कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल???

Submitted by mansi298 on 19 November, 2014 - 05:52

एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे त्याला गावी घेउन जायचे आहे कारण माझ्याकडे ५ मान्जरे आहेत. बस ने कसे नेता येईल??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजरीला अंगाईगीत आवडतं. फक्त त्या मांजराला मराला, तमीळ, कन्नड, मल्याळम, उडीया, कोंगाडी यातली कुठली भाषा कळते हे कन्फर्म करा.

कुत्र्याला हिप्नोटाईज करतानाही हे करावे लागेल. मल्याळी कुत्र्याला हिंदीतून " अब तुम्हें नींद आ रही है, सो जाओ , सो जाओ " असं म्हणून काही फायदा नाही.

प्रश्न बसने न्यायचा आहे का ...मग एवढे काय त्यात
त्याचे पाय बांधा तोंडाला करकचून दोरी बांधा आणि भरा पोत्यात आणि टाका टापावर .........................
गावाला पोहचवल्यावर तुमच्या एखाद्या शत्रूला किंवा सासूला कुत्र्याला सोडवायला सांगा ..म्हणजे जरा चिडलेला असेल न तो ........................

एक से एक लेख आणि प्रतिसाद आहेत..याची पण पीडीएफ करावी म्हणतेय.आमच्या घरातली ३ झुरळे सासरी कोल्हापूरला शिफ्ट करायची आहेत तेव्हा रेफरेन्स ला उपयोगी पडेल

तुम्ही झुरळाला घाबरता म्हणून लगेच सासरी पाठवायच का? शत्रचा शत्रू . ते मित्र होतील. शिवाय तुम्हाला काही भूतदया वगैरे आहे की नाही. Happy

बायदवे मी आमचा जर्मन शेफर्ड स्वखर्चाने ब्राझिलला नेउन आणला होता. तेंव्हा तुमची कळकळ समजू शकतो मानसी298.

सासरि कोणी नाहीहो, सासर इथेच आहे,झुरळ रिकाम्या घरात पाठवायचीत, इथे होजीयरीच्या भारी टॉप ना छिद्र पाडतात म्हणून☺☺☺☺

कुत्र्या चा दात लागुन जर खरचट्ले असेल तर एन्जेक्श्न घ्यावे लागेल का????

हो पण कुणी इंजेक्शन घ्यायचे ते आधी ठरवा
सामान्य माणसाला चावले तर माणसाने घ्यावे
माबोकराला चावले तर कुत्र्याने घ्यावे Happy

कुत्र्या चा दात लागुन जर खरचट्ले असेल तर एन्जेक्श्न घ्यावे लागेल का????
कुत्रा जर पाळीव असेल तर त्याचे वर्षातून एकदा अँटी-रेबीजचे लसीकरण झाले असले पाहिजे. माझ्या कुत्र्याचे होते. तेव्हा खरचटल्यावर आयोडीनचे दोन थेंब टाका आणि निवांत रहा.

परंतु, कुत्रा जर रस्त्यावरचा असेल तर डॉक्टरांना भेटणे श्रेयस्कर.

सार्वजनिक वाहनात कुत्रा नेता येत नाही. मागे आम्ही आमच्या वाहनाने आमचा कुत्रा घेऊन मुरुड जंजिऱ्याच्या गेलो होतो. बोटीतून जंजिऱ्याच्या किल्ल्यावर जाताना कुत्रा किनाऱ्यावर आमच्या गाडीला बांधून ठेवला आणि गेलो. त्याला बोटवाल्याने आमच्याबरोबर राहू दिले नाही.

बादवे रुमालाचा ऋ चा कोणता आहे?
>>>>>>>

तुम्ही मागितला म्हणून देतोय.
https://www.maayboli.com/node/51571
पण तो सिरीअसली अन स्वच्छ हेतूने काढला होता. फक्त जगात माझ्यासारखी भोळीभाबडी अन निरागस माणसे असू शकतात यावर लोकांचा विश्वास बसल्याने त्याला वेगळ्या अर्थाने घेतले गेले.

पुढे या धाग्यात ते स्पष्टही झाले.
http://www.maayboli.com/node/51604

अरे! मी माबोकरांना विचारलं, तर स्वतः ऋनेच येऊन रूमालाच्या धाग्याची लिंक दिली. काय योगायोग आहे पहा! Lol

दोन्ही वाचून काढतो.

कारण माझ्याकडे ५ मान्जरे आहेत. >>> पाच मांजरं का पाळतात लोकं? नाही म्हणजे एक पाळलं तरी सुख तेवढेच आणि पाच पाळले तरी तेवढेच मिळेल. की पाचपट मिळतं? Uhoh एक उत्सुकता म्हणून विचारतोय.

पाच पाळल्या की चार मैत्रीणींचे सुख त्या मांजरांना मिळते. त्यांचाही विचार करा. काय ते नेहमी मनुष्य स्वभावाला जागत नेहमी मनुष्याचाच विचार करायचा Happy

पाच पाळल्या की चार मैत्रीणींचे सुख त्या मांजरांना मिळते. >>> हो! हेही बाकी खरंच आहे. पण त्यांचा एकमेकांत एकोपा असला तर ठीक आहे ना! नाहीतर दुष्मनी असली तर त्यांचं काही खरं नाही.

बरं, प्रत्येकाला जेवायला सेपरेट ताट, वाट्या, साखळ्या, पट्टा, झोपायला गाद्या, त्यांचे कपडे, अंघोळी, साबण, ब्रश, इंजेक्शने, शी शु, आवडीचं जेवण, फिरायला न्यायची वेळ, त्यांची भांडणं हे सर्व सांभाळायचं म्हणजे आपली तारेवरची कसरतच म्हणायची. त्यांना सुख देता देता, आपल्याला दुःख मिळायचे.

देवा....
हा असला ऐवज 3 वर्षे कसा काय मिस केला होता मी??
हहपुवा आहे हा धागा.

मी आधीचं काही वाचले नाही पण मला वाटतं सहलीला किंवा लग्नाच्या वर्हाडाला एसटी बस बुक करतो तशी बुक करून त्यातून कुत्रा गावाला न्यावा.

Pages