विश्वमोहिनी मोहनवीणा

Submitted by नितीनचंद्र on 12 December, 2014 - 15:18

काही लोक स्वत: गायक/वादक व अर्थातच संगीत प्रेमी असतात. काही गायक/वादक नसतात पण तांत्रीक अंगाने संगीताचा आस्वाद घेण्यात त्यांना आनंद मिळतो. मला जाता जात सहज म्हणुन कानावर पडेल ते फ़ारस शास्त्रीय / उपशास्त्रीय किंवा सुगम असे भेद न करता जे कानाला आवडेल ते ऐकण्याचा हेतु ठेऊन ऐकणे आवडते.

सर्वात प्रथम जेव्हा माझ्या जिजाजीनी मोहनवीणा नावाचे गिटार सारखे वाद्य खरेदी करुन रिटायर्डमेंट नंतर शिकण्यास प्रारंभ केला तेव्हा मोहनवीणा हे वाद्य विचीत्रविणा या पारंपारिक वाद्यापेक्शा काही जास्तच विचीत्र आहे की काय असा मनात एक विचार येऊन गेला. सरस्वतीची वीणा, दाक्षिनी वादक वाजवत असत ती विचीत्रवीणा आणि पं रविशंकरांनी ज्यावर हुकुमत मिळवत सगळ्या जगाला वेड लावल ती सतार या पेक्शा हे तंतुवाद्य काय वेगळे आहे हे जाणण्याचा प्रयत्न मी केला. मला जिजाजींनी यु ट्युबवर पं विश्वमोहन भट त्यांची मोहनविणा याची एक झलक दाखवली. हे वाद्य पं विश्वमोहन भट यांनी सतार, गिटार, सरोद आणि व्हायोलीन यांचे गुण साधत स्वत: निर्माण केले आहे हे ऐकुन या व्यक्ती आणि या वाद्या विषयी कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले.

चिंचवड जशी किरण यज्ञोपवित, मुक्ता बर्वे तसेच प्रशांत दामले यांची बालपण जोपासलेली भुमी तसेच संगीत क्शेत्रात कै. वसंतराव देशपांडे याचे दोन शिष्य़ पं. पदमाकर कुलकर्णी आणि डॉ. रविंद्र घांगुर्डे या गायक आणि संगीत नाटकाला जोपासणारे तसेच स्वत: सं. कट्यार काळजात घुसली या सारख्या दमदार नाटकाचे अनेक प्रयोग खासाहेबांच्या भुमिकेने गाजवणारे कलाकारांची पण भुमी आहे. डॉ. वसंतराव देशपांडे फ़ॊउंडेशनच्या वतीने जेव्हा पं. विश्वमोहन भट यांचा पहिला कार्येक्रम चिंचवडला झाला तेव्हा पंडितजींना जवळुन पहाण्याचा योग नाना दामले यांच्यामुळे मला आणि अर्थात जिजाजींनाही आला. त्यांचे निगर्वी सुमधुर हास्य आणि प्रथम भेटीत विंगेत सुध्दा अपरिचितांना काही क्शण देण्याचे औदार्याने मी तर मोहुन गेलो होतो.

पहिल्या मैफ़िलीत मी ते वाद्य बंद सभागृहात शांतपणे ऐकत होतो तेव्हा त्याचे मोहिनी घालणारे वेगळेपण जाणवत होते पण तांत्रीक दृष्ट्या हे का ते समजत नव्हते. पंडितजींनी वाजवलेला राग आणि वाद्याच्या प्रदर्शनार्थ काढलेले वेगवेगळे आवाज जसा मोराचा हे तर अप्रतिम होते. पंडितजी वाजवताना मधे राग मधे मधे गाऊनही दाखवत होते आणि वाद्याचे वैषीष्ठ्य सांगाताना हे वाद्य गायकीच्या अंगाने कसे वाजते हे प्रदर्शन सुंदरच होते.

काल महासाधु मोरया गोसावी यांच्या उत्सवात पंडितजींनी पुन्हा हजेरी लावली. सत्कार स्विकारताना असो किंवा संवाद साधताना पंडितजींना पदमश्री सारख्या भारतीय पुरस्काराबरोबरच ग्रॅमी सारखा परदेशी आणि फ़क्त दोन भारतीय कलाकारांना तो मिळालेला आहे त्यापैकी एक पंडितजी आहेत. याचा रुबाब, आत्मप्रौढी सारख्या भावना न दिसता फ़क्त विनम्रता दिसत होती. हा दौरा खास चिंचवड साठी नसावा तर पुण्यात सुरु असलेल्या सवाई गंधर्वच्या कार्येक्रमाला सुध्दा ते आले असावेत.

220px-Vishwa_Mohan_Bhatt_1.jpg

मागच्या वेळेला जे पंडितजी सांगत होते की हे वाद्य जरी असले तरी जसे गायकाला गळ्यातुन स्वर काढता येतात त्याजवळपासची क्षमता या वाद्याची आहे याचा खास परिणाम कालच्या मारुबिहाग रागाच्या प्रदर्शनातुन जाणवला. मारुबिहागची ही खासीयत होती की काय ते समजले नाही. अनेक तारांच्या कंपनातुन निर्माण होणारा रेझोनन्स आणि त्याची खासीयत तसेच सतार, गिटार, सरोद आणि व्हायोलीन यांचे वेगळेपण एकत्रीत पणे या वाद्यातुन निर्माण होते हा प्रयोग तर नाविन्यपुर्ण आहे. ८८ देशांमध्ये प्रवास करुन आपली कला सादर केलेला हा कलाकार आणि त्यांची मोहनवीणा माझ्यामते फ़ारशी प्रसिध्द नाही. ( चुकभुल देणे ) याचे कारण जसा हार्मोनियमला त्याच्या अंतर्गत रचनेच्यामुळे मींड निर्माण करण्याचा अभावाने रागदारी किंवा ज्याला सोलोवादन म्हणता येइल असे वाजवण्याला फ़ारसा सन्मान मिळाला नाही तसा दोष तंतुवाद्यात नाही. पण ती हुकुमत मिळाल्या शिवाय तो कलाकार आणि वाद्य संगीतप्रेमींना रुचत नाही हेच असावे. सरोदवाद्क अमजद अलीसाहेब, संतुर वादक पं शिवकुमार शर्मा यांना जी प्रसिध्दी पं. रविशंकराच्या बरोबरीने मिळाली ती मात्र पं. विश्व मोहन भट यांना लाभली नाही असे वाटते. याच कारण सुरवातीच्या दुरदर्शनच्या काळात जेव्हा हे मातब्बर दिसायचे त्या काळात पं विश्वमोहन भट लांब राहिले असावेत.

पं. विश्वमोहन भट यांच्या बाबतची आणि मोहनवीणेची तांत्रीक अधिक माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. http://www.vishwamohanbhatt.com/profile.htm

युट्युबवर तर अनेक मैफीली आहेत.

पं विश्वमोहन भट यांच्या कलेचा सन्मान जगभरात झाला आहे पण परिचय फ़ार संगीतप्रेमींना नसावा या भावनेने हा लेखन प्रपंच आहे. मायबोलीवर तुलाच विश्वमोहन भट माहित नव्हते आम्हाला अनेक वर्षे माहित आहेत असा सुर परदेशातल्या मायबोलीकरांनी आळवल्यास विशेष नाही. भारतातले मायबोलीकर काय म्हणतात हे जाणण्याची उत्सुकता मात्र आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती !

वीणेचे प्रकार किती आणि कसे असतात ? म्हणजे वाद्यातच वेगळेपण असते का ?
रूद्रवीणा, सरस्वतीवीणा, मोहनवीणा, इ. ?

माहिती चांगली आहे..

विश्वमोहन भट.. हे खूप वर्षांपासून वाजवतात आणि संगीत क्षेत्रातील लोकांना नक्कीच माहिती आहेत.. त्यांची वाजवण्याची स्टाईल युनिक आहे. आणि मैफल फारच सुरेख रंगवतात..

वीणेचे प्रकार इथे आहेत..
http://en.wikipedia.org/wiki/Saraswati_veena
http://en.wikipedia.org/wiki/Rudra_veena
http://en.wikipedia.org/wiki/Vichitra_veena
http://en.wikipedia.org/wiki/Gottuvadhyam

आणि सगळ्यात नवीन असलेली मोहनवीणा..

छानच! पंडितजी आणि त्यांची बहीण मंजु मेहता (सतारवादक) दोघेही प. रवी शंकरांकडे शिकले. मोहनवीणेवर आलाप फार सुंदर वाजतो! त्यांचा अप्रतिम झिंझोटी आहे ट्युबवर!

kharach khup chhan....
Pandit ji amachya ghari aale hote...tyana
atishay javalun ekayala ani baghayala milale ahe..

छान लिहिलंय.
वर कुलूने लिहिलंय त्याला 'मम' Happy
ऐकत राहा, लिहीत राहा...संगीतास्वाद घेत राहा.

छान लेख. माहीत आहेत की... पंडितजींनी अनेक फिल्मी गाण्यांत वाजवलय... तसच 'कलोनियल कझिन्स' सारख्या फ्युजन ग्रुप्स बरोबरही.
सिडनीत त्यांचा एक कार्यक्रम ऐकला त्यात त्यांनी पाश्चिमात्य पियानिस्ट बरोबर जुगलबंदी वाजवली होती... पं. रवीशंकर ह्यांची एक सिम्फनी बेस होता. मजा आली.