साराभाई v/s साराभाई हिंदी मालिका

Submitted by सुजाता बापट on 24 November, 2014 - 16:11

साराभाई v/s साराभाई ही मला आवडणारी एक evergreen हिंदी मालिका. ह्या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा इतकी चपलख जमली आहे... आम्ही ह्या मालिकेचि अक्षरशः पारायणे केली आहेत. ह्यातला प्रत्येक विनोद माहीत आहे तरी तो इतका निखळ आणि उत्स्फूर्त आहे की प्रत्येक वेळी बघताना हसायला येतंच..
हे कुटुंब -
इंद्रवदन - कळीचा नारद , प्रचंड खाण्याची आवड,
माया - high society representative,
सून - मोनिशा - typical मध्यम वर्गीय ,
मुलगे - साहिल - सगळ्या कुटुंबाचा विचार करणारा , रोशेस - एक वेगळेच व्यक्तिमत्व
इतकं निखळ, अप्रतिम मिश्रण आहे - अशी भट्टी क्वचितच जमून येते....

ह्या मालिकेचा कोणतही भाग म्हणजे stress कमी करण्याचा हमखास उपाय वाटतो मला...

"साराभाई vs. साराभाई चे ६७ एपिसोड्स"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेब सिरिज येणार होती ना? त्याचं काय झालं?
हॉटस्टार युएस मधे दिसत नाही.. का कोण जाणे (परत आल्याचा आनंद व्हावा असं किमान एकतरी कारण सापडलं Proud )

मोबाईलवर एखादं vpn अॅप किंवा लॅपटॉप ब्राऊजरवर वीपीएन अॅडऑन घालायचं, virtually यायचं भारतात नी बघायचं. हाकानाका. मी ओपेरा वीपीएन वापरून जगभर फिरत असते. बरेचदा नविन मोबाईल ओएस युएसला आधी येते नी मग भारतात येते तेव्हा मी युएसमधून अपग्रेड करते. लय फावतं अशा वीपीएननी.

"गीव्ह मी सम ओकरा" - मम्मीजी
"भैया, भीन्डी दे ना " - मोनीशा
भेन्डी घेताना प्र्यत्येक वे ळा मला आठवण येते साराभाई ची...

केक खाताना इंद्रवदन च्या डोक्यावरचे "डेव्हील" आणि "एन्जल" माझ्या डोक्यावर आल्या सारख वाटते
Lol

मी जेव्हा कसलीही खरेदी करायला जाते तेव्हा एकदम भार्री असं काही महागडं (आणि माझ्या कामाचं नसूनही) दिसलं आणि ते घ्यावंसं वाटलं की "मला माया साराभाई सिंड्रोम झालाय" असं म्हणते! Proud

मोनिशा: "डॅडीजी, ये लिजिए बिस्किट्स!"
इंद्रवर्धन: "अरे वा!"
माया: "ये बिस्कीट मत खान हं इंद्रवर्धन!"
इंद्रवर्धन: "क्यु?"
माया: "जो बिस्किट्स बेचने वाला आता है उसकी लुंगी देखी है तुमने?"
इंद्रवर्धन: "मुझे बिस्कीट खानी है, उसकी लुंगी थोडी खानी है!" xD XD
खरंच ही मालिका अप्रतिम होती, १६मे पासून सीजन २ सुरु होतोय, आशा आहे कि या वेळेस पण धम्माल येईल. अजून एक खूप खूप जुनी सीरिअल आहे, 'ये जो है जिंदगी' नावाची, ती पण पहा youtubeवर, खरंच अप्रतिम आहे!

Lol
सोनू, तू काय सांगितलंस मला कायच नाय कळ्ळ.
मी नेटवर्किंग इलिटरेट आहे..

प्रज्ञा, अगदी अगदी.... आमच्या घरी मी आणि माझी बहिण हे आणि एकंदरच या सिरिअल मधले बरेचसे डायलॉग्स वापरत असतो...
भारीये Lol

फेसबुक वर आजच स्नीक पीक पाहीला.. हा सीझन पण तितकाच भारी असणारे! इथे आत्ता लिंक देता येत नाहीये. फेसबुकवर रोसेश साराभाई ह्या पेजवर आहे.
Can't wait!

Pages