मला व्हेजिटेबल आणि फ्रूट कार्विंग आणि सॅलड डोकोरेशन मध्ये खूप रस आहे. नेट वरच्या कलाकृती पाहून मी भारावून जाते. ह्या कलेचा उगम थायलंड मध्ये झाला. फार पूर्वीपासून शाही मेजवानीत तिथे अशी फळ आणि भाज्यांची सजावट शेफ करत असत. मला फार काही येत नाही पण प्रयत्न चालू असतो. हे मी केलेले काही आयटेम. ( ह्यांना कला़कृती म्हणायचं माझं धाडस होत नाहीये.)
१) गाजराची फुलं
 From mayboli
From mayboli
२) गाजर आणि मुळ्याची फुलं तयार करुन ती टुथ पिक च्या सहायाने मोसंब्यावर लावून फ्लॉवर पॉट तयार केला आहे.
 From mayboli
From mayboli
३) ही काकडी आणि टोमॅटोची कमळं तयार केली आहेत.
From mayboli
४) टोमॅटोच्या कमळांनी सजलेले हे औक्षणाचे तबक
From mayboli
५) ही आहेत कांद्यापासून तयार केलेली फुल
From mayboli
हे मी केलेले सॅलड डोकोरेशन
१)From mayboli
२)From mayboli
ही ती सुरी. ही सुरी छोटीच आहे. साधारण पाच इंच लांब असेल. हीच हँडल लांब आहे आणि प्रत्य़क्ष सुरीचा भाग त्यापे़क्षा लहान आहे. धार नॉर्मल आहे आणि पुढे हीला पॉईंट आहे. खूप धारेची सुरी लागत नाही कार्विंग साठी तर लागतो हातावर कंट्रोल. कार्वींग करताना आपण भाजी कापताना सुरी धरतो तशी नसते धरायची तर लिहीण्यासाठी आपण पेन जसं धरतो तशी धरायची सुरी. अनामिकेने ( मधल्या बोटाच्या जवळचे बोट ) ज्यावर कार्व करणार आहोत त्यावर हलकेच दाब द्यायचा आणि कट करायच फर्मली असं टेकन्किक आहे त्याचं. प्रॅकटीस नी जमतं. मला ही खूप छान जमतयं असं नाही अजून खूप सुधारणा हवी आहे याची जाणीव आहे. कार्विंगचे व्हिडीओ बघताना मी मंत्रमुग्ध होऊन जाते त्यांचं स्कील बघुन.
हं चला तर तयार व्हा टोमॅटो काकडीवर वार करायला (स्मित) इथे फोटो टाका मात्र आपल्या कलाकुसरीचे.

 
 
सुंदरच आहेत की!! सह्ही
सुंदरच आहेत की!! सह्ही केलंय!! आणि ते खालचे क्रोशाचे रुमाल पण सुंदर आहेत!....:स्मित:
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग ! किती
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग ! किती सुंदर बनवल आहेस मनीतै . अतिशय सुरेख झालय सारं..
शांकली , जाई मनापासून
शांकली , जाई मनापासून धन्यवाद.
सुपर !!
सुपर !!
सही जमलेत/ ते औक्षणाचे दिवे
सही जमलेत/ ते औक्षणाचे दिवे फार आवडले..
Wow !!!
Wow !!!
सहीयं!
सहीयं!
खूप सुंदर
खूप सुंदर
सुंदर आहेत . क्रोशाचे रुमाल
सुंदर आहेत . क्रोशाचे रुमाल पण सुंदर आहेत .
मस्तच. आम्हाला तरी 'कलाकृती'
मस्तच.
आम्हाला तरी 'कलाकृती' च वाटतायत.
क्रोशाचे कामही सुंदर.
ते दिव्यांचे ताट आणि शेवटचा फोटो खासच आलाय.
सर्वांना मनापासुन धन्यवाद.
सर्वांना मनापासुन धन्यवाद.
वॉव! फारच सुरेख! औक्षणाच्या
वॉव! फारच सुरेख! औक्षणाच्या ताटाचा फोटो फारच सुंदर!
अपेक्षाभंग झाला! ह्यांना
अपेक्षाभंग झाला!
ह्यांना कला़कृती म्हणायच माझं धाडस होत नाहीये.>> या वाक्याने तो केला..
सुंदरच.. नाजूक अन कल्पक काम झालेय
ॠन्मेष मनिमोहोर ह्याला तू
ॠन्मेष
मनिमोहोर ह्याला तू प्रयत्न म्हणतेस ? सुरेख आलेत सगळे फोटो .
मस्तच ..
मस्तच ..
मस्तं जमलंय..
मस्तं जमलंय..
अफलातून जमलंय - जियो ...
अफलातून जमलंय - जियो ...
खूप छान
खूप छान
खूप सुंदर! क्रोशाचे कामही
खूप सुंदर!
क्रोशाचे कामही सुंदर.
ते दिव्यांचे ताट आणि शेवटचा फोटो खासच आलाय.+१००
मस्त जमलयं.
मस्त जमलयं.
खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद प्रतिसादांसाठी.
अजून खूप परफेक्शन यायला हवे आहे. सुधारणेला खूप वाव आहे.
तरीही तुम्हाला आवडले छान वाटलं.
हे विणकामासारख उसवता किंवा दुरुस्त करता येत नाही. थोडा जरी कट चुकला तरी आकार चुकतो. हातावर खूप कंट्रोल लागतो. म्हणून प्रयत्न चालु आहेत. पण तुम्हाला आवडलं म्हणून हुरुप आला आहे.
आम्ही काही दिवसांपूर्वी स्काईप वर काहीतर्री घरगुती समारंभ केला होता. आठ दहा ठिकाणची मंडळी जमली होती. त्यावेळी हे ताट केले होते ई - औक्षणा साठी .
क्रोशेकाम आवडलं छान वाटल त्याबद्दल नंतर कधीतरी.
फार सुरेख!!!
फार सुरेख!!!
मस्त !
मस्त !
हे प्रयत्न? मग कलाकुसर कशी
हे प्रयत्न?

मग कलाकुसर कशी असु शकते? जरा कॉम्पेक्स न देण्याचे काय घ्याल हो???
प्रचंड मस्त आहेत सगळ्याच कलाकृती.
एक नंबर मला ती फुलं करायला
एक नंबर
मला ती फुलं करायला शिकवं ना गं
मस्त आहेत. हे जर प्रयत्न
मस्त आहेत.
हे जर प्रयत्न असतील तर आमच्या भाजी कापण्याला काय म्हणावे!!!!
अप्रतिम आहे...क्रोशाचे रुमाल
अप्रतिम आहे...क्रोशाचे रुमाल पण सुंदर आहेत .
खूप सुंदर! क्रोशाचे रुमाल पण
खूप सुंदर! क्रोशाचे रुमाल पण सुंदर आहेत.
फार सुरेख!!!
फार सुरेख!!!
आहाहा काय सुंदर केलयत तुम्ही
आहाहा काय सुंदर केलयत तुम्ही हे सगळ.
ती कमळ तर फारच सुंदर आहेत. मी आता तुमच्याकडे क्लास लावणार.
Pages