देवयानी - कोथरुडमधील एक उत्तम रुग्णालय

Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2015 - 03:42

दिनांक १७ जानेवारी २०१५ रोजी कोथरुडमधील देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक वैद्यकीय शिबीर भरवण्यात आले होते. ह्या शिबीरात तनिष्का ह्या सकाळ पेपर्सने स्थापन केलेल्या महिलांच्या व्यासपीठाशी संलग्न अश्या अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवला. ह्या शिबीरात सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. सकाळ पेपर्सचे श्री डी आर कुलकर्णी (तनिष्का - पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा प्रमुख व प्रमुख उपसंपादक) ह्यांनी ह्या शिबीराचे हेतू विशद केले. त्यानंतर श्री सुतार ह्यांचे भाषण झाले. त्यानंतर देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. श्रीरंग लिमये (अस्थिरोग तज्ञ) ह्यांनी आपले विचार मांडले. तसेच डॉ. स्वप्ना लिमये (स्त्रीरोगतज्ञ) व डॉ. वैशाली पाठक (फिजिशियन) ह्यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती दिली व महिलांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसनही केले. विशेषतः, शिबीराच्या ह्या सत्रात प्रत्येक वयोगटातील महिलेने कोणताही त्रास होत नसतानासुद्धा कोणकोणत्या तपासण्या केल्याच पाहिजेत ही अतिशय महत्वाची माहिती पुरवण्यात आली.

अश्या प्रकारचे उपक्रम अनेक रुग्णालयांमध्ये होत असतात. चांदणी चौक ते वारजे ह्या हायवेलगत, डेक्कन जिमखाना ते कर्वेनगर ह्या भागात व पौड रोड परिसरात अनेक लहानमोठी रुग्णालये आहेत. बहुधा सर्वात मोठे रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे असावे. ह्या रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी रुग्णालय हे नवीन व अद्ययावत रुग्णालय आहे.

देवयानी रुग्णालयाशी सुरुवातीला माझा संबंध आला तो माझ्या सासर्‍यांना अ‍ॅडमीट केले तेव्हा! त्यानंतर माझ्या वडिलांचा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा त्यांच्यावरील शस्त्रक्रिया तेथेच झाली व मध्यंतरी मला स्वतःलाच उच्च रक्तदाबाचा त्रास झाला तेव्हा मीही तेथेच उपचार घेतले. माझ्या सोसायटीत राहणार्‍या एका ४२ वर्षे महिलेला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आम्ही तिला तेथेच अ‍ॅडमीट केले होते. एकदा एका रस्त्यावरील अपघातग्रस्त प्रौढालाही मी तेथे नेलेले होते. गेल्या काही महिन्यांत विविध कारणांनी देवयानी रुग्णालयाशी माझा परिचय होत गेला व त्या रुग्णालयाची खासियत मला अधिकाधिक समजत गेली. किंबहुना, एकापेक्षा अधिक खास बाबी! आजवर मी अनेक रुग्णालयांचे अनुभव घेतलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला देवयानीची काही वैशिष्ट्ये जाणवली ती अशी:

१. कोथरुड हे गेल्या काही वर्षात जणू कायापालट झालेले असे एक उपनगर असून येथे सर्व आर्थिक स्तरातील नागरीक फार मोठ्या प्रमाणावर राहतात. कोथरूडची लोकसंख्या तूर्त सहा ते सात लाखाच्या दरम्यान आहे असे समजते. ह्या भागात असलेल्या रुग्णालयांवर रुग्णांचा बराच भारही पडत आहे व अनेक रुग्णालयांच्या काही ना काही मर्यादाही आहेत, जसे सर्व 'निदान व उपचार यंत्रणा' नसणे, पार्किंग प्लेसचा प्रॉब्लेम, रुग्णाकडे वैयक्तीक लक्ष पुरवले जाणे वगैरे! देवयानी हे रुग्णालय भर डहाणूकर कॉलनीत असून बहुसंख्य कोथरुडकरांसाठी ते कुठूनही दहा ते बारा मिनिटांत पोचण्यासारखे आहे. ह्या रुग्णालयाची स्वतःची पार्किंग प्लेस तर आहेच पण आजूबाजूला सार्वजनिक जागेतही पाकिंग करणे शक्य आहे. देवयानी हे एक अत्याधुनिक रुग्णालय असून तेथे उपलब्ध असलेल्या 'निदान व उप्चार यंत्रणा' तसेच इतर सुविधा आपण वेबसाईटवर पाहू शकताच. इतर कित्येक रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी हे प्रथमदर्शनीच छाप पाडते ते तेथील अत्यंत स्वच्छ इन्टेरियर्समुळे! एखाद्या स्टार हॉटेलसारखी येथील अंतर्गत रचना आहे. एलेव्हेटर्स अत्याधुनिक, पुरेसे व वेगवान आहेत. रिसेप्शन, प्रवेशद्वार, विविध विभाग, चोवीस तास चालू असलेले औषधांचे स्टोअर, अद्ययावत संगणक प्रणाली व अत्यंत मित्रत्वाने वागणारे कर्मचारी हे सगळेच घटक व्यवस्थापनाचा रुग्णाबाबतचा केअरिंग अ‍ॅप्रोच दर्शवतात. इमर्जन्सी सेवेसाठी सर्व कर्मचारी व यंत्रणा त्वरीत कार्यान्वित होतात. मुळात रुग्णालयात येणारा रुग्ण व त्याचे नातेवाईक हे नेहमीच काहीसे भेदरलेले, गोंधळलेले व खर्चाचा आकडा किती असेल ह्या चिंतेत असलेले असतात. अश्या नागरिकांना हमखास दिलासा मिळेल असे वर्तन सर्व कर्मचारी वर्गाचे आहे. भारतासारख्या देशात जेथे कस्टमर ओरिएन्टेशन ही संज्ञा अजून रुजूही शकलेली नाही तेथे ह्या रुग्णालयात अगदी मामा, मावशी हे कर्मचारीसुद्धा रुग्णाशी हसतमुख नाते निर्माण करतात. ह्या सगळ्याच्या मुळाशी डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. श्रीरंग लिमये व डॉ. स्वप्ना लिमये ह्यांची सेवाभावी विचारधारा आहे हे सहज जाणवते. रुग्णालयात अजून स्वतःची केटरिंग व्यवस्था नाही. मात्र त्या परिसरात पन्नास मीटर्सच्या त्रिज्येत आहार, फळे, ज्यूस असे सर्व काही मिळते. माझ्या अनुभवाप्रमाणे येथील चार्जेसही इतर रुग्णालयांइतकेच आहेत.

२. रुग्णालयात भरती होणार रुग्ण व त्याचे नातेवाईक ह्यांची सर्वात मोठी मानसिक गरज म्हणजे 'माझी सर्वांना काळजी आहे' ह्या इच्छेची पूर्तता होणे! देवयानीमध्ये नेमके हेच होते. अनावश्यक व्यावसायिकता न आणता डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठक हे सर्व रुग्णांशी आत्मीयतेचे नाते जोडतात.

३. देवयानीने पुण्यातील एकाहून एक तज्ञ डॉक्टरांना आपल्याशी संलग्न करून घेतलेले असून त्यांच्या नियमीत भेटी तेथे असतात.

४. प्रवेश, भरतीदरम्यानच्या उपचारांचा खर्च, मेडिकल स्टोअरमधील आर्थिक व्यवहार व डिसचार्जच्या वेळच्य अप्रक्रिया अतिशय सुलभपणे पार पडतात.

श्रीमती देवयानी लिमये ह्या स्वतः स्त्रीरोग तज्ञ असून त्या आता ७८ वर्षांच्या आहेत. त्यांनीच स्थापन केलेले हे रुग्णालय आधी त्याच परिसरात थोड्या लहान स्वरुपात होते. आता ते भव्य स्वरुपात पुनर्निर्मीत झालेले असून रुग्णांसाठी अतिशय सहाय्यभूत ठरत आहे. देवयानी रुग्णालयामध्ये इतरही विविध योजना आहेत, स्वतःच्या रुग्णवाहिकाही आहेत. अतिशय मोठ्या रुग्णालयांमधील गोंधळून टाकणारा पसारा आणि अतिशय लहान रुग्णालयांमधील मर्यादीत उपचार ह्या दोघांच्या तुलनेत हे मिडियम साईझ मात्र अत्याधुनिक रुग्णालय निश्चितच खूप सोयीचे आहे.

खाली काही छायाचित्रे देत आहे.

प्रवेशद्वारः

IMG_5207.JPG

रिसेप्शनः

IMG_5204.JPG

इमारतः

IMG_5208.JPG

डॉ. श्रीरंग लिमये शिबीराचे शुभारंभीय भाषण करताना:

IMG_5240.JPG

सकाळचे श्री डी आर कुलकर्णी महिलांना उपक्रमाची माहिती देताना:

IMG_5253.JPG

व्यासपीठावर डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठकः

IMG_5254.JPG

डॉ. स्वप्ना लिमये महिलांना मार्गदर्शन करताना:

IMG_5261.JPG

डॉ. वैशाली पाठक उपस्थित महिलांच्या शंकांची उत्तरे देताना:

IMG-20150117-WA0031.jpg

धन्यवाद!

========================

-'बेफिकीर'!

----------------------------------
मायबोलीच्या धोरणानुसार लेखात काही छोटे बद्ल केले आहेत : वेबमास्तर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि धन्यवाद.
तो माझा नीच प्रतिसाद म्हणजे मी तुमच्याच लेखातून डकवलेला भाग होता हे पुन्हा सांगतो

>>> इब्लिस | 19 January, 2015 - 21:33 नवीन

बेफि धन्यवाद.
तो माझा नीच प्रतिसाद म्हणजे मी तुमच्याच लेखातून डकवलेला भाग होता हे पुन्हा सांगतो
<<<

अज्जिबातच नाही इब्लिस!

तो प्रतिसाद तुम्ही एका अत्यंत असंबद्ध धाग्यावर दिलेला होतात.

'हे असे असे लिहिले की झाली गझल, आहे काय मराठी गझलेत' असे तुम्ही लिहिले होतेत.

>>> इब्लिस | 19 January, 2015 - 21:39 नवीन

इथे नको. धाग्याची पीडीएफ मेल करतो
<<<

ह्यातील 'इथे नको' ही पॉलिसी ९४ प्रतिसादांमध्ये कित्येकवेळा अंगिकारता आली असती नाही का?

अवश्य द्या. फक्त इथे तो एक असंबद्ध प्रतिसाद असेल. तुम्हाला मुद्दा समजून घ्यायचा नाही आहे असे दिसते.

पीडीएफ सेपरेटली पाठवतो, 'इथे नको', ह्यातील 'इथे नको'बाबत मी बोललो आहे की 'इथे नको' ह्या कॅटेगरीतील अनेक गोष्टी तुमच्यातर्फे व इतरांतर्फे आधीच इथे येऊन गेलेल्या आहेत व तेव्हा हे समजले नव्हते का!

तुम्ही कुठेही एस एस द्या! मला जे म्हणायचे आहे ते मी आधीच म्हणालेलो आहे.

Happy

रॉहू,
तो धागा आणि त्यावरचे प्रतिसाद मी वाचलेले नव्हते. माझ्यासारखे अनेक वाचक असतील ज्यांनी ते वाचलेलं नसेल. त्यामुळे तुम्हांला जर त्या संदर्भात लिहायचं होतं तर संदर्भ देऊन लिहिलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे मी प्रतिसाद लिहायच्या फंदात पडलो नसतो. मुळात झालं असं की ते वाक्य तुमच्या कडून आलेलं पाहून जास्त आश्चर्य वाटलं म्हणून मी लिहिलं. आधीचा काही संदर्भ नसल्याने मला तरी हा लेख प्रचारकी थाटात लिहिलेला वाटला नाही.
असो.

>>>आधीचा काही संदर्भ नसल्याने मला तरी हा लेख प्रचारकी थाटात लिहिलेला वाटला नाही.<<<

प्रचारकी थाटात लिहिलेला नाहीच आहे.

(मायबोलीवर पालकदत्त नामाने न वावरता वेगळेच सदस्यनाम घेणार्‍या सदस्यांनी आपण डॉक्टर आहोत हे जाहीर करणे हे जाहिरातीत मोडते का?)

अपवाद - डॉ. कैलास गायकवाड आणी डॉ. ज्ञानेश पाटील

अवांतर :

लोकहो,

एका कृत्याबद्दल माझं एक सदस्यनाम रहित झालं होतं. त्यात श्री इब्लिस यांनी पुढाकार घेतला होता.

ib_complaint.jpg

या पार्श्वभूमीवर श्री इब्लिस यांचा रिकाम#ट हा शब्द कसा वाटतो ते आपण ठरवावं. मला जालमास्तरांकडे तक्रार करायची नाही.

आ.न.,
-गा.पै.

@ बेफीकीर जी.
___/\___तुमच्या सयंंमाबद्दल.

बेफिकीर,

दगडावर डोकं आपटलं तर आपलं डोकं फुटतं, दगडाला काहीही फरक पडत नाही.
तुम्ही तुमचं डोकं फोडून घेऊ नका ही विनंती.

http://www.maayboli.com/node/35415?page=2

या धाग्यावर एका प्रतिसादात बेफिकिर्भौ बोलतात ..


आमीर खानने रडणे नाटकी वाटले. मुळात हे करताना त्याने मुस्लिम कुटुंबियांना बोलावणे यात मला तरी एक उगाचच छुपा अजेंडा वाटला.

एखाद्या धर्माचा प्रभाव पाडणे ही कामे अशीच, अत्यंत नकळतपणे आणि तरीही प्रभावीपणे होत असतात हे काही सिरिअल्स, पुस्तके वगैरे पाहून ज्ञात झालेले आहे म्हणून वरील वाक्य

......

हाच आरोप बेफिकिरभौवर केला तर ती मात्र ब्रह्महत्या ठरते !

Proud

बेफ़िकीर,

"The right sort of people do not want apologies, and the wrong sort take a mean
advantage of them." ― P.G. Wodehouse.

ज्यांना इथे जाहीरात होतेय असा आक्षेपआहे त्यांनी स्वतःच्या हॉस्पीटलची माहीती देणारा धागा काढावा. त्यात हॉस्पीटलचे नाव, गाव पत्ता, स्वतःचे नाव, फोटो हे दिलं तरी चालेल. विनाकारण एखाद्याचे शब्द दुस-याला चिकटवत बसण्यापेक्षा हे जास्त सकारात्मक राहील.

( माझ्याबद्दल संशय व्यक्त करायचा असेल तर मला काही फरक पडत नाही. पण विनाकारण इतरांची नावं घेऊन त्यांना माझ्यामुळे त्रास होऊ नये ही इच्छा !)

इथे तर धमाल चालू आहे, शिर्षकाने फसवले .. >>>>>

तुमच्या कडुन बेफींनी शिकायला पाहीजे की शिर्षक कसे द्यायचे की लोक धाग्यावर आलीच पाहीजेत.

तुम्ही अजुनही दारुच्या धाग्यावरच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.

चांगल असणे आणि चांगले असल्याचे दाखवणे यातला फरक काही लोकांना कळतो व काहिंना कळत नाही.

बेफिकीर,
उत्तम आणि माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

तुम्ही या लेखात तुमचे व्यक्तिगत मत (ब्राम्हण वैद्यकिय व्यावसायिक हे ब्राम्हणेतरांपेक्षा उजवे असतात) प्रकट केले नाही (जे तुम्ही अगदी हिरीरीने मागे एका धाग्यावर मांडत होता) ते खूप उत्तम. नाहीतर लोकांनी उगीचच तुमच्या हेतूविषयी शंका घेतली असती.

कोरा.

धन्यवाद!

तिकडचे रेफरन्सेस इकडे देताना सर्व पार्श्वभूमीसकट द्यायला पाहिजेत. सिलेक्टिव्ह पॅराज पेस्ट करून झेंडे मिरवण्यात अर्थ नाही. पण लोकांनी मात्र ते इथेही केले. म्हणजे उदाहरणार्थ, मी तिथे जे बोललो ते समजा न पटल्याने तिथे करायचा तो विरोध केलाच, वर ह्या धाग्यावरही तोच विरोध काहीही कारण नसताना सुरू केला. हे शुद्ध आकस असण्याचेच लक्षण आहे. कधी एकदा भडास काढता येतीय ह्या पाळतीवर असल्याप्रमाणे काही सदस्य वागलेले आहेत. वेबमास्तरांनी लेख अ‍ॅप्रूव्ह करून त्या सर्वांना गप्प केलेले आहेच. तेव्हा ह्याउप्पर बोलणे नको.

(वेबमास्तरांनी काय बदलले आहे ते मला माहीत आहे)

तुम्ही अजुनही दारुच्या धाग्यावरच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत.
>>>>
तिथला प्रश्न तिथेच विचारा हो, इथे आता सहज चक्कर टाकली म्हणून समजले, आज रात्री वेळ मिळाला तर देणार उतरे पण देणार हे नक्की, कारण मी एंजॉय करतो अश्या प्रश्नांची उत्तरे देणे.
अवांतराबद्दल क्षमस्व. Happy

ह्या धाग्यावर दिसून येईल की किती नीच पातळीला जाऊन विचार पोचलेले आहेत. पण तरीही धागा वर आणण्याचे कारण इतकेच की बी ह्यांच्या ५७६६४ शी ह्याचा थोडाफार संबंध आहे.

Pages