पक्षी सम्मेलन

Submitted by जो_एस on 14 November, 2014 - 03:32

सध्य़ा पक्षी सम्मेलन भरलय माझ्या घरा जवळ
अजून असे बरेच आहेत ज्यांचे फोटो काढता आले नाहियेत
सगळे आपापल्या आवाजात साद घालत असतात निसर्गाला…..
बाकिचे घार, बगळे, हॉर्नबिल, बुलबुल, शिंपी असे नेहमीचे कलाकार आहेतच

ra7.jpgra6.jpgra5.jpgra4.jpgra2.jpgra14.jpgra13.jpgra10.jpgra9.jpgra8.jpg

हा पण दिसला फिरताना.
saap.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
मला असे मोकळे (बंदिस्तच्या विरुद्ध काय असतं? Uhoh ) पक्षी पहायला फार आवडतात.

सर्व फोटो मस्त.
पहिला आणि दुसरा खासच, दुसर्‍या फोटोत त्याच्या डोळ्याचा लाल रंग मस्तच दिसत आहे.

धन्यवाद मित्रांनो
वर्षा तो ओरिएन्टल व्हाइट आय ( चश्मेवाला) हाच आहे

बाकीचे कोतवाल, वेडा राघू, नाचरा आहेत. तिसरा फोटो तांबट असावा
चौथा काळा आहे त्याच नाव माहित नाही.

भन्नाट पक्षी संमेलन!!!!

चौथा काळा आहे त्याच नाव माहित नाही.>>>>> हा नर सुर्यपक्षी आहे.
आठवा आणि नववा fantail flycatcher असावा. याची शेपटी पंख्यासारखी उघडते.

जो_एस : तुम्ही कुठे रहाता? मुंबईत???
मी कांदिवलीला रहाते. माझ्या घरातून २०-२५ प्रकारचे पक्षी दिसतात. पण कोतवाल, वेडा राघू आणि हळद्या फक्त सिझनल आहेत. काळे कोतवाल नॅशनल पार्कमधे सक्रिय झाले की, पांढर्‍या पोटाचे अ‍ॅशी कोतवाल आजूबाजूच्या परिसरात दिसू लागतात. तुम्हालाही असा अनुभव आहे का?

धन्यवाद
मी पुण्यात असतो
कोतवाल सिझनल असतात, वेडा राघूची संख्या सध्या वाढल्ये. पण एरवी एखादा दिसतो. शिंजीर, सूर्यपक्षी पण सिझनल आहेत. पाण कोंबड्या फेब्रुवारी ते ऑक्टोबर दिसतात.

छान.
वेडा राघूची संख्या सध्या वाढल्ये.>>>> पक्षांना माणसांची सवय झाली आहे. पूर्वी ईतके पक्षी सर्रास दिसत नव्हते.

८ नव्हेंबरच्या शनीवारी सकाळीच "हुपु" देखिल आला होता. असे पाहुणे मन प्रसन्न करतात.

पक्षांना माणसांची सवय झाली आहे. पूर्वी ईतके पक्षी सर्रास दिसत नव्हते. >>>>
हो आणि माणसाच्या बऱ्यापेकी जवळपण येतात,

खूप सुंदर,, इतके पक्षी घरातून पाहायला मिळणं हे भाग्यच!!

जो-एस, प्लीज प्रत्येक फोटो वर त्या त्या पक्ष्याचं नांव टाका ,म्हंजे सोपं होईल Happy (माझ्या सारख्यांची सोय होईल)

वॉव...........भारीये सम्मेलन!
पाचवा फोटो मस्त आलाय. वेड्या राघूंचा.

सगळे फोटो मस्तच. फक्त शेवटचा बापरे ! कॅटेगरीतला.

मला असे मोकळे (बंदिस्तच्या विरुद्ध काय असतं? अ ओ, आता काय करायचं )>> रीया @ स्वछंदी, मुक्त ,स्वैर जसं सगळ्यांनी असायला हवं. Happy

सॉलीड मस्त आहेत फोटो.

जो_एस लकी आहात हो तुम्ही. निसर्ग किती आजुबाजुला नांदतोय तुमच्या आणि तुम्ही मस्त बागडताय, विहरताय त्यात.

Pages