कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल???

Submitted by mansi298 on 19 November, 2014 - 05:52

एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे त्याला गावी घेउन जायचे आहे कारण माझ्याकडे ५ मान्जरे आहेत. बस ने कसे नेता येईल??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुत्र्याचं तिकीट काढून

कुत्र्याचं तिकीट काढून रेग्युलर एसटीने नेता येईल. त्यासाठी त्याला स्वतःचा पिंजरा असणे व गाडीच्या टपावरून प्रवास ह्या दोन गोष्टी कंपल्सरी आहेत.

एसटीस्टँडवर जाऊन कंट्रोलर यांचेशी बोलून अधिक माहिती मिळेल. किंवा मायबोलीवर एस्टीतले कुणी असतील तर ते माहिती देऊ शकतील.

ससे, उंदिर, गिनिपिग सारखे प्राणी मी स्वतः शिवाजीनगरहून एस्टीवर टाकून लगेजच्या भावात नेलेले आहेत. कंडक्टर साहेब प्रत्येक ससा-उंदीर-गिनिपिगचं तिकिट मागत होते. शासकीय कामासाठी प्राणी नेत असल्याने व तितका खर्च अनुज्ञेय नसल्याने मा. कंट्रोलर साहेबांच्या अखत्यारीतील निर्णयावरून शेवटी लगेजच्या हिशोबाने ते प्राणी नेता आले.

(मात्र पिंची वाल्यांनी गावात शिरताना रिकामे पिंजरे विकायला आणले आहेत असे गृहित धरून जकात वसूल केली होती. सरकारी कागद त्या गाढवांना दाखवून उपयोग झाला नव्हता. प्राणी त्याकाळी सुरू असलेल्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्सच्या अ‍ॅनिमल हाऊसमधून ब्रीडिंगयोग्य असे दुसरे अ‍ॅनिमल हाऊस एस्टॅब्लिश करण्यासाठी न्यायचे होते.)

रेल्वेने नेताना लगेज कंपार्टमेंटमधून प्राणी नेता येतात. अगदी सर्कशीतले प्राणी देखिल असे नेता येतात. स्टेशनवर जाऊन चौकशी करावी.

फक्त अ‍ॅनिमल वेलफेअर (पेटा) वाल्यांकडे जरा जास्त लक्ष राहु द्या आजकाल कशावरही धावा बोलतात

ट्रेनमधून नेता येते.कुत्र्याचे तिकिट(पास म्हणतात रेल्वेवाले) काढावे लागते.

mansi298 जेवढे प्रतिसाद घेण्यायोग्य आहेत तेवढे घे बाकिचे या कानाने ऐकुन त्या कानाने सोडुन दे.

तुला मायबोली वर मदत मागावी वाटली या वरुनच कळते की तुला मायबोली आनि मायबोली कर किती आपले वाटतात. इब्लिस च्या पोस्ट नी तुम्हाला नक्की मदत होईल.

@दिवाकर देशमुख "ओम्नी" चे फायदे सांगणारी पोस्ट एका वाक्यात उरकल्या बद्दल तुमचा निषेध. यावरुन तुम्ही किती कमी अभ्यासू आहात ते सिद्ध होते.

कुत्रा किडनॅप करायचा नाही आहे, सन्मानाने गावी न्यायचा आहे. >> Rofl

आणखी प्रतिक्रिया:

मोदीभक्त माबोकर: या लेखामुळे मायबोलीवर खूप लोक हसत आहेत. आनंदीआनंद झाला आहे. अच्छे दिन आले आहेत. याचं श्रेय फक्त मोदीजी व अमित शाहजींचं आहे. नमो नम:.

मोदीविरोधी माबोकर: कसले अच्छे दिन? फसवं मार्केटिंग आहे नुसतं. पाच मांजरींसाठी पाच जागा असतील तर तीन मांजरींना हाकलून दया आणि त्या तीन जागा कुत्र्यांसाठी आरक्षित करा. एक जागा मागे आलेल्या कुत्र्याला दया आणि बाकीच्या दोन जागा रिकाम्या ठेवा. बाहेर हाकललेल्या मांजरींनी कुठे जायचं वगैरे फालतु प्रश्न विचारु नका. मार्जार जातीत जन्माला आल्याची शिक्षा त्यांनी भोगायलाच हवी. पुढची निवडणुक कुत्रा-मांजर आरक्षण मुद्दयावरुन मतदारांत फूट पाडून आम्हीच जिंकू.

मोदी: मित्रों, केम छो? लवकरच आम्ही तुमच्या घरापासून गावापर्यंत आलिशान सुपरफास्ट बुलेट ट्रेन सुरु करत आहोत. त्यात प्राणी नेण्यासाठी वेगळा डबा असणार आहे. अम्दावाडमध्ये रिक्षातून कुत्रा नेण्यापेक्षा कमी खर्चात या बुलेट ट्रेनचं तिकीट उपलब्ध असेल. माणूस, कुत्रा, मांजर, सर्व प्राणीमात्रांसाठी आमच्या बुलेट ट्रेनमध्ये भरपूर जागा आहे. सबका साथ, सबका विकास.

घडयाळकाका: कुत्र्याला ट्रेनमध्ये बसवा आणि तुम्ही बाहेरुन पाठिंबा दया.

रुन्मेष: या विषयावर कुत्र्याचे आत्मवृत्त, मांजरीचे आत्मवृत्त आणि मला कुत्रा आवडतो/आवडत नाही पोल असे माझे तीन धागे लवकरच माबोवर येणार आहेत. आतुरतेने वाट पहा.

मार्जार जातीत जन्माला आल्याची शिक्षा त्यांनी भोगायलाच हवी<<< Lol

>>>घडयाळकाका: कुत्र्याला ट्रेनमध्ये बसवा आणि तुम्ही बाहेरुन पाठिंबा दया. <<<

आणि गाडीने स्टेशन सोडले की म्हणा आमचा पाठिंबा ह्या प्लॅटफॉर्मपुरता होता

bedekarm नि मायबोली वर "वानु" लेख लिहला तसा तुही तुझ्या कुत्र्या वर लिहन्याचा प्रयत्न कर."वानु" ला

चांगलेच प्रतिसाद मिळालेत.

तुम्ही सध्या कुठे राहता? आणि कुत्रा कोणत्या गावी न्यायचा आहे?
ते सान्गाल का?

आमच्या ओळखीचे गृहस्थ मुंबईहून रत्नागिरीला एस. टी. तुन कुत्रा घेऊन यायचे. त्यांच्याकडे कुत्रा पाळण्याचे परमिट होते. कुत्रा भुंकु नये म्हणून त्याच्या तोंडाला विशेष उपकरण(?) लावायचे. (ह्याला नक्की काय म्हणतात?)

पांडुरंगा...
अजून कसले कसले धागे बघायला लावणार आदेश..<< रुमाल धाग्या पेक्श्या बरा आहे की. कुत्रा काही नेहमी ट्रान्स्पोर्ट केला जात नाही त्यामुळे त्याबद्दल माहिती/ नियम/अनुभव फार कमी लोकांना माहीत असतील. अर्थात प्रॉपेर ऑथेरीटी कडे योग्य आणि अचुक माहीती मिळेलच पण इथे इतरांचे अनुभव ऐकायला धागा काढला असेल. इब्लिसने छान माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया मात्र भारी आहेत सगळ्यांच्या Lol
वेदिका सुस्साट प्रतिसाद < +१ Lol

विषय चेष्टेचा वाटतो आहे पण मलाही दोन वर्षांपूर्वी हाच प्रश्न पडला होता म्हणून सांगतो.
एसटी महामंडळाच्या बसमधून नेता येतो. फक्त कुत्र्याला लस दिल्याचे डॉक्टरचे सर्टिफिकेट लागतं. आणि फुल तिकिट काढावं लागतं. कंडक्टरला पूर्वकल्पना देउन चढा. मी पुणे स्टेशनच्या बस स्थानकावरून एक पिल्लू घरी नेलं होतं. त्यावेळी मला तेथील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती.

पिल्लू शांत बसलं होतं. पण सासावडच्या पुढे आल्यावर माझा डोळा लागला आणि कस काय देव जाणे ते पिशवीतून बाहेर पडलं आणि पुढच्या सिट्सजवळ गेलं. बराच धुमाकूळ झाला होता. पण त्याचे तिकीट काढलेले असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही.

पिल्लू शांत बसलं होतं. पण सासावडच्या पुढे आल्यावर माझा डोळा लागला आणि कस काय देव जाणे ते पिशवीतून बाहेर पडलं आणि पुढच्या सिट्सजवळ गेलं. बराच धुमाकूळ झाला होता. पण त्याचे तिकीट काढलेले असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही.>>>>>>>> अहो निर्सगवेडा, थेरॉटिकली शक्य असले तरी मोठ कुत्र कस नेणार बस मधून . ,.......... एकतर ते एका जागी बसणार नाही........ परत ते भुंकायला लागले तर बाकिचे प्रवासी तुम्हाला कुत्र्यासकट बाहेर फेकून देतील बसमधून...... आणि त्याने परत कुठे घाण केली तर प्रवासी भांड्ण काढ्तील ते वेगळच.. आणि त्यात जर ते कुणाला चावलच आणि तुम्ही कितीही सागितल कि लस दिली तरी तरी लोक पैसे काढ्ल्याशिवाय सोड्णार नाहीत..........

अहो निर्सगवेडा, थेरॉटिकली शक्य असले तरी मोठ कुत्र कस नेणार बस मधून >>> मोठा कुत्रा असेल तर इब्लिस म्हणतायत तसं पिंजऱ्यात टाकून टपावरून न्यावा लागेल...आणि कुत्र्यावरही डिपेंड आहे हो. म्हणजे शांत बसलं तर ठीक, लागलं भुंकायला तर 'आलिया भोगासि असावे सादर'...(फु.स. : कुत्र्याला झोपेची गोळी देऊन चढवा :D)

कुत्र्याचं तिकीट काढून रेग्युलर एसटीने नेता येईल. त्यासाठी त्याला स्वतःचा पिंजरा असणे व गाडीच्या टपावरून प्रवास ह्या दोन गोष्टी कंपल्सरी आहेत.>> कुत्रा जरी कमी खर्चात गावाला न्यायचा असेल तरी त्याला पिंजर्यातुन टपावरुन नेणं योग्य आहे का? लगेज आणि प्राण्यांत फरक आहे.

सुम यांच्याशी सहमत >> बाकिचे प्रवासी तुम्हाला ...लस दिली तरी तरी लोक पैसे काढ्ल्याशिवाय सोड्णार नाहीत....>> त्यामुळे आता कसा न्यायचा कुत्रा ते तुम्हीच ठरवा mansi298. Happy

वानु च्या लिंक बद्दल धन्यवाद. Happy

कुत्रा ट्रेनने नेतात आमच्या शेजारचे.. पुण्याला नेतात!

असो, पण या निमित्ताने पडलेला एक प्रश्न - मांजर आणि कुत्रा यांचे खरेच पटत नाही का? ट्राय करायला काय हरकत आहे? नक्की काय कारण असते यांचे न पटण्यामागे, मी आजवर कधी कुत्र्याला मांजर मारून खाताना वा व्हायसे वर्सा पाहिले नाहीये. Sad

यावरुन तुम्ही किती कमी अभ्यासू आहात ते सिद्ध होते.> आम्ही गरीब मोटरसायकलवाली माणस कुठे गाडींचा अभ्यास करणार Happy

बाकी काही म्हना भारतातले लोक दयाळु, कनवाळू ,सोशिक असतात especially प्राण्यांच्या बाबतित म्ह्नुन तर त्यांची पुजापन केली जाते भारतात.गोमाता,नाग,वानर्,उंदीर,अजुन बरेच काही......
.

आमच्या ओळखीचे गृहस्थ मुंबईहून रत्नागिरीला एस. टी. तुन कुत्रा घेऊन यायचे. त्यांच्याकडे कुत्रा पाळण्याचे परमिट होते. कुत्रा भुंकु नये म्हणून त्याच्या तोंडाला विशेष उपकरण(?) लावायचे. (ह्याला नक्की काय म्हणतात?)

>>>>>>>> राहुल१२३, साईलेंसर असेल... Lol Lol

कुत्रा ट्रेनने नेतात आमच्या शेजारचे.. पुण्याला नेतात!

असो, पण या निमित्ताने पडलेला एक प्रश्न - मांजर आणि कुत्रा यांचे खरेच पटत नाही का? ट्राय करायला काय हरकत आहे? नक्की काय कारण असते यांचे न पटण्यामागे, मी आजवर कधी कुत्र्याला मांजर मारून खाताना वा व्हायसे वर्सा पाहिले नाहीये.
>>>
तस तुमच लाईफ वेगळच आहे नॉर्मल लोकांपासुन...:हाहा:
कुत्रा आणि मांजरांचे कधीच पटत नाहि...अपवाद जर ते लहानपणापासुन एकत्र असतील तर मी कुत्रा आणि मांजर एकत्र एका ताटात दुध पीताना पन पाहीले आहेत आणि कुत्र्यांना मांजरीचा जीव घेताना पण पाहीले आहे...कुत्रे मांजरांना खात नाहित पण पकडुन मानेला हिसका देतात त्यात मांजर मरते...विशेतः पील्लांवर
खुप डोळा असतो कुत्र्यांचा...मोठी मांजरे भारी पडतात ते पंजे मारतात डोळ्यांवर्...असो..

पण कुत्र्याला झोपेची गोळी देऊन पिशवीत घालुन नायच्...मी न्यायची मांजरांना...लहानपणी वर्षातुन एकदा तरि मी गावावरुन मांजर घरी घेउन यायचीच...

mansi298 जेवढे प्रतिसाद घेण्यायोग्य आहेत तेवढे घे बाकिचे या कानाने ऐकुन त्या कानाने सोडुन दे. धन्यवाद.

इब्लिस धन्यवाद.

प्रसाद गोडबोले ह्यन्चा प्रतिसाद वाचुन हा प्रश्न येथे का वीचारला असे वाट्ले.

माफ करा प्लीज कोनिही प्रतीसाद देउ नका.
SORRY MALA MARATHI TYPE KARAYALA JAMAT NAHI MAHNUN MALA UTTAR DETA YET NAHI AHE. ANI PRASHN SUDDHA NIT VICHARTA ALA NAHI AHE MAHNUN TUMCHA GAIRSAMAJ HOT AHE.
HI KUTRI ME OFFICE MADHUN GAHRI YETANA (8.30 PM) MAZYA MAGE MAGE GAHRI ALI MAHNUN ME TILA THODE JEVAN DELE ANI PUNHA KHALI NEUN SODLE PAN ME GHARI ALYA VAR TI 15 MIN NI PUNHA GHARI ALI ANI BHUNKU LAGLI MAG RATRA ASLYA MULE ME TILA SAKALI PUNHA DUR JAUN SODUN ALE TARI PUNHA BLDG KHALI MALA SHODAT PHIRT HOTI MALA VATLE TI NANTAR NIGHUN JAYIL PAN NAHI ME OFFICE LA JANYASATHI KHALI UTARLE TAR TINE MAZE PAICH PAKDUN THEVALE MALA JAUCH DEYINA MAG ME TILA PARAT GHARI THEVLE ANI OFFICE LA GELE. ATA TILA ASE KUTHE HI SODUN DENE KHUP JIVAVAR ALE AHE. MALA PHAKT ETKECH VATEE KI TI GAVI AMCHYA GHARI RAHILI TAR TI UPASHI NAHI RAHNAR ANI TILA GHAR HI MILEL KARAN TI MANSA MADHE RAHNE KHUP AVADTE ASE VATTE. MAZE GHAR 1BHK AHE 3RD FLR LA ANI GAVI MOTHE GHAR AHE TI TITHE MOKLYA JAGET RAHU SAKEL. THANKS ALL
FOR REPLY.

कुत्र्याला झोपेची गोळी देऊन पिशवीत घालुन नायच्......मला हि असे वाट्ते पन गोळि कोन्ति अस्ते. वेट ला विचारावे लागेल असे कहि मेडीसिन आहे का.

सीमा, माहितीबद्दल धन्यवाद,
तसे मी कुत्र्याला मांजरीवर भुंकताना पाहिलेय, पण तसे ते आपल्यावर पण भुंकतात, किंवा कुत्रे कुत्र्यावर पण भुंकतात..

आपणच आपल्या प्रतिसादात म्हणालात की लहानपणापासून एकत्र असतील तर पटते, याचा अर्थ हे शत्रूत्व केवळ मानसिक आहे, यामागे शास्त्रीय वा नैसर्गिक असे काही कारण नाही. नसावे.

जर मांजर हे कुत्र्याचे भक्ष्य (आहार) नसेल (आणि व्हायसे वर्सा) तर उगाचच्या उगास खुन्नस ठेवण्यात काय अर्थ आहे? हे त्यांना समजावले की झाले. आपल्याला थारा देणार्‍या मालकाच्या मांजरींशी तो योग्यच वागेल. प्रश्न निर्माण करून ते सोडवण्यापेक्षा ते प्रश्न निर्माणच होऊ नयेत हे बघणे केव्हाही चांगले.

आपणच आपल्या प्रतिसादात म्हणालात की लहानपणापासून एकत्र असतील तर पटते, याचा अर्थ हे शत्रूत्व केवळ मानसिक आहे,>>

कुत्र्याला लगेच प्राणीमानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा. ते त्याचं काउन्सेलिंग करतील. मग तो आणि मांजरे आनंदाने राहतील.

जर मांजर हे कुत्र्याचे भक्ष्य (आहार) नसेल (आणि व्हायसे वर्सा) तर उगाचच्या उगास खुन्नस ठेवण्यात काय अर्थ आहे? हे त्यांना समजावले की झाले. आपल्याला थारा देणार्‍या मालकाच्या मांजरींशी तो योग्यच वागेल. प्रश्न निर्माण करून ते सोडवण्यापेक्षा ते प्रश्न निर्माणच होऊ नयेत हे बघणे केव्हाही चांगले.
>>>
Uhoh

कुत्र्यांना कोणत्या भाषेत समजावनार बाबा? पण तुम्ही हे करु शकशील असा विश्वास नक्की आहे मला...वाट्लतर धागा काढ कुत्र्यामांजरीचे वळण आणि शिक्षण्...काय म्हणताय???

मला हि असे वाट्ते पन गोळि कोन्ति अस्ते. वेट ला विचारावे लागेल असे कहि मेडीसिन आहे का.
>>>
मिळेल कि....मस्त मांडिवर न्यायचा झोपवुन विचारल तर सांगायच गावाकडचा आहे ईथे वातावरण रुचल नाही..आजारी आहे म्हणुन घेऊन चाललेय्..हाकानाका...

कुत्र्याला लगेच प्राणीमानसोपचार तज्ञाकडे घेऊन जा. ते त्याचं काउन्सेलिंग करतील. मग तो आणि मांजरे आनंदाने राहतील.
>>>
Rofl

Rofl

Rofl

Rofl

जर मांजर हे कुत्र्याचे भक्ष्य (आहार) नसेल (आणि व्हायसे वर्सा) तर उगाचच्या उगास खुन्नस ठेवण्यात काय अर्थ आहे? हे त्यांना समजावले की झाले. आपल्याला थारा देणार्‍या मालकाच्या मांजरींशी तो योग्यच वागेल.>>>>>:हहगलो:

वेदिका भन्नाट.:हहगलो:

तुम्ही सध्या कुठे राहता? आणि कुत्रा कोणत्या गावी न्यायचा आहे?
ते सान्गाल का?

मला विरारहुन महाड पासुन १०-१५ किमि न्यायचा आहे....
मला उपाय सापड्ला आहे मि तिला खाजगी वाहन करुन घेउन जाईन.
जस्ति जास्त ५ ते ६ हजार खर्च होईल. पन त्या साथि मरणाचे नाटक तर नाहि करावे लागनार.

प्रसाद गोडबोले ह्यन्चा प्रतिसाद वाचुन हा प्रश्न येथे का वीचारला असे वाट्ले.

माझ्या प्रतिसादाची बर्‍याच वर्षांनी कोणी तरी गंभीर दखल घेतली हे पाहुन मी भावुक झालो आहे Biggrin

माझ्या प्रतिसादाची बर्‍याच वर्षांनी कोणी तरी गंभीर दखल घेतली हे पाहुन मी भावुक झालो आहे > बस कर यार रुलायेगा क्या ? Wink

मला उपाय सापड्ला आहे मि तिला खाजगी वाहन करुन घेउन जाईन.
जस्ति जास्त ५ ते ६ हजार खर्च होईल.
>>>>

हा उपाय तर प्रश्न निकालातच काढण्यासारखा आहे. आपण बसने कसे न्यायचे असे विचारल्याने चर्चा सुरू झालेली. खाजगी वाहनाचा खर्च एखाद्या रस्त्यावरच्या कुत्र्यासाठी आपण कराल अशी शक्यता कोणी लक्षात घेतली नव्हती, अर्थात ते साहजिकच होते. पण मनापासून, आपल्या या भूतदयेला म्हणा वा औदार्याला सलाम ! Happy

वेदिका आणि ऋन्मेऽऽष एकच आहे का?
>>>
या प्रश्नाचे उत्तर मी दिले तर विश्वास ठेवाल?
>>>>>
ठेवु हो ...
.... नका म्हणु पण....

वेदिका आणि ऋन्मेऽऽष एकच आहे का?
>>>
या प्रश्नाचे उत्तर मी दिले तर विश्वास ठेवाल?
>>>>>
ठेवु हो ...
...... नका म्हणु पण....

मागे लागुन आलेल्या कुत्र्याचे फार मनावर घ्यायचे नाही... कारण तो मागे लागुन आलेला असतो... त्याला ईथेच सोडा... तुम्ही गावी जा... तुम्हाला तिथे दुसरा नक्की मिळेल... कारण मागे लागणारे कुत्रे सगळीकडे असतात.

mansi298 कागद पेन घेऊन मराठी लिहन सोपे वाटते पन किबोर्ड्वर टाईप करायला सुरवातिला जमत नाही.
खुप चुका होतात. पण म्ह्णुन लिहायचे सोडायचे नाही.जेवढे जास्त तु लिहान्याचा सराव करशिल तेवढे तुला जमेल.

प्रतिसाद देनार्‍यामधे गंमत म्हणुन टिंगलटवाळी म्हुनुन व्देषभावनेनी लिहणारे असतात.
व्देषभावनेनी लिहणार्‍याला हे कळत नाही की व्देषभावना जाग्रुत करुन जेंव्हा आपन लिहीत असतो तेंव्हाआपल्या शरिरा मधे ज्या biochemical reactions होत असतात त्या आपल्याच शरिरा साठी हानिकारक असतात.

व्देषभावनेनी लिहणार्‍याला हे कळत नाही की व्देषभावना जाग्रुत करुन जेंव्हा आपन लिहीत असतो तेंव्हाआपल्या शरिरा मधे ज्या biochemical reactions होत असतात त्या आपल्याच शरिरा साठी हानिकारक असतात.

>>>> Rofl
बरेचदिवसांनी माबोवर परतल्याचे सार्थक झाले हा प्रतिसाद आणि धागा वाचुन Rofl

Pages