वाट्टेल तेवढा गम दे

Submitted by वैवकु on 20 November, 2014 - 10:29

वाट्टेल तेवढा ग़म म दे
पण मला तुझा मौसम दे

तू आल्यावरही झरती
माझ्या अश्रूंना दम दे

कर ह्या देहाचा पावा
ह्या श्वासांना सरगम दे

गहिरेपण आकाशाचे
अन् पृथ्वीचा संयम दे

गझलेत येत जा माझ्या
ही तुझी कृपा कायम दे

चल मागत नाही काही
पण देशिल ते उत्तम दे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

देशिल ही सूट घेतली हे मी सांगितले नाही व त्यामुळे मी चेले जमवत आहे असे सांगायला कोणी तज्ञ समीक्षक आले तर त्यांची मते फाट्यावर मारली जात आहेत असा निरोप देऊन टाका. धन्यवाद!

वाट्टेल तेवढा गम दे
पण मला तुझा मौसम दे

कर ह्या देहाचा पावा
ह्या श्वासांना सरगम दे<<< हे शेरही आवडले.

थँक्स बेफीजी Happy
एखाद्या गझलेत सर्व शेर विठ्ठलाला अर्पण करावेत अशी अनेक दिवसापासून इच्छा होती ह्या गझलेने ते समाधान दिले
ह्या रचनेतले सर्व शेर विठ्ठ्लावर घसरवता येतात बेफीजी Happy

पण मला तुझा मौसम दे

कर ह्या देहाचा पावा
ह्या श्वासांना सरगम दे

चांगली ओळ व चांगली द्विपदी.

गहिरेपण आकाशाचे
अन् पृथ्वीचा संयम दे
उत्तम इच्छा आहे, 'संगत' बदला कदाचित फलद्रुप होईल Light 1 Rofl

धन्स आत्मग्न आणि हबा

हबा तुमाची सूचनेची ओळ आहे डिक्टो तस्साच बदल सुचलेला मलाही पण करावासा वाटला नाही का कोण जाणे पण नाही वाटला . क्षमस्व व धन्स हबा