देवयानी - कोथरुडमधील एक उत्तम रुग्णालय

Submitted by बेफ़िकीर on 18 January, 2015 - 03:42

दिनांक १७ जानेवारी २०१५ रोजी कोथरुडमधील देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक वैद्यकीय शिबीर भरवण्यात आले होते. ह्या शिबीरात तनिष्का ह्या सकाळ पेपर्सने स्थापन केलेल्या महिलांच्या व्यासपीठाशी संलग्न अश्या अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवला. ह्या शिबीरात सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. सकाळ पेपर्सचे श्री डी आर कुलकर्णी (तनिष्का - पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा प्रमुख व प्रमुख उपसंपादक) ह्यांनी ह्या शिबीराचे हेतू विशद केले. त्यानंतर श्री सुतार ह्यांचे भाषण झाले. त्यानंतर देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. श्रीरंग लिमये (अस्थिरोग तज्ञ) ह्यांनी आपले विचार मांडले. तसेच डॉ. स्वप्ना लिमये (स्त्रीरोगतज्ञ) व डॉ. वैशाली पाठक (फिजिशियन) ह्यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती दिली व महिलांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसनही केले. विशेषतः, शिबीराच्या ह्या सत्रात प्रत्येक वयोगटातील महिलेने कोणताही त्रास होत नसतानासुद्धा कोणकोणत्या तपासण्या केल्याच पाहिजेत ही अतिशय महत्वाची माहिती पुरवण्यात आली.

अश्या प्रकारचे उपक्रम अनेक रुग्णालयांमध्ये होत असतात. चांदणी चौक ते वारजे ह्या हायवेलगत, डेक्कन जिमखाना ते कर्वेनगर ह्या भागात व पौड रोड परिसरात अनेक लहानमोठी रुग्णालये आहेत. बहुधा सर्वात मोठे रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे असावे. ह्या रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी रुग्णालय हे नवीन व अद्ययावत रुग्णालय आहे.

देवयानी रुग्णालयाशी सुरुवातीला माझा संबंध आला तो माझ्या सासर्‍यांना अ‍ॅडमीट केले तेव्हा! त्यानंतर माझ्या वडिलांचा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा त्यांच्यावरील शस्त्रक्रिया तेथेच झाली व मध्यंतरी मला स्वतःलाच उच्च रक्तदाबाचा त्रास झाला तेव्हा मीही तेथेच उपचार घेतले. माझ्या सोसायटीत राहणार्‍या एका ४२ वर्षे महिलेला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आम्ही तिला तेथेच अ‍ॅडमीट केले होते. एकदा एका रस्त्यावरील अपघातग्रस्त प्रौढालाही मी तेथे नेलेले होते. गेल्या काही महिन्यांत विविध कारणांनी देवयानी रुग्णालयाशी माझा परिचय होत गेला व त्या रुग्णालयाची खासियत मला अधिकाधिक समजत गेली. किंबहुना, एकापेक्षा अधिक खास बाबी! आजवर मी अनेक रुग्णालयांचे अनुभव घेतलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला देवयानीची काही वैशिष्ट्ये जाणवली ती अशी:

१. कोथरुड हे गेल्या काही वर्षात जणू कायापालट झालेले असे एक उपनगर असून येथे सर्व आर्थिक स्तरातील नागरीक फार मोठ्या प्रमाणावर राहतात. कोथरूडची लोकसंख्या तूर्त सहा ते सात लाखाच्या दरम्यान आहे असे समजते. ह्या भागात असलेल्या रुग्णालयांवर रुग्णांचा बराच भारही पडत आहे व अनेक रुग्णालयांच्या काही ना काही मर्यादाही आहेत, जसे सर्व 'निदान व उपचार यंत्रणा' नसणे, पार्किंग प्लेसचा प्रॉब्लेम, रुग्णाकडे वैयक्तीक लक्ष पुरवले जाणे वगैरे! देवयानी हे रुग्णालय भर डहाणूकर कॉलनीत असून बहुसंख्य कोथरुडकरांसाठी ते कुठूनही दहा ते बारा मिनिटांत पोचण्यासारखे आहे. ह्या रुग्णालयाची स्वतःची पार्किंग प्लेस तर आहेच पण आजूबाजूला सार्वजनिक जागेतही पाकिंग करणे शक्य आहे. देवयानी हे एक अत्याधुनिक रुग्णालय असून तेथे उपलब्ध असलेल्या 'निदान व उप्चार यंत्रणा' तसेच इतर सुविधा आपण वेबसाईटवर पाहू शकताच. इतर कित्येक रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी हे प्रथमदर्शनीच छाप पाडते ते तेथील अत्यंत स्वच्छ इन्टेरियर्समुळे! एखाद्या स्टार हॉटेलसारखी येथील अंतर्गत रचना आहे. एलेव्हेटर्स अत्याधुनिक, पुरेसे व वेगवान आहेत. रिसेप्शन, प्रवेशद्वार, विविध विभाग, चोवीस तास चालू असलेले औषधांचे स्टोअर, अद्ययावत संगणक प्रणाली व अत्यंत मित्रत्वाने वागणारे कर्मचारी हे सगळेच घटक व्यवस्थापनाचा रुग्णाबाबतचा केअरिंग अ‍ॅप्रोच दर्शवतात. इमर्जन्सी सेवेसाठी सर्व कर्मचारी व यंत्रणा त्वरीत कार्यान्वित होतात. मुळात रुग्णालयात येणारा रुग्ण व त्याचे नातेवाईक हे नेहमीच काहीसे भेदरलेले, गोंधळलेले व खर्चाचा आकडा किती असेल ह्या चिंतेत असलेले असतात. अश्या नागरिकांना हमखास दिलासा मिळेल असे वर्तन सर्व कर्मचारी वर्गाचे आहे. भारतासारख्या देशात जेथे कस्टमर ओरिएन्टेशन ही संज्ञा अजून रुजूही शकलेली नाही तेथे ह्या रुग्णालयात अगदी मामा, मावशी हे कर्मचारीसुद्धा रुग्णाशी हसतमुख नाते निर्माण करतात. ह्या सगळ्याच्या मुळाशी डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. श्रीरंग लिमये व डॉ. स्वप्ना लिमये ह्यांची सेवाभावी विचारधारा आहे हे सहज जाणवते. रुग्णालयात अजून स्वतःची केटरिंग व्यवस्था नाही. मात्र त्या परिसरात पन्नास मीटर्सच्या त्रिज्येत आहार, फळे, ज्यूस असे सर्व काही मिळते. माझ्या अनुभवाप्रमाणे येथील चार्जेसही इतर रुग्णालयांइतकेच आहेत.

२. रुग्णालयात भरती होणार रुग्ण व त्याचे नातेवाईक ह्यांची सर्वात मोठी मानसिक गरज म्हणजे 'माझी सर्वांना काळजी आहे' ह्या इच्छेची पूर्तता होणे! देवयानीमध्ये नेमके हेच होते. अनावश्यक व्यावसायिकता न आणता डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठक हे सर्व रुग्णांशी आत्मीयतेचे नाते जोडतात.

३. देवयानीने पुण्यातील एकाहून एक तज्ञ डॉक्टरांना आपल्याशी संलग्न करून घेतलेले असून त्यांच्या नियमीत भेटी तेथे असतात.

४. प्रवेश, भरतीदरम्यानच्या उपचारांचा खर्च, मेडिकल स्टोअरमधील आर्थिक व्यवहार व डिसचार्जच्या वेळच्य अप्रक्रिया अतिशय सुलभपणे पार पडतात.

श्रीमती देवयानी लिमये ह्या स्वतः स्त्रीरोग तज्ञ असून त्या आता ७८ वर्षांच्या आहेत. त्यांनीच स्थापन केलेले हे रुग्णालय आधी त्याच परिसरात थोड्या लहान स्वरुपात होते. आता ते भव्य स्वरुपात पुनर्निर्मीत झालेले असून रुग्णांसाठी अतिशय सहाय्यभूत ठरत आहे. देवयानी रुग्णालयामध्ये इतरही विविध योजना आहेत, स्वतःच्या रुग्णवाहिकाही आहेत. अतिशय मोठ्या रुग्णालयांमधील गोंधळून टाकणारा पसारा आणि अतिशय लहान रुग्णालयांमधील मर्यादीत उपचार ह्या दोघांच्या तुलनेत हे मिडियम साईझ मात्र अत्याधुनिक रुग्णालय निश्चितच खूप सोयीचे आहे.

खाली काही छायाचित्रे देत आहे.

प्रवेशद्वारः

IMG_5207.JPG

रिसेप्शनः

IMG_5204.JPG

इमारतः

IMG_5208.JPG

डॉ. श्रीरंग लिमये शिबीराचे शुभारंभीय भाषण करताना:

IMG_5240.JPG

सकाळचे श्री डी आर कुलकर्णी महिलांना उपक्रमाची माहिती देताना:

IMG_5253.JPG

व्यासपीठावर डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठकः

IMG_5254.JPG

डॉ. स्वप्ना लिमये महिलांना मार्गदर्शन करताना:

IMG_5261.JPG

डॉ. वैशाली पाठक उपस्थित महिलांच्या शंकांची उत्तरे देताना:

IMG-20150117-WA0031.jpg

धन्यवाद!

========================

-'बेफिकीर'!

----------------------------------
मायबोलीच्या धोरणानुसार लेखात काही छोटे बद्ल केले आहेत : वेबमास्तर

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! अतिशय उपयुक्त लेख !

घराजवळच्या एखाद्या अशा सुसज्ज होस्पिटलची माहिती असणे अनिवार्य होवून बसले आहे आजकाल.

धन्यवाद !

हल्ली रुग्णालय म्हणजे रुग्णांचा खाटिकखाना अशीच प्रतिमा तयार होउ लागली आहे. त्यातून अशी पॉश दिसणारी हॉस्पिटल्स म्हणजे संशयाला वाव. या पार्श्वभूमीवर सुखद परिचय झाला.

बेफीकीर कशासाठी जाहिरातबाजी करताय ?मायबोलीच्या टर्म्समध्ये हे बसत नाही.
@admin मायबोलीचे उत्पन्न बुडवणारे हे धागे बंद करा, मायबोलीला फुकट बॅण्डविड्थ मिळत असेल तर चालु द्या.

इथे जातीचा काय संबंध? कुठला ही विषय जातीवर आणुन ठेवायचा ही मानसिकता जातीअंताच्या दिशेने जाणार्‍या लढ्यातील मोठा अडसर आहे.
अवांतर- समजा ही जाहिरात आहे असे जरी मानले तरी यामुळे बेफी यांना तिथे काय फुकट उपचार मिळणार आहेत काय?

बेफिंच्या चांगल्या रुग्णालयाच्या व्याखेत ते येते. म्हणून पडताळा घेतला.... बरोबर निघाले (च)

माहीती उत्तम आहे. हेतु स्वच्छ असला/असावा तरी एका खाजगी रुग्णालयाची अशी माहीती देणे या जाहीरात करणे मायबोलीवर करता येते.? Uhoh

बेफी,

अत्यंत महत्वाची माहिती दिलीत, एखाद्याला हार्ट अ‍ॅटॅक आला असताना जवळ कुठल चांगल हॉस्पिटल आहे हे माहिती असण जास्त महत्वाच !! अशी माहिती हाताशी असण केव्हांही चांगल !!

तिथे विशिष्ट जातीचे डॉक्तर असणार म्हनजे. दीनानाथ सारखे ! >>>>> अत्यंत disgusting प्रतिसाद.. ते ही रॉहुसारख्या (सो कॉल्ड) सेन्सिबल आयडीकडून.. लेख आणि आधीचे प्रतिसाद वाचताना हा असला अँगल डोक्यातही नव्हता आला. दुसर्‍यांना जातियवादी म्हणताना स्वतःचेही डोकेही त्याच मार्गाने विचार करते.. खुलेआम लिहून टाका ना.. उगीच विशिष्ट जात वगैरे कशाला?
रॉहू, तुम्ही जात बघून डॉक्टर निवडता का? की तुमच्यावर कधी काही बाका प्रसंग आला (जिवनमरणाची लढाई वगैरे) तर डॉक्टरांची जात बघून उपचार करून घेणार आहात ?

रूग्णालयाची जाहिरात करावी की नाही ह्याबद्दल मला काही म्हणयाचं नाही.. पण अगदीच रहावलं नाही म्हणून लिहिलं...

पराग , तुम्हाला बेफिकीर यानी दुसर्‍या ठिकाणी याबद्दल काय लिहिले होते याबद्दल कल्पना नसावी. अनुभव सांगायला हरकत नाही. पन हेतूबद्दल नक्कीच शंका आहे. ज्या पद्धतीने 'सचित्र' अनुभव दिलेत त्या. लेखक मजकूर देखील डॉक्टर कडे जाताना डॉक्टरची ' तपासणी ' करूनच जातात असे त्यानीच इतरत्र लिहिले आहे ' काहीतरी ' दीनानाथ' मधल्या डोक्तरांचा विशय होता .मी क्स्क्रीन शॉट ठेवत नाही पण ' विरोधी पक्ष नेते ' इब्लिस यांचे कडे असतीलही.... तिकडे यावर प्रचंड वाद झाला होता आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला आहे तोच तिथे उपस्थित झाला होता आणि त्यावर पुष्कळ गुर्हाळ झाले आहे. बेफिकीर लेखक म्हणून ग्रेट आहेत . पण राजकारणात उतरल्यावर ते गैर्लागू आहे.

इथे बर्‍याचदा वैद्यकीय व्यावसायिकांबद्दल अनुभव अथवा पत्ते विचारले जातात ते दिलेही जातात त्यात गैर काहीच नाही उलट ते मार्गदर्शक ठरते आणि उपयुक्तही आहे. अगदी कोथरुडात एक चांगले रुग्नालय सुरु झाले आहे तिथे अशा अशा सोई आहेत मला चांगला अनुभव आला एवढ्यापुरते ठीक राहिले असते .पण हे काही 'वेगळेच' आहे असे वाटत नाही का? 'प्रचारका' च्या भूमिकेतून तर अधिकच वेगळे

बहुजन समाजातिल लोक जात व अडनाव बघुन कधिच डॉक्टर कडे जात नाहित पण विशिष्ट जातितील लोक नक्किच जात व अडनाव बघुन डॉक्टर कडे जातात हे १००% खरे आहे.

अवांतर- समजा ही जाहिरात आहे असे जरी मानले तरी यामुळे बेफी यांना तिथे काय फुकट उपचार मिळणार आहेत काय?>>>>तसेही असु शकते शक्यता नाकारता येत नाही.

उपयुक्त माहिती सर! हे देवयानी आधी डहाणुकर सर्कलजवळ होतं तेच आहे का? सर्कलजवळ ते सागर स्वीट्सचं दुकान आहे तिथे एक हॉस्पिटल होतं आणि त्याच वेळी चौथ्या गल्ल्लीत एक नवीन हॉस्पिटल होत होतं. आता मीच तिथे खूप दिवसांत न गेल्यामुळे थोडी कन्फ्यूज आहे.
पण डॉ. देवयानी लिमयेंबद्दल खूप कौतुक व आदर ऐकून आहे Happy

बाकी पराग यांना अनुमोदन.

महिनाभरापासून मी विविध ठिकाणी असलेल्या आरोग्यक्षेत्रातील सोयीसुविधांची थोडी माहिती जमवत आहे. त्यापैकी उपयुक्त किंवा आवडू शकेल अशी माहिती देण्याचा प्रयत्न म्हणून उत्तररंग ह्या विभागात देवयानी हॉस्पीटलची माहिती दिली.

येथील प्रतिसाद वाचून मन विषण्ण झाले.

प्रशासनाकडे तक्रार करण्याचा माझा स्वभाव नाही. आपल्या सर्वांना विनम्रपणे आवाहन करतो की प्रतिसादांची अशी पातळी टाळता आली तर बघावेत. Happy

एक (अनावश्यकही वाटेल असा) खुलासा - माझ्याकडे देवदयेने मुबलक पैसा आहे. मी व माझ्या कुटुंबियांसाठी आजारपणाचा खर्च करण्याची माझी ऐपत आहे. मला एखाद्या रुग्णालयाची माहिती देऊन त्या बदल्यात काही सवलती मिळवण्याची सुदैवाने आवश्यकता नाही. लेख लिहिताना माझ्या मनात जाहिरात किंवा अश्या काही सवलती, असे काहीही नव्हते. मी अश्या प्रकारची माहिती जमा करत आहे हे पटावे म्हणून ह्या आणखीन एका आरोग्यकेंद्राची माहिती देणारा धागा मुद्दाम निर्माण केला.

असो!

सर्वांचे दखल घेण्यासाठी अनेक आभार! Happy

==========================

वेदिका २१ - होय, त्याच डॉ. श्रीमती देवयानी लिमये! Happy

==========================

-'बेफिकीर'!

<<बहुजन समाजातिल लोक जात व अडनाव बघुन कधिच डॉक्टर कडे जात नाहित पण विशिष्ट जातितील लोक नक्किच जात व अडनाव बघुन डॉक्टर कडे जातात हे १००% खरे आहे.>> म्हणजे काय?.

इथे लोक लग्नाला /मुंजीला इतक्या इतक्या माणसां करता कुठला होल सुचवू शकाल/पुण्या मुंबईत अशी माहिती विचारताहेत. त्यांना हॉलची माहिती दिली जाते. तिथला जेवण कस आहे. केटरर कुठला चांगला आहे हे सांगितलं जात. ती माहिती सांगणार्यांकडून जाहिरात होते का ? ट्रीपला कुठे जाऊ? म्हणून विचारणा होते. त्यांना वेगवेगळी रिसोर्ट सुचवली जातात. त्या त्या रिसोर्ट च्या वेब साईट्स देण्यात येतात . ही सगळी माहिती देणार्यांकडून रिसोर्ट ची जाहिरात केली जाते का ?.

मायबोलीवर वेगवेगळ्या ठिकाणची खाण्याची ठिकाण कुठली चांगली आहेत हे लोक विचारताहेत. गाडी कुठली घेऊ .रेफ्रीजरेटर घेऊ? व्याशिंग मशीन कुठला घेऊ ? मोबाईल कुठला घेऊ? आणखीन किती तरी माहित्या लोक विचारताहेत. त्या सगळ्याची माहिती पण लोक देत आहेत. म्हणजे माहिती देणारे जाहिरात करतात का ?

सुजा,
भारतात वकिल, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाऊंटंट यांना आपल्या धंद्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करायला कायद्याने आणि त्या त्या व्यावसायिकांच्या संघटनेच्या नैतिक नियमांनुसार बंदी आहे.

(अर्थात, वरिल लेख हा एखाद्या जाहिरातीचा भाग नसल्याची नम्र जाणीव आहेच.)

मात्र उद्या आपण वर उल्लेखलेल्या सामानाच्या यादीतील एखाद्या प्रकाराच्या उत्पादकांनी , उदाहरणार्थ मिक्सर बनविणार्यांच्या असिसिएशनने नियम केला की मिक्सरची सार्वजनिकरित्या जाहिरात करू नये तर तशी जाहिरात कुणी केल्यास ते चुकीचे ठरेल.
इतकेच नव्हे तर त्या मिक्सरवाल्यावर कदाचित मिक्सरवाल्यांच्या असिशिएशनतर्फे कारवाईही होईल.
तुम्ही चांगल्या मनाने रिव्ह्यू लिहाल पण कदाचित ते त्या मिक्सर उत्पादकाला त्रासदायक ठरू शकेल.

हॉस्पीटल्सच्या वेबसाईट्स ह्या जाहिराती नसतात का?

आसपासच्या परिसरात लावलेले 'अ‍ॅरो'चे फलक हे हॉस्पीटलकडे पोचण्यासाठी सहाय्यकारक असले तरी मुळात जाहिरात नसतात का?

'आमच्याकडे ह्या ह्या सुविधा आहेत' अशी होर्डिंग्ज हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहिलेली आहेत, त्या जाहिराती नसतात का?

आणि मायबोलीवर इतर अनेक प्रकारचे लेखन करणार्‍या माणसाने पहिल्यांदा एका रुग्णालयाबाबत माहिती देणारा लेख लिहिला तर त्यावर जात्यंध, रुग्णालयासहित अर्थपूर्ण व्यवहार असणारा आणि जाहिरात करणारा हे प्रतिसाद?

बाकी, ह्या माहितीचा कोणालाही कसलाही उपयोग होण्याची अजिबात शक्यता नाही असे प्रशासनाला वाटत असले तर हा लेख अवश्य रद्द केला जावा. त्या रुग्णालयातर्फे जे लोक खरोखरच रुग्णांसाठी मनापासून झटत आहेत त्यांना माझ्या ह्या लेखाची अजिबातच आवश्यकता नाही आहे. तसेच मीही मायबोलीवर काहीही सिद्ध करण्याचे राहिलेले नाही आहे. Happy

या लेखावरील प्रतिसाद पाहुन वाईट वाटले. डॉक्टरांच्या कपाळावरही जातीचे शिक्के मारण्यापासुन हे लोक चुकत नाहीत याला काय म्हणावे?

<<भारतात वकिल, डॉक्टर आणि चार्टर्ड अकाऊंटंट यांना आपल्या धंद्याची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करायला कायद्याने आणि त्या त्या व्यावसायिकांच्या संघटनेच्या नैतिक नियमांनुसार बंदी आहे.>>

तरी चिक्कार वकील / डॉक्टर / चार्टर्ड अकाऊंटंट जस्ट डायल वर आपापल्या जाहिराती करताहेत.
न्यूज पेपर मध्ये पण त्यांच्या जाहिराती असतातच. मुल बाळ होत नाही या या डॉक्टरांच्या क्लिनिक ला भेट द्या.
मी अगदी रत्यावर सुधा एक वकिलांची भली मोठ्ठी पाटी/बोर्ड नाव पत्यासकट आत्ताच ( गेल्या पंधरा दिवसात ) बघितली आहे. आमच्या कडे हि हि काम करून मिळतात अशा प्रकारे .

रॉबीनहूड | 18 January, 2015 - 05:19
तिथे विशिष्ट जातीचे डॉक्तर असणार म्हनजे. दीनानाथ सारखे !

>>>>

Very cheap response of cheap mentality.

Befikir, Thanks for info. Will be helpful for people living near by.

I always consider others reviews and experience before selecting doctor, or hospital. I personally don't know who is robinhood and eblis, but if they are real doctors then I wont recommend these doctors to anyone at least in my circle. It doesn't mean to cast.

डॉक्टरांच्या कपाळावरही जातीचे शिक्के मारण्यापासुन हे लोक चुकत नाहीत याला काय म्हणावे?

>>>

हेच , अगदी हेच आम्हाला म्हणावयाचे आहे . हे वाईटच आहे ना? मग तेव्हा कुठे गेला होता राधेसुता तुझा धर्म?
खेल तो वहां शुरु हुआ है !

बेफिकिरभौ आता युक्तीवादावर. उतरले.

ही जाहिरात नव्हतीच असे बोलता बोलता बाकीचे डॉक्टर. बाणाची चित्रे होर्डिंग लावतातच की , मग मे लिमयेंच्या दवाखान्याची जाहिरात केली तर बिघडले कुठे ? या टिपिकल युक्तीवादावर अले.

Proud

दवाखाने , डॉक्टर याना जाहिरात करता येत नाही. हे अनएथिक्ल आहे. डॉक्टर लोकाम्च्या हितासाथी एखादा लेख लिहु शकतील. एखादे शिबिर घेतले असेल तर त्याची थ्डक्यात बातमी देऊ शकतील. पण अमुक एरियात अमुक हॉस्पिटल आहे म्हणे , तिथला स्टाफ व डॉक्टर फार्फार प्रेमळ आहेत म्हणे इ इ जाहिरात करण्यासाठेच लिइले आहे हे उघड अहे.

सरकारी अरोग्य केंद्र व डॉ. कांबळे यांच्यावरचा तो लेख. मुद्दाम लिहिला गेलेला आहे , जेणेकरुन हा लेक म्हणजे जाहिरात नाही , असा युक्तीवाद करता येईल.

बेफिकिर भौना नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा

बेफिकीर,

>> येथील प्रतिसाद वाचून मन विषण्ण झाले.

जाम हसलो हे वाक्य वाचून! Rofl

लेखक लोकप्रिय का होतो? तो जी अनुभूती लिहितो ती वाचकाला आपली स्वत:चीच वाटते म्हणून. जर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहून हा लेख लिहिला असेल तर तुम्हाला कुणाचीही चाड बाळगायची गरज नाही.

प्रामाणिकपणे अनुभव लिहूनही त्याच त्या ठराविक सदस्यांकडून उफराटे प्रतिसाद आले. याचा अर्थ लेखाचा योग्य तो परिणाम साधला गेला आहे! Happy

आ.न.,
-गा.पै.

अवांतरः

बेफिकीर यांचे ते प्रतिसाद इथे आणि इथपासूनच्या पुढच्या काही पानांवर वाचायला मिळतीलः
http://www.maayboli.com/node/49618?page=4

या प्रतिसादांत त्यांनी फक्त त्यांचे अनुभवच दिलेले आहेत. त्याचा असा विपर्यास करुन आणि सोयिस्कर अर्थ काढून जातीयवादी रंग देणार्‍या सर्वांचाच निषेध.

मी बेफिकीर यांना नीट ओळखतो. त्यांना कुणी काही म्हणो, ते जातीयवादी आहेत असा कुणी निष्कर्ष काढला तर मात्र हसूच येते. तेव्हा करा प्रशासकांकडे वाटल्यास तक्रार त्यांची. गो अहेड!

- - - -

@ बेफिकीर
अहो कुणाचे प्रतिसाद वाचून विषण्ण वगैरे होताय? कुणाचे?

Pages