हॉर्न ओके प्लीज!!

Submitted by साजिरा on 3 June, 2008 - 05:32

ट्र्कवाल्यांची अभिरूची. तुमचं म्हणणं काय आहे?
माझं म्हणणं- एकदम जबरदस्त!
वैराण, तापलेल्या रस्त्यावरून वैतागभरला प्रवास करीत असताना एखाद्या ट्रकच्या मागे लिहिलेला सुविचार, शेर, पोट पकडून हसायला किंवा चक्क विचार करायला लावणारं वाक्य कधी वाचलंत?
हा अक्षरश: खजिना आहे मंडळी! काळाच्या ओघात (न जाणो ट्र्कवाल्यांची अभिरूची बदलली तर!) हा अमुल्य 'साहित्य-ठेवा' नामशेष होऊ नये, अन भविष्यकालीन इतिहाससंशोधकांना आयतं काम मिळू नये, म्हणून जमेल तेवढं, अन जमेल तसं साहित्य गोळा करून मायबोलीवर ठेवायचा मानस आहे. हे सध्या जेवढं आहे, त्याच्या हजारपट तुमच्या सहकार्यातून अन प्रतिक्रियांतून होईल याची खात्री आहे..

तो देवीयों ओर सज्जनों, पेश है-
दि ग्रेट इंडियन ट्रक लिटरेचर!!
--------------------

हॉर्न ओके प्लीज
(सॉरी मंडळी, पण 'पयलं नमन' बाप्पालाच की नाही? तसंच हेही!)

साऊंड वेट हॉर्न फॉर प्लीज साईड
(कळलं का? 'साऊंड हॉर्न प्लीज' 'वेट फॉर साईड' - दोन वेगळ्या सुचना.)

स्टॉप साऊंड ओके हॉर्न सिग्नल
(वरच्यासारखंच. दरवेळी आपण नाही बुवा फोड करून सांगणार.)

A, पाहू नकोस, प्रेमात पडशील!
(काय प्रेमळ धमकी! बहुधा प्रेमात 'पडशील' असं म्हणायचं असेल.)

A, तु Q जलता?
(कशावर भाऊ? समानार्थी- 'जलो मगर दीप के समान', 'मुझपे जलनेवाले तेरा मुंह काला', 'जलनेवाले जलते रहो, चलनेवाले चलते रहो' इथपर्यंत ठीक आहे हो; पण सर्वात कळस म्हणजे-
'आग लगे तेरी दौलत को!!' मागनं गाडी चालविणार्‍याची झोप उडविण्याचाच प्रकार की हो!)
हे खानदान फार मोठे पसरले आहे. आणखी बघा-

O नाना O तात्या A भाऊ Q रे बापू
A, आती क्या खंडाला?

घर कब आओगे, पोपई खाने को!
(आयला, कोणाला कोणती गोष्ट मोटिव्हेट करेल, काही सांगता येत नाही.)

भगवान सबका भला करे शुरू मेरेसे करे.
(विशेष काही नाही हो. आपले पुढारी नाही का, स्वतःच्या शेतीसाठी कॅनॉल फिरवितात, पण सर्व शेतकर्‍यांचं भलं केल्याचा आव आणतात. ट्रकवाले बिचारे प्रामाणिक तरी. हेतू सुरूवातीलाच सांगून टाकतात.)

जर वाचवायचे असतील प्राण, तर घाला नेहमी शिरस्त्राण.
(जनप्रबोधनाचा वसा काही घेतात. पण कधीकधी त्यासाठी आपलं प्राथमिक शिक्षणही त्यांना आवश्यक वाटत नाही. खालचा नमूना वाचा-)
कंदम कप कप, यवन संबं जप जप
(ओळखलं तर तुम्ही खरे मायबोलीकर बुवा!)

पढलिखकर बाबूजी बने, चले नोकरी ढुंढनेको,
बेकारीकी ठोकरे खायी, आये वापिस ट्रक चलानेको.
(स्वतःचं आत्मचरित्र अन 'विस्तवी' वास्तव- दोन्ही फक्त दोनच ओळींत! कुठल्या बड्या साहित्यिकाची आहे टाप?)

१ बस १३ ही ७
('१३ मेरा ७' चा एका ट्रकवाल्या 'रामू' ने केलेला रिमेक! एक शंका (शेणखा तिचैला!)- हिंदीत हे लोक साताला 'साथ' का म्हणतात हो?)

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
(आतमध्ये बसून रडतच असेल बहूतेक. एवढे शूर होते राजे, पण याला घाबरून कसचे येतात. राजांचं नुसतं नावही काहींना पुरतं बघा-)
'राजे', 'महाराज', 'शिवबा', 'जय शिवराय', 'जय भवानी, जय शिवाजी', 'शिवशाही',
'शिवबा जीव तुटतो रे'...!
(याच्या कॉलनीत 'भय्ये' जास्त आले बहूतेक!)

खुदा गारद करे ट्रक बनानेवालोंको, घरसे बेघर कर दिया हम ट्रक चलानेवालोंको!
(टाटांचे दिवस काही बरे नाहीत बुवा. आधीच काही लोक- 'नॅनो' बनविणारे मुर्दाबाद- म्हणू लागलेत.)

भरके चली अनारकली
(जास्त भरू नको रे भाऊ. अनारकलीचे 'दिवस' भरणार नाही तर!)

मुलगी झाली, शाळा शिकली, प्रगती झाली.
(इथपर्यंत कॉमनच आहे हो. पण खालचं वाचून स्वतःला अप्डेट करा बघू-)
मुलगी झाली, शाळा शिकली, राष्ट्रपती झाली!

जगह मिलनेपर पास दिया जायेगा, आगे जानेवालोंको माफ किया जायेगा!
(एवढे 'मवाळमतवादी' ट्रकवाले दुर्मिळ झालेत.. काही फारच आक्रमक असतात हो. उदाहरण बघा-)
दम है तो पास कर, वरना बरदाश्त कर..!

मेरे ख्वाबोंकी तसबीर, मेरी गाडी, मेरी तकदीर!
('अनारकलीची'च दुसरी आव्रुत्ती. गाडीवरचं प्रेम बघा!)

कुणाच्या गाडीवर, कुणाचे ओझे.
(अध्यात्माच्या मार्गाला लागलेला असा एखादा विरळाच!)

१०० मे से ९९ बेईमान, फिरभी मेरा भारत महान!
(अंतिम सत्य. नुसतंच 'मेरा भारत महान' लिहिण्याचे दिवस संपले.)

वाट पाहीन पण ७१७६ नेच जाईन..
(७१७६ हा त्याचा गाडी नंबर. वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन असं वाचून दया आली होती. आता हा
७१७६ वाला पठ्ठ्या मालवाहतूक सोडून माणसांची वाहतूक करणार काय? पीएमटी आधीच एम्टी धावतेय म्हणावं!)

-
आता एक ट्र्क आठवला, अन थोबाडीत मारल्यागत झालं. म्हणजे काय, अगदी जमिनीवरच आलो..
ते सांगतो, अन थोडी विश्रांती घेतो-

'काम पे जा, चांद पे मत जा!'

-
-
-
-
-
आणखी काही आहेच मंडळी. पण तोपर्यंत जरा तुमचीही पोतडी उघडा की राव!

गुलमोहर: 

Image034.jpg

एक फोटो माझ्या कॅमेय्रातुन.....पहा "कपट्टी" आणि "शेत्रु"!!!!!

>> मुलगी झाली, शाळा शिकली, राष्ट्रपती झाली!
खरंतर ते असं हवं 'मुलगी झाली, निष्ठावान राहिली, राष्ट्रपती झाली!' Happy

कालच वाचलेले अमूल्य तत्त्वज्ञान...
जिंदगी भर कमाना पैसा हिरा मोती
मगर याद रखना कबर मे जेब नही होती...
==================
ढिपाडी ढिपांग ढिची पाडी ढिपांग
हिडी पाडी ढिची पाडी ढिपांग टू डू

अभिजित,
लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. मला माहिती नव्हतं, बहूधा तेव्हा मी सभासद नव्हतो.
मायबोलीकरांनी यावर मस्तच संशोधन केलं आहे.
ज्यांना ते माहिती नसेल, त्यांच्यासाठी 'कॉपी-पेस्ट' करून इथे टाकतो..

शेठ की गाडी ड्रायव्हर का पसीना
चले रोड पे बनकर हसीना

पुण्यातील रिक्शावर - येतोस का जाऊ.

तुझि ज़ळते तर मी काय करु?

बुरि नजर वाले तेरा भी हो भला.

तुमची कोणितरी घरि वाट बघतय.

हमे तो अपनोने लुटा, गैरोमें कहॉं दम था?
अपनी कश्ती वहा डूबी जहॉं पानी कम था.

एक रिक्शावर लिहिलय.. "भटकती आत्मा"

एक टिपीकल वाक्य: पहा, पन प्रेमाणे.....

केला इशारा येता जाता...

रिक्षा तिथे मार्ग...

दादांची Horn OK कृपा.

माझं नाव नंदा
मी करते घोडनदी वाळूचा धंदा

एका रिक्षावर वाचलेले... याचा अजूनही अर्थ लावतोय
"हुबेहूब मेरे मेहबूब"

जलती है अगरबत्ती खुशबू लेते चलो
आती है गाडी गरीब की साईड देते चलो

बुरी नजरवाले तेरे बच्चे जिये
बडे होकर देसी दारू पिये

सोनू, मनू, पिंकी, रमेश, माई
(खालच्या ओळीत) Bank of Maharashtra च्या सौजन्याने

- हे असंच चालायचं!
- देवाक काळजी

ऐ ख़ुदा तेरी अदालत में मेरी जमानत रखना
मैं रहूँ या ना रहूँ मेरी घरवाली को सलामत रखना

एका रिक्षाच्या मागे लिहिले होते... शेवटी एकटाच

A 30 का J Y ला .. ..!

"भिऊ नकोस, मीच तुझ्या पुढे आहे!"

"नीम का पेड़ क्या चंदन से कम है?
मेरा रेवाड़ई 'डीसटीक' क्या लंडन से कम है?"

"गोहाटी की सड़अक प्यारी, पर घाटी डरा देती है,
पक्का होता है भाई का प्यार पर भाभी भगा देती है"

मालिक दिलदार, चमचे हजार

११३७ - एक तेरा साथ

" अगर पेट तेरा भरा है, तो संसार जगमगाता है
अगर पेट तेरा भूका है, तो ईमानभी डगमगाता है !"

खुदा सलामत रख्खे मेरे दुष्मनोंको
वरना मेरे मरनेकी दुवा कौन करेगा ?

2 13 dekh
1 2je K li A

अगर दम है बाजुओ में तो ताजमहल हिलाके दिखा
वरना आ मेरे साथ दो पेग लगा और ताजमहल को हिलता देख.

'सायकल सोडून बोला'

देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है !

म.रा.प.म. च्या एका बसवर “तुम्ही वाहून नेता केळी नी कणसं; आम्ही मात्र लाख मोलाची माणसं !” असे लिहिल्याचे मला आठवते.

तितलियॉं रस पिती है, भवरें बदनाम होते है ।
दुनिया शराब पिती है; ‘डिरायवर‘ बदनाम होते है ।

चित्र बासरीवाला कन्हैया. आणि शेजारी शेर :
रहते है दिल्लीमे(बस मुंबईची) खाते है केले.
तुम्हारी याद आती है तो सो जाते है अकेले.

एका ट्र्क मागे लिहील होत... मामा ९ टन मामी टनाटन

मी पुण्यात एक scooter पाहिली त्यावर लिहिले होते "right hand drive"

आज एका सॅन्ट्रो वर वाचले. एल चा मोठा बोर्ड आणि
Thank you for your patience.

परवा पाहीलेल्या एका गाडीवर लिहीलं होतं की
"बघतोस काय? मी यांचीच आहे.."

"मै जिंदगीभर साथ दुंगी, पीकर मत चलाना"

महाभारत में मख्खन, रामायण में घी
कलयुग में दारू, सोच समझ के पी

चलेगी गाडी, उडेगी धूल; जलेंगे दुश्मन, खिलेंगे फूल

'नादच ख़ुळा..... '
अर्थ काय कोण जाणे!

'जळतात मेले'.

"आबा कावतोय"

परवाच एका PMT च्या मागे धुळीत लिहिले होते 'बस विकायची आहे, १० रु. किलो.'

recently एका व्हनच्या मागे हे लिहिलेलं पाहिलं.. "हा ट कू न"

एका भल्या मोठ्या तीसपस्तीस चाकी कॅरीअरवर लिहिलेले
इटुकली पिटुकली, मी धिटुकली

Don't follow me, I'm Already Lost!!!!

कोल्हापुर मध्ये एक सुमोच्या मागे " गंड्या वांडर" असे लिहीलेले वाचले.

किसी लडकी को मत सता, पाप होगा!
तू भी कभी किसी लडकी का बाप होगा!

एक रिक्शा च्या मागे वाचलंय: (मोठ्या अक्षरात)तुझ्या आईला........(आणी अगदी बारिक अक्षरात) माझा नमस्कार सांग.

बुरी नज़र वाले तेरा बेटा जीये, और बडा होके तेरा खून पीये.

"मेरी चली तो तेरी क्यूँ जली.."

कोल्हापूरच्या एका ट्रकवर लिहिलेलं: नाद नाय करायचा
(तिथे, त्याचा अर्थ 'उगीच माझ्या नादी लागू नको, भारी पडेल' असा होतो.)

नाही पाप, नाही शाप, कुष्टरोग हा तर जंतूंचा प्रताप!

"मौत कभी रिश्वत नही लेती
क्योंकी कफन को जेब नही होती"

" काय बघतोस रागानं?
ओव्हरटॅक केलंय वाघानं. "

"कृष्ण करे तो लीला, हम करे तो अपराध!!"

Lol
मजा आली वाचून. धन्यवाद.

वा डोकं फिरलं हे वाचून हसून हसून.. परवाच एका ट्रकचं दर्शन झालं.. वाचून मला काही अर्थबोध झाला नाही.
लुक बट लव्हली..
खूप डोकं खाजवलं मग नवरा माझ्या मदतीला आला.. नशीब माझं..
देखो मगर प्यारसे चं ते स्वैर भाषांतर होतं....

अरे भन्नाट !!!!
हे सगळं वाचून एखादा ट्रकवाला निश्चित म्हणेल, "अबे, बुरी नजरवाले........."

साजिरा,
तुझं फाईंडच भन्नाट आहे.
............................अज्ञात

भले शाब्बास !

अजून एक पाटी मी मुंबईत एका ट्र्कवर वाचली होती. हा ट्र्क ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मला नेहमी दिसायचा (१९९४-९५ मध्ये). मी एक्झॅक्ट्ली त्याची भाषा वापरली आहे.

माझं नाव नंदा, फिरायचा माझा धंदा

वाह क्या बात है!

एका डोश्याच्या ( साउथ इण्डियन फ्लेवर ) गाडीवर लिहिले होते

"मराठीत बोला, आम्हाला फक्त मराठीच कळते." (मराठी बाणा)

आणि त्याचा अगदी वर त्याच पाटीवर

|| सब का मालिक एक || (भैया फ्लेवर)

साजीर्‍या एकाने

दादांची कृपा असे लिहुन खाली ज्योती, सुरेश, मुन्नी, पप्या, गण्या, प्रकाश अशी अनेक मुलांची नावे लिहीली होती.

>> (जास्त भरू नको रे भाऊ. अनारकलीचे 'दिवस' भरणार नाही तर!)
काहीच्या काहीच....

एका ट्रकवर लिहिलं होतं " आलं बया दाजी !!!!!!!!!" मी खूप हसले होते हे वाचून.

मस्त कलेक्शन

भन्नाट रे साजिर्‍या! मी कसं मिसलं देवाक ठाउक!

एका ट्रक वर लिहिलेल...
"थोडा कम पी रानी ,महन्गा है इराक का पानी "....

साजिर्‍या, मान गये... व्यासंग अफाट आहे. Happy

माझा मित्र एकदा गाडी घेऊन कोकणांत गेला होता. त्याने गाडी जिथे पार्क केली होती तिथे काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्या मुलांचा बॉल एकदा गाडीला लागला. हा पठ्ठ्या त्यांना ओरडला. दुसर्‍या दिवशी तो बघतो तो गाडीवर ठळक दिसेल असं चांगल्या अक्षरांत कोरलं होतं 'ही गाडी चोरीची आहे.'

बिचार्‍याला गाडी रंगवायला द्यायला लागली.

मी असे वाचले आहे की sing is king हे टायटल अक्षयकुमारला असेच ट्रकवर वाचुनच सुचले होते.
पण त्याचा फायदा ट्रकवाल्याला झाला नाही.

मी एका कंटेनरच्या मागे वाचलं होतं,

"अपनी औकात मे रहना !"

त्या प्रचंड कंटेनरच्या पुढे (खरं तर मागे) आपली छोटीसी गाडी आपल्याला तिची औकात सांभाळूनच चालवावी लागते!

गगनभेदी गप्पांचे प्रणेते श्री. अनिम थत्ते यांच्या गाडीवर लिहीले आहे मी चक्रम आहे माझ्या मागे रहु नका, माझ्या पुढेही जाऊ नका

*******************
नतद्रष्ट वायरसमुळे खुप त्रास होतयं
एकदा टाईप केलेलं तीन वेळा येतयं
*******************

गगनभेदी गप्पांचे प्रणेते श्री. अनिम थत्ते यांच्या गाडीवर लिहीले आहे मी चक्रम आहे माझ्या मागे रहु नका, माझ्या पुढेही जाऊ नका

*******************
नतद्रष्ट वायरसमुळे खुप त्रास होतयं
एकदा टाईप केलेलं तीन वेळा येतयं
*******************

गगनभेदी गप्पांचे प्रणेते श्री. अनिम थत्ते यांच्या गाडीवर लिहीले आहे मी चक्रम आहे माझ्या मागे रहु नका, माझ्या पुढेही जाऊ नका

*******************
नतद्रष्ट वायरसमुळे खुप त्रास होतयं
एकदा टाईप केलेलं तीन वेळा येतयं
*******************

Pages