हॉर्न ओके प्लीज!!

Submitted by साजिरा on 3 June, 2008 - 05:32

ट्र्कवाल्यांची अभिरूची. तुमचं म्हणणं काय आहे?
माझं म्हणणं- एकदम जबरदस्त!
वैराण, तापलेल्या रस्त्यावरून वैतागभरला प्रवास करीत असताना एखाद्या ट्रकच्या मागे लिहिलेला सुविचार, शेर, पोट पकडून हसायला किंवा चक्क विचार करायला लावणारं वाक्य कधी वाचलंत?
हा अक्षरश: खजिना आहे मंडळी! काळाच्या ओघात (न जाणो ट्र्कवाल्यांची अभिरूची बदलली तर!) हा अमुल्य 'साहित्य-ठेवा' नामशेष होऊ नये, अन भविष्यकालीन इतिहाससंशोधकांना आयतं काम मिळू नये, म्हणून जमेल तेवढं, अन जमेल तसं साहित्य गोळा करून मायबोलीवर ठेवायचा मानस आहे. हे सध्या जेवढं आहे, त्याच्या हजारपट तुमच्या सहकार्यातून अन प्रतिक्रियांतून होईल याची खात्री आहे..

तो देवीयों ओर सज्जनों, पेश है-
दि ग्रेट इंडियन ट्रक लिटरेचर!!
--------------------

हॉर्न ओके प्लीज
(सॉरी मंडळी, पण 'पयलं नमन' बाप्पालाच की नाही? तसंच हेही!)

साऊंड वेट हॉर्न फॉर प्लीज साईड
(कळलं का? 'साऊंड हॉर्न प्लीज' 'वेट फॉर साईड' - दोन वेगळ्या सुचना.)

स्टॉप साऊंड ओके हॉर्न सिग्नल
(वरच्यासारखंच. दरवेळी आपण नाही बुवा फोड करून सांगणार.)

A, पाहू नकोस, प्रेमात पडशील!
(काय प्रेमळ धमकी! बहुधा प्रेमात 'पडशील' असं म्हणायचं असेल.)

A, तु Q जलता?
(कशावर भाऊ? समानार्थी- 'जलो मगर दीप के समान', 'मुझपे जलनेवाले तेरा मुंह काला', 'जलनेवाले जलते रहो, चलनेवाले चलते रहो' इथपर्यंत ठीक आहे हो; पण सर्वात कळस म्हणजे-
'आग लगे तेरी दौलत को!!' मागनं गाडी चालविणार्‍याची झोप उडविण्याचाच प्रकार की हो!)
हे खानदान फार मोठे पसरले आहे. आणखी बघा-

O नाना O तात्या A भाऊ Q रे बापू
A, आती क्या खंडाला?

घर कब आओगे, पोपई खाने को!
(आयला, कोणाला कोणती गोष्ट मोटिव्हेट करेल, काही सांगता येत नाही.)

भगवान सबका भला करे शुरू मेरेसे करे.
(विशेष काही नाही हो. आपले पुढारी नाही का, स्वतःच्या शेतीसाठी कॅनॉल फिरवितात, पण सर्व शेतकर्‍यांचं भलं केल्याचा आव आणतात. ट्रकवाले बिचारे प्रामाणिक तरी. हेतू सुरूवातीलाच सांगून टाकतात.)

जर वाचवायचे असतील प्राण, तर घाला नेहमी शिरस्त्राण.
(जनप्रबोधनाचा वसा काही घेतात. पण कधीकधी त्यासाठी आपलं प्राथमिक शिक्षणही त्यांना आवश्यक वाटत नाही. खालचा नमूना वाचा-)
कंदम कप कप, यवन संबं जप जप
(ओळखलं तर तुम्ही खरे मायबोलीकर बुवा!)

पढलिखकर बाबूजी बने, चले नोकरी ढुंढनेको,
बेकारीकी ठोकरे खायी, आये वापिस ट्रक चलानेको.
(स्वतःचं आत्मचरित्र अन 'विस्तवी' वास्तव- दोन्ही फक्त दोनच ओळींत! कुठल्या बड्या साहित्यिकाची आहे टाप?)

१ बस १३ ही ७
('१३ मेरा ७' चा एका ट्रकवाल्या 'रामू' ने केलेला रिमेक! एक शंका (शेणखा तिचैला!)- हिंदीत हे लोक साताला 'साथ' का म्हणतात हो?)

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
(आतमध्ये बसून रडतच असेल बहूतेक. एवढे शूर होते राजे, पण याला घाबरून कसचे येतात. राजांचं नुसतं नावही काहींना पुरतं बघा-)
'राजे', 'महाराज', 'शिवबा', 'जय शिवराय', 'जय भवानी, जय शिवाजी', 'शिवशाही',
'शिवबा जीव तुटतो रे'...!
(याच्या कॉलनीत 'भय्ये' जास्त आले बहूतेक!)

खुदा गारद करे ट्रक बनानेवालोंको, घरसे बेघर कर दिया हम ट्रक चलानेवालोंको!
(टाटांचे दिवस काही बरे नाहीत बुवा. आधीच काही लोक- 'नॅनो' बनविणारे मुर्दाबाद- म्हणू लागलेत.)

भरके चली अनारकली
(जास्त भरू नको रे भाऊ. अनारकलीचे 'दिवस' भरणार नाही तर!)

मुलगी झाली, शाळा शिकली, प्रगती झाली.
(इथपर्यंत कॉमनच आहे हो. पण खालचं वाचून स्वतःला अप्डेट करा बघू-)
मुलगी झाली, शाळा शिकली, राष्ट्रपती झाली!

जगह मिलनेपर पास दिया जायेगा, आगे जानेवालोंको माफ किया जायेगा!
(एवढे 'मवाळमतवादी' ट्रकवाले दुर्मिळ झालेत.. काही फारच आक्रमक असतात हो. उदाहरण बघा-)
दम है तो पास कर, वरना बरदाश्त कर..!

मेरे ख्वाबोंकी तसबीर, मेरी गाडी, मेरी तकदीर!
('अनारकलीची'च दुसरी आव्रुत्ती. गाडीवरचं प्रेम बघा!)

कुणाच्या गाडीवर, कुणाचे ओझे.
(अध्यात्माच्या मार्गाला लागलेला असा एखादा विरळाच!)

१०० मे से ९९ बेईमान, फिरभी मेरा भारत महान!
(अंतिम सत्य. नुसतंच 'मेरा भारत महान' लिहिण्याचे दिवस संपले.)

वाट पाहीन पण ७१७६ नेच जाईन..
(७१७६ हा त्याचा गाडी नंबर. वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन असं वाचून दया आली होती. आता हा
७१७६ वाला पठ्ठ्या मालवाहतूक सोडून माणसांची वाहतूक करणार काय? पीएमटी आधीच एम्टी धावतेय म्हणावं!)

-
आता एक ट्र्क आठवला, अन थोबाडीत मारल्यागत झालं. म्हणजे काय, अगदी जमिनीवरच आलो..
ते सांगतो, अन थोडी विश्रांती घेतो-

'काम पे जा, चांद पे मत जा!'

-
-
-
-
-
आणखी काही आहेच मंडळी. पण तोपर्यंत जरा तुमचीही पोतडी उघडा की राव!

गुलमोहर: 

अलीकडे एका रिक्षेवर वाचले आणि चार दिवसांनी पुन्हा तीच रिक्षा समोर आली. ते असे होते -

आईचा आशीर्वात
बापाने दिली लाथ
म्हणून सुदरलो आज

मला आजवर हॉर्न ओके प्लीज चा अर्थ कळलेला नाही. 'हॉर्न प्लीज' समजू शकतो पण 'ओके' काय?

===================================
हॉर्न प्लीज असेच असते. पण ओके हे मधे लिहीलेले असते.

मी गेल्या आठवड्यात एका रिक्षावर वाचल होतं
"तु KC है"...........
१/२ तास विचार करत होते की याला नक्की काय म्हणायच आहे, मग कळलं की त्याने तु कैसी है अस लिहील होतं

>>मला आजवर हॉर्न ओके प्लीज चा अर्थ कळलेला नाही. 'हॉर्न प्लीज' समजू शकतो पण 'ओके' काय?
डाव्या बाजूने ओव्हर्टेक करायचा तर हॉर्न द्या
उजव्या बाजूने ओव्हर्टेक करायचा असेल तर हॉर्न देण्याची गरज नाही, प्लीज पुढे जा
आणि मागे मागे यायचे असेल तर नो प्रॉब्लेम, - ओके

माझ्याकडुन काही -

एका ट्रकच्या मागे - सोडु का साप ?

एका पुणेरी रिक्षाच्या मागे - माझे टायर गेले मी सुखी झालो. तुम्ही दु:खी झालात हे लक्षात ठेवा.

पुन्हा एक ट्रक - जायेगा कमानेकु... तो रोटी मिलेगी शामकु..

एका ट्रक वरचं वास्तव -
अमिरोंकी जिंदगानी, विस्की और केक..
ड्राईवरोंकी जिंदगानी, ऐक्सलीटर और ब्रेक..

ह ह पु वा
'शिवबा जीव तुटतो रे'...! was the best
followed by साप सोडू का!
म्हणजे काहीही!
ह्या भन्नाट कलेक्शन बद्दल धन्यवाद!

साजिरा तुफान आहेस.
दिल्लीत असताना भयाण शेर वाचले होते. त्यातला एक ट्रक जास्त लक्षात राहीला. आम्ही मारुतीमध्ये होतो. गाडी थांबवताना प्रोब्लेम होत होता. मला गाड्यांच ज्ञान नसल्याने कळेना. शेवटी ड्रायव्हरने सांगितलं,'ब्रेक खराब आहे.' गाडी सिग्नलला गचके घेत थांबली. पुढच्या ट्रकवर होतं 'अबे, औकातमे रहना.'
इंधनाच्या टाकीवर लिहीलेले प्रकार पण खासच असतात... खाद्यमंत्री, पेट पुजा..

इंधनाच्या टाकीवर लिहीलेले प्रकार पण खासच असतात... खाद्यमंत्री, पेट पुजा >>
===========
मी वाचलेले " खुराक मंत्री, ईराक का पानी "

एक अजूनः

१२ के फूल १७ की माला,
बुरी नजर वाले तेरा मुंह काला ||
===============
ह्यात गाडी चा नं १२१७ हे सांगणे नलगे ...

>>>घर कब आओगे, पोपई खाने को!
(आयला, कोणाला कोणती गोष्ट मोटिव्हेट करेल, काही सांगता येत नाही
.>>>>>सोनू, मनू, पिंकी, रमेश, माई
(खालच्या ओळीत) Bank of Maharashtra च्या सौजन्याने
>>>देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है !

भन्नाट
Rofl Biggrin Rofl Biggrin Rofl Biggrin Rofl Biggrin Rofl Biggrin

परवा एका ट्रकवर एक असच अफलातून वाचलं..
'रास्तेपर चली सवारी, गराजमे हुवा सिन्गार..
मालीकसे हो गयी शादी , और ड्रायव्ररसे हो गया प्यार!!'

वा! साजिरा...खुपच मस्त....वाट लागली हसून हसून Rofl तुमचा लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही वाचून. खरंच किती मजेशीर लिहिलेलं असतं ट्रक, रिक्षा यांच्या मागे...ते वाचता वाचता लांबचा प्रवास सुद्धा सुखकर होतो...
आपले महाराष्ट्र शासनाचे जागोजागी लिहिलेले संदेश सुद्धा असेच भारी असतात. विनोदी नसले तरी...
जसे-
घाई नाशाची आई
haste is waste
दूर्घटनासे देर भली
हळू जा. घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे. (असंच काहीतरी...नीट आठवत नाहीये)
हम दो हमारे दो (हल्ली हम दो हमारा एक)
पुढे शाळा आहे; वाहने सावकाश हाका (जसे काही सगळे बैलगाडीच हाकत आहेत)

Pages