दिनेश. | 30 December, 2014 - 12:14 नवीन
नवीन वर्षाचे मायबोलीकरांचे संकल्प.. ( आयड्यांची नावे विनंतीवरून गुप्त ठेवण्यात आली आहेत.. )
१) आता बास झालं,अजून किती मुस्काटं फोडायची ती.... आता या वर्षी थोबाडीतच द्यावी हे बरं
२) आता बास झालं, या डू आयड्यांची पोल खोलणं.... या वर्षी कुण्णाकुण्णाला दादा म्हणणार नाही.
३) आता बास झालं, फळांची, प्राण्यांची वगैरे नाव वपरून झाली.. आता कानडी नावे घ्यावीत.
४) आता बास झालं, सरळ बोलून ऐकत नाहीत, तिरसट बोलूनही ऐकत नाहीत... तर फक्त तिरसटच बोलीन.
५) आता बासं झालं, प्रेमप्रकर्ण तरी किती लिहायची... पण अजून काय सूचत नाही तोवर २५ ते ३२ सिरीज लिहू.
६) आता बास झालं, प्रत्येकवेळी नव्या डिशेस कुठून आणायच्या ? स्टीलच्या घ्याव्यात झालं
७) आता बास झालं, तसेही नमो सुधारणार नाहीत, यावर्षी जरा शब्दांची धार वाढवावी हे बरं
८) आता बास झालं, खाशाबा पैलवानांची जन्मतारीख मिळवायलाच हवी
९) आता बास झालं, गफ्रेचं नुसतं नाव घेतलं तर गप रे म्हणतात.. बॉफ्रे शोधावा हे बरं ( फार तर बाप रे म्हणतील )
दिनेशदांनी सुरवात केली आहे, तरी आपण सर्वांनी यात भर घालावी.
@ अग्निपंख असं काही नाही.
@ अग्निपंख
असं काही नाही. कितीतरी नवरे आपल्या बायकांवर मनापासून प्रेम करतात. त्यांच्या बाबतीत असं वाटण्याचा प्रश्न येत नाही. बायकोची इतकी भीती वाटणा-यांनी लग्न तरी कशाला करावं ?
हो काहीजण आपल्या बायकोचा खून
हो काहीजण आपल्या बायकोचा खून देखील करतात
नांवे का गुप्त ठेवायची? मी तर
नांवे का गुप्त ठेवायची? मी तर म्हणतो नांवे लिहून संकल्प लिहावेत. सगळे सगळ्यांना व्यवस्थित ओळखतात.
====================================================================
नांवे लिहून (त्या सदस्याचे काल्पनिक) संकल्प लिहीत आहे.
====================================================================
कोकणस्थ - माबोसदस्यांशी माबोबाह्य माध्यमांतून संपर्क न साधणे
गा मा पैलवान - आसाराम बापूंना निर्दोष सिद्ध करणे
भरत मयेकर - पाचपेक्षा अधिक सदस्यांना आपले बोलणे कळेल ह्याची दक्षता घेणे
साती - 'मैने कहां फुलोंसे' हे गाणे लावून ते ऐकून खिलखिलून हसणे
इब्लिस - स्वतःचा आय डी घालवून दाखवणे
काउ - स्वतःचा आय डी टिकवून दाखवणे
लिंबूटिंबू - प्रतिसादात पॅराग्राफ्स पाडणे
चिनूक्स - काहीही माहिती न देणारा एक लेख लिहून दाखवणे
दिनेश - कीबोर्डवरील 'U' हे अक्षर टाईप करताना शिफ्टची कळ न दाबणे
रश्मी - संत्री सोलण्याचे कंत्राट नाकारणे
भाऊ नमसकर - चुकलेल्या चित्रांना व्यंगचित्र म्हणून न खपवणे
वीणा सुरू - हयात व्यक्तीचा फोटो वापरण्याची परवानगी मिळवणे
अरविंद चौधरी - किमान एका वादात सहभागी होणे
बी - 'माहिती हवी आहे' ह्या ग्रूपमधून बाहेर पडणे
झक्की - प्रतिसादाखाली 'आपला नम्र' असे लिहून प्रतिसादाची शूचिर्भूतता न घालवणे
सिंडरेला - त्या त्या धाग्याखाली त्या धाग्याशी संबंधीत प्रतिसाद देता येतात हे शिकून घेणे
डी विनिता - अॅडमीनकडे कोणाची तक्रार करावी ह्याबाबत कोणाचा सल्ला घ्यावा हे कोणालातरी विचारणे
अॅडमीन - स्वतःची विपू वर्षातून किमान एकदा वाचणे
ऋन्मेष - आलेल्यापैकी पाच टक्के प्रतिसादांचा तरी अनुल्लेख करायला शिकणे
माझा संकल्प कोणता असावा हे कृपया बाकीच्यांनी ठरवावे.
(No subject)
मस्तच आणि धन्यवाद .कारण मला
अॅडमीन-स्वतःची विपू वर्षातून किमान एकदा वाचणे>>:हाहा: मला तर वाटायचं की ती खोटी असते .आणि अॅड्मीन ना मी अजुन अमानवीयच समजते.
मी लिहितेय तुमचा संकल्प .
बेफीकीर- चित्रपटांच्या धाग्यावर आणि नको तीथे "चु भु द्या घ्या" लिहिणायाचे टाळेन .
बेफीकीर- सिरियलींवर फक्त विडंबन गाणी लिहिन .त्यातल्या कुठ्ल्याही अभिनेत्रीचे कौतुक टाळेन.
आता बास झालं, नव्या वर्षात
आता बास झालं, नव्या वर्षात प्रसन्न वाटेल असे बोलेन . ( कुणाचं ते माहीत नाही )
आता बास झालं, केलेले संकल्प पाळणार नाही.
बेफिकीर.... जबरी!!! १ नंबर
बेफिकीर.... जबरी!!!
१ नंबर भारी आहे दिनेशदा..
अजून कोणाला कळला नसेल तर घ्या मूस्काट फोडुन. 
डी विनिता - अॅडमीनकडे कोणाची
डी विनिता - अॅडमीनकडे कोणाची तक्रार करावी ह्याबाबत कोणाचा सल्ला घ्यावा हे कोणालातरी विचारणे>>>बाऊन्सर होता... प्लीजच एक्सप्लेन
मैने कहा fool s से हसो तो वो
मैने कहा fool s से हसो तो वो खिलखिलाके रो दिये.

शिफ्ट 'यू' आणिदिनेशदांचा संबंध कळला नाही. 'ऊम्म अली' शी रिलेटेड आहे का?
>>>शिफ्ट 'यू' आणिदिनेशदांचा
>>>शिफ्ट 'यू' आणिदिनेशदांचा संबंध कळला नाही<<<
'तू'म्हाला इतके सोपे कळले नाही?
वक्के, हल्ली इथे यायचं कमी
वक्के, हल्ली इथे यायचं कमी केल्याने डोक्याची धार कमी झाल्येय.

बेफिकीर भारीये हे. पण सन्त्री
बेफिकीर भारीये हे.:फिदी: पण सन्त्री सोलणे म्हणजे काय्?:अओ: मला खरच नाही माहीत.
यात दिवाकर देशमुख राहीले त्याना पण धरा.:फिदी:
बेफिकिर मला वाटते तुम्ही फार
बेफिकिर मला वाटते तुम्ही फार अवघड भाषेत लिहिलेय.... बरेच समजत नाहीय....नवीन वर्षात नव्याने डोके घासायचे की काय?
ऋन्मेष - आलेल्यापैकी पाच
ऋन्मेष - आलेल्यापैकी पाच टक्के प्रतिसादांचा तरी अनुल्लेख करायला शिकणे
>>>
येस्स यंदा हे जमवणार आहे, आणि त्यावेळेत कविता, गझल, चारोळ्या वगैरे शिकायचा संकल्प आहे. निदान मुक्तछंद तरी. त्या कविता विभागावर बरेच दिवस डोळा आहे माझा..
त्या कविता विभागावर बरेच दिवस
त्या कविता विभागावर बरेच दिवस डोळा आहे माझा..>>
कविता विभागातून बाहेर कसे पडावे कृपया मदत करा.
(No subject)
मागच्या पानावर लिहिलेला माझा
मागच्या पानावर लिहिलेला माझा संकल्प कॅन्सल!!! ताबडतोब आत्ताच्या आत्ता!!
'' यावर्षी कादंबर्या लिहिताना
'' यावर्षी कादंबर्या लिहिताना आपले राजकीय अजेंडे त्यात घुसवणार नाही.
उगाच एखाद्या नेत्याबद्दल गैरसमज पसरविणारे विधान करणार नाही.
नावडत्या नेत्याचे नाव कादंबरीच्या व्हिलनला देणार नाही.
कुठल्या डॅशिंग कॅरेक्टरला टिनपाट मायबोली आयडीचे नाव देणार नाही.''
पैचान कौन?
''आम्हाला ऑस्करला
''आम्हाला ऑस्करला पाठवण्याजोगे चित्रपटच बनविता येतात, चांगले येत नाहीत'' असे एखाद्या मायबोली आयडीला शालजोडीतले मारणारे वाक्य लिहिणार नाही.
पैचान कौन?
चारोळ्या चालतील, निदान लवकर
चारोळ्या चालतील, निदान लवकर वाचून होतील. (एका धाग्यावर एकच चारोळी, असा नियम करा व पाळा)
येणार येणार ... घझल आणि
येणार येणार ... घझल आणि कविता मध्ये गर्ल फ्रेंड आणि शाखा येणार..
बास झालं आता सारखं सारखं
बास झालं आता सारखं सारखं शारूक मोडात जाणं, आता जरा दारासिंग मोडात जावं.... ओळखा बघू
मस्त बेफिकीर... अचुक जमलय...
मस्त बेफिकीर... अचुक जमलय... !
पण आता ना, खरेच बास्स झाले.. यंदापासून मी स्वत: उघडलेल्या धाग्यांवरच लिहीणार, उगाच लोकांच्या अंगणात जाऊन खेळणार नाही ! (नै त काय? कुणाच्याही धाग्यावर गेल की सगळे हाडहूड करतात... )
नै त काय? कुणाच्याही धाग्यावर
नै त काय? कुणाच्याही धाग्यावर गेल की सगळे हाडहूड करतात...
>>>>
माझ्या धाग्यावर कधीही या हं. असे मी तरी नाही करणार. वाटल्यास मलाच हाडहूड करून जा. प्रेम वाढते त्याने
वाटल्यास मलाच हाडहूड करून जा
वाटल्यास मलाच हाडहूड करून जा >> ऋन्म्या अजून हौस भागली नै वाटतं

वाटल्यास मलाच हाडहूड करून जा.
वाटल्यास मलाच हाडहूड करून जा. प्रेम वाढते त्याने<<<
गफ्रे ला ही हा सल्ला द्यावात. तुमच्यातील प्रेम वाढेल. अधेमधे तुम्हीसुद्धा एकदा तिला मायेने हाडहुड करून बघा. प्रेम अजून वाढेल.
अजून ?? >>> उलट येथील लोक्स
अजून ?? >>> उलट येथील लोक्स स्वतःची इमेज जपत खूप सौम्य भाषेत हाडहूड करतात, त्यामुळे शंभर झाल्यावर मी एक मोजतो
येत्या वर्षात त्या समस्त हाडहूड करणार्यांना मी हाडहूडची पातळी उंचावायला लावायचा प्रयत्न करणार!
बेफिकीर,
ग'फ्रेंड हाडहूड नाही करणार तर कोण करणार, न जमल्यास ते नाते कृत्रिम आहे असे समजावे.
व्वा! (प्रेम या विषयातील एका
व्वा!
(प्रेम या विषयातील एका अबोध बालकावर हे ज्ञानकण शिंपडल्याबद्दल हे युग आपले आभारी आहे).
आणि हा बाफ संकल्प
आणि हा बाफ संकल्प लिहीण्यासाठीच वापरावा. कृपया. धन्यवाद. कृपया.
.........................................................................................
--------------................---------------------..................-------........--
----------.....................................----................----------------
................."-----------------------"....................
---------.............,-------------............. :--- ===========
ओक्के ऋन्मेष, पण मला
ओक्के ऋन्मेष, पण मला शास्त्रशुद्ध भाषेत हाडहूड करता येत नाही व ज्या भाषेत हाडहूड केले जाते ती मला अवगत नाही.
पण मी आता गंभिरपणे ठरवतोय की स्वगतांकरता एक स्वतंत्र धागा काढून तिथेच माझी स्वगते रचायला पुन्हा सुरुवात करावी !
अन माझीच स्वगते ती... ती काय घाऊकरित्या वाळवणात घातलेल्या कुरड्या पापड्यांप्रमाणे असणार का, की कुठूनही चिमण्याकावळ्यांची झून्ड टोचे मारायला यावी अन तिला हाकलीत बसावे लागावे?
Pages