कुटप्रश्न क्र. १

Submitted by शाबुत on 4 December, 2014 - 08:02

समजा,
>> एका रांगेत काही खुटे आहेत
>>त्यांना काही बैल बांधायचे आहेत
>> तेव्हा, एका खुट्याला जर एक बैल बांधत गेलो तर एक बैल उरतो
>> आणि, एका खुट्याला जर दोन बैल बांधत गेलो तर एक खुटा उरतो.
>> आता सांगा.. त्या रांगेत खुटे किती... तसेच त्यांना बांधायचे बैल किती?
....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका बैलाला सोडुन द्या हो.
सगळ्यांना बांधलेले आहे ना. तो बिचारा एकटा कुठे जाणार. बसेल त्यांच्याबरोबर.
आणि सगळ्यांनाच बांधायचे आहे तर राहुद्या की एक खुंटे मोकळे. भाड्याने घेतला आहे का? की वापरायलाच पाहिजे ? Uhoh Happy

वरचे उत्तर अर्थातच बरोबर आहे पण या कोड्याचे आणखी एक उत्तर असू शकते.

चार खुटे पाच बैल..
तिसर्‍या खुट्याला एकच बैल बांधला जाईल आणि चौथा खुटा रिकामा राहील.
तिसर्‍याला एक का होईना बैल बांधला गेला असल्याने तो रिकामा न राहता वापरात आलाय म्हणायला हरकत नसावी. Happy

- कूटप्रश्नतज्ञ ऋन्मेषाचार्य

ऋन्मेषच्या पद्धतीने केल्यास या उत्तराला अमर्याद उत्तरे येतील.
एका प्रश्नाला एकच काटेकोर उत्तर येण्यापेक्षा शेकडो अकाटेकोर उत्तरे असणे, रादर शेकडो उत्तरे असणे हे महत्त्वाचे आहे.
त्यात पुन्हा दिदे म्हणतात तसे हे बैल एकमेकांचे मित्रं असतील तर बिना बांधताच , बिना खुंटीचेच एकत्रं बसून रहातील.
आपल्या मायबोलीवर नाही का काही ढवळे आणि पवळे बिनाखुंटीचे एकाखाली एक झील तोडत रवंथ करत बसतात.

तेव्हा ऋन्मेष यांना या कूटप्रश्नं सोडवायच्या स्पर्धेचे विजेते आणि दिदेंना उपविजेते घोषित करावे.

साती अमर्याद उत्तरे कशी?
यापुढे जाऊन पाच खुटे आणि सहा बैल केले तर तीन खुट्यातच सहा बैल संपतील आणि दोन खुटे रिकामे राहतील ना.
आणखी काही उत्तरे येऊ शकतात का? साडेतीन खुटे आणि साडेचार बैल वगैरे..

'कोड्याच्या टर्म्स आणी कंडिशन्स् स्वतःला पाहिजे तश्या बदलून मग ते सॉल्व करणे ' ही अमर्याद उत्तरे काढायची पद्धत.
आता तूच नाही का एका खुंट्याला एक का होईना , बैल बांधलाय ना, अशी पळवाट काढलीस तसं दुसरे आणखी पळवाटा काढतील.
Wink

कुठे टर्मसकंडीशन्स बदलल्यात.. आधी नियमानुसार दोन दोन बांधत आल्यावर मग उरलेला पाचवा बैल एकटाच बांधावा लागणार ना..
तरी त्याच्या एकटेपणावर तरस येत असल्यास एखादी ग'फ्रेंड गाय शोधून देऊया त्याला.. म्हणजे बैल पाचच राहतील Wink

तसे म्हटले तर २ खुटा ३ बैल पण उत्तर येइल
कारण एका खुट्याला एक बैल बांधल्यास १ बैल उरेल.
एका खुट्यास २ बैल बांधायचे असतील तर एक खुटा उरेल (आणि एक बैल पण उरेल पण सगळे बैल संपले पाहिजेत असे कुठे लिहिले आहे)
_______________________________________________

४ खुटा आणि ५ बैल पण उत्तर येउ शकेल
बैल A, B, C, D, E
खुटा अ, ब, क, ड
प्र्त्येक खुट्यास एक बैल तर एक बैल उरेल हे सहज कळते.

आता अ खुट्यास A, B बांधले
ब खुट्यास B, C बांधले
क खुट्यास D, E बांधले
ड खुटा उरला
(एक बैल २ खुट्यास बांधु नये असे कुठे लिहिले आहे?)
________________________________

अर्थात्त विरंगुळा आहे तेंव्हा दिवे घ्या!

निलिमा कर्रेक्ट Happy

असामी, यालाच तर म्हणतात थिंक औट औफ द बौक्स..
तो सपस्ष्ट लिहिलेला नियम वापरूनच तर मी त्यात माझे ५ बैल बसवलेत..
आता उलटा घास खायचा तर असा विचार करा, की तुमच्याकडे ५ बैल आहेत आणि एका खुट्याला दोन बैल बांधायचे आहेत तर किती खुटे लागतील.. उत्तर मिळून जाईल Happy

असामी, यालाच तर म्हणतात थिंक औट औफ द बौक्स..

>> अरे 'थिंक औट औफ द बौक्स'' काय ?
बैल आणि म्हशी मोकळ्या सुटल्या आहेत ... (मी इन्क्लुडिंग)

Wink

बैल आणि म्हैस...? गाय असायला हवे ना? Uhoh
..

तसे म्हटले तर २ खुटा ३ बैल पण उत्तर येइल.. (आणि एक बैल पण उरेल पण सगळे बैल संपले पाहिजेत असे कुठे लिहिले आहे)
>>>>
मोकळा कश्याला सोडताय, त्या बैलाला बैलाबरोबर बांधा.. खुट्याला दोनच बैल बांधायचेत पण त्या बांधलेल्या बैलांना आणखी एखादा बैल बांधायला हरकत नसावी, साखळी पद्धतीने Happy

असामी,
खरेय.. मी नेहमी ओवरकॉमनसेन्समध्ये जातो Happy

* संपादीत *

चुकून क्रिकेट धाग्यावरची पोस्ट इथे पडली. बहुधा झोपेत असल्याने असे झाले असावे. शुभरात्री शब्बाखैर!

उमेश... माफ करा तुमचा आयडी मला टाईप करता येत नाही.
>>> या जगात गणित हि अशी एकमेव गोष्ट आहे की ज्यात दोन उत्तरे नसतात.
>>> जर आपले गणित कच्चे असेल तर मात्र कितीही उत्तरे असु शकतात.

... @ साती यांनी पहिल्यादांच उत्तर बरोबर दिल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो.

गणित कच्चं???
अहो मी जेव्हा दहावीत होतो तेव्हा अभ्यासिकेतल्या बारावीच्या मुलांना गणित शिकवायचो. आणि याचा मला तेव्हा भयंकर अहंकार सुद्धा होता. पण त्या कारणाने बहुधा माझा अभ्यास राहिला की काय माहीत नाही पण मला स्वत:ला गणितात १५० पैकी १४८ पडले.. कारण काहीही असो पण मला फुल्ल मार्क्स पाडता आले नाही याचाच अर्थ माझे गणित १०० टक्के अचूक नाही हे मला समजले आणि माझा अहंकार गळाला.. Sad

राहिला प्रश्न एका गणिताची दोन उत्तरे तर एका सोप्या उदाहरणापासून सुरुवात करूया.

४ चे वर्गमूळ, माझ्या माहिती प्रमाणे
१) +२
२) -२
अशी दोन उत्तरे येतात.. Happy

अवांतर - नाव टाईप नाही करता येत काही हरकत नाही. ( Ru ) हि दोन अक्षरे ऋ टाईपतात हे तुमच्या माहितीसाठी, बाकी काहीही लिहिले तरी नो प्रॉब्लेम Happy

अहो... उमेश... मला दहवीला १५० पैकी १४९ मार्क पडले... पेपर तपासणाराच्या पेनातली शाई संपली... म्हणुन त्याला... त्याला पुढचा आकडा लिहता आला नाही... १५०.

अनंतरंगी भाऊ,
अपयशाला कारणे द्यायची नसतात, ते स्विकारायचे असते.. नाहीतर तेच यशाच्या मार्गातील अडथळा बनते..

अन्यथा एक काळ होता जेव्हा ऋन्मेष हे नाव बघूनच गणिताचे मास्तर शंभरात शँभर गुण देउन पुढच्या पेपरकडे वळायचे..

Pages