चेरी ब्लॉसम - एक अविस्मरणीय पहाट

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

२०१३ च्या शेवटी शेवटी आणि ह्या वर्षाच्या सुरवातील मी वाशिंगटन डीसी आणि वर्जनियामधे नोकरीनिमित्त काही महिने राहिलो. मी तिथे गेलो तेंव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरवात झालेली होती. पानगळीच्या दरम्यान गळून गेलेली पाने जमिनाला चिकटत चाललेली होती. कुजत चाललेली होती. काही पाने कधीकाळी वहीत जपूण ठेवलेल्या पिंपळाच्या पानाची आठवण करुन देणारी होती. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला आणि कुठे सिंगापुरातली दमट हवा आणि उंचच उंच इमारती आणि कुठे हे ठेंगणे जग! मी तुलना करता करताच मला भव्य रस्ते असलेले डीसी शहर भेटले आणि मी वाशिंगटन डीसीच्या प्रेमातच पडलो. कित्येक दिवसाच्या सांजा, शनवार रविवारचे दिवस मी डीसीमधे फिरण्यात घालवले. मी 'बालटी' नावाच्या ज्या हॉटेलमधे जेवायला जात होतो तिथे एक कश्मिरी गोरापान सोनू निगम सारखा दिसणारा मुलगा होता. त्याने मला चेरी ब्लॉसमबद्दल माहिती दिली. मला जो मुलगा माझ्या हॉटेलमधून ऑफीसमधे सोडायचा त्यानेही मला चेरी ब्लॉसमबद्दल थोडे सांगितले पण सिंगापुरमधे एखाद्या गोष्टीची जशी जाहिरात असते ना तशी जाहीरात मला इथे दिसली नाही. काही ठिकाणी मला चेरी ब्लॉसमचे टी शर्ट दिसले. काही ठिकाणी जपानच्या कलाप्रदर्शनाबद्दल मला वाचायला मिळाले पण नक्की चेरी ब्लॉसम आहे काय हे स्पष्ट असे कळत नव्हते. ऑफीसमधील काही लोकांना मी विचारले तर त्यांनी हो आता फुले उमलतील नक्की दिवस ठरवल्या जाईल अशी माहिती दिली पण बाहेरचे कुंद, कोंदट वातावरण, बर्फाने वेढून घेतलेले झाड न झाड, सुर्याची कुठे तिरीप नाही - अशा अवस्थेत कुठून ही फुले फुलतील मला कळेच ना. सारखे सारखे चेरी ब्लॉसमबद्दल विचार करुन मी गुगलवरुन माहिती काढली. मी डीसीमधे जिथे नेहमी फिरायला जायचो ती जागा म्हणजे 'टायडल बेसिन'. तिथे एक तळे आहे. त्या तळ्याभवती चेरीची खूप जुनी झाडे आहेत पण ती झाडे जुनी आहेत म्हणून अगदी वडापिंपळासारखे डेरेदार त्यांचे रुप नाही. त्या झाडांसमोर नॅशनल मॉलमधील विशाल वास्तू उभ्या आहेत. त्या वास्तूंपुढे चेरीची झाडे नजरेला पडतील तर शपथ!

हळूहळू हिवाळा ओसरत गेला. आणि एका भल्या पहाटे आकाश निळे झाले. गवताचे पाते मातिच्या कुशीतून वर डोकावू लागले. टुलिप्सचे कोंब पानांना डावलून थेट आपली हसरी जांभळी पिवळी फुले घेऊनच जन्माला आलीत. चेरीच्या कळ्या मुळात कळ्या आहेत की पाने फुटली आहेत हे कळू न देता एका शांत रात्री .. रामप्रहरी उमलून निसर्गाचा अविष्कार काय असतो ते दाखवू लागली. ये कहा आ गये हम.. अथवा ये हंसी वादीया ये खुला आसमा.. ही गीते ओठी आलीत.

कुठल्याही परिस्थितीमधे आपली पहाट चुकु नये म्हणून मी अगदी पहाटे ३ वाजता टॅक्सी बोलावली. हॉटेलपासून एका तासाचे अंतर होते डीसीपर्यंतचे. मला घ्यायला आलेली व्यक्ती एक पाकिस्तानी व्यक्ती होती. त्यांना रस्ता माहिती नव्हता पण मीच गाईड केले. स्टर्लिंगपासून डीसी अगदी सरळसोट रस्ता आहे.

पहीले दृश्य म्हणजे दुरुनच दिसणारे दुसर्‍या महायुद्धाचे हे प्रतिकः

चहूकडे ही अशी फुलेच फुले:

ही सगळी फुले एकाच रात्रीतून फुललेली आहेत.. म्हणून खरे तर आव चेरी ब्लॉसम!

हळू हळू पहाट उमलते आहे पण त्याही पुर्वी आज फुलेच फुले उमललेली आहेत. पहाटेचे स्वागत फुलांनी केलेले आहे:

असे म्हणतात चेरीचे खरे सौंदर्य बघायचे असेल तर तिचे प्रतिबिंब पाण्यात बघावे. फिकट गुलाबी रंगाची झाक ह्या टायडल बेसिन भोवती पसरलेली आहे. जपानी लोकांनी मुद्दाम ही झाडे तळयाभोवती लावलीत जेणेकरुन चेरीचे प्रतिबिंब पाण्यात पडेल.

तळ्याचा पुर्ण परिघ फोटोत मावत नाही. फक्त इतकाच आला:

मार्टीन लुथर किंग ...

श्या.. ऐकतच नाही आज ही फुले:

पा़कळीतून झिरपलेले उन्हः

कैसे दिन बीते .. कैसी बिती रतिया.. पिया जानेना हो!!! ....काल परवा हे खोड आणि ह्या फांद्या बर्फाच्छादीत होत्या. तब्बल पाच ते सहा महिने बर्फाच्या कुशीत बाह्यजगापासून अलिप्त होत्या:

आयी बरखा बहार..

डार डार पिया फुलोकी चादर बुनी..... काले-काले पिया सावन के बादल चुने..बादल चुन के आँखों में काजल घुले...हुई बाँवरी हुई साँवरी....हूँ हूँ हूँ

दहीभाताची उंडी मी लाविन तुझे तोंडी..

मै तो तुम संग नैन मिलाके हार गयी सजना....

मैने कहा फुलो हसो.. तो वो खिलखिलाकर हंस उठे!!!

बाहो मे चले आवो... हम से सनम क्या परदा..

निला आसमा सो गया... हो...

दुपार होत नाही तर झाडांची फुले गळून नवीन पालवी हजर आणि दुपार मस्त झोप घेऊन आलेल्या निसर्गप्रेमींना ती संधी मिळतच नाही जी झोप अर्धवट घेऊन आलेली असतातः

इन हसी वादीयोके दो चार नजारे चुराये ...

अभी ना जावो छोडकर .. की दिल अभी भरा नही!
आणि ती ...
समझाके मैं तो हारी ...धमकाया.. दीनी गारी ....नी नी नी रे रे ग ग म म प प ध नी सा सा सा....

करवटे बदलती रहे सारी रात हम.. चेरीजी आपकी कसम!

का रे अबोला .. का रे दुरावा!

झांडाच्या पुढे वाकायच असतः

बारा दिवस जॅपनीज लोक ह्या दिपमाळेत दिप लावतातः

काय बरे लिहिले आहे वरती:

ही दीपमाळ नाहीच तर.. पण खर्‍या भारतिय माणसाला नक्कीच आपल्या दिपमाळेची आठवण येईलः

किताबे बहुतसी पढी होगी तुमने..

ही सगळी झाडे टिकीयोनी डीसीला भेट दिली आहे. सुरवातीला आणलेली २००० झाडांना किड लागली. ती जाळपोळ केली. परत नवीन आणली. त्यातील काही वाचलीत. तगलीत. वाढलीत. रुजलीत. बहरली. आणि मैत्री अशीही असते हे दाखवून गेली. काश ऐसी होई दोस्ती हमे मिल जाये! थ्री चीअर्से:

थोडी ज्ञानात भर करुया:

चेरी ब्लॉसम निमित्त खास परेडः

संध्याकाळपर्यंत चिंबून गेलेली फुले! पण जीवाला भरपुर आनंद देऊन गेली.

उन्हामुळे गर्द होत चाललेला गुलाबी रंगः

काही फुल झडून गेलीत..

पाण्यात पडलेल्या ह्या फुलांच्या पाकळ्या;:

पाय ठेवायला जागा उरली नाही.. बरे केले पहाटेच पहिला नंबर लावला Happy

अय्यो ही लोक आपल्यासारखी खाली बसून बसतात खातात पितात...

काहीजण गर्दीपासून दूर जात आपली शांतता शोधतातचः हीच्या कानातील लोंबकळणारे रिंग सुरेख होते.

खरच हे नियम पाळायलाच हवे पण लोक पाळत नाहीतः अगदी प्रगत देशातील लोक सुद्धा नियम पाळत नाही.

हे वाचा:

किती महान ना.. फुले कधी उमलतील हे बरोबर ताडले जाते: त्याचा फायदा निसर्गप्रेमींना मिळतो. कारण हा सगळा खेळ त्या एक दिवसावर असतो.

योशिनोनी झाडे सर्वात जास्त आढळली:

फिर वही शाम .. वही गम .. वही तनहाई है..

चांद फिर निकला.. मगर तुम ना आये...

पाण्यात इतक्या पाकळ्या पडळ्या की पाणी पाकळीमय झाले आणि बदकांना पोहायला एक गुलाबी गादी मिळाली आणि पाणी प्यायला एक बिसलरीची बाटली. शोधा:

एक लाट पाकळ्यांचीही होती:

काठाशी डचमळत रालीलेला फुलांचा निचरा.. निसर्गाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्यः

बघा हे अमेरिकेचे राजधानी शहरातील एक रुप. इथेही केर असतो. लोक नियम पाळत नाही:

तर मंडळी आपण अशी एक आशा करु की आपणही आपले रोजचे जीवन उमेदीने जगू. एक आशा बाळगू की आपणही फुलु आणि फुलता फुलता कधी कोमेजलोच तर जगाला एक आनंद देऊन जाऊ!

धन्यवाद
बी

विषय: 

बी... सुर्रेख रे.. प्रत्येक फोटो कातिल आलाय.. आणी तू दिलेले कॅप्शन्स... चेरी फुलांसारखेच फुललेत अगदी!!!

मस्त मस्त मस्त वाटतंय...

वॉव! बी काय अप्रतीम पकडलायस चे ब्लॉ फेस्ट!
तुला आठवत असेल ....तुझ्या नंतर २ दिवसांनी आम्ही गेलो होतो पण इतका बहार नाही मिळाला पहायला. आम्ही दोन दिवस लेट केला होता!
फोटो आणि शीर्षकंही अफलातून!

सुंदर फोटोज Happy
काही काही कॅप्शन्स परफेक्ट जमलीयेत काहे एतरी ओढुन ताणुन बसवल्यासारखी वाटली Happy

प्यार के मोड पे छोडो गे.. जो बाहे मेरी..!!! >>>
इथे छोडो गे मधली स्पेस काढा ओ भाऊ Uhoh
मला आधी वाटलेलं गे कपलचा फोटो असेल Wink

पण हा इतका मस्त आणी पर्फेक्ट फोटो आहे ना की त्या कपलला दिलात तर ते १२ गावं इनाम म्हणून देतील तुम्हाला Happy
परफेक्ट फेसबूक कव्हर फोटो फॉर देम Happy

किती सुंदर फोटो आणि त्याची तितकीच सुंदर नावे. मस्तच.. खुप आवडले.

एका रात्रीत जर सग़ळी फुले अचानक उमलत असतील तर कोणीतरी बिफोर आणि आफ्टर असा फोटो कधीतरी टाकेल काय ???

साधना, हो भाग येणार आहे.

शशांक, पराग, सिनी, रिया, साधना, ललिताप्रिती, संजीव, सतिश, झकासराव, अदिती - धन्यवाद.

Pages