चिपोटले बरिटो बोल

Submitted by बाईमाणूस on 6 January, 2015 - 11:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बासमती तांदूळ - १ कप
अवाकाडो -१
सावर क्रीम -१/२ कप
कोथिंबीर
बिन्स - १/२ कप (शिजलेले - कॅन मधील)
लिम्बू -१/२
मक्याचे दाणे -१/२ वाटी
लेट्यूस - १ कप बारीक चिरलेला
छोटा टोमॅटो -१ बारीक चिरलेला
छोटा कांदा -१ बारीक चिरलेला
सिमला मिरची -१ ज्यूलियन कट चिरलेली
मेक्सिकन सॉस - चवी नुसार
मिरची-आले-लसूण पेस्ट - चवी नुसार
चिकन- १ १/२ वाटी छोटे तुकडे

क्रमवार पाककृती: 

१. बासमती तांदूळ धूवून १५-२० मिनिटे बाज़ूला ठेवा.
२.दूसरीकडे टोमॅटो, कांदा, सिमला मिरची , कोथिंबीर चिरून घ्या.
३. चिकन मिरची-आले-लसूण पेस्ट आणि मीठ लावून बाज़ूला ठेवा.
४. अवाकाडो कापून त्याची पेस्ट करा. त्यात चवीला मीठ, लिंम्बाचा रस, कोथिंबीर एकत्र करा.
५. मक्याचे दाणे मीठ टाकून थोडे शिजवून घ्या.
६. आता भात मोकळा शिज़ेल एवढे पाणी अंदाजे टाका. मीठ टाकून भात शिज़ायला ठेवावा.
७. एका पॅनमध्ये थोडे तेल टाका. सिमला मिरची मोठ्या आचेवर शिजवून घ्या. शिजल्यावर एका बोलमध्ये काढून ठेवा.
८. चिकन पॅनमध्ये शिजवून घ्या.
९. आता भातात थोडा लिम्बू आणि कोथिंबीर मिक्स करा.
१०. एका प्लेटमध्ये भात वाढा.त्यावर बिन्स, चिकन, सिमला मिरची, लेट्यूस, मक्याचे दाणे, सावर क्रिम, अवाकाडो पेस्ट, कांदा, टोमॅटो हे क्रमवार पसरवा.
११. सगळे एकत्र करून खाण्यास तय्यार !

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

Chipotle मेक्सिकन रेस्टॉरंट मधील आवडीचा पदार्थ!
चिकन न टाकता त्याजागी भरपूर ग्रील्ड भाज्या टाकून शाकाहारींसाठी देखील बनवता येते.
आपल्याला आवडेल तसे तिखट कमी-जास्त करता येईल.
आयत्यावेळी लेट्यूस नसल्याने पालक आणि कांद्याची पात टाकले.

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल आणि स्वप्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठला पदार्थ हा (कोणत्या भागातला) >>> वीणा सुरु तुम्ही शिकागोत राहुन तुम्हाला चिपोटले कुठला पदार्थ आहे माहीत नाही ?

श्रीबाळा,
वीणाजी उथळ असल्या तरी आधुनिक नाहीत त्यामुळे त्या शिकागोत राहूनही वरण भात भाजी पोळी खातात.
चिपोटले नाही काही.

मस्त! सॉस नेमका कुठला घालायचा?
मी चिपोटलेत हे बनवून घेते तेव्हा चीजही घालायला सांगते थोडं! बीन्स मग थोडया कमी करते.

(अवांतरः भारतात वरण भाताच्या बिया मिळतात हल्ली. कस्टम्समधून चोरून आणून इथे बॅकयार्डात लावायच्या आणि मस्त रोज व भा ओरपायचा. Wink )

बामा, एकदम मस्त दिसतंय कलरफुल.

मस्त. इथे जवळच एक चिपोटले उघडल्यामुळे घरी करण्याच्या फंदात पडणार नाही Happy

बोल कुठे आहे पण? Wink

'चिपोटले बरीटो नाहीतो' असं नाव द्या. फहिता आणि मोहितो चालतं त्यांना नाहीतो चालायला काहीच हरकत नाही. Proud

मस्त! आवडता पदार्थ चिपोटलेतला! चि़झ हवच!
कान्दा, टोमॅटो एवजी साल्सा घातला तरी चालेल, फोटो भारी आलाय..

अरे - सहीच लागतो हा पदार्थ. मी http://www.recipechatter.com/how-to-make-a-chipotle-style-burrito-bowl-a... इथे बघून करते. भात सरळ प्रेशर कुकर मधे लावते - भरपूर कोथिंबीर, लोणी, लिंबू वगैरे घालून. टॉपिंग्ज मधे मशरूम्स पण घालते. शेवटी वरून चीज पसरवायचं. चिपोतले चिलीचं लोणचं टाईप मिळतं - ते मस्त लागतं ह्यात. ग्वाकामोली (वर दिल्याप्रमाणे अ‍ॅव्होकॅडो ची पेस्ट) शिवाय मजा नाही.

फोटो एकदम तोंपासु आलाय आणि चवही छान लागेल.
बरिटो बोल एकदोनदा घरी करण्याचा प्रयत्न केला होता पण ... चिपोटले सम चिपोटलेच Happy त्यांचे चिकन थोडेसे chewy असते आणि एक चारग्रिल्ड वेगळीच चव असते. शिवाय पिंटो बीन्समध्ये बेकनचा अंश असतो ( की बीफचा ? ) त्यामुळे ते वेगळे लागतात.
बरिटो बोलची भयंकर आठवण येऊन राह्यली आता Happy