प्लास्टिक पिशवीचे टेबल मॅट.

Submitted by आरती on 27 December, 2014 - 11:06

भाजीच्या दुकानात मिळालेल्या पिशवीच्या साधारण १/२ इंच जाडीच्या पट्ट्या कापुन घेतल्या. गाठी मारुन त्या एकमेकींना जोडुन घेतल्या. त्यांचा गोल गुंडा तयार केला. आणि क्रोश्याच्या सुईने (नेहमीच्य पद्धतीने) विणकाम केले.

सगळे पुर्ण खांब आहेत आणि जाळीसाठी साखळ्या विणल्या आहेत.

साईज प्रमाणे उपयोग करता येईल.
१. टी कोस्टर
२. टेबल मॅट
३. छोट्या कुंडी / फ्लॉवरपॉट खाली
४. एखाद्या छोट्या मुर्ती खाली

FullSizeRender.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! मी प्लस्टिकच्या पिशव्यांच्या पर्स केलेल्या पाहील्या आहेत. हे येते मग पर्सही करुन पाहा.

विद्याक, पर्स करायचा प्रयत्न करते. Happy

सायो, स्टेप बाय स्टेप म्हणजे फक्त पट्ट्या कापणे इतकेच आहे, म्हणुन फोटो नाही टाकला.

नीरजा,
लोळत पडलेले पुर्ण करणे चालु आहे. पिंटरेस्टवर पण डोकवायचे आहे एकदा.

आवडल्याचे कळवल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. Happy