ओट्स वाफल्स (फोटोसहित)

Submitted by स्वाती२ on 11 December, 2014 - 09:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ १/२ कप ओट्स फुड प्रोसेसर मधे पीठ करुन
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून मीठ
१ टे. स्पून साखर
३ १/२ टेबलस्पून तेल - मी कनोला वापरते.
३/४ कप दूध, हे रूम टेंपला असणे महत्वाचे. -
२ अंडी
१ टीस्पून वॅनिला इसेन्स

क्रमवार पाककृती: 

एका बोल मधे ओट्सचे पीठ, बेकिंग पावडर, मीठ अणि साखर वायर विस्कने एकत्र करुन घ्या. दुसर्‍या बोलमधे दूध आणि तेल एकत्र करा. त्यातच दोन अ‍ॅडी फोडून घाला. वायर विस्क वापरून छान बीट करुन घ्या. आता वॅनिला इसेन्स घालून नीट ढवळा आणि हे मिश्रण ऑट्सच्या मिश्रणात घाला. मोठ्या पळीने ढवळून घ्या. मिश्रण अगदी केक बॅटरसारखे एकजीव होणार नाही. काळजी करु नका. मिश्रण १० मिनिटे झाकून ठेवा. १० मिनिटानी नीट ढवळून घ्या. वाफल मेकर प्री हीट करत ठेवा. गरम झाला की पळीने मिश्रण घालून वाफल्स तयार करा.
waffles with berries.jpg

वाढणी/प्रमाण: 
६ आयताकृती वाफल्स + १ छोटा वाफल. ३ जणांना ब्रेकफास्टसाठी पुरेसे
अधिक टिपा: 

मी स्किम मिल्क वापरले. आल्मंड मिल्क वापरले तरी चालेल. दूधाच्या जोडीला अंडीही शक्यतो रुम टेंपला असावीत. लहान मुलांसाठी, वाफल्सच्या मिश्रणात मिनी चॉकलेट चिप्स घालता येतील. चवीत बदल किंवा फेस्टिव करण्यासाठी चिमुटभर पंपकिन स्पाईस घातल्यास छान स्वाद येतो. हे वाफल्स छान फ्रीज होतात. सकाळी टोस्टरमधे गरम केले की झाले.

माहितीचा स्रोत: 
इंटरनेट वरील http://cookieandkate.com/2014/easy-gluten-free-oat-waffles/ ही पाककृती . मी मला सोईचे बदल केले.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त दिसतायत वॉफल्स. कोपर्‍यात पांढरट का दिसतायत?
समहाऊ मला वॉफल आयर्नचं टेक्निक कधी जमलंच नाही. शेवटी वैतागून मी कचर्‍यात टाकली.

धन्यवाद.
सिंडरेला , रोल्ड ओट्स घेतले.
>>वॉफल्स ओटमुळे चिवट होतात का?>> नाही. दूध आणि अंडी रूम टेंपला असणे महत्वाचे.

>>कोपर्‍यात पांढरट का दिसतायत?>>
सायो, कोपर्‍यात बॅटर थोडे कमी झाले त्यामुळे वरच्या बाजूने कॉन्टॅक्ट कमी पडला त्यामुळे कडा कमी ब्राऊन झाल्यात.

ओके. मी आयर्न अजून फेकली नाही तेव्हा एक प्रयत्न करून बघेन. वॉफल्स खूप आवडतात त्यामुळे फ्रोजन खाते नाही तर आवडीच्या रेस्टॉरंटमधून प्याक करून आणते.

मस्त रेसिपी नक्की करून बघ्णार !

सायो आणि सिंडी मी तर वॅफल्स मेकर च्या प्रेमात आहे अगदी थॅन्क्स्गिविंग ला अजून एक खरेदी केलिये.
पहिल्या चौकोनी वर वॅफल्स करताना बॅटर ओसंडून वाहत होते. मला नक्की माहित नव्ह्ते किती प्रमाणात मिश्रण घालायचे. नविन ब्लॅक अ‍ॅन्ड डेकर च्या सुचना फॉलो केल्यावर दोन्ही मस्त होताहेत. Happy

फेकून देउ नकोस वॅफल आयर्न सिंडे....त्या वर सँड्विचेस ग्रिल करते. छोटे ऑम्लेट बनवता येते. कसाडियाज पण करते कधी कधी चिज वगैरे टाकून.र्फ्रेन्च टोस्ट पण. Happy

बघायला हवं करून. ओट्स आणि वॉफल्स दोन्ही आवडतात. Happy
(आणि वॉफल आयर्नपण आवडते. :P)

डॅफो, त्यात ग्रिल बिल करायचं डोक्यात आलं नव्हतं. ट्राय मारणार नक्की. Happy

त्या वर सँड्विचेस ग्रिल करते. छोटे ऑम्लेट बनवता येते. कसाडियाज पण करते कधी कधी चिज वगैरे टाकून.र्फ्रेन्च टोस्ट पण>>संपदा, हे कसं करायचं?

पण>>संपदा, हे कसं करायचं?>
प्रिती,
वॅफल आयर्न चालू करून ग्रिन लाईट लागला की अंड्याचं कांदा टोमॅटो किंवा भाज्या घातलेलं मिश्रण घालायचं २ मिनिटात मस्त ऑम्लेट होतं.
अगं सोप्प आहे खूप बिना तेलाचं ऑम्लेट बनवता येतं नक्की ट्राय कर.
टॉर्टीया वर हवं ते फिलिंग घालून ग्रिल करता येतं.
भाज्या भरून सॅन्ड्विच ग्रिल करता येतं... आपण ब्रेड मधे बटाट्याची भाजी भरून करतो ती खमंग सँड्विचेस ग्रिल होतात
आय लव्ह वॅफ्ल्स Wink