जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात पोरांचा शेवटचा डायलॉग भारी होता.. गुलाबाच्या पाकळ्यांचा कचरा कोणी केला आहे.. Proud

रच्याकने, मी ह्या आठवड्यात चारही दिवस जुयेरेगा पाहिलं !! आणि त्याचं टायटल साँग मला आवडायला लागलय.. Uhoh

या सिरियलचं टायटल साँग(च) सर्वांना आवडण्यासारखं आहे.
बाकी आदे, मेदे आवडणं हे व्यक्तीसापेक्ष आहे Proud

मला अवगत नसलेल्या आणी कधी तरी अचानक प्रकट झालेल्या कॉमेडी सेन्सला दाद दिल्याबद्दल आभारी आहे.:फिदी:

सुमेधा, ती चित्रा खालमुन्डी वाटतेच कधी तरी पण मला एक कळत नाहीये की ती देसायान्च्या घरात ठाण मान्डुन का बसलीय? सतिशने तिला स्थळे पहायला इकडे आणलीय की, ती स्वतःच तसा गैरसमज करुन बसलीय.:अओ:

राणेकाकुनी पण एक आपटे नावाचे स्थळ आणले होते, त्याला तिने नकार दिला बहुतेक. माझे मधले एपिसोड गायब झाले. कालचा पण पाहीला नाही.:अओ:

आणी तो येडपट आदे आधीच खोटे बोलण्यामुळे गोत्यात आलाय, आता परत त्या चित्राच्या भरीस पडुन घरच्या लोकान्शी आणी विशेषता सतिशशी पन्गा घेणार हे निश्चीत. जेव्हा पहावे तेव्हा ही त्या आदेला पालीसारखी चिकटुन गावभर उनाडते. आदेला ती आता भैय्या मानतेय की सैय्या देव जाणे.:फिदी:

आता पुढच्या एपिसोडाची झलक दाखवलीय, त्यात बाबाजी आदेला चित्राबरोबर पहातात. चला, डाळीत पाणी वाढवले चित्राबाईनी.

ती चित्रा झंपट वाटते रेशीमगाठीमधे, मी एकदाच बघितलं तिला. खरी ती वेस्टर्न ड्रेसमधे छान दिसते आणि कामपण दुसर्‍या सिरीयलमधे चांगलं केलं होतं, निदान इथल्यापेक्षा तरी बरंच बरं.

ती चित्रा झंपट वाटते<<< इथे एक झंपी नावाचा आय डी आहे बरं का? जरा जपून!

==========================================================

चित्रा पिंट्याला कशी दिसेल? दोन्ही सिरियलीही एक होऊन जातील, तोही एक ताप मिटेल

=============================================================

ही कोण चित्रा आलीय, स्वतःचंच रडगाणं गातीय, तिला तो विरक्त आदित्य मदत काय करतोय, ती आजारी काय पडतीय, गोधडी काय अंगावर घेऊन बसतीय, त्या अर्चूचा नवरा काय तिला थोपटतोय आणि अर्चू तिला खायला काय आणून देतीय!

चित्रा म्हणजे एखाद्या स्पेसीतला राहिलेला शेवटचा सजीव असावा तसं चाललंय नुसतं!

काल तर गहजब झाला. लग्नाच्या तुळशीची कुंडीच फुटली. आता ती खरोखरीच लग्न झाल्यावर दुसर्या घरी आपलं कुंडीत नांदायला जाणार. मुळांच्या रेशीमगाठी मातीत जुळणार.

Rofl

खरे तर ताप आल्यावर अन्गावर सैलसर कपडे घाला असे डॉक्टर सान्गतात, तर ही बया गोधड्या पान्घरुन बसते. आता हे देसाई कुटुम्ब मुम्बईत रहात की कोकणात की पुण्यात? कारण तिन्ही ठिकाणी अजून थन्डीचा पत्ता नाहीये. गुलाबी थन्डीची स्वप्ने पडतात की काय हिला ती गोधडी पान्घरल्यावर्?:फिदी:

बेफीजी तिला बघुन पट्कन हाच शब्द आला होता तोंडात.

पिंट्या आणि चित्रा करेक्ट बेफीजी, त्या दुसर्‍या शिरेलीत ह्या दोघांचीच पेअर होती.

त्या अर्चूला आदे आणि मेदेचे सूत जुळलेले पाहवले नसल्यामुळे तिने एक चित्रा नावाची काडी रॉकेलमध्ये बुडवून दोघांच्या मधे आणून ठेवलेली आहे. आता फक्त भस्स्स्स्स्स कधी होते बघायचे.

पिंट्या आणि चित्रा करेक्ट बेफीजी>>> नको अंजू, पिंट्या छान आहे ती चित्रा बोअर / पकाऊ आहे. कायम रडका चेहरा असतो तिचा.

अग नताशा त्या दोघांची पेअर होती दुसर्‍या चॅनेलच्या शिरेलीत.

नक्कीच पिंट्या जास्त छान होता, मला आवडतो तो.

अग अन्जू तू त्या माझे मन तुझे झाले बद्दल म्हणतीयस का? त्यात पिन्ट्या, शेखरचा भाऊ आहे, कधीतरी उगवतो. त्यात ही चित्रा होती का?

हो रश्मी. त्यात ती चित्रा सिया होती. पण तिथे बरी वाट्ली. पिंट्याला तिथुन आता गायबच केले आहे. त्याचा लास्ट शॉट २१ एप्रिलला होता.

असं काही करु नको पियु नाहीतर ती हसायचं बंद करुन आणखिन वात आणेल सिरीयलीत. Lol
झंपट Lol पेक्षा चांगला शब्द मी आधी इथे लिहिणार होते चित्राबद्दलच पण तोही मला जरा जास्त (हार्श) वाटला म्हणुन मी तीला ही Proud सारखी दिसते असे लिहीले होते मागे. Lol पण असं बेफिकीर यांच्यासारखे लिहिता यायला पाहिजे .

झंपक नाही झंपट. लहानपणी बर्‍याचदा हा शब्द वापरला जायचा आमच्या फ्रेन्ड्समधे, तो तिला बघितल्यावर पटकन आठवला.

नको, नको. चित्राला मेल नको करुस. ती आदित्याला आणखीन विरक्तपणा आणुन त्याचा देवदास बनवेल. कारण इथल्या चर्चा वाचुन त्याचे उट्टे फेडावे कसे हा तिच्यापुढे प्रश्न असेल.:फिदी:

त्या पेक्षा आदे आणी मेदेलाच ही लिन्क फेसबुकावर पाठव. म्हणजे आदित्य कपाळावर झिपर्‍या आणुन हसणे बन्द करेल आणी मेघना चेहेरा पाडणे बन्द करेल.:फिदी:

Pages