चेरी ब्लॉसम - एक अविस्मरणीय पहाट

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

२०१३ च्या शेवटी शेवटी आणि ह्या वर्षाच्या सुरवातील मी वाशिंगटन डीसी आणि वर्जनियामधे नोकरीनिमित्त काही महिने राहिलो. मी तिथे गेलो तेंव्हा हिवाळ्याची नुकतीच सुरवात झालेली होती. पानगळीच्या दरम्यान गळून गेलेली पाने जमिनाला चिकटत चाललेली होती. कुजत चाललेली होती. काही पाने कधीकाळी वहीत जपूण ठेवलेल्या पिंपळाच्या पानाची आठवण करुन देणारी होती. सगळीकडे बर्फच बर्फ पसरलेला आणि कुठे सिंगापुरातली दमट हवा आणि उंचच उंच इमारती आणि कुठे हे ठेंगणे जग! मी तुलना करता करताच मला भव्य रस्ते असलेले डीसी शहर भेटले आणि मी वाशिंगटन डीसीच्या प्रेमातच पडलो. कित्येक दिवसाच्या सांजा, शनवार रविवारचे दिवस मी डीसीमधे फिरण्यात घालवले. मी 'बालटी' नावाच्या ज्या हॉटेलमधे जेवायला जात होतो तिथे एक कश्मिरी गोरापान सोनू निगम सारखा दिसणारा मुलगा होता. त्याने मला चेरी ब्लॉसमबद्दल माहिती दिली. मला जो मुलगा माझ्या हॉटेलमधून ऑफीसमधे सोडायचा त्यानेही मला चेरी ब्लॉसमबद्दल थोडे सांगितले पण सिंगापुरमधे एखाद्या गोष्टीची जशी जाहिरात असते ना तशी जाहीरात मला इथे दिसली नाही. काही ठिकाणी मला चेरी ब्लॉसमचे टी शर्ट दिसले. काही ठिकाणी जपानच्या कलाप्रदर्शनाबद्दल मला वाचायला मिळाले पण नक्की चेरी ब्लॉसम आहे काय हे स्पष्ट असे कळत नव्हते. ऑफीसमधील काही लोकांना मी विचारले तर त्यांनी हो आता फुले उमलतील नक्की दिवस ठरवल्या जाईल अशी माहिती दिली पण बाहेरचे कुंद, कोंदट वातावरण, बर्फाने वेढून घेतलेले झाड न झाड, सुर्याची कुठे तिरीप नाही - अशा अवस्थेत कुठून ही फुले फुलतील मला कळेच ना. सारखे सारखे चेरी ब्लॉसमबद्दल विचार करुन मी गुगलवरुन माहिती काढली. मी डीसीमधे जिथे नेहमी फिरायला जायचो ती जागा म्हणजे 'टायडल बेसिन'. तिथे एक तळे आहे. त्या तळ्याभवती चेरीची खूप जुनी झाडे आहेत पण ती झाडे जुनी आहेत म्हणून अगदी वडापिंपळासारखे डेरेदार त्यांचे रुप नाही. त्या झाडांसमोर नॅशनल मॉलमधील विशाल वास्तू उभ्या आहेत. त्या वास्तूंपुढे चेरीची झाडे नजरेला पडतील तर शपथ!

हळूहळू हिवाळा ओसरत गेला. आणि एका भल्या पहाटे आकाश निळे झाले. गवताचे पाते मातिच्या कुशीतून वर डोकावू लागले. टुलिप्सचे कोंब पानांना डावलून थेट आपली हसरी जांभळी पिवळी फुले घेऊनच जन्माला आलीत. चेरीच्या कळ्या मुळात कळ्या आहेत की पाने फुटली आहेत हे कळू न देता एका शांत रात्री .. रामप्रहरी उमलून निसर्गाचा अविष्कार काय असतो ते दाखवू लागली. ये कहा आ गये हम.. अथवा ये हंसी वादीया ये खुला आसमा.. ही गीते ओठी आलीत.

कुठल्याही परिस्थितीमधे आपली पहाट चुकु नये म्हणून मी अगदी पहाटे ३ वाजता टॅक्सी बोलावली. हॉटेलपासून एका तासाचे अंतर होते डीसीपर्यंतचे. मला घ्यायला आलेली व्यक्ती एक पाकिस्तानी व्यक्ती होती. त्यांना रस्ता माहिती नव्हता पण मीच गाईड केले. स्टर्लिंगपासून डीसी अगदी सरळसोट रस्ता आहे.

पहीले दृश्य म्हणजे दुरुनच दिसणारे दुसर्‍या महायुद्धाचे हे प्रतिकः

चहूकडे ही अशी फुलेच फुले:

ही सगळी फुले एकाच रात्रीतून फुललेली आहेत.. म्हणून खरे तर आव चेरी ब्लॉसम!

हळू हळू पहाट उमलते आहे पण त्याही पुर्वी आज फुलेच फुले उमललेली आहेत. पहाटेचे स्वागत फुलांनी केलेले आहे:

असे म्हणतात चेरीचे खरे सौंदर्य बघायचे असेल तर तिचे प्रतिबिंब पाण्यात बघावे. फिकट गुलाबी रंगाची झाक ह्या टायडल बेसिन भोवती पसरलेली आहे. जपानी लोकांनी मुद्दाम ही झाडे तळयाभोवती लावलीत जेणेकरुन चेरीचे प्रतिबिंब पाण्यात पडेल.

तळ्याचा पुर्ण परिघ फोटोत मावत नाही. फक्त इतकाच आला:

मार्टीन लुथर किंग ...

श्या.. ऐकतच नाही आज ही फुले:

पा़कळीतून झिरपलेले उन्हः

कैसे दिन बीते .. कैसी बिती रतिया.. पिया जानेना हो!!! ....काल परवा हे खोड आणि ह्या फांद्या बर्फाच्छादीत होत्या. तब्बल पाच ते सहा महिने बर्फाच्या कुशीत बाह्यजगापासून अलिप्त होत्या:

आयी बरखा बहार..

डार डार पिया फुलोकी चादर बुनी..... काले-काले पिया सावन के बादल चुने..बादल चुन के आँखों में काजल घुले...हुई बाँवरी हुई साँवरी....हूँ हूँ हूँ

दहीभाताची उंडी मी लाविन तुझे तोंडी..

मै तो तुम संग नैन मिलाके हार गयी सजना....

मैने कहा फुलो हसो.. तो वो खिलखिलाकर हंस उठे!!!

बाहो मे चले आवो... हम से सनम क्या परदा..

निला आसमा सो गया... हो...

दुपार होत नाही तर झाडांची फुले गळून नवीन पालवी हजर आणि दुपार मस्त झोप घेऊन आलेल्या निसर्गप्रेमींना ती संधी मिळतच नाही जी झोप अर्धवट घेऊन आलेली असतातः

इन हसी वादीयोके दो चार नजारे चुराये ...

अभी ना जावो छोडकर .. की दिल अभी भरा नही!
आणि ती ...
समझाके मैं तो हारी ...धमकाया.. दीनी गारी ....नी नी नी रे रे ग ग म म प प ध नी सा सा सा....

करवटे बदलती रहे सारी रात हम.. चेरीजी आपकी कसम!

का रे अबोला .. का रे दुरावा!

झांडाच्या पुढे वाकायच असतः

बारा दिवस जॅपनीज लोक ह्या दिपमाळेत दिप लावतातः

काय बरे लिहिले आहे वरती:

ही दीपमाळ नाहीच तर.. पण खर्‍या भारतिय माणसाला नक्कीच आपल्या दिपमाळेची आठवण येईलः

किताबे बहुतसी पढी होगी तुमने..

ही सगळी झाडे टिकीयोनी डीसीला भेट दिली आहे. सुरवातीला आणलेली २००० झाडांना किड लागली. ती जाळपोळ केली. परत नवीन आणली. त्यातील काही वाचलीत. तगलीत. वाढलीत. रुजलीत. बहरली. आणि मैत्री अशीही असते हे दाखवून गेली. काश ऐसी होई दोस्ती हमे मिल जाये! थ्री चीअर्से:

थोडी ज्ञानात भर करुया:

चेरी ब्लॉसम निमित्त खास परेडः

संध्याकाळपर्यंत चिंबून गेलेली फुले! पण जीवाला भरपुर आनंद देऊन गेली.

उन्हामुळे गर्द होत चाललेला गुलाबी रंगः

काही फुल झडून गेलीत..

पाण्यात पडलेल्या ह्या फुलांच्या पाकळ्या;:

पाय ठेवायला जागा उरली नाही.. बरे केले पहाटेच पहिला नंबर लावला Happy

अय्यो ही लोक आपल्यासारखी खाली बसून बसतात खातात पितात...

काहीजण गर्दीपासून दूर जात आपली शांतता शोधतातचः हीच्या कानातील लोंबकळणारे रिंग सुरेख होते.

खरच हे नियम पाळायलाच हवे पण लोक पाळत नाहीतः अगदी प्रगत देशातील लोक सुद्धा नियम पाळत नाही.

हे वाचा:

किती महान ना.. फुले कधी उमलतील हे बरोबर ताडले जाते: त्याचा फायदा निसर्गप्रेमींना मिळतो. कारण हा सगळा खेळ त्या एक दिवसावर असतो.

योशिनोनी झाडे सर्वात जास्त आढळली:

फिर वही शाम .. वही गम .. वही तनहाई है..

चांद फिर निकला.. मगर तुम ना आये...

पाण्यात इतक्या पाकळ्या पडळ्या की पाणी पाकळीमय झाले आणि बदकांना पोहायला एक गुलाबी गादी मिळाली आणि पाणी प्यायला एक बिसलरीची बाटली. शोधा:

एक लाट पाकळ्यांचीही होती:

काठाशी डचमळत रालीलेला फुलांचा निचरा.. निसर्गाला वाहिलेल्या फुलांचे निर्माल्यः

बघा हे अमेरिकेचे राजधानी शहरातील एक रुप. इथेही केर असतो. लोक नियम पाळत नाही:

तर मंडळी आपण अशी एक आशा करु की आपणही आपले रोजचे जीवन उमेदीने जगू. एक आशा बाळगू की आपणही फुलु आणि फुलता फुलता कधी कोमेजलोच तर जगाला एक आनंद देऊन जाऊ!

धन्यवाद
बी

विषय: 

मस्तच फोटो बी

आणि एका सिंगापूरस्थित भारतीयाने अमेरिकेत गेला असताना जपानी लोकांनी भेट म्हणून दिलेल्या चेरीच्या झाडांच्या बहराचे फोटो मायबोलीच्या माध्यमातून जगभरातली माणसे बघतील, असे वाटून मौज वाटली.

अमेरिका आणि जपानच्या सहली केलेल्या (नोकरीनिमित्ताने असो वा प्रवासी असो) कित्येकांनी चेरी ब्लॉसमचे वर्णन केले आहे....ते मी वाचले होतेच...पण बी तुम्ही प्रत्यक्ष चेरी ब्लॉसम इथे मायबोलीवर चित्ररुपाने असे काही सादर केले की....जणू मी देखील त्या बदकाप्रमाणे गुलाबी पाण्यात पोहू लागलो.....डोळे इतके शांत झाले चित्रे पाहून की चेरी ब्लॉसमची जादू वॉशिंग्टन डीसीमध्ये प्रत्यक्ष हजर राहून पाहत आहे असेच वाटत गेले....शैली छानच आहे तुमची वर्णन करण्याची.

(एक सूचना करावीशी वाटते.....खालून तिसरा फोटो....जो कचर्‍याचा आहे....तो प्लीज काढून टाकाल का ? काही गरज नाही त्याची ह्या सौंदर्याच्या गुच्छात. जगाला तो शाप लागला आहे लोकांच्या मुर्दाड वृत्तीचा....मग भारत असो वा अमेरिका....नाईलाज आहे. तो पुरावा इतक्या सुंदर फोटोसमवेत पाहू नये असेच वाटले. अर्थात हे माझे मत आहे. तुम्हाला तो तिथे हवाच आहे असे वाटत असेल तर जरूर असू देत.)

मस्तच !

सुंदर फोटो आहेत आणि वर्णनसुद्धा छान !
खूप मस्त टिपलेत सगळे क्षण!
खुप आवडले.

बी, खुप सुंदर फोटो आणि लेखनही.
शेवटी तूला सवड मिळाली तर फोटो टाकायला. आता अजून हवेत बरं का !

>>
हा सगळा खेळ त्या एक दिवसावर असतो. >>>> चेरी ब्लॉसम फक्त एक दिवसाचा नसतो.>> बरोबर. हवा चांगली राहिली तर ८,१० दिवसही बहर टिकतो.

फार सुरेख टिपलाय ब्लॉसम. गळणार्‍या फुलाखाली नवी पालवी फुटण्याचा फोटो स्मरणात राहील.

आणि हर्पेन>>>>>>>>>>>>>
आणि एका सिंगापूरस्थित भारतीयाने अमेरिकेत गेला असताना जपानी लोकांनी भेट म्हणून दिलेल्या चेरीच्या झाडांच्या बहराचे फोटो मायबोलीच्या माध्यमातून जगभरातली माणसे बघतील, असे वाटून मौज वाटली.

>>>>>>>>>>>>>>>>. यात पाकिस्तानी ड्रायव्हरच्या टॅक्सीतून हे राहिलंच की ....:स्मितः

chaan photo.

फोटो फारच छान आहे.

अवांतर : काही फोटोमधे व्यक्ती आलेल्या आहेत आणि त्यांचे खाजगी क्षण देखील अश्यांची पुर्वपरवाणगी घेतली होती का ? मायबोलीवर बरेचजण स्वतःचे खाजगी आयुष्य जपतात मग इतरांचे देखील त्याचप्रमाणे जपावे. इतकेच

लेख वाचून सहज मनात आलं आणि YOUTUBE वर 'cherry blossom time lapse' सर्च केल, आणि हा व्हिडीओ सापडला......its beautiful
https://www.youtube.com/watch?v=egTI8S45Pko
download (1).jpg

@ बी, .......... लेख आणि फोटोग्राफ्स छान आहेत

गुलाबी फुलनक्षी निळाईवर
मल्मली पायघड्या जमीनीवर
पाणी गुलाबी रजई पांघरुन,
दिवास्वप्न वेगळे काय असते याहून?...
अगदी ताजे टवटवीत रंगआले आहेत फोटोतले

निसर्गचक्रातला एक दिवसाचा लावण्यमहोत्सव!
तो खुलवणाऱ्या , फुलवणाऱ्या , आमच्यापर्यंत पोचवणाऱ्या सर्वांसमोर नतमस्तक, तुम्हीही त्यात येता, बी Happy

मस्त..

Pages