साराभाई v/s साराभाई हिंदी मालिका

Submitted by सुजाता बापट on 24 November, 2014 - 16:11

साराभाई v/s साराभाई ही मला आवडणारी एक evergreen हिंदी मालिका. ह्या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा इतकी चपलख जमली आहे... आम्ही ह्या मालिकेचि अक्षरशः पारायणे केली आहेत. ह्यातला प्रत्येक विनोद माहीत आहे तरी तो इतका निखळ आणि उत्स्फूर्त आहे की प्रत्येक वेळी बघताना हसायला येतंच..
हे कुटुंब -
इंद्रवदन - कळीचा नारद , प्रचंड खाण्याची आवड,
माया - high society representative,
सून - मोनिशा - typical मध्यम वर्गीय ,
मुलगे - साहिल - सगळ्या कुटुंबाचा विचार करणारा , रोशेस - एक वेगळेच व्यक्तिमत्व
इतकं निखळ, अप्रतिम मिश्रण आहे - अशी भट्टी क्वचितच जमून येते....

ह्या मालिकेचा कोणतही भाग म्हणजे stress कमी करण्याचा हमखास उपाय वाटतो मला...

"साराभाई vs. साराभाई चे ६७ एपिसोड्स"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोणतही एक डिसाईड करता येत नाही >>> मलाही! सगळेच आवडलेत. यातून एक काढलं तर काही अर्थ नाही सिरिअल ला! Wink (पाहा इम्याजिनून)

सगळ्याच पात्रांच टायमिंग इतकं पर्फेक्ट आहे की एका कोणाला बदललेही विचार करणं शक्य नाही......

माया मला सर्वात जास्त हसवते म्हणुन ते पात्र सर्वात जास्त आवडते. रत्ना पाठकने कमाल केली आहे. मोनिशा सर्वात कमी आवडते. बाकी तिघात अवघड आहे ठरवणे..

खरेतर मोनिषाच्या भुमिकेसाठी सोनाली कुलकर्णी सारखी साधी कोणीतरी हवी होती.
जिने काम केले आहे आत्ता ते सुद्धा चांगलेच केले आहे पण तरी ती मुळात मध्यम किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय वाटत नाही.
अशीच अजुन एक चांगली मालिका म्हणजे "तू तू मैं मैं"

रत्ना पाठकने कमाल केली आहे.>> + १
मस्त होती ही सिरियल. परत लागतेय का . मलापण माया आणि रोशेश ही पात्र आवडतात. मलातर मायाचे डायलॉग नंतरचं किंवा मोनिषाला टोमणे मारल्यानंतच बॅग्रांउड मुझिक पण आवडायचं. (गोळ्या मारल्याचं) Happy

माधुरी मिडलक्लास (की अश्याच काही) नावाची. . अजिबात नाही आवडलेली.>> + १ ज्यांनी साराभाई पाहीलेय त्यांना नाहीच आवडणार इतकी वाईट होती ती सिरियल.

रत्ना पाठकने कमाल केली आहे.>> + १ >> + २ ... ती त्या रोलमध्ये बापच आहे.. तिचा आणि सतीश शाहचा फिल्मी चक्कर म्हणून पण एक कार्यक्रम होता बहुधा.. खूपच लहान असल्याने तेव्हा आता काहीही आठवत नाही, पण तेव्हा आवडीने बघायचो हे आठवतेय.

शँकी थँक्यू सो मच Happy
मी कल पुर्ण रात्र जागून सगळे एपिसोड बघितले Proud
तेवढीच मज्जा आली.
काही काही जोक माहीत असूनही मी तितकीच हसले Happy

प्लिज ही लिंक वरती हेडर मधे टाका ना धाग्याच्या

बेस्ट स्ट्रेसबस्टर मालिका!! कधीही, कोणताही भाग बघा, मनोरंजनाची पूर्ण गॅरेंटी! बहूतेक सगळे भाग युट्युबवर आहेत. दुष्यंतच्या उल्लेखाशिवाय मालिकेची ओळख अपूर्ण आहे! > +1000

साराभाई ऑल टाईम फेव्हरेट मालिका. गुजर गये पोपट काका फिदीफिदी ते विडंबन मला आईये मेहरबां पेक्षा जास्त आवडतं आणी आठवतं > +1000

खरचं मस्त मालिका... उत्तम स्ट्रेस बस्टर.. सगळीच पात्र चपखल.. सगळ्यात बेस्ट माया साराभाई आणि इंद्रवदन खरंच नारद आहे... साहिल मधल्यामध्ये अडकतो बिचारा.. रोसेश जामच इनोसंट.. Happy

ही मालिका परत सुरू होणारे आहे, असं वाचलं होतं मीपण...

इ-सकाळ वरुन

'साराभाई व्हर्सेस साराभाई' पुन्हा येणार..?

मुंबई : ‘साराभाई व्हर्सेस साराभाई‘ या मालिकेचा दुसरा ‘सीझन‘ लवकरच टीव्हीवर झळकणार असल्याचे संकेत या मालिकेच्या निर्मात्यांनी दिले आहेत. 2004 मध्ये सुरू झालेली ही मालिका 69 भागांनंतर 2006 मध्ये संपली होती. ‘या मालिकेचा दुसरा ‘सीझन‘ नसेल‘ असे निर्माते जमनादास मजेठिया यांनी 2012 मध्ये सांगितले होते; मात्र त्यांनीच आज (गुरुवार) ‘ट्‌विटर‘वर मालिकेतील सर्व कलाकारांचे एकत्रित छायाचित्र प्रदर्शित करून ‘चाहत्यांसाठी लवरकच चांगली बातमी असेल‘ असे म्हटले आहे.

देवेन भोजानी यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत सतीश शहा, रत्ना पाठक, सुमीत राघवन, रुपाली गांगुली, राजेश कुमार हे प्रमुख कलाकार होते. ‘सिच्युएशनल कॉमेडी‘ या प्रकारातील ‘साराभाई..‘ने स्वत:चा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. या मालिकेतील सर्व कलाकार सतीश शहा यांच्या घरी जमले होते. त्या प्रसंगाचे छायाचित्र मजेठिया यांनी ‘ट्‌विटर‘वर प्रसिद्ध केले आहे.

ही सिरिअल 'साराभाई व्हर्सेस साराभाई - टेक २' या नावानी हॉट्स्टार वर येते आहे. १६ मे २०१७ पासून. सॉर्ट ऑफ एक्स्लूसिव्ह अ‍ॅप ओन्ली एअरिंग वगैरे...
वेळ नाही माहीती...

हॉटस्टार सध्या युएस मध्ये बंद केलेले आहे !! काय माहीती काय झाले ते ? Sad

अमित, हॉटस्टार म्हणजे भारताचे हुलू ! अ‍ॅप आणि वेब् साईट दोन्ही आहेत

योकू, वेळ तुम्हाला आवडेल ती Lol

Pages