अजिंठा लेणी

Submitted by शाबुत on 10 November, 2014 - 23:50

कधीतरी चवथ्या-पाचव्या वर्गात असतांना अजिंठा ला आमच्या वर्गाची सहल गेली होती... त्या लहान वयात फार काही कळत नाही... वरुन शिक्षकांचा धाक... हे करु नका... ते करु नका... तरी लेण्या उंच डोंगराच्या कडेला कोरलेल्या आहेत... समोर खोल दरी आहे... लेण्याच्या भिंतीवर खुप जुने चित्र आहेत... शेवटी भगवान बुध्दाची झोपलेली मुर्ती एका लेणीत आहे... एवढेच मला आठवायाचे... ती एकच मुर्ति माझ्या डोक्यात कशी राहली याचा आजवर मला उलगडा झाला नाही.

वर्ष भरापासुन परत एकदा अजिंठा पाहायला जावु अशी मनात ईच्छा झाली... तसा योग आणला... एकदाचा त्या डोंगराच्या पायथ्याशी बसने पोहचलो... अगदी सुरुवातीलाच MTDC चा कारभार खुपच सुधारलेला वाटला... अगदी डोळ्यात भरण्यासारखा... प्रत्येक लेणीमध्ये ए.सी... मंद लाईट्ची व्यवस्था... प्यायला कुलरचे थंड पाणी... ठरवुन केलेली निसर्गाची जपवणुक... विदेशी पर्यटक खुप होते.

>>> अजिंठा च्या लेण्या ह्या सुंदर चित्रासाठी प्रसिध्द आहेत... भगवान बुध्दाच्या जिवनातले अनेक प्रसंग... तसेच त्या काळातले समाज जिवन त्या चित्रावरुन आपल्याला दिसते. या लेण्याचे खोदकाम हे जवळपास दिड हजार वर्षापुर्वी झाले असावे... नंतर त्या सातशे वर्ष ध्यान्-प्रार्थना करण्यासाठी वापरात होत्या... नंतर त्यांचा वापर अचानक बंद झाला... का झाला याचे कारण कळाले नाही.

* समोरच्या उंच डोंगरावरुन १९३९ साली Jon Smith या शिकारीसाठी गेलेल्या ब्रिटिश अधिकार्‍याला ह्या लेण्या दिसल्या.
प्राचि. ०१
Viwe 01.JPG

* प्रवेश...
प्राचि. ०२
Viwe 02.JPG

* त्या काळातल्या या सुंदर स्त्रीचे चित्र हे जेव्हा भारतात बंगलोरला मिस वर्ल्ड स्पर्धा झाली... तेव्हा तिथे लावले गेले.
प्राचि. ०३
Pari 002.JPG

* त्या काळातल्या स्त्रीया आणि त्याचे अलंकार...
प्राचि. ०४
Lady 01.JPG

प्राचि. ०५
Lady 02.JPG

* हिच ती बुध्दाची झोपलेली मुर्ती... मला नेहमी आठवायची.
प्राचि. ०६
Budhh 05.JPG

* त्या लेण्याच्या आतिल भिंतीवरील बुध्दांची चित्र... अजुनही काही वर्षापुर्वी काढली इतकी ताजी वाटतात.
प्राचि. ०७
B Paint 01.JPG

प्राचि. ०८
B Paint 02.JPG

प्राचि. ०९
B Paint 03.JPG

प्राचि. १०
B Paint 04.JPG

* लेण्याच्या छतावर वेगवेगळी नक्षी काढलेली आहे... एका लेणीच्या छतावर आजचा चिनी ड्रगन दिसला.. पण प्रकाशा अभावी मला ते चित्र घेता आले नाही.

प्राचि. ११
Bhint 01.JPG

प्राचि. १२
Bhint 02.JPG

* एका लेणीचे प्रवेशद्वार...
प्राचि. १३
Door 01.JPG

* त्यामधील स्तुप...
प्राचि. १४
Stup 02.JPG

* जास्तीत जास्त लेण्यामधे मध्याभागी भगवान बुध्दाची ध्यानस्थ मुर्ती आहेत...
प्राचि. १५
Stup 01.JPG

* शेवटी लेण्याच्या बाजुला कोसळणारा सात खळग्यांचा धबधबा... म्हणजे तो सात मोठ्या खळग्यामधुन पाणी खाली वाहत येते.
प्राचि. १६
7 Flow.JPG

*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहेत.
अजुन एक बुध्दाची ध्यानस्थ मुर्ती आहे ज्यात बुध्दाचा एका बाजुने हसरा चेहरा दिसतो व दुसर्‍या बाजुने खुप गंभिर.

तिथे दगडात खुप कला कोरलेल्या आहेत... चार हरणींचे एकच तोंड आहे.. पण त्या लेणीत खुपच अंधार असल्याने तो फोटो घेता आला नाही.

<<प्रत्येक लेणीमध्ये ए.सी... मंद लाईट्ची व्यवस्था... प्यायला कुलरचे थंड पाणी... ठरवुन केलेली निसर्गाची जपवणुक... विदेशी पर्यटक खुप होते>>>>>या सगळ्यासाठि जपान ने अर्थसहाय्य दिले आहे even अजिंठा लेणी कडे
जानारे रस्ते बांधन्यासाठि ही.

मि Discovery channel वर एका प्रोगाम मध्ये पाहिलेल १९ २६ नं च्या ज्या गुंफा आहेत त्यातिल बुध्दाच्या मुर्ती च्या
चेहर्‍यावर उगवत्या सुर्याचि पहिलि किरने पडतात. मला ते दृष्य पाहन्याचि खुप ईच्छा आहे.