पिटलबद्दल, डॉक्टरांबद्दल सांगितले जाणे याची तुलना
>> २. सकाळच्या माध्यमातून बालाजी तांबेंसारख्या अनेक (सेवाभावी) वैद्यकीय सेवांना (मोफत) हायलाईट केले जाते. तसेच बेफिक़ीर यांनी इथे करण्याचे मनावर घेतले आहे, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन.<<
या वाक्यात कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसताना डॉक्टर म्हणवून घेणार्‍यांशी का केली जातेय?

अस वाटतय की बेफिकीर यांनी जुना मुद्दा पटवण्यासाठी नविन धागा काढला आहे.कीप इट अप. Happy अजुन चांगल्या हॉस्पीटल विषयी माहीती देत जा. अर्थात स्वता: कुठल्याही कारणास्तव अ‍ॅडमिट न होता.

असं का वाटलं अंके? मला तरी तसं काही नाही वाटलं. मला वाटतं इथे सगळ्यांनीच पूर्वग्रह बाजूला ठेवण्याची गरज आहे.

सर्वज्ञ आणि सर्वसाक्षी लोकांनी हॉस्पीटलच्या धाग्यावरही थैमान घातलेले पाहून धन्य जाहलो!

छेछे.
बालाजी तांबेंशी तुलना करण्याचा अजिब्बात हेतू नाही. ते वानगी दाखल नांव घेतले इतकेच.
मी आधीच क्लिअर केले आहे की प्रतिसाद लेखाबद्दल आहे, दवाखाण्याबद्दल नाही.
सकाळच्या तनिष्का मधून या उपक्रमास हायलाईट केल्याचे बेफिंनी लिहिलेच आहे. तेच मी सांगतो आहे, की ज्याप्रकारे सकाळचे आरोग्य पुरवणी प्रतिनिधी तिथे काम करतात, तसेच काम बेफ़िकीर इथे करीत आहेत.

स्वतःची ओळख बुरख्याआड लपवण्याचा भेकड शेळपटपणा न करता प्रतिसाद देण्याला हिम्मत लागते.

काही लोक कधीकधी स्वतःच्या आयडीनेही प्रतिसाद देतात हे पाहून धन्य झालो. <<
हे मला म्हणत असाल तर...
मी कायमच माझ्याच आयडीने प्रतिसाद देते. माझा कुठलाही डुप्लिकेट आयडी नाही.

नीधप, तुम्हाला उद्देशून अजीबात म्हटले नव्हते.
हे मी गगोवरच्या सन्माननीय सदस्यांबद्दल म्हणतो आहे. मिरची योग्यजागी पोहोचली ते दिसतेच आहे. नाही का?

@ADMIN हे असे प्रचारकी धागे काढून मायबोलीचे उत्पन्न बुडवलेले चालत असेल तर असे "माहितीपुर्ण(?)" धागे अनेकजण काढतील.
कृपया हा धागा डीलीट करा.

मला वाटतं इथे सगळ्यांनीच पूर्वग्रह बाजूला ठेवण्याची गरज आहे>> + १००..पण तस होतच नाही ना.. आनि आता मला तस वाटल त्याला मी काय करणार.जे वाटल ते लिहल.

मा. अ‍ॅडमिन,
यांच्या शूरवीरपणाला उत्तर देत आहे, कृपया माफ करावे.
अ‍ॅडव्हान्स्ड धन्यवाद.

***

भेकड शेळपटपणा न करता प्रतिसाद देण्याला हिम्मत लागते.
<<
कसली घंट्याची हिम्मत?
माझा नांव नंबर पत्ता तुम्हाला दिला, तरी माझे काहीही वाकडे करण्याची तुमच्यात व तुमच्या 'मित्रांत' हिम्मत वा कपॅसिटी नाही.
फुकट धमक्या देत जाऊ नका. तसले उद्योग करायला डूआयड्या वापरत जा.

आधी स्वतःचं साधं नाव सांगा आणि ते जमत नसेल तर फुकटचे तमाशे करु नका.

एनी वे! वन्स अ‍ॅन्ड फॉर ऑल - इग्नोर.

कुणी कुणाचे वाकडे करु इच्छित असेल असे वाटत नाही इथे मायबोलीवर तरी असे आमचे निरिक्षण आहे. तथापि, स्वतः नाव, नंबर, पत्ता आदि तपशील लपवायचे आणि इतरांना विविध मार्गान्नी व आयडीन्नी खोडसाळपणा करुन उपद्रव द्यावयाचा हा अजब प्रकार आहे. तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे.

आधी स्वतःचं साधं नाव सांगा आणि ते जमत नसेल तर फुकटचे तमाशे करु नका.
<<

Lol

आरसा आहे का घरी, 'स्पार्टाकस'??

आम्हाला मज्जा येते ब्वा फुकटचे तमाशे पहायला. भरपूर रिकामा वेळ असतो आमच्याकडे. बाकी तुमचं कसं काय, सुरू? रात्र फार झाली असेल ना आतापर्यंत? थंड वारंही सुटलं असेल? असो.

बेफिंना पुन्हा एकदा शुभेच्छा, व अभिनंदन.

हा मी निघालो जेवायला.

Pages