हॉर्न ओके प्लीज!!

Submitted by साजिरा on 3 June, 2008 - 05:32

ट्र्कवाल्यांची अभिरूची. तुमचं म्हणणं काय आहे?
माझं म्हणणं- एकदम जबरदस्त!
वैराण, तापलेल्या रस्त्यावरून वैतागभरला प्रवास करीत असताना एखाद्या ट्रकच्या मागे लिहिलेला सुविचार, शेर, पोट पकडून हसायला किंवा चक्क विचार करायला लावणारं वाक्य कधी वाचलंत?
हा अक्षरश: खजिना आहे मंडळी! काळाच्या ओघात (न जाणो ट्र्कवाल्यांची अभिरूची बदलली तर!) हा अमुल्य 'साहित्य-ठेवा' नामशेष होऊ नये, अन भविष्यकालीन इतिहाससंशोधकांना आयतं काम मिळू नये, म्हणून जमेल तेवढं, अन जमेल तसं साहित्य गोळा करून मायबोलीवर ठेवायचा मानस आहे. हे सध्या जेवढं आहे, त्याच्या हजारपट तुमच्या सहकार्यातून अन प्रतिक्रियांतून होईल याची खात्री आहे..

तो देवीयों ओर सज्जनों, पेश है-
दि ग्रेट इंडियन ट्रक लिटरेचर!!
--------------------

हॉर्न ओके प्लीज
(सॉरी मंडळी, पण 'पयलं नमन' बाप्पालाच की नाही? तसंच हेही!)

साऊंड वेट हॉर्न फॉर प्लीज साईड
(कळलं का? 'साऊंड हॉर्न प्लीज' 'वेट फॉर साईड' - दोन वेगळ्या सुचना.)

स्टॉप साऊंड ओके हॉर्न सिग्नल
(वरच्यासारखंच. दरवेळी आपण नाही बुवा फोड करून सांगणार.)

A, पाहू नकोस, प्रेमात पडशील!
(काय प्रेमळ धमकी! बहुधा प्रेमात 'पडशील' असं म्हणायचं असेल.)

A, तु Q जलता?
(कशावर भाऊ? समानार्थी- 'जलो मगर दीप के समान', 'मुझपे जलनेवाले तेरा मुंह काला', 'जलनेवाले जलते रहो, चलनेवाले चलते रहो' इथपर्यंत ठीक आहे हो; पण सर्वात कळस म्हणजे-
'आग लगे तेरी दौलत को!!' मागनं गाडी चालविणार्‍याची झोप उडविण्याचाच प्रकार की हो!)
हे खानदान फार मोठे पसरले आहे. आणखी बघा-

O नाना O तात्या A भाऊ Q रे बापू
A, आती क्या खंडाला?

घर कब आओगे, पोपई खाने को!
(आयला, कोणाला कोणती गोष्ट मोटिव्हेट करेल, काही सांगता येत नाही.)

भगवान सबका भला करे शुरू मेरेसे करे.
(विशेष काही नाही हो. आपले पुढारी नाही का, स्वतःच्या शेतीसाठी कॅनॉल फिरवितात, पण सर्व शेतकर्‍यांचं भलं केल्याचा आव आणतात. ट्रकवाले बिचारे प्रामाणिक तरी. हेतू सुरूवातीलाच सांगून टाकतात.)

जर वाचवायचे असतील प्राण, तर घाला नेहमी शिरस्त्राण.
(जनप्रबोधनाचा वसा काही घेतात. पण कधीकधी त्यासाठी आपलं प्राथमिक शिक्षणही त्यांना आवश्यक वाटत नाही. खालचा नमूना वाचा-)
कंदम कप कप, यवन संबं जप जप
(ओळखलं तर तुम्ही खरे मायबोलीकर बुवा!)

पढलिखकर बाबूजी बने, चले नोकरी ढुंढनेको,
बेकारीकी ठोकरे खायी, आये वापिस ट्रक चलानेको.
(स्वतःचं आत्मचरित्र अन 'विस्तवी' वास्तव- दोन्ही फक्त दोनच ओळींत! कुठल्या बड्या साहित्यिकाची आहे टाप?)

१ बस १३ ही ७
('१३ मेरा ७' चा एका ट्रकवाल्या 'रामू' ने केलेला रिमेक! एक शंका (शेणखा तिचैला!)- हिंदीत हे लोक साताला 'साथ' का म्हणतात हो?)

राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
(आतमध्ये बसून रडतच असेल बहूतेक. एवढे शूर होते राजे, पण याला घाबरून कसचे येतात. राजांचं नुसतं नावही काहींना पुरतं बघा-)
'राजे', 'महाराज', 'शिवबा', 'जय शिवराय', 'जय भवानी, जय शिवाजी', 'शिवशाही',
'शिवबा जीव तुटतो रे'...!
(याच्या कॉलनीत 'भय्ये' जास्त आले बहूतेक!)

खुदा गारद करे ट्रक बनानेवालोंको, घरसे बेघर कर दिया हम ट्रक चलानेवालोंको!
(टाटांचे दिवस काही बरे नाहीत बुवा. आधीच काही लोक- 'नॅनो' बनविणारे मुर्दाबाद- म्हणू लागलेत.)

भरके चली अनारकली
(जास्त भरू नको रे भाऊ. अनारकलीचे 'दिवस' भरणार नाही तर!)

मुलगी झाली, शाळा शिकली, प्रगती झाली.
(इथपर्यंत कॉमनच आहे हो. पण खालचं वाचून स्वतःला अप्डेट करा बघू-)
मुलगी झाली, शाळा शिकली, राष्ट्रपती झाली!

जगह मिलनेपर पास दिया जायेगा, आगे जानेवालोंको माफ किया जायेगा!
(एवढे 'मवाळमतवादी' ट्रकवाले दुर्मिळ झालेत.. काही फारच आक्रमक असतात हो. उदाहरण बघा-)
दम है तो पास कर, वरना बरदाश्त कर..!

मेरे ख्वाबोंकी तसबीर, मेरी गाडी, मेरी तकदीर!
('अनारकलीची'च दुसरी आव्रुत्ती. गाडीवरचं प्रेम बघा!)

कुणाच्या गाडीवर, कुणाचे ओझे.
(अध्यात्माच्या मार्गाला लागलेला असा एखादा विरळाच!)

१०० मे से ९९ बेईमान, फिरभी मेरा भारत महान!
(अंतिम सत्य. नुसतंच 'मेरा भारत महान' लिहिण्याचे दिवस संपले.)

वाट पाहीन पण ७१७६ नेच जाईन..
(७१७६ हा त्याचा गाडी नंबर. वाट पाहीन पण पीएमटीनेच जाईन असं वाचून दया आली होती. आता हा
७१७६ वाला पठ्ठ्या मालवाहतूक सोडून माणसांची वाहतूक करणार काय? पीएमटी आधीच एम्टी धावतेय म्हणावं!)

-
आता एक ट्र्क आठवला, अन थोबाडीत मारल्यागत झालं. म्हणजे काय, अगदी जमिनीवरच आलो..
ते सांगतो, अन थोडी विश्रांती घेतो-

'काम पे जा, चांद पे मत जा!'

-
-
-
-
-
आणखी काही आहेच मंडळी. पण तोपर्यंत जरा तुमचीही पोतडी उघडा की राव!

गुलमोहर: 

मी एका ट्रकच्या मागे नुकताच वाचलेला एक शेर :

तकदीर से नाराज हूं, घर से दूर हूं |
जी रहा हूं इसलिये की किसी की माँग का सिंदूर हूं |

सहिये साठा. Rofl

खालील ओळीची समस्यापूर्ती करा. हे कुठेतरी ट्रकच्या मागे वाचलेलं, पूर्ण काव्य आठवत नाहिये. Proud

बेली का फुल, चमेली की माला,
______, डायवर का साला

कंदम कप कप, यवन संबं जप जप चा अर्थ सांगितला तर मॉड्स जपाला बसवतील मला!!
हे अजून थोडे घ्या- आईचा आशिर्वाद,काकूचा पैसा
हमें तो अपनों ने मारा,गैरोंमें कहां दम था,
मेरा चालान वहां हुआ जहां वजन कम था।
कोकणात एका ट्रकमागे टिपीकल कोकणी विचार लिहीला होता- 'देवाक काळजी'

आजच एक ट्रक-वाक्य वाचले.

परदेस जा रही हुं खयाल रखना| लौट के आउंगी माल तयार रखना.

चलती है शेरलेट (शेवर्लेट !) उडती है धुल
ड्रयव्हर के हाथ मे गुलाब का फूल !!

चमकला धृवाचा तारा
धन्य तो उत्तर सातारा

एका टँकर वर लिहिलं होतं

कत्ल करो नजरों से, तलवारों में क्या रखा है,
सफर करो टँकरों में, कारों में क्या रखा है Happy

संग्रह खुप छान आहे...
एका रिक्षेवर लिहलेलं.. 'A काय बघते'

लहान असतांना गाडी पार्क करण्याच्या बाजूला पाटी होती त्यावर लिहिले होतं 'साहेबांच्या गाडिला हात लावू नये' मित्राने सहज चालता चालता एका अक्षरावर दिलेल्या अनुसस्वारामुळे मला एका टिंबाचे महत्व कळालं .... हा विषय वेगळा आहे सहज म्हणून आठवलं...

Pages