वडिलांच्या नावे असलेले घर विकून अपत्याच्या नावे घर घेणे

Submitted by zoom on 16 November, 2014 - 09:23

खालील व्यवहारात कायदेशीर / योग्य मार्ग कोणता?

सध्याचे घर वडिलांच्या नावावर आहे. ते विकून दुसरे नवे (थोडे मोठे) घर विकत घ्यायचे आहे.
नवे घर हे [वडलांच्या सध्याच्या घराच्या विक्रीतून आलेली रक्कम ] + [कमावत्या अपत्याची आर्थिक भर] अशी जुळणी करून घेण्यात येणार आहे.
नवे घर वडील (स्वेच्छेने) थेट अपत्याच्याच नावे करू इच्छितात.

या व्यवहारात-
१. वडिलांना घराच्या विक्रीतून आलेल्या रकमेवर (कसल्याही प्रकारचा) कर भरावा लागतो का?
२. वडिलांकडून (सध्याच्या घराच्या विक्रीतून) आलेली ती रक्कम नव्या घरासाठी वापरताना अपत्याला त्या रकमेवर (कसल्याही प्रकारचा) कर भरावा लागतो का?
३. नवे घर [वडील + अपत्य] दोघांच्या नावे घेतले तर वरच्या प्रश्न १ आणि २ मध्ये भरावे लागणारे कर (असतील तर) इथेही लागू होतात का?
४. दोघांच्या नावे घर विकत घ्यायचे असल्यास दोघांनी घालायच्या रकमेचे काही गुणोत्तर असावे लागते का?
५. अशा प्रकारचा व्यवहार भारतीय कायद्यात राहून आणि किफायतशीररीत्या कसा पार पाडावा?

तज्ज्ञांनी कृपया माहिती द्यावी.

अनेक धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. वडिलांना घराच्या विक्रीतून आलेल्या रकमेवर (कसल्याही प्रकारचा) कर भरावा लागतो का?

होय त्याना LTCG २० % भरावा लागेल (assuming house hold for 3 years)

२. वडिलांकडून (सध्याच्या घराच्या विक्रीतून) आलेली ती रक्कम नव्या घरासाठी वापरताना अपत्याला त्या रकमेवर (कसल्याही प्रकारचा) कर भरावा लागतो का?
पण पूर्ण रक्कम जर नवीन घरात गु.तवली तर Section 54 of IT Act 1961 खाली exemption मिळू शकेल पण वडील प्रथम नाम धारक असावेत नवीन घरात मुलाला वेगळा कर नाही

३. नवे घर [वडील + अपत्य] दोघांच्या नावे घेतले तर वरच्या प्रश्न १ आणि २ मध्ये भरावे लागणारे कर (असतील तर) इथेही लागू होतात का? उत्तर २ मध्ये आले आहे
४. दोघांच्या नावे घर विकत घ्यायचे असल्यास दोघांनी घालायच्या रकमेचे काही गुणोत्तर असावे लागते का? असे काही फक्त जुन्या घरातली पूर्ण रक्कम नवीन घरात गु.न्तवली पाहीजे (bal amount for new house can be paid by son from his own sources and or loans son will be second holder in new property)
५. अशा प्रकारचा व्यवहार भारतीय कायद्यात राहून आणि किफायतशीररीत्या कसा पार पाडावा?
Sale amount to be invested in new house with fathers name incorporated as first holder and claim exemption under section 54 of the Income tax act 1961 so that there is no capital gain tax (only condition that this new house should be held for at least 3 years from purchase otherwise amount exempted earlier will be taxable.

REGARDS

तज्ज्ञांनी कृपया माहिती द्यावी.

धन्यवाद, केदार.

नवे घर फक्त अपत्याच्याच नावे करायचे झाले तर जुन्या घराच्या किमतीतवर वडिलांना LTCG कर भरल्यानंतरही (जेवढी रक्कम) नव्या घराकरता वपरले जाईल त्यावर अपत्याला कर भरावा लागेल का?

नवे घराचे फर्स्ट होल्डर वडील असले तर कसलाही कर लागू होणार नाही, बरोबर ना?

नवे घर फक्त अपत्याच्याच नावे करायचे झाले तर जुन्या घराच्या किमतीतवर वडिलांना LTCG कर भरल्यानंतरही (जेवढी रक्कम) नव्या घराकरता वपरले जाईल त्यावर अपत्याला कर भरावा लागेल का?
>>> होय जुन्या घराच्या विक्रीवर पूर्ण कर भरावा लागेल ( जर नवे घर अपत्याच्या नावे केले तर)

नवे घराचे फर्स्ट होल्डर वडील असले तर कसलाही कर लागू होणार नाही, बरोबर ना?
>>>>>> होय जर पूर्ण नफा नवीन घरात गु.न्तवला तर