जागो ग्राहक जागो....

Submitted by मनोज. on 10 December, 2014 - 08:24

आपण रोज अनेक ठिकाणी ग्राहक म्हणून वावरत असतो.. बँका / वित्तीय संस्था, डॉक्टर्स, विमानसेवा, मोबाईल / इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर आणि सर्व प्रकारची दुकाने...

ग्राहक म्हणून आपल्याला आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्वांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील अशी अपेक्षा आहे.

माझे [ सध्या लगेच आठवणारे Wink ] दोन अनुभव..

*****************************************************************

लै लै लै भारी समजली जाणारी अत्यंत हुच्चभ्रू अशी बँक.
स्थळ: पुण्यापासून ३५० किमी दूर - महाराष्ट्रातच.
दिवस: बुधवार - कोणताही पब्लीक हॉलीडे नाही.
वेळ: दुपारी १:००

मी ज्या पार्टीसोबत होतो त्यांचे या बँकेत व्यावसायीक करंट अकाऊंट आहे आणि त्यावर नेहमी भरभक्कम व्यवहार होतात. "Any Branch Banking" हा टॅगही असल्याने त्या बँकेच्या कोणत्याही बँकेत कितीही रकमेचे व्यवहार विनासायास होतात. अर्थात मोठी रक्कम काढावयाची असेल तर बँकेला आधी पूर्वसूचना देणे आवश्यक असते मात्र हा व्यवहार पैसे खात्यात भरावयाचा होता.

बँकेत प्रवेश करून कॅशीयरच्या लाईनीत उभारणे, त्या दरम्यान नोटांचे विवरण तयार करणे व डिपॉझीट स्लिप भरणे वगैरे सोपस्कार पार पडले.

कॅशीयर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.. थांबा साहेबांना विचारतो..
साहेब (असिस्टंट मॅनेजर) : तुमची कॅश स्वीकारता येणार नाही.
मी : कारण कळेल का..?
असिस्टंट मॅनेजर : तुमचे इथले अकाऊंट नाहीये.
मी : हरकत नाही साहेब.. एनी ब्रँच बँकींग आहे.
असिस्टंट मॅनेजर : तरीपण घेवू शकत नाही.
मी : तुमच्या मॅनेजरला बोलवा.
असिस्टंट मॅनेजर : साहेब रजेवर आहेत. मीच मॅनेजर आहे आज. कॅश घेता येणार नाही.
मी : नियम बघा.. घेता येते. मी महाराष्ट्रात सगळीकडे भरतो. व्यवहार बघा तुमच्या सिस्टीममध्ये.. आणि गावांची नावे बघा.
असिस्टंट मॅनेजर : नाही घेणार.

(आम्ही एकदम गोंधळून गेलो होतो)

आता सोबतच्याने रिंगणात प्रवेश केला..

अहो साहेब.. आमचेच अकाऊंट आहे... सगळीकडे कॅश घेतात...

असिस्टंट मॅनेजर : (बोलणे मध्येच तोडून आणि अत्यंत उद्धट सुरात..) अहो तुम्हाला सांगीतले आहे ते कळतेय का..? कॅश घेणार नाही..

आता दोघांचेही फ्युज गेले..

मी : ओ भाषा सुधारा..

सोबतचा : ओ तुम्हाला हे जड जाईल.. लेखी द्या कॅश घेत नाही म्हणून.

असिस्टंट मॅनेजर : लेखी देणार नाही. काय करायचे ते करा.

मग आम्ही क्यू सोडला. आमच्याकडच्या एका कागदावर सगळा प्रसंग लिहून काढला आणि

यावर अ‍ॅक्नॉलेजमेंटची सही द्या अन्यथा आमच्या अकाऊंटला एक रिलेशनशिप मॅनेजर असाईन्ड आहे त्याला कॉल करतो असा दम दिला.

तो मॅनेजर सही देईल याची खात्री नव्हती कारण तशी सही देणे म्हणजे त्याने स्वत:च्या पंचनाम्यावर सही करण्यासारखे होते. पण साहेबांनी सही दिली.

आम्ही धावपळ करून दुसरी ब्रँच शोधली व पैसे भरले.

नंतर हे सगळे प्रकरण आणि त्या पत्राची प्रत cgmcsd@rbi.org.in या रिझर्व बँकेच्या ओम्बुड्समन \ कस्टमर केअरला पाठवली.

बँकेने विनाअट त्वरीत लेखी माफी मागीतली व त्या असिस्टंट मॅनेजर साहेबांची त्याठिकाणाहून २५० किमी दूर एका ब्रँचमध्ये "बॅक ऑफिस" ला बदली केली.

आता त्या ठिकाणी आमचे पैसे विनातक्रार स्वीकारतात.
*****************************************************************

ऑफिसमध्ये कामात बुडलेल्या अवस्थेत असताना अचानक फोन वाजला..

टेलीकॉलर -(मंजुळ सुरात..) मनोज सर बोलताय का..?

मी: हो.

टेलीकॉलर : मी ** सर्विसमधून बोलत आहे.. तुम्हाला कार घ्यायची आहे का..? तुमचे XXXX बँकेसोबत होम लोन आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला चांगले इंटरेस्ट रेट देवू शकतो आणि अशी अशी ऑफर आहे.. तुम्हाला इंटरेस्ट आहे का..? (हे सगळे एका दमात)

मी : (मनातल्य मनात) $%#^& हिला कसे कळाले माझे होम लोन आहे आणि ते पण या बँकेत..!!!!

मी: (अधिक माहिती मिळविण्यासाठी तिला घोळात घेत) मॅडम मला SX4 घ्यायची आहे. बोला..

आणि साधारणपणे १५ मिनीटांच्या चर्चेनंतर मला हवी ती माहिती कळाली.
त्या सेल्सवालीचे नांव, तिच्या मॅनेजरचे नांव आणि सर्वात महत्वाचे बँकेच्या ज्या मॅनेजरने ही माहिती दिली त्याचे नांव.

मग एक सुस्पष्ट असा मेल लिहिला.

Subject: Complaint - Sharing Personal Details with Third Party.

Hello,

This is मनोज. - My customer ID is १२३४५६७८९.

Today morning I got a call from a Maruti Automobile dealer "***" from Fugewadi Pune, asking for any requirement for Auto Loan. I was assured lucrative interest rate since I am a prevailed customer of XXXX Bank.

I was shocked to know that caller (Ms. XXXX from number +91-00000 00000) was referring to my home loan and my association with XXXX Bank. After demanding more information on 'my details available at their end' I got to know that "XXXX Has provided these details to her supervisor, Mr XXXX " and they have got data set for around 200 XXXX Home Loan customers.

Therefore I would like to know,

Is it legitimate to share Loan details / Personal details / Contact number with third party..?

If not - I request a thorough investigation as to "Why personal details were made available to third party"

I am really disappointed that such incident have taken place even after my contact number is registered for DND.

Please feel free to revert in case any information required from my side.

Regards,
मनोज.

नंतर त्या बँक मॅनेजरचा फोन आला.. त्यांनी असे फोन परत येणार नाहीत याची खात्री दिली आणि तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली

मारूतीच्या शोरूममधून ज्या मुलीने फोन केला तिने माफी मागावी अशी अपेक्षा आहे का..? असेही विचारले या गोष्टीस मी नकार दिला कारण माझे काम झालेले होते.

मला आजतागायत पुन्हा त्या शोरूम मधून किंवा कोणत्याही ठिकाणाहून Home Loan च्या रेफरन्सने फोन आलेले नाहीत.

*****************************************************************
ग्राहक म्हणून आपल्याला आलेले वाईट अनुभव आणि त्याविरोधात आपण कसा लढा दिलात हे येथे लिहूया.. यातून सर्वांना अनेक नवीन गोष्टी नक्की कळतील..
*****************************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. एवढा पाठपुरावा करुन काम करवून घेणारे फार कमी लोक असतात. पण ते आवश्यक असते.
मुळात यानंतर तुम्हाला त्या लोकांनी पुन्हा त्रास दिला नाही हे महत्त्वाचे. बरेच लोक याच विचाराने घाबरुन काही स्टेप घेत नाहीत.

पण साहेबांनी सही दिली.
>>>
म्हणूनच साहेबांची बदली झाली.
ते तुमच्याशी नियमबाह्य वागण्यापेक्षा त्यांनी अशी कुठेही सही करून देणे हे त्यांच्या बँकेसाठी जास्त घातक होते.

मनोज, ह्या धाग्यावर तुम्हाला आलेल्या अनुभवासारखे अनुभव जर अजुनही कोणी शेअर केले तर हा एक उपयुक्त धागा होईल. अजुन तरी मला असे अनुभव आलेले नाहीत पण भविष्यात असे अनुभव आले तर त्यावेळी आपण काय केले पाहिजे त्याचे मार्गदर्शन नक्कीच मिळेल.

तुम्हाला आलेल्या दोन्ही अनुभवातुन केवळ तुमच्या समंजसपणा आणि कायद्याच्या माहितामुळे तुम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवलात.

साहेब फारच नवीन होते वाटतं.. सही दिली वगैरे..

स्वतःच्याच अकाऊंट मध्ये सुद्धा कॅश भरायला न देणे ही जरा नवीन पद्धत सुरु झालेली आहे.. त्याचे कारण कदाचित काळ्या पैश्यावर नियंत्रण हे असू शकेल.. काही ठिकाणी पैसे भरु देतात पण त्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो.

कॅश न भरण्यास काही कारण नाही.

बाकी तूम्हाला मारुतीसाठी फोन कुठल्या कंपनीतून आला असेल, याची कल्पना आली. या गाड्यांचे मार्केट अगदी गळ्याशी आलेय तरी त्यांचा कोटा त्यांना पूर्ण करायचा असतो, म्हणून भल्या बुर्‍या मार्गाने असा डेटा मिळवला जातो.
तुमच्यासारखे विरोध करणारे फार थोडे, बाकी बहुतेक जण ऐकून घेतात. गोव्यात हिच कंपनी, ज्या व्यक्तीकडे बाईक आहे तिला आपल्या गाडीचा ग्राहक बनवतात. काही वर्षांपुर्वी गोव्यात दर ३ माणसांमागे एक गाडी असे प्रमाण होते.

त्या मार्केटींग टीमवर भरपूर प्रेशर आणले जाते. त्यामुळे त्यांना नम्र पण ठाम नकार देऊन मला परत असा फोन करू नका, एवढे सांगितले तर ते गप्प बसतात.

@हिम्सकूल

>>>स्वतःच्याच अकाऊंट मध्ये सुद्धा कॅश भरायला न देणे.

स्वतःचे अकाऊंट होते परंतु होम ब्रँच वेगळी होती. असे व्यवहार त्याच बँकेच्या इतर शाखांमध्ये (आणि त्या शाखेतही) केले आहेत.

बॅक ऑफ महाराष्ट्र - पैसे कॅश काढायला दोन काऊंटर्स असतात. दहा हजार रुपयांच्या खालचे पेमेंट आणि दहा हजार रुपयांच्या वरचे असा वेगळा काउंटर. दहा हजार रुपयांच्या खालच्या पेमेंटसाठी लांबच लांब रांग. दुसरा कॅशीयर माशा मारत असतो पण सांगुनही काही होत नाही. प्रश्न ते लोक एटीम वर पैसे का काढत नाहीत ? गरीब बिचारे पेन्शनर्स त्या हे आवडत नाही./ जमत नाही/ एटीम ऑपरेट करणे अवघड वाटते.

गरीब बिचारे पेन्शनर्स त्या हे आवडत नाही./ जमत नाही/ एटीम ऑपरेट करणे अवघड वाटते. >> पेन्शन अकाउंटवरती एटीएम कार्ड मिळत नाही म्हणून. Happy

Congrats on getting positive results. In first case, you did a huge favor to the employee who got transferred to 'back office'.

>>>Congrats on getting positive results. In first case, you did a huge favor to the employee who got transferred to 'back office'.

Really..??