कुत्रा सार्वजनिक गाडी ने गावि कसा नेता येईल???

Submitted by mansi298 on 19 November, 2014 - 05:52

एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे त्याला गावी घेउन जायचे आहे कारण माझ्याकडे ५ मान्जरे आहेत. बस ने कसे नेता येईल??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बसच्या चाकांना श्वानखाद्याची पूड लावणे हा एक उपाय सुचला. जाईल पळत पळत मागून. Light 1

सार्वजनिक वाहनात नाही चालत प्राणी नेलेला! त्याला वेगळे वाहन करावे लागेल.

चिंता दोगान्चीहि आहे कोन्त्याहि मुक्क्या प्रान्य्यावर अन्याय होता कामा नये.मान्जरे गेले १४ वर्शापासुन आहेत. पण कुत्रा पुन्हा पुन्हा घरी येत आहे आता त्याला कूथे ही सोडायला मन होत नाही गावि निदान घराची राखण तरी करेल ना तो.

एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे>>>>म्हणजे काय???

असे वाट्ते की तो पाळीव असावा कारण भटका असता तर परत गेला असता. मालकाने सोडुन दिले असावे कदाचीत्....त्याला घर मिळावे असे मला वाट्ते.

शबाना आझमीला फोन करा.. Happy Just kidding.

सीरीयसली..
तुमचा हेतु चांगला आहे..पण गावी नेण्यापेक्षा..स्थानिक डॉग शेल्टर किंवा तत्सम संस्था नाही का? त्यांच्याकडे सोडता येइल.तिथे त्याची काळजीही घेतली जाईल..

अहो पण कुठे आहे ती वानु? तिच्यासारखा तो दिसतो म्हणून त्याला गावी न्यायचे?

तुम्ही गाळलेल्या जागा भरा ऑप्शनला टाकायचात का?

एकुण मला जे समजले ते असे!

ह्या आय डी च्या मागे मागे एक कुत्रा त्यांच्या घरी गेला. त्यांच्या घरी आधीच काही मांजरे आहेत. मांजरे व कुत्रा ह्यांच्यात विशेष आपुलकी निर्माण होण्याचे कोणतेही चान्सेस दिसत नाही आहेत. मांजरे अनेक वर्षांपासून आहेत. कुत्रा नवीन आहे. नवागताने अ‍ॅडजस्ट व्हायला हवे ह्या नैसर्गीक नियमानुसार कुत्र्याला घराबाहेर हाकलणे आवश्यक आहे हे ह्या आय डी ला समजलेले आहे. पण तो कुत्रा कोणीतरी आधी पाळलेला असल्यामुळे तो केविलवाणा झालेला असून त्याला एका घराची नितांत आवश्यकता आहे. त्यातच तो कोणा एका वानुसारखा दिसतो. गी वानु कुठे असते ह्याबद्दल विशेष तपशील तूर्त उपलब्ध नाही. त्या कुत्र्याची कीव आलेली असल्याने त्याला निदान गावाकडच्या घरी तरी ठेवावे असा उदार दृष्टिकोन बाळगून त्याला स्थलांतरीत कसे करावे ह्याची माहिती विचारण्यासाठी हा धागा आहे.

हे सगळे जर बरोबर असेल तर मनस्मिंचा प्रतिसाद पटतो की त्याला डॉग शेल्टरमध्ये भरती करावे. गवकडे न्यायचेच असेल तर कधीतरी एखादे खासगी वाहन तिकडे जाईल त्यात त्याला पाठवावे असे वाटते.

यापेक्षा ऋऽऽनमेषचा रुमालाचा धागा व्यवस्थित लिहिलेला होता तरी ओळखीचा आइडी नाही म्हणून केवढी हाडतुड करण्यात आली होती.

एसार्डी मग तुमचं म्हणणं काय आहे? इथे पण हाडतुड केली पाहिजे असे का ? तसे होईल हो, काही चिंता नका करू. आताशी कुठे धागा निघालाय. Happy

एक कुत्रा माझ्या मागे घरी आला आहे त्याला गावी घेउन जायचे आहे

आणि

माझ्याकडे ५ मान्जरे आहेत.

ह्या दोन वाक्यातील संबंध कळाला नाही Uhoh

तरीही एक उपाय सुचवतो ...

तुम्ही मेल्याची अ‍ॅक्टींग करा , मग शववाहिनी बोलवा अन त्यांना सांगा की पुढील संस्कार गावाला व्हावेत अशी अंतिम इच्छा होती म्हणुन आणि कुत्र्याचे मालकावर लईच प्रेम होते त्याला इथे सोडुन जाता येणार नाही . त्याला सोबतच न्यावे लागेल

थोडे खर्चिक पडेल पण सार्वजनिक वाहनातुन कुत्रा गावी न्यायचा तुमचा हट्ट पुर्ण होईल हे नक्की Proud

हे मुक्तपीठ असतं तर खालील प्रतिक्रिया आल्या असत्या

१. ओ ताई मला तुमच्याबरोबर घरीच राहायचं आहे. नका ना मला गावाला नेऊ. मी, तुम्ही, पाच मांजरं सगळे मजेत राहू.
प्रेषकः मागे आलेला कुत्रा

२. म्याव म्याव त्यात काय मोठसंं? डिकीत घालून न्या कुत्र्याला. त्याला विमानात बसल्यासारखं वाटेल. मी तशीच फिरते सगळीकडे.
प्रेषकः सप्तर्षींचं मांजर

>>>तुम्ही मेल्याची अ‍ॅक्टींग करा , मग शववाहिनी बोलवा अन त्यांना सांगा की पुढील संस्कार गावाला व्हावेत.... >>>

पण तुम्ही मेल्यावर (म्हन्जे अ‍ॅक्टींग केल्यावर) हे सगळं कोण सांगणार..?? एक मिन. तो 'बोलका कुत्रा आहे कि काय..?

प्रसाद Lol Rofl
आणि जाळायला काढल्यावर काय करायचं ? मढं उठून कसं बसलं असं विचारलं तर काय उत्तर देणार? Rofl

रेल्वे मधुन न्यायची सोय आहे भोवतेक.गार्ड्च्या जागेत.
जास्त लांबचा प्रवास नसेल व कुत्रा शांत बसनारा असेल तर बसच्या ड्रायव्हरला विनंतीकरुन बघा समोर घेऊन बसु दिले तर.
प्राण्या बद्द्ल चे तुमचे प्रेम बघुन बरे वाटले.
माझ्या मुलांनाही लहानपनी कुत्रा,मांजराची खुप आवड होती ते त्यांची पिल्ल कुठुनही उचलुन घरी आनायची.

मढं उठून कसं बसलं असं विचारलं तर काय उत्तर देणार?<<<

अरे अरे! काय चाललंय हे!

मढं उठून कसं बसलं असं विचारलं तर 'हेच ते अच्छे दिन' म्हणायचं

हे मुक्तपीठ असतं तर खालील प्रतिक्रिया आल्या असत्या

प्रेषक :
ज्युनियर ब्रह्मे :

१९९२ साली मी औंधच्या पेट्रोल पंपावर माझ्या लुना मध्ये पेट्रोल भरत होतो तेव्हा असाच एक कुत्रा गावाला घेवुन जाण्यासाठी एका सुंदर मुलीने मला पैसे मागितले . मी लगेच चार हजार रोख काढुन दिले .
नंतर कुत्रा दिसला पण पण ती मुलगी काही दिसली नाही ...महागात पडले स्त्रीकुत्रादाक्षिण्य !

प्रेषक : बबन
स्वतंत्र विदर्भ व्हायलाच पायजेल

Rofl

कुत्रा आणि माहीती हवी म्हणुन आधी धागा पाहीला नाही.आता मात्र Rofl

mansi298 @.सार्वजनिक वाहनात नाही चालत प्राणी नेलेला!+२
योग्य उत्तर हेच की स्वतःचे वाहन किंवा दुसरी काही सोय होते का ते पहा ,पाळीव प्राण्यांच्या बाबतीत सेंन्सेटीव असाल तर यातलाच मार्ग निवडा. Happy

अरे कुठे नेउन ठेवला आहे माझ्या प्रतिसादाचा अर्थ

ओम्नी यासाठी म्हणालो की जागा असते ना दोन समोर समोर सीट्स मधे जागा फार असते तिथे कुत्र्याला नीट ठेवु शकतात.

इथे तर भलतेच काय समजले गेले.

विनातिकीट पाठवू नका दंड होईल, तिकीट काढून पाठवा आणि कंडक्टर ला सांगा एकटाच चाललाय, इच्छित स्थळी उतरवून द्या, ते मदत करतात

Pages